Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sun, 22 Dec 2024-6:30 pm,

Maharashtra breaking News Today Ajchya Thalak Batmya on December 22 aajchya Tajya Batmya Pune Mumbai Nagpur Political News in Marathi

Latest Updates

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    PM Modi Awarded Kuwait's Highest Honour : पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात आला आहे...  'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर'ने पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आलं आहे... कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांच्याकडून 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदींना कुवेतमध्ये देण्यात आला आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • ओबीसी नेत्यांनी बैठकीत छगन भुजबळांच्या भूमिकेवर पाठिंबा दर्शवला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    OBC Leaders Meet Over : मुंबईत ओबीसी बहुजन आघाडीची बैठक संपन्न.. ओबीसी बहुजन आघाडीची बैठक आज मुंबईतील महिला विकास मंडळ या ठिकाणी पार पडली.. बैठकीत ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर पाठिंबा दर्शविला आहे.. भुजबळ यांना मंत्री मंडळातून डावलल्यानंतर ओबीसी नेत्यांची ही पहिली बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपवेळी 'छगन भुजबळ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ' असा एकमुखाने नारा आणि घोषणा दिल्या आहेत.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची आज बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    OBC Leaders Meet : आज ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक..  प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली बैठक.. या बैठकीत ओबीसींच्या मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे.. याशिवाय छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजात असंतोष आहे. त्यामुळे याही विषयावर चर्चा होणार.. या बैठकीनंतर ओबीसी नेते संध्याकाळी उशिरा छगन भुजबळांची  भेट घेणार आहेत.

     

  • कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयाची दादागिरी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kalyan Marhan : कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयाची दादागिरी पाहायला मिळतेय...चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणा-याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आलीये...उत्तम पांडे असे मारहाण करणा-या इसमाचे नाव असून पांडे यांच्या पत्नीकडून देखील मारहाण करण्यात आलीये.. या बेदम मारहाणीत मराठी तरुण, तरुणाची पत्नी आणि आईला देखील मारहाण करण्यात आली आहे.. यात पोलीस कर्मचारी जखमी झालाय.. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीय... याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • फडणवीस, शिंदेंसोबत अर्थसंकल्प तयार करणार- अजित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : येत्या 3 मार्चला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. यात अर्थसंकल्प सादर केला जाणार असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना विश्वासात घेऊन तो तयार करणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. बारामतीत ते बोलत होते. सोमवारी आपण खात्याचा कारभार स्वीकारणार, असंही ते म्हणाले. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • 'छगन भुजबळ 20 वर्ष मंत्री होते',माणिकराव कोकाटेंनी भुजबळांना डिवचलं

     

    Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : भुजबळांनी नाराज व्हायचं कारण नाही-कोकाटे...भुजबळ 20 वर्ष मंत्री होते... माणिकराव कोकाटेंनी छगन भुजबळांना डिवचलं... भुजबळांनी समजून घेतलं पाहिजे-कोकाटे

  • छगन भुजबळांची सर्व पक्षांना आणि राज्याला गरज- गुलाबराव पाटील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     Gulabrao Patil On Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची सर्व पक्षांना आणि राज्याला गरज आहे. त्यामुळे त्यांची लवकरच नाराजी दूर करतील, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय. छगन भुजबळ ओबीसींचे मोठे नेते आहेत, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • शहापूर गोळीबारातील जखमी दिनेश चौधरींचा मृत्यू

     

    Shapur Crime : शहापुरात काल रात्री झालेल्या गोळीबारात जखमी ज्वेलरचा मृत्यू झालाय.... काल रात्री शहापूर शहरातील बाजारपेठेत महालक्ष्मी ज्वेलर्सवर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता..यात दिनेश चौधरी याच्या पाठीला गोळी लागली... त्याला उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आलं होतं.. मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झालाय... मोटारसायकलवरुन आलेले हे दोन्ही हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झालेत.. या घटनेमुळे शहापूर तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.. 

  • कुर्ल्यातील बस अपघातानंतर प्रशासनाला जाग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Best Bus : कुर्ल्यातील बेस्ट अपघातानंतर बेस्ट प्रशासनाला जाग...भाडेतत्त्वावरील बसेसना स्पीड लॉक लावणार...भाडेतत्त्वावरील गाड्यांना प्रतितास 50 किमीची वेगमर्यादा...वाहन चालकांसाठीही मार्गदर्शन तत्व जाहीर

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार',संजय शिरसाटांचा दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Sirsat : 'संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार'... संजय शिरसाटांचा पालकमंत्रिपदावर दावा...भाजपचीही पालकमंत्रिपदाची मागणी... संभाजीनगर पालकमंत्रिपद कोणाला? भाजप की शिवसेना?

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 2 दिवसांत पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होऊ शकते- शंभूराज देसाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shambhuraj Desai : मंत्र्यांचं खातेवाटप झाल्यानंतर आता लवकरच पालकमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.. दोन दिवसात पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होऊ शकते, असा दावा पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंनी केलाय. पालकमंत्रिपदासंदर्भात तिन्ही नेते निर्णय घेतील, असं ते म्हणालेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • विजय मिळवूनही लाजत फिरतोय- दिलीप वळसे पाटील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dilip Walse Patil : विजय मिळवूनही लाजत फिरतोय तर विरोधातले पराभव होऊनही पाटलांसारखं फिरतात, अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप वळसे पाटलांनी दिलीय. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचनाही वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्यात.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या कंपनीत संचालक',अंजली दमानियांचा आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकारावरून अंजली दमानियांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कंपनीत संचालक आहेत, असा आरोप अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात अंजली दमानियांनी ट्विटवर व्हिडिओ शेअर केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • कर्जतमध्ये बंदूक रोखून दहशत माजवण्याचा प्रयत्न

     

    Raigad : रायगडमध्ये बंदुकीचा धाक दाखवत तरुणावर गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आलीय. हा प्रकार कर्जतच्या साकोळमध्ये घडलाय. नारळाची वाडी इथं एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टर संजू जगदीश मोहिते यांना आरोपी शोएब बुबरे यांनी बंदुकीचा धाक दाखवत 30 हजार रुपयांची खंडणी मागितली. धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शोएब बुबरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस तपास करीत आहेत.

  • शरद पवार आज भीमथडी यात्रेला भेट देणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar : शरद पवार आज भीमथडी यात्रेला भेट देणार आहेत.. पुण्यातील पुणे कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर इथं 18वी भीमथडी यात्रा भरलीये.. या यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण कला, संस्कृतीचं दर्शन घडतं.. सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत ही यात्रा सुरु असते.. या यात्रेतून ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन मिळतं.. आज या यात्रेला शरद पवार भेट देणार आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • नाशिकमध्ये गळ्यात नायलॉन मांजा अडकल्यानं शिक्षक गंभीर जखमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik : नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने शिक्षक गंभीर जखमी झालाय... दुचाकीवरून जात असताना अचानक शिक्षकाच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला... यावेळी हा मांजा पकडण्याच्या नादात शिक्षकाचा तोल गेल्याने, शिक्षक दुचाकीवरून खाली पडला.. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झालीयं... मात्र या घटनेमुळे बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री शहरात अद्याप सुरूच असल्याचं समोर आलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या बसला आग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    A running bus caught fire on the Mumbai-Goa highway : मुंबई गोवा महामार्गावर धावत्या खासगी बसला भीषण आग लागली. आगीत बससह प्रवाशांचे साहित्य जळून खाक झालेत. ही बस मुंबईतील जोगेश्वरीहून मालवणकडं जात होते. बसमध्ये 34 प्रवासी होते. कोलाडमधील कोकण रेल्वे पुलाजवळ बसच्या मागील बाजूस स्फोट झाला आणि बसनं पेट घेतला. तातडीनं प्रवाशांना खाली उतरवण्यात आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link