Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
'परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1', उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
Devendra Fadnavis : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1 असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी X या सोशल मीडियावरून केलीय. एप्रिल ते सप्टेंबर 2023 या 6 महिन्यांच्या कालावधीत राज्यात 65 हजार 502 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.. कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातपेक्षा झालेल्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा महाराष्ट्रात जास्त FDI आल्याचा दावा फडणवीसांनी केलाय... 2022-23 या गेल्या आर्थिक वर्षात 1 लाख 18 हजार 422 कोटींची परकीय गुंतवणूक झाली होती. आता यंदाच्या वर्षातही परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रानं अव्वल नंबर कायम ठेवलाय.
दिल्लीत 2 दिवसांनी इंडिया आघाडीची बैठक होणार
Mukul Wasnik : दिल्लीत दोन दिवसांनी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.. आतापर्यंत इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाहीये. दरम्यान दिल्लीत होणा-या बैठकीतही पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा होणार नाही अशी माहिती काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
पुण्यात महायुतीत ठिणगी?
Pune Mahayuti : पुण्यात महायुतीत ठिणगी पडलीय.अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकासनिधी मिळत नसल्याचा भाजप आणि शिंदे गटाचा आरोप आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केलीय. तब्बल 800 कोटींचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केलाय. हा 800 कोटी रुपयांचा निधी तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN 1चे 10 रुग्ण
Corona JN 1 in State : राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN 1 चे १० रुग्ण झालेत. आज राज्यात ३७ नवीन रुग्णांचं निदान झालं. तर राज्यात आज दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. JN1 व्हेरियंटचे १० रुग्ण सापडलेत. ठाण्यात ५, पुण्यात ३, सिंधुदुर्गात १ तर अकोल्यात नव्या व्हेरियंटचा एक रुग्ण सापडलाय.
अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांना नव्या गाड्यांचं मिळणार गिफ्ट
Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या गाड्या गिफ्ट दिलंय. जिल्हाध्यक्षांसाठी नव्या 40 गाड्या मुंबईत दाखल झालेत. सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या गाड्या मिळणार. मुंबईतील पक्षकार्यालयाबाहेर गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'राममंदिर उभारल्याचा आनंद','बाबरी पाडल्याचं जबाबदारी केवळ बाळासाहेबांनी घेतली','राममंदिर उभारणीत अनेकांचं योगदान','नाना पाटेकर निवडणूक लढवण्याबाबत ऐकलेलं नाही', शरद पवार यांचं वक्तव्य.
कोल्हापूरात अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई
Kolhapur | Action On Illegal Masjid : कोल्हापूरात अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यात आलीय. लक्षतीर्थ वसाहत भागातल्या अनधिकृत मशिद आणि मदरसावर महापालिकेनं कारवाई केलीय. लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृत मशीद आणि मदरसा उभारल्याचा महापालिकेला संशय आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात मशीद आणि मदरसाचा पंचनामा करण्यात आला.महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मशीद आणि मदरसाला टाळं ठोकलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
ऑनर किलिंग रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
Honour killing : ऑनर किलिंगसारखे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच पोलीस बंदोबस्त असलेली सुरक्षागृहे उभारणार आहे... सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आता अशी सुरक्षागृहे उभारली जाणार आहेत. आंतरजातीय तसंच आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांना याठिकाणी निवासासोबत पोलीस सुरक्षा उपलब्ध केली जाणाराय.. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सुमारे वर्षभर याठिकाणी जोडप्यांना राहता येईल. या सेवेसाठी नाममात्र शुल्क आकारलं जाणाराय... गृह खात्याच्या या निर्णयाचं जात पंचायत मूठमाती अभियान या संस्थेनं स्वागत केलंय...
उद्धव ठाकरेंना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांना रामलल्ला प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण पाठवल्याची सूत्रांची माहिती मिळतेय.
पुण्यात तब्बल 10 सिलेंडरचा स्फोट
Pune Cylinder Blast : पुण्याच्या विमानतळ परिसरात बेकायदा सिलेंडर साठ्याचा स्फोट झाला. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हे सिलेंडर ठेवण्यात आले होते. सिंबोयसेस कॉलेजजवळ, रोहन मिथिला इमारतीलगत सिलेंडरच स्फोट झालाय. त्यापैकी 10 सिलेंडरचा स्फोट झाला.अजूनही त्या ठिकाणी 50 सिलेंडर आहेत. सिलेंडरचा स्फोट होऊन त्या ठिकाणी आग लागलीय.
माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार?
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार का? तर माधुरी म्हणते राजकारण नको रे बाबा...माधुरी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. माधुरीने आपल्या अभिनयासह नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. माधुरी दीक्षित निर्मित 'पंचक' (Panchak) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दरम्यान बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने डॉ श्रीराम नेनेंसोबत झी २४ तासच्या लीडर्स या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने राजकारणात एन्ट्री करणार का? याबद्दल खुलासा केला आहे. काय म्हणाली माधुरी पाहा...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
कोरोनानं पुन्हा सर्वांची चिंता वाढवलीये
Corona JN.1 Varient : कोरोनानं पुन्हा सर्वांची चिंता वाढवलीये.. कोरोनाचा नवा व्हॅरियंट JN.1ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 100 पार गेलीय. देशात 26 डिसेंबरपर्यंत 109 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी सर्वाधिक 36 रुग्ण गुजरातमधले आहेत तर कर्नाटकात 34 रुग्ण आहेत. महाराष्ट्रात JN.1चे 9 रुग्ण झालेत. दरम्यान गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 529 नवे रुग्ण आढळून आले असून तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय..यात कर्नाटकमधील दोघांचा तर गुजरातमधील एका रुग्णाचा समावेश आहे.. नव्यानं आढळून आलेल्या रुग्णांसह देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता चार हजारांहून अधिक झालीये. सुट्ट्या आणि नव्या वर्षाचं सेलिब्रेशन यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखीन वाढलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पुण्यातील निधीवाटपावरुन महायुतीत ठिणगी
Pune Mahayuti : पुण्यात महायुतीत ठिणगी पडलीय. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकासनिधी मिळत नसल्याचा भाजप आणि शिंदे गटाचा आरोप आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केलीय. तब्बल 800 कोटींचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केलाय. हा 800 कोटी रुपयांचा निधी तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
देशात कोरोनाचे 529 नवे रुग्ण, 3 मृत्यू
India Corona : कोरोनानं पुन्हा सर्वांची चिंता वाढवलीये.. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 529 नवे रुग्ण आढळून आले असून तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय..यात कर्नाटकमधील दोघांचा तर गुजरातमधील एका रुग्णाचा समावेश आहे.. नव्यानं आढळून आलेल्या रुग्णांसह देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता चार हजारांहून अधिक झालीये. सुट्ट्या आणि नव्या वर्षाचं सेलिब्रेशन यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखीन वाढलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
लोकसभेसाठी काँग्रेसचं 'है तैयार हम'
Nagpur Congress Rally : काँग्रेस नागपुरातून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकणारेय. उद्या काँग्रेस पक्षाच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात सभा होतेय. त्यासाठी गांधी कुटुंब व्यासपीठावर एकत्र येणारेय. पक्षाध्यक्ष खरगेंसह सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधींसह काँग्रेसचे बडे नेते या महारॅलीला उपस्थित राहणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवारांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार?
Sharad Pawar Meet Bachchu Kadu : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी... बच्चू कडू महायुती सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या अमरावती दौऱ्यावर आहेत.. याच दौ-यात शरद पवार आणि बच्चू कडूंची त्यांच्या निवासस्थानी भेट होणार आहे.. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याने चर्चांना उधाण आलंय.. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू उमेदवार देणार आहेत.. कडू यांचे निकटवर्तीय रवींद्र वैद्य प्रहारचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होणार असली तरी बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
OBC विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
OBC Student : राज्यातल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आता इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी शिक्षक मिळणार आहेत.. 141 खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 282 शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत.. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी हा निर्णय घेतलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
गोळ्या घातल्या तरी माघार नाही - मनोज जरांगे
Manoj Jarange : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंनी राज्य सरकारला आता निर्वाणीचा इशारा दिलाय... गोळ्या जरी घातल्या तरी आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय... सरकार मराठा आरक्षण देत नसल्याने नाईलाजाने मुंबईत यावंच लागेल... आणि आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असाही इशारा जरांगेंनी दिलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut On BJP : भाजप म्हणजे पळपुटे रणछोडदास असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय.. देशातील कोणत्याही साहसी लढ्यात भाजपचा सहभाग नसल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा टप्पा जाहीर
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत सर्वात मोठी बातमी.. भारत जोडो यात्रेचा पुढचा टप्पा आता जाहीर झालाय... राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची सुरुवात मणिपूरपासून होईल... तर या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे.. 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा असेल... एकूण 6 हजार 200 किलोमीटरची ही यात्रा असेल.. मणिपूर, नागालँड, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल.. राहुल गांधींच्या याआधीच्या भारत जोडो यात्रेतही महाराष्ट्राचा समावेश होता..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचं लवकरच लोकार्पण
Shivadi-Nhava Sheva Bridge : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणा-या शिवडी- न्हावाशेवा सागरी सेतूच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरलाय...जानेवारी किंवा फेब्रुवारीत लोकार्पण होण्याची शक्यता आहे.. लोकसभा निवडणुकीआधी लोकार्पण होणार असल्याची माहिती मिळतेय. मुंबई ते नवी मुंबई, जेएनपीटी, मुंबई-गोवा महामार्ग तसंच रायगड जिल्ह्यातून दक्षिणेकडे जलदगतीने जाण्यासाठी या सागरी सेतूचा फायदा होणार आहे...या सागरी सेतूमुळे नवी मुंबई ते मुंबई प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य होणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे... 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.. त्यासाठी मंदिराचं बांधकाम आता जवळपास पूर्ण होत आलंय.. राम मंदिराची हीच EXCLUSIVE दृश्य तु्म्ही झी २४ तासवर पाहू शकता.. अगदी भव्य आणि दिव्य असं राम मंदिराचं बांधकाम आहे... प्राणप्रतिष्ठा होणा-या जागेचं काम जवळपास पूर्ण झालंय.. मंदिराच्या बाहेरच्या भागाच्या कामावर शेवटचा हात फिरवला जातोय.. तर मंदिराच्या आत सुंदर नक्षीकाम करण्यात आलंय.. पुराण काळातल्या कथांची चित्रही या मंदिरावर साकारण्यात आली आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक
Maratha Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक आज पुण्यात होणार आहे... मात्र या बैठकीआधीच नाराजीनाट्यही पाहायला मिळतंय.. आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम हे बैठकीला जाणार नाहीत.. मागासवर्ग आयोगानेही त्याबाबत मेश्राम यांना नोटीस पाठवलीय.. चंद्रलाल मेश्राम यांनीही या नोटीसला उत्तर दिलंय.. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक पार पडणार आहे.. मराठा समाज तसंच खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामाचा आढावा यात घेतला जाईल.. तसंच ओबीसी संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून मिळालेल्या प्राप्त पत्रावर निर्णयही घेतला जाईल...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राहुल गांधी कुस्तीच्या आखाड्यात
Rahul Gandhi Meet Wrestlers : कुस्तीपटूंच्या वादात आता राहुल गांधींनीही केंद्राविरोधात शड्डू ठोकलाय.. राहुल गांधींनी कुस्तीपटू दीपक पुनियासह इतर कुस्तीपटूंचीही हरियाणात भेट घेतली.. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात पैलवान रस्त्यावर उतरले आहेत.. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या बृजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी पैलवानांनी केलीय.. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा वादही ताजा आहेच.. साक्षी मलीकनं कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला तर बजरंग पुनियानंही पद्मश्री पुरस्कार परत केला.. विनेश फोगटनं देखील खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार हे दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केलाय.. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींची कुस्तीपटूंसोबतची ही भेट महत्त्वाची मानली जातेय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे इंडिया आघाडी नेत्यांना निमंत्रण
India Alliance Leader Invitation : 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.. यासाठी जगभरातल्या नेत्यांसोबत भारतातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलंय.. मात्र यामुळे इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट उभं राहिलंय.. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे नेते द्विधा मनस्थितीत दिसतायत.. राम मंदिर सोहळ्याला जायचं की नाही यावरुन या नेत्यांमध्ये गोंधळ दिसतोय.. कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय हायकमांडचा असेल असं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय.. तर निमंत्रण मिळाल्यास कार्यक्रमाला जाणार असं समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी म्हटलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राजधानी दिल्ली धुरक्यात हरवली
Delhi Smug : राजधानी दिल्लीत आज शून्य दृश्यमानता नोंदवण्यात आलीये.. दाट धुकं आणि प्रदूषणाचा दिल्लीतील रस्ते, रेल्वे आणि विमान सेवेला मोठा फटका बसलाय.. 14 रेल्वे गाड्या उशीरानं धावत आहेत तर 30 विमानांची उड्डाणं उशिरानं करावी लागलीत... प्रदूषणामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांकही 381पर्यंत पोहोचला.. दिल्लीतील आनंद विहारमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झालीये.. दरम्यान उद्याही दिल्लीवर दाट ते अतिदाट धुकं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
कोरोना वाढतोय, काळजी घ्या...
State Corona Update : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच आहे... राज्यात मंगळवारी 37 नवे रुग्ण आढळले... चिंताजनक म्हणजे मुंबईतल्या सर्वाधिक 19 रुग्णांचा यात समावेश आहे.. राज्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या 168 वरुन 194 इतकी झालीय.. पुणे, हिंगोली, रायगड, नवी मुंबई, कोल्हापूर, नागपूरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.. राज्यात JN1 या व्हेरिएंटचे आतापर्यंत 10 रुग्ण आढळले आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
दिल्लीच्या इस्रायली दूतावासाजवळ स्फोट
Blast Near Israel Embassy In Delhi : दिल्लीच्या इस्रायली दुतावासाजवळ काल स्फोट झाला.. दिल्ली पोलीस तसंच इतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.. पोलिसांना घटनास्थळावर इस्रायली राजदूतांना उद्देशून एक पत्र सापडलंय.. NIA आता या पत्रासह स्फोटाचाही तपास करतेय.. इस्रायली दूतावासाजपळ याआधीही स्फोट झाला होता.. जानेवारी 2021 तसंच फेब्रुवारी 2012 मध्ये हे स्फोट झाले होते.. तेव्हा या जुन्या स्फोटाचा आणि आताच्या स्फोटाचा काही संबंध आहे का याचा तपास NIA करतेय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शेतकऱ्यांसाठी शरद पवार गट आक्रमक
Farmer Akrosh Morcha : राज्यातल्या शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर शरद पवार गट आक्रमक झालाय... शेतक-यांसाठी शरद पवार गट आजपासून आक्रोश मोर्चा काढणार आहे... खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.. मोर्चाची सांगता शरद पवारांच्या जाहीर सभेने होईल. कांदा प्रश्न, पिक विमा, दुधाचे दर तसंच शेतक-यांची कर्जमाफी अशा विविध प्रश्नांवर हा मोर्चा काढला जाईल.. याचसंदर्भात खासदार अमोल कोल्हेंनी काल शरद पवारांची भेटही घेतली होती
बातमीचा व्हिडीओ पाहा -