Pune Car Accident Update : अल्पवयीन आरोपीचा फेक व्हिडिओ, रॅपर आर्यनला नोटीस

Sun, 26 May 2024-10:49 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • अल्पवयीन आरोपीचा फेक व्हिडिओ बनवणाऱ्या रॅपर आर्यनला सायबर विभागाची नोटीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Car Accident Update :  रॅपर आर्यनला पुणे सायबर विभागानं नोटीस बजावली आहे. कार अपघातात दोघांचा बळी घेणा-या अल्पवयीन आरोपीचा फेक व्हिडिओ, आर्यननं बनवला होता. या प्रकरणी 48 तासांत चौकशीसाठी हजर होण्याबाबतची नोटीस त्याला देण्यात आलीये. अल्पवयीन मुलाचे आक्षेपार्ह व्हिडिओ आर्यननं इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. तर आपण फक्त कंटेंट क्रिएटर आहोत, त्यामुळे आपल्यावरचे गुन्हे मागे घेण्याची विनंती आर्यननं पोलिसांना केल्याची सूत्रांची माहिती आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • एवढी वर्ष हाथ की सफाई केली, नालेसफाईवरून शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    CM Shinde on Nalesafai : मुखमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मुंबईतील नालेसफाईचा आढावा घेतला... त्यांनी मुंबईतील पाच मोठ्या नाल्यांची पाहणी केली...यावेळी मुंबई महापालिका अयुक्तांसह महापालिका कर्मचारीही उपस्थित होते... त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी नालेसफाईच्या मोहिमेत नागरिकांनाही सहभागी होण्याचं आवाहन केलंय... एवढी वर्ष हाथ की सफाई केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • गोव्यामध्ये बस झोपडीत घुसल्याने अपघात, 4 जणांचा मृत्यू, 4 जखमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Goa Accident : गोव्यामध्ये बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत घुसल्याने मोठा अपघात झालाय...यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. तर 4 जण जखमी झालेत...जखमींवर मडगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे... अपघातावेळी चालक दारुच्या नशेत असल्याचं समोर आलंय...बस रोझेनबर्गर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने बस झोपडीत घुसली. यात झोपडीत झोपलेल्या मजुरांचा मृत्यू झाला.. सर्व मजूर मूळचे बिहारचे रहिवासी असल्याचं समजतंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • पुण्यातील बॉलर पबवर धाड, बार आणि स्टोअर रूम सील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Pub Raid : पुण्यातील बॉलर पबवर धडक कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागानं या पबवर धाड टाकली. रात्री पार्टी सुरू असताना बॉलर पबवर धाड टाकण्यात आली. यावेळी पबमधला बार आणि स्टोअर रूम सील करण्यात आली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास रोहित पाटलांचा विरोध

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rohit Patil Agitation : रोहित आर आर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. पाण्यासाठी बिरणवाडीमध्ये रास्ता रोको केल्यावरुन पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. तसंच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु केली. त्याला रोहित पाटलांनी विरोध केला. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर आपल्यावरही गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेऊन, रोहित पाटलांनी पोलीस ठाण्यामध्येच ठाण मांडलं. पुणदी सिंचन योजनेतून पाणी मिळावं या मागणीसाठी, सावळजसह परिसरातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • पुणे विद्यापीठात विनयभंग प्रकरण, अक्षय कांबळेंची काँग्रेसमधून हाकालपट्टी 

     

    Pune Molestation Case :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUIचा विद्यापीठ अध्यक्ष अक्षय कांबळेंची काँग्रेसमधून हकलपट्टी करण्यात आलीय. त्यांच्याकडील सर्व पदं काढून घेण्यात आलेत. अक्षय कांबळे यांच्यावर एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्राचे प्रभारी अर्जुन चपराना यांनी हकलपट्टीचा पत्र काढलंय.

  • घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी 29 मेपर्यंत भावेश भिंडेला पोलीस कोठडी

     

    Ghatkopar Hoarding  Case : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीये. भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत 29मेपर्यंत वाढ करण्यात आलीये. घाटकोपर होर्डिग दुर्घटनेत 19 निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले... या प्रकरणात भावेश हा मुख्य आरोपी होता.. दुर्घटनेनंतर तो फरार झाला होता.. त्याला उदयपूरमधून मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

  • 'भ्रष्टाचाराचा खेकड्याकडून नांग्या मारण्यास सुरूवात',रोहित पवारांची टीका

     

    Rohit Pawar : निलंबित आरोग्य अधिका-याच्या पत्रावर रोहित पवारांनी शिंदेंना सवाल विचारलेयत....नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का?...आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री शिंदे अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? असा सवाल रोहित पवारांनी शिंदेंना विचारलाय...

  • पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Molestation Case : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केलाय.. काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUIच्या अध्यक्षानं या तरुणीचा विनयभंग केलाय.. या प्रकरणी पीडित तरुणीनं चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.. त्यानंतर पोलिसांनी NSUIचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहा-फडणवीसांचे प्रयत्न', संजय राऊतांचा गंभीर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut on Nitin Gadkari : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केला...असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय...राऊतांनी सामनातील रोखठोकमधून गडकरींवरून मोदी शाह आणि फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत...  

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • पुणे अपघातप्रकरणी 100 पेक्षा अधिक सीसीटीव्हींची तपासणी

     

    Pune Car Accident Case : पुणे अपघात प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अ‍ॅक्शनमध्ये......गुन्हे शाखेकडून 100 पेक्षा अधिक सीसीटीव्हींची तपासणी......अग्रवालच्या घरापासून पब, अपघातस्थळाचे फुटेज हाती.....गुन्हे शाखेच्या हाती अनेक धागेदोरे लागण्याची शक्यता
     

  • नांदेड जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा

     

    Nanded Water : नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा आता सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात केवळ 21 टँकर सुरू असले प्रत्यक्षात अनेक गावात मात्र तीव्र पाणीटंचाई आहे. सर्वाधिक पाणीटंचाई मुखेड तालुक्यात आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने नागरिकांना पायपीट करत मिळेल तिथून पाणी आणावे लागत आहे

  • मुख्यमंत्री शिंदे आज मुंबईतील नालेसफाईची पाहणी करणार 

     

    Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी करणार आहे. पावसाळापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून ही पाहणी करण्यात येणारेय. पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी तुंबण्याचा त्रास होऊ नये म्हणून पावलं उचलण्यात येतायत 

  • अकोला ठरलं विदर्भातील सर्वात उष्ण शहर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    IMD Alert : अकोला जिल्ह्यातील तापमानाचा पारा 44 ते 45.8 अंश सेल्सिअसपर्यंत जातोय. त्यामुळे विदर्भात सर्वाधिक हॉट शहर म्हणून अकोल्याची नोंद झालीय. याच पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका पाहता अकोला जिल्ह्यात ३१ मेपर्यंत कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलेत. प्रादेशिक हवामान विभाग नागपूरनुसार 31 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

     

    Bhagwan Pawar : निलंबित आरोग्य अधिकाऱ्यानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून संबंधित मंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय...संबंधित मंत्र्यांनी कात्रजच्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं आणि खरेदीसाठी दबाव आणला होता...मात्र, नियमबाह्य कामात मदत न केल्याने निलंबित केल्याचा आरोप भगवान पवार यांनी केलाय. 

  • जळगावच्या रावेरला वादळी पावसाचा तडाखा

     

    Jalgaon Rain : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसलाय...यात शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा भुईसपाट झाल्यायत...मध्य प्रदेश महाराष्ट्रासीमेवरील हजारो हेक्टर वरील केळी बागांना वादळाचा फटका बसलाय...अटवडा, अजनाड, दोधे, नेहते, या पट्यात वादळाचा चांगलाच तडाखा बसल्याने अनेक ठिकाणी विद्युत खांब देखील पडले...यामुळे अनेक गावांचा विजपुरवठा खंडीत झालाय...ऐन कापणीला आलेल्या केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय...

  •  राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये आग्नितांडव, 32 जणांचा मृत्यू

     

    Rajkot TRP Game Zone fire : राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत होरपळून 9 मुलांसह 32 जणांचा मृत्यू झालाय.. या भीषण अग्नितांडवाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केलीय. याप्रकरणी गेम झोनच्या मालकासह पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. राजकोटच्या कालावड रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये लाकडी सामानाला आग लागली... बघता बघता या आगीनं रौद्र रूप धारण केलं. त्यात हा अख्खा गेम झोन जळून खाक झाला...अनेक लहान मुलं इथं गेम खेळायला गर्दी करतात...या आगीत त्यांच्यापैकी अनेकांचा बळी गेल्याचं सांगितलं जातंय. दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय...

  • सांगली जिल्हा बँकेत महाघोटाळा

     

    Sangli District Bank Scam : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दुष्काळ निधी अपहाराची व्याप्ती आता आणखी वाढलीय. दुष्काळ आणि अवकाळ मदत निधीतील गैरव्यवहार प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे 6 शाखेतून एकूण दोन कोटी 43 लाखांचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय..याप्रकरणी संबंधित शाखेच्या अधिका-यांसह कर्मचा-यांवर कारवाई करत पाच जणांना बँक प्रशासनाकडून निलंबित करण्यात आलंय. याआधी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं,त्यामुळे आता घोटाळयाप्रकरणी एकूण आठ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय. 219 शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीमही सुरू आहे

  • नाशिकमध्ये सुराणा सराफा ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड

     

    Nashik Income Tax Department Raids : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने टाकलेल्या छापात सुमारे 26 कोटी रुपयांची रोकड हाती लागलीय...तसेच 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आलेयत...सलग 30 तास झाडाझडती घेतली. यात नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकाने ही कारवाई केली. 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरू केले. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स, बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.

  • रेमल चक्रीवादळ आज बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Remal Cyclone : रेमल चक्रीवादळ आज बंगालच्या किनारपट्टीवर धडकणाराय. पुढील 6 तासांत वादळाचं मोठ्या चक्रीवादळात रुपांतर होणारेय. या वादळाचा ओडिशा राज्यालाही फटका बसणारेय. उत्तर ओडिशात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किना-यावर अलर्ट जारी करण्यात आलाय.एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्यायत...या चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यताये. मात्र, यामुळे महाराष्ट्राला काहीही धोका नसल्याचं सांगण्यात आलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link