Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
मराठा आरक्षण अध्यादेश ही जनतेची दिशाभूल- उल्हास बापट
Ulhas Bapat on Manoj Jarange : मराठा आरक्षण अध्यादेश ही जनतेची दिशाभूल आहे. असं आरक्षण राज्यघटनेच्या आधारे देता येत नाही.. असं विश्लेषण घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केलंय. पाहुयात कायदेतज्ज्ञ बापटांना आरक्षणाबद्दल काय वाटतं..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
राज ठाकरेंनी टोलनाक्यावर किती पैसे मोजले?- गुणरत्न सदावर्ते
Gunaratna Sadavarte on MNS : राज ठाकरेवर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केलीय. राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? त्यांनी टोलनाक्यावर किती पैसे मोजलेत?, अशी टीका सदावर्ते केलीय. तर सदावर्ते हा मूर्खांच्या नंदनवनात फिरणारा माणूस असल्याचा पलटवार मनसेनं केलाय
आरक्षण कधी मिळणार ते मुख्यमंत्र्यांना विचारा- राज ठाकरे
Raj Thackeray on Manoj Jarange : राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन केलंय. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
नितीश कुमार भाजप युतीमुळे NDAमध्ये अस्वस्थता?
Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय वातावरण तापलंय, कारण नीतीशकुमार RJDसोबतची आघाडी सोडून उद्याच भाजपसोबत शपथविधी करणार आहेत हे जवळपास निश्चित झालंय. अमित शाहा स्वत पटनातील शपथविधीला हजर राहू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. दुसरीकडे नितीशकुमारांना लालू प्रसाद यादव आणि मल्लिकार्जुन खरगेंनी फोन केले मात्र नितीशकुमारांनी त्यांचे फोन उचलले नाहीत. नितीशकुमार यांच्या भूमिकेमुळे भाजपसोबतचे मित्रपक्ष दुखावलेत. चिराग पासवान यांनी आपण आहेत तितक्याच जागा लढवणार, एकही जागा कमी होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलीय. तर आता भाजपसोबत असणा-या माजी मुख्यमंत्री जितन राम मांझीनी थेट राहुल गांधींशी फोनवरुन चर्चा केल्याचं समजतंय. राहुल गांधींनी मांझींना इंडिया आघाडीत सामील होण्याचं आमंत्रण दिलंय. त्यामुळे एकीकडे नितीश-भाजप आघाडी निश्चित झालेली असताना भाजपच्या मित्रपक्षांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मराठा समाजाची एकी पाहायला मिळाली- आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray on Maratha Reservation : मराठा समाजाची एकी महत्त्वाची होती ती पहायला मिळाल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीये...त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर पाहिल्यानंतर वक्तव्य करणार असल्याचंही ते म्हणाले
बातमीचा व्हिडीओ पाहा-
नेमकं मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला?- नाना पटोले
Nana Patole on Maratha Reservation : नेमकं कोणाच आरक्षण काढून, कोणाला दिलं, किंवा आरक्षण नेमकं कोणाला किती मिळेल?, ओबीसी समाजाला फसवलं की मराठा समाजाला फसवलं? असे सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलेत. तसंच ऐतिहासिक निर्णय घेताना दोन उपमुख्यमंत्री का नव्हते? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
सरसकट प्रमाणपत्रांचा विषय अनुत्तरीत- अशोक चव्हाण
Ashok Chavan on Maratha Reservation : मराठा समाजाचा विजय झाला ही आनंदाची बाब आहे...मात्र सरसकट प्रमाणपत्रांचा विषय अद्यापही अनुत्तरीत असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणालेत...
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावरून वाद
Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून आता वादाला तोंड फुटलंय...मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं पत्र दिल्याचं जरांगे म्हणाले...तर सरकार गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत...तर चुकीचा पायंडा पडेल, असं म्हणत भुजबळांनी मुद्द्याला विरोध दर्शवलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मराठा आंदोलनात जाळपोळ, तोडफोडीचे गुन्हे मागे नाहीत- फडणवीस
Devendra Fadnavis on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिलं असलं तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात येणार नाहीत असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. जाळपोळ, तोडफोड, सरकारी कार्यालयांचं नुकसान अशा स्वरूपाचे गुन्हे कोर्टाच्या आदेशानुसारच मागे घेता येतात असंही फडणवीसांनी सांगितलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मराठा आरक्षण अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार - गुणरत्न सदावर्ते
Gunaratna Sadavarte : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिलाय.. कायद्यानुसार हे आरक्षण टिकणारं नाही असंही ते म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मराठ्यांचा विजय झाला ही आनंदाची बाब - अशोक चव्हाण
Ashok Chavan : मराठा समाजाचा विजय झाला ही आनंदाची बाब आहे...मात्र सरसकट प्रमाणपत्रांचा विषय अद्यापही अनुत्तरीत असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणालेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मनोज जरांगे यांच्या लढ्याल यश
Vashi Eknath Shinde : मराठा समाजाच्या पाठिशी सरकार उभं असून, मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार असं आश्वासन शिंदेंनी दिलंय...आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या शैक्षणिक सवलती मराठ्यांना मिळणार आहेत...तसंच सगे सोय-यांबाबत अध्यादेश काढण्यात आलाय...नोंदी मिळणा-यांना प्रमाणपत्र दिले जातील अशी माहिती मुख्यमंत्र्य़ांनी दिली...आरक्षण देणार म्हणून शिंदेंनी शपथ घेतली होती...ती शपथ पूर्ण केल्याचंही शिंदेंनी म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मराठ्यांच्या गुलालचा अपमान करु नका - जरांगे
Vashi Manoj Jarange : अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे...उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका, अशी विनंती जरांगेंनी शिंदेंना केलीय...आरक्षणातील कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मी सर्वात पुढे राहीन असं आश्वासन जरांगेंनी दिलंय...या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी पुन्हा मुंबईत उपोषणाला येणार असा इशारा जरांगेंनी दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश
Vashi Maratha Jallosh : जरांगेंच्या लढ्याला यश मिळताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी जल्लोष साजरा केलाय...मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगेंनी ज्युस पिऊन उपोषण सोडलंय...नव्या अध्यादेशात सगे सोय-यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलाय...त्यामुळे मराठा आंदोलकांनी विजयी जल्लोष साजरा केलाय...
रामलल्लाच्या चरणी भाविकांनी तब्बल साडेतीन कोटींचं दान
Aayodhya Ram Mandir : अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरु आहे.. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पाच दिवसांतच रामलल्लाच्या चरणी भाविकांनी तब्बल साडेतीन कोटींचं दान अर्पण केलंय... काल 26 जानेवारीच्या दिवशी तब्बल सव्वातीन लाख भाविकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलंय.. दिवसेंदिवस भाविकांचा ओघ वाढतच आहे.. वाढती गर्दी पाहता पोलिसांनी अनेक ठिकाणी मार्गही वळवण्यात आलेत..
मनोज जरांगेंना सर्व कागदपत्रं दिलीत - दीपक केसरकर
Deepak Kesarkar : राज्य सरकारनं सर्व कागदपत्र जरांगेंना दिली असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय...मध्यरात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली...त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वत: जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी वाशी येथे येणार असल्याचंही केसरकरांनी यावेळी सांगितलं....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या लढ्याला यश
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या लढ्याला अखेर यश आलंय...सरकारकडून जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्यायत...नव्या अध्यादेशात सग्या सोय-यांच्या मुद्याचा समावेश करण्यात आलाय...त्यामुळे जरांगे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार आहेत...वाशीत आज जरांगे विजयी सभा घेणार आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -