Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
कांदा रोखण्याचं केंद्र सरकारचं मोठं पाऊल
Onion Export : सणासुदीच्या काळात कांदा दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय. प्रती मेट्रिक टनामागे 800 डॉलर निर्यात शुल्क लागू करण्यात आलंय. 31 डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातीवर मिनिमम एक्स्पोर्ट प्राईस अर्थात MEP लागू असेल. उत्पादनात घट झाल्यानं कांदा महागलाय. त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर प्रति मेट्रीक टनामागे 800 डॉलर निर्यातशुल्क लागू केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे
Kalyan Chandrashekar Bawankule : कल्याणमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले... कल्याणमधील जनतेशी बावनकुळे संवाद साधत असताना मराठा आंदोलकांनी गोंधळ घालायला सुरूवात केली... काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. गो बॅक बावनकुळे आणि एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या... पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Mumbai Uddhav Thackeray : महाराष्ट्रात भाजपला रोखण्याची ताकद केवळ शिवसेनेतच आहे. दुस-या कुणाचीही हिंमत नाही असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय. मुंबईला ओरबाडणं सुरू असून आधी हिरे बाजार गुजरातला नेला, बीएमसीच्या ठेवींवर डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अजित पवार 'भावी मुख्यमंत्री'
Ajit Pawar Banner : मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीसांच्या विडिओनंतर आता अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकलेत... पुण्यात अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत.. विकासाचा वादा, अजितदादा! भावी मुख्यमंत्री असा उल्लेख या बॅनरवर आहे... देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ ट्विटनंतर अजित पवार समर्थकांनी ही पोस्टरबाजी केलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अशोक चव्हाणांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले
Nanded Ashok Chavan : काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर मराठा आंदोलकानी फाडले. नांदेड जिल्ह्यातील माहुरमध्ये हे बॅनर लावण्यात आले होते. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असल्यानं आपण वाढदिवस साजरा करणार नाही असं अशोक चव्हाण यांनी पूर्वीच जाहीर केलं होतं. अशोक चव्हाण यांचा वाढदिवस असल्यानं नांदेड जिल्हयात काही ठिकाणी त्यांच्या समर्थकानी बॅनर लावले होते.सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडून अशोक चव्हाणांचा निषेध केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
माजी आमदार बदामराव पंडितांची गाडी फोडली
Beed Badamrao Patil : मराठा आरक्षणासाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बीडच्या मादळमोहीत ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची गाडी फोडण्यात आलीय. पंडित हे मोही माता यात्रेसाठी मादळमोही इथं आले होते त्यावेळी संतप्त मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी फोडली आणि घोषणाबाजी केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी तातडीची बैठक
Maratha Reservation Meet : सोमवारी मंत्रालयात मराठा आरक्षणासंबंधी तातडीची बैठक बोलावण्यात आलीय, सकाळी १० वाजता ही बैठक होणार आहे.. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षणा मिळावं यासाठी नेमण्यात आलेली समिती मराठा उपसमितीला अहवाल सादर करणार आहे.. जरांगे पाटील यांचं उपोषण सोडविण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
ओपिनियन पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपची पिछेहाट
Madhya Pradesh Assembly Election : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत कुणाची सरशी होणार यावरून राजकारण तापलेलं असताना ओपिनियन पोलनुसार इथं भाजपची पिछेहाट होताना दिसतेय. 230 पैकी 132 ते 146 जागांवर काँग्रेसची सरशी होण्याची शक्यता आहे तर भाजपला केवळ 84 ते 98 जागा मिळू शकतात. या सर्व्हेक्षणानुसार मध्यप्रदेशच्या सातपैकी सहा विभागांमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेस बाजी मारण्याची शक्यता आहे. सर्वेनुसार काँग्रेसला 46 टक्के तर भाजपला 43 टक्के मतं मिळू शकतात. केवळ भोपाळ विभागात भाजपला ब-यापैकी जागा मिळू शकतील असा अंदाज आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मराठा आरक्षण प्रश्न 2 दिवसांत सुटणार - तानाजी सावंत
Tanaji Sawant On Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केलाय. मराठा आरक्षणावर राज्य सरकार साधक-बाधक विचार करतय. राज्य सरकार अत्यंत कळकळीनं या विषयावर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल असंही सावंत म्हणालेत
बातमीचा व्हिडीओ पाहा -
इन्कम टॅक्सची टोल नाक्यावर धाड
Income Tax Raid On Toll Naka : नाशिक पुणे रस्त्यावरील शिंदे टोलनाक्यावर इन्कम टॅक्सची धाड पडलीय... या महामार्गावर टोलचा झोल होत असल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात आली... मुंबईतून दोन वाहनांतून आलेले अधिकारी इथं तळ ठोकून बसलेत. त्यांनी संगणकावर बसून वाहनांची आणि टोलची तपासणी सुरू केलीय. फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुली होत असली तरी काही वाहनं संशयास्पदरित्या टोलमधून सोडली जात आहेत तसेच संगणकीय माध्यमातून फ्रॉड होत असल्याचा संशय आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
हिवाळी अधिवेशन बंद पाडू - निलेश लंके
Nilesh Lanke On Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे.गावोगावी नेत्यांना गावबंदी करण्यात आलीये. यातून विरोधीपक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदारही सुटलेले नाहीत. अशातच मराठा आरक्षणावरुन अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय. आरक्षण न मिळाल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू असा इशारा निलेश लंकेंनी सरकारला दिलाय.. मावळमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या आंदोलनात निलेश लंके सहभागी झाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
नाशिकमध्ये आणखी एक ललित पाटील
Solapur Drugs Factory : नाशिकमध्ये ललित पाटीलसारखेच आणखी बडे ड्रग्ज माफिया असल्याचं समोर आलंय.. सनी पगारे आणि सुमित पगारे हे पगारे बंधू ललित पाटीलपेक्षाही पुढे गेलेयत... पगारे बंधूंनी ललित पाटीलला टक्कर देत सोलापुरात ड्रग्जचा कारखाना उघडला होता... पोलिसांचं लक्ष वळवण्यासाठी या आरोपींनी स्वामी समर्थ केमिकल नावाने एक कारखाना सुरु केला होता.. नाशिकच्या पोलीस पथकानं पगारे बंधूंचा सोलापूरमधला एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. या कारखान्यातून दहा कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल ताब्यात घेण्यात आलाय.. तर सोलापुरातून त्यांच्या एका साथीदारालाही बेड्या ठोकण्यात आल्यात.. ड्रग्ज पेडलर अर्जुन पिवालच्या चौकशीतून पोलिसांना यासंदर्भातही माहिती मिळाली होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मुंबईत नवरात्रोत्सवात 4 हजार 700 घरांची विक्री
Mumbai Real Estate : मुंबई शहरात नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात 4 हजार सातशे घरांची विक्री झालीय.. यात 55% रिसेल घरांची विक्री तर 45% नवीन घरांची विक्री झालीय.. आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार नाईट फ्रँक इंडिया संस्थेने हा अहवाल दिलाय.. 2022 च्या तुलनेत नवरात्रोत्सवात घर खरेदीत 37 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली.. मुंबईकरांनी विकत घेतलेल्या 60% घरांच्या किमती या एक कोटींपेक्षाही अधिक आहेत.. घरांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असली तरी सर्वाधिक महाग शहर मुंबईच असल्याचंही अहवालात म्हटलंय.. परवडणा-या घरांच्या यादीत अहमदाबाद पहिल्या क्रमांकावर आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
धनगर समाजाकडूनही गावबंदी
Dhangar Reservation : मराठा समाजाने नेत्यांना केलेल्या गावबंदीत धनगर समाजाने उडी घेतलीय...सरकारने आम्हाला सांगितलेल्या वेळेत आरक्षण द्यावं...मराठा समाजासारखी आमची दिशाभूल करू नये...नाहीतर आम्हीही नेत्यांना गावबंदी करू असा इशारा यशवंत सेना प्रमुख बाळासाहेब दोडतोलेंनी दिलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
लातूरमध्ये रविकांत तुपकरांना मराठा तरुणांचा घेराव
Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लातूरमध्ये मराठा तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. मराठा तरुणांनी तुपकरांना घेराव घातला. इतकच नाही तर त्यांना सोफ्यावरूनही उठवलं. तुपकरांची सोयाबीनचा दर आणि पीकविमासंदर्भात बैठक होती. या बैठकीनिमित्त ते लातुरात आले होते. मात्र, बैठकीच्या ठिकाणी जाऊन मराठा तरुणांनी गोंधळ घातला. गावबंदी असताना शहरात का आलात... मराठा आरक्षणविरोधी आहात का.... अशा प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी त्यांनी तुपकरांविरोधात घोषणाबाजीही केली.
Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पाठिशी', 'शिंदे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार', 'शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका होणार', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.
हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प
Harbour Railway : हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झालीये. मालगाडीच्या इंजिनातील बिघाडामुळे वाहतूक ठप्प. दुपारी 1 वाजल्यापासून दोन्ही मार्गाची वाहतूक बंद. हार्बर मार्गाची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना फटका.
कार्तिकी एकादशीच्या महापूजेला मंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बंदी
Maratha Reservation : कार्तिकी एकादशीच्या महापूजेलाही मंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर सकल मराठा समाजाने बंदी घातलीय.. पंढरपुरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची होणा-या कार्तिकी महापूजेला मराठा समाजाने विरोध दर्शवलाय.. महापूजेला येत असाल तर मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच या... नाहीतर तुमच्या तोंडाला काळं फासू असा इशारा मराठा समाजाने दिलाय.. सकल मराठा समाजाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला तसं पत्रही देण्यात आलंय.. वारक-यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला विठूरायाची शासकीय महापूजा करावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केलीय..
अजित पवार माळेगाव कारखान्यात येणार नाही
Ajit Pawar : अजित पवार बारामतीच्या कार्यक्रमात येणार नाहीत... अजित पवार पुण्यातील जिजाई निवासस्थानी दाखल झालेत.. माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम अजित पवारांच्या हस्ते होणार होता... मात्र अजित पवारांना मराठा समाजाने गावबंदी केलीय.. माळेगाव कारखाना परिसरात मराठा समाजाकडून आक्रमक आंदोलनही करण्यात आलं. तेव्हा अजित पवारांनी माळेगावमधल्या कार्यक्रमाला जाणं टाळलंय..अजित पवार गाव बंदीचा आवाहन डावलून माळेगांवमध्ये आले तर मराठा समाजात चुकीचा संदेश जाईल. अजित पवार हे समाजाच्या हिताच्या विरोधी भूमिका घेत असल्याचं बोललं जाईल. तसं होऊ नये यासाठी अजित पवारांनी कार्यक्रम टाळल्याची माहिती मिळतेय.
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'शेतकऱ्यांची 62 हजार कोटींची कर्जमाफी केली','कृषी क्षेत्रात अनेक नव्या योजना सुरू केल्या', 'आयात करणारा देश निर्यात करणारा झाला', शरद पवार यांचं वक्तव्य.
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'स्थिती बिघडेल याची माहिती मनमोहन सिंगांनी दिली','देशाच्या कृषी क्षेत्रातील चेहरा मोहरा बदलला','गहू सोयाबीन तांदळाला हमी भावात चांगली वाढ','शेतीसोबत मत्स व्यवसायालाही प्रोत्सहन दिलं','जगभरात तांदूळ उत्पादनात भारताचा पहिल्या स्थानी','ऊस, कापसाच्या उत्पादनात भारत पहिल्या दुसऱ्या स्थानी', 'अन्नधान्य वाढ केल्यानं देश स्वयंपूर्ण', शरद पवार यांची माहिती.
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'पंतप्रधान हे संविधानिक पद','पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे','2004 ते 2014 कालावधीत मी कृषीमंत्री होतो','पद स्वीकारलं तेव्हा अन्नधान्य तुटवडा','2004 साली अन्नधान्याचा तुटवडा','मोदींचं वक्तव्य वस्तूस्थितीपासून दूर','गहू आयात करण्याचा निर्णय घेतला','गहू आयातीच्या फाईलवर 2 दिवस मी सही केली नाही', शरद पवार यांचं वक्तव्य.
शिंदे-अजित पवारांमुळे भाजपची प्रतिमा मलीन- संजय राऊत
Sanjay Raut on Devendra Fadanvis : काही काळासाठी फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर स्वागत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार नसेल. शिंदे-अजित पवारांमुळे भाजपची प्रतिमा मलीन . एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरून जावंच लागेल असं विधान खासदार संजय राऊत यांना केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'लोकांची लेकरं मरताना मजा घेऊ नका''सरकारनं आंदोलन गांभीर्यानं घ्यावं','आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नका','कोणत्याही नेत्याला गावात येऊ देऊ नका','उद्यापासून सरसकट गावागावात आमरण उपोषण करा','उग्र आंदोलन करू नका, शांततेत आंदोलन करा', मनोज जरांगे यांचं मराठा तरुणांना आवाहन.
मी पुन्हा येऊ शकत नाही वाटल्यानं ट्विट डिलीट- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची सत्ताच येणार नाही, तेव्हा कशाला नवरदेव बनताय असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावलाय.. फडणवीस पुन्हा येऊ शकत नसल्यानेच भाजपने ट्विट डिलीट केल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
उद्योगपती मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी
Mukesh Ambani Death Threat : उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.. धमकी देणा-या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटींची खंडणी मागीतलीये... काल एका अज्ञात व्यक्तीनं मुकेश अंबानींच्या इमेल आयडीवर धमकीचा मेल पाठवला.. त्यात पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
यवतमाळमध्ये अज्ञातांनी एसटी बस पेटवली
Yavatmal ST Bus : नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी एसटी बस पेटवून दिली. उमरखेड तालुक्यातील गोजेगाव जवळच्या पैनगंगा पुलावर बस पेटवण्यात आली.. दुचाकीवरुन आलेल्या एकाने ही धावती बस थांबवली. त्यानंतर मागून पाच ते सहा युवक आले... त्यांनी बसमधल्या 73 प्रवाशांना खाली उतरवलं आणि बसवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. ही बस नेमकी का आणि कशासाठी पेटवली याचा तपास आता पोलिसांकडून सुरु आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
शिंदे, फडणवीसांनी राजीनामा द्यावा- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : मराठा आरक्षणासाठी दिलेलं आश्वासन राज्य सरकारला पाळता आलं नाही.. तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.. मराठा आरक्षण देता येत नसेल तर खुर्ची खाली करा असं म्हणत वडेट्टीवारांनी शिंदे, फडणवीसांवर निशाणा साधलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
विधानसभा अध्यक्ष उद्या तुषार मेहतांची घेणार भेट
MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत चर्चा केलीय...राहुल नार्वेकरांची बिरेंद्र सराफ यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...तसंच विधानसभा अध्यक्ष उद्या देशाचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांचीही भेट घेणार आहेत...30 ऑक्टोबरपर्यंत नवे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाच्या आहेत...त्याअनुषंगाने वेळापत्रकात नेमके काय बदल करायचे? यावर कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
शरद पवार आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आरोपांवर शरद पवार काय पलटवार करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.. तर दुसरीकडे शरद पवार गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठकही होणार आहे... आगामी लोकसभा निवडणूक तसंच राज्यातल्या राजकीय परिस्थितीचाही आढावा शरद पवार घेणार आहेत.. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांसह महत्त्वाचे नेते या बैठकीला हजर राहणार आहेत...
जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे...जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी दुस-यांदा आमरण उपोषण सुरू केलंय...या उपोषणादरम्यान कोणतेही औषधोपचार आणि तपासणी करणार नसल्याचं जरांगेनी म्हटलंय...दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजता जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पैठणफाटा ते अंतरवाली सराटी असा कँडल मार्च काढण्यात येणार आहे...या कँडलमार्चमध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यताय...
अजित पवारांना बारामतीमध्येच गावबंदी
Ajit Pawar : आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक झालाय आणि त्याची झळ आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसलीय. अजित पवारांना बारामतीतच गावबंदी करण्यात आलीय. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाला अजित पवार येणार आहेत.. मात्र सकल मराठा समाजाने अजित पवारांना जोरदार विरोध केलाय.. यावर तोडगा काढण्यासाठी सकल मराठा संघटनेसोबत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पोलीस प्रशासनानं बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरलीय. मराठा आंदोलक अजित पवारांना गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी मोळी टाकू न देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिलाय. मात्र अजित पवार स्वत: येणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-