Nagpur Accident : नागपूर अपघातप्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

Sat, 25 May 2024-11:02 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • नागपूर अपघातप्रकरणी तीनही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Accident : पुण्यातील हिट अँड रनची केस चर्चेत असतानाच उपराजधानी नागपुरातही असाच धक्कादायक अपघात घडलाय. नागपुरीतील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल भागातील झेंडा चौकात शुक्रवारी रात्री मद्यधुंद कारचालकाने बेदरकारपणे तिघांना उडवलं.. सचिन सुभेदार हे टपरीवर चहा प्याल्यानंतर बाईक काढत असताना भरधाव कारनं त्यांना जोरदार धडक दिली. रस्त्यावरून चालत असलेली नाझमिन शेख ही महिला आणि अवघ्या तीन महिन्यांचा चिमुकला जोहान हे देखील गंभीर जखमी झाले.
    याप्रकरणी पोलिसांनी सनी चव्हाण, अंकुश ढाले आणि आकाश महेरूलिया अशा तिघा आरोपांना अटक केलीय. सनी हा गाडी चालवत होता. .तीन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी...
    धक्कादायक म्हणजे आरोपींच्या गाडीत दारूच्या 3 बाटल्या आणि गांजा सापडलाय..पोलीस तपास सुरू. यापैकी सनी चव्हाण आणि अंकुश ढाले हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

     

  • पोर्श कारच्या अपघाताचं सिनेमॅटिक रिक्रीएशन करण्यात येणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Car Accident Recreation : पुणे कार अपघातप्रकरणी मोठी बातमी समोर येतेय. पोर्श कारच्या अपघाताचं सिनेमॅटिक रिक्रीएशन करण्यात येणार आहे.. पोलीस या कार अपघाताचं नाट्य रुपांतर करतील... गुन्ह्याचा तपास तसंच खटल्याच्या कामकाजात त्याचा उपयोग होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • आरोपी सुरेंद्र अग्रवालला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Surendra Agrawal Police Custody : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आता आजोबालाही तुरुंगवास.. ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. सुरेंद्र अग्रवालवर आधीही 4 गुन्हे दाखल असल्याची बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. दारुच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपाली सध्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय. त्याचे वडील विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर आजोबा सुरेंद्र अग्रवालला आज कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • एसी लोकलमधील फुकट्या प्रवाशांना बसणार चाप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai AC Local : मुंबईत प्रवाशांच्या सोयीसाठी एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतोय....मात्र यामध्ये फुकट्य़ा प्रवाश्यांची संख्याही तेवढीच वाढलीये...या फुकट्या प्रवाशांवर चाप बसवण्यासाठी आता एसी ट्रेनमध्ये टीसींचं विशेष पथक तैनात करण्यात आलंय

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रॅप साँग तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Car Accident Update : पुणे कार अपघात प्रकरणी रॅप साँग तयार करून व्हायरल करणा-यांविरोधात सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय...या प्रकरणी रॅपर आर्यन आणि इन्स्टावर व्हिडिओ व्हायरल करणा-या शुभम शिंदेवर गुन्हा दाखल केलाय...पुण्यातील अल्पवयीन आरोपी कार अपघात प्रकरणात, दिवसभर रॅप साँग समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झालं...काही वृत्तवाहिन्यांनी तो व्हिडिओ आरोपीची मुजोरी म्हणून चालवला. मात्र तारतम्य आणि संयम राखत, झी २४ तासनं तो व्हिडिओ प्रसारित केला नाही. प्रत्यक्षात तो व्हिडिओ रॅपर आर्यनचा असल्याचं समोर आलंय...'झी २४ तास' म्हणजे जबाबदार पत्रकारिता हे पुन्हा सिद्ध झालंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अरविंद केजरीवालांनी पाकिस्तानच्या माजी मंत्र्याला सुनावलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Delhi Arvind Kejriwal : केजरीवालांनी पाकिस्तानच्या माजी मंत्र्याला खडेबोल सुनावलेयत...भारतातील मतदान आमचा अंतर्गत विषय आहे, दहशतवादाच्या समर्थकांनी आमच्यात हस्तक्षेप करू नये असं प्रत्युत्तर फवाद चौधरींच्या ट्विटवर केजरीवालांनी दिलंय...फवाद चौधरींनी केजरीवालांच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं...शांतता आणि सद्भावनेने द्वेषाच्या आणि अतिरेकी शक्तींचा पराभव केला पाहिजे असं ट्विट फवाद चौधरींनी केलं होतं...यावर केजरीवालांनी पाकिस्तानच्या माजी मंत्र्याला सुनावलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राजाराम बंधाऱ्यावर पोलीस नियुक्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur : कोल्हापुरातल्या राजापूर बंधा-यावर पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय...राजापूर बंधाऱ्याच्या पुढेच कर्नाटक राज्यात पाणी टंचाई असल्याने अज्ञातांनी बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता...शासनाची कोणतीही परवानगी नसताना विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली...त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर राजापूर कृष्णा नदीवर असलेल्या शेवटच्या बंधाऱ्यावर बंदोबस्त वाढवलाय...दोन पोलीस आणि दोन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अशा चार कर्मचाऱ्यांचे दोन पाळीचे पथक नियुक्त करण्यात आलेयत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दहावीचा निकाल 27 मे रोजी लागणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    SSC Result Date : येत्या 27 मे रोजी दहावीचा निकाल लागणाराय...दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार येणार आहे...त्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

    बातमी पाहा - सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

  • मुंबईवर पाणीकपातीचं संकट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Water :  मुंबईवर पाणीकपातीचं संकट निर्माण झालंय. 30 मे पासून मुंबईत 5 टक्के तर 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात केली जाणारेय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयाचा पाणीसाठा कमी झाल्यानं खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय. पाणीकपातीच्या निर्णयानं घाबरून जावू नये. मात्र, पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन महानगरपालिकेनं केलंय

    बातमी पाहा - Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून 5 टक्के तर 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपात

  • बच्चू कडूंचे तिसऱ्या आघाडीचे संकेत?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bacchu Kadu Interview : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या आहेत.. मात्र आता राज्यात तिसरी आघाडी होणार का याची चर्चा आहे.. तसे संकेत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिले आहेत.. लहान पक्षांना सोबत घेऊन तिस-या आघाडीचा विचार करताय का, या टू द पॉईंट प्रश्नावर बच्चू कडूंनी हे संकेत दिले आहेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bacchu Kadu On Mahayuti : महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार असा इशारा दुस-या तिस-या कुणी नाही तर महायुतीतल्या बच्चू कडूंनीच दिलाय.. पैसा आहे, सत्ता आहे म्हणून अतिरेक करु नका असा घरचा आहेर बच्चू कडूंनी महायुतीला दिलाय.. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत बच्चू कडूंनी हा दिलाय....

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विधानपरिषदेसाठी ठाकरे गटाचे 2 उमेदवार जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vidhan Parishad Election : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच शिवसेना ठाकरे पक्ष कामाला लागलीय. उद्धव ठाकरे यांनी दोन उमेदवार जाहीर केलेत. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना उमेदवारी जाहीर केलीय...तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Pune Car Accident Update : कल्याणीनगर अपघाताचा तपास आणि याप्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी अपघातात मरण पावलेल्या दोघा संगणक अभियंत्यांच्या पालकांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केलीय. या अपघाताचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवावा अशी मागणी अपघातात मरण पावलेल्या अश्विनी कोष्टा यांचे वडील सुरेशकुमार कोष्टा यांनी केलीय. तर या अपघाताची दुहेरी खून म्हणून दखल घेण्यात यावी अशी मागणी अपघातातील मृत अनीश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधियांनी व्यक्त केलीय.. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नागपूर RTE घोटाळ्यात एका महिलेला अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur RTE Scam Update : नागपुरातील RTEघोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केलीये.. घोटाळ्यातील मुख्य आरोपी शाहिद शरीफ याच्या कार्यालयात ही महिला काम करत होती.. पालकांकडून येणारे पैसेही तिच्याच खात्यावर जमा केले जात होते.. त्यानतंर ती महिला शाहिदला पैसे काढून देत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी आधीच दोन आरोपींना अटक केली होती त्यामुळे आता या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या तीनवर गेलीये. या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद शरीफ मात्र अद्याप फरार आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्य सरकारनं दुष्काळाकडं लक्ष द्यावं - जयंत पाटील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jayant Patil On Drought : राज्यातील दुष्काळावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. इलेक्शनच्या मोडमधून सरकार बाहेर पडलं असेल तर थोडं दुष्काळाकडंही लक्ष द्यावं, असा निशाणा जयंत पाटलांनी राज्य सरकारवर साधलाय. शरद पवार पाठोपाठ आता जयंत पाटलांनीही आपल्या X अकाउंटवरून सरकारवर टीका केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राहुल, सोनिया आणि प्रियंका गांधींचं काँग्रेसला मत नाही

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातल्या निवडणुकीत गांधी कुटुंबातून मोठी बातमी समोर येतेय.. कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंब काँग्रेसला मतदान करणार नाही.. यंदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंबाला काँग्रेसच्या पंजाला मतदान करता येणार नाही.. तर गांधी कुटुंब यंदा आम आदमी पक्षाच्या झाडूला मतदान करणार आहे... दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी झालीय. त्यात नवी दिल्लीचा लोकसभा मतदारसंघ हा आम आदमी पक्षाला मिळालाय. याच नवी दिल्ली मतदारसंघात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचं मतदान आहे.. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात आपकडून सोमनाथ भारती हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहे. तर त्यांच्याविरोधात दिवंगत सुषमा स्वराज्या यांची मुलगी बांसुरी स्वराज भाजपकडून उभ्या आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विशाल अग्रवालभोवतीचा फास आणखी आवळणार

     

    Pune Vishal Agarwal : पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालभोवतीचा फास आणखी आवळणार आहे. अग्रवालविरोधात काही तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन पुणे पोलिसांनी केलंय. त्यामुळे अग्रवालच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यताय...आधीच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं प्रकरण समोर आल्याने सुरेंद्र अग्रवालची चौकशी सुरू आहे...त्यामुळे आता आणखी प्रकरणं बाहेर आल्यास अग्रवाल गोत्यात येणाराय...

  • पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

     

    Pune Car Accident Update : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. येरवडा पोलीस स्टेशनकडून तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आलाय. एसीपी सुनील तांबे आता पुढील तपास करणार आहेत. सहा दिवसांनंतर अखेर कल्याणीनगर अपघाताचा तपास हस्तांतरित करण्यात आलाय.. 

  • लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी मतदान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून 58 जागांवर मतदान होणार आहे.. यात जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघाचाही समावेश आहे... सहाव्या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.. या टप्प्यात धर्मेंद्र प्रधान, कृष्ण पाल सिंग गुर्जर आणि राव इंद्रजित सिंग हे 3 केंद्रीय मंत्री रिंगणात आहेत. तर तीन माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, मनोहर लाल खट्टर आणि जगदंबिका पाल हे देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.. त्यासोबतच मनोज तिवारी, कन्हैय्या कुमार, मनेका गांधी, बन्सुरी स्वराज, संबित पात्रा, राज बब्बर, निरहुआ हे उमेदवारही रिंगणात आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link