Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 24 Dec 2024-7:44 am,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मनोज जरांगेंचा आजपासून गाठीभेटी दौरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील दोन दिवसीय परभणी जिल्हा दौऱ्यावर जाऊन गाठी भेटी घेणार आहेत. दोन दिवसीय परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज ते पाथरी, पोखर्णी, शिंगणापूर फाटा मार्गे दामपुरी इथे मुक्कामी असणारेत. तर उद्या दामपुरी वरून पूर्णा तालुक्यातील आलेगाव इथे येणार आहेत, त्यानंतर परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेणार आहेत, त्यानंतर मनोज जरांगे पाटील साळेगाव वरून बीड जिल्ह्यतील मस्साजोग इथे जाणार. पुढे नागझरी वरून अंतरवालीत येणार

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 3 दिवस हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट रात्रभर सुरु राहणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    The bar will be open all night on the 31st : नाताळसह नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आज उद्या आणि 31 डिसेंबरला हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स रात्रभर सुरु राहणार आहेत.. पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्यास गृहविभागानं परवानगी दिलीये.. या तीन दिवशी वाईनशॉप मध्यरात्री 1वाजेपर्यंत सुरु असतील तर परमीट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बीअरबार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.. खुल्या जागेत होणा-या संगीत कार्यक्रमांसाठीही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shyam Benegal : ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालंय. त्यांना बऱ्याच दिवसापासून क्रोनिक किडनीचा त्रास होता. मुंबईतल्या घरी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल यांनी समांतर सिनेमांना वेगळ्या उंचीवर नेलं. त्यांनी दिग्दर्शित केलेले अंकूर, मंथन, निशांत, भूमिका, जुबैदा हे सिनेमे आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेत. त्यांनी फक्त सिनेमेच बनवले नाहीत तर शबाना आझमी, नसिरुद्दीन शहा, एम पुरी, स्मिता पाटील यासारख्या कलाकारांनाही घडवलं. श्याम बेनेगल यांना आजवर पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उपमुख्यमंत्री अजित पवारांची रोखठोक भूमिका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : राज्यात महायुतीला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे आता आमदार रुसला फुगवा काढुन समजूत काढावं असं काहीच करावे लागणार नाही अशा शब्दात छगन भुजबळ यांच्यासह इतर नाराज आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट सुनावले देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे आणि मी नाराजांचा मान सन्मान ठेवण्याचं काम आम्ही करू अशा काळजी आम्ही नक्की करू असा ही इशारा अजित पवारांनी दिला आहे हवेली तालुक्यातील एका खाजगी कार्यक्रमावेळी अजित पवार बोलत होते

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कल्याणमध्ये तीन तलाकची धक्कादायक घटना

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kalyan Triple Talaq : कल्याण पश्चिममध्ये तीन तलाकची धक्कादायक घटना समोर आलीये,. एका 28 वर्षीय विवाहित महिलेला माहेरुन 15 लाख रुपये आणण्यासाठी पतीकडून मारहाण करण्यात आलाय.. पत्नीनं पैस न आणल्यानं तिला तलाक म्हणत तिला घराबाहेर काढल्याचा आरोप महिलेनं केलाय. याप्रकरणी पतीविरोधात कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 'शेख हसीना यांना परत पाठवा', बांगलादेशचं भारताला पत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bangladesh Letter To India : बांगलादेशाने भारताला पत्र लिहून माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी केलीये...मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकारने भारत सरकारला हे पत्र लिहिलं आहे..बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमध्ये शेख हसीना यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.. बांग्लादेशामध्ये ऑगस्टच्या अखेरीस सत्तापालट झाल्यानंतर शेख हसीना भारतात आल्या होत्या...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विनोद कांबळीची प्रकृती खालावली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vinod Kambli : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना भिवंडीच्या कोपर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे....कांबळी याना युरीन इंपेक्शन आणि पायाला दुखापत झाली होती..मात्र उपचार दरम्यान स्कॅन केल्यानंतर ब्रेनला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे..कांबळींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahayuti Minister Bunglow : महायुतीच्या मंत्र्याना बंगल्याचं वाटप करण्यात आलंय. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर दालनांचं वाटप जाहीर झालं. त्यानंतर अवघ्या काही तासांत मत्र्यांना कोणकोणते बंगले मिळणार याची यादी जाहीर करण्यात आलीय. चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला मिळालाय. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आलाय. पंकजा मुंडेंचा मुक्काम आता पर्णकुटी बंगला मिळणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर फडणवीस आणि शिरसाटांची टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadanvis, Sanjay Shirsat On Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या परभणी दौ-यावरून सत्ताधा-यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय.. राहुल गांधींचा दौरा हा राजकीय हेतूनं असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीये.. तर राहुल गांधींनी परभणीचा दौरा करणं ही राजकीय नौटंकी असल्याचं कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कल्याणच्या कोनगावात 4 बांगलादेशी नागरिकांना अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bhiwandhi Bangaladesh People Arrest : कल्याणच्या कोनगावमधील धर्मा निवास भागातील एका इमारतीतून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.. काही संशयास्पद कागदपत्रे,वस्तूसह 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीये...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ठाणे जिल्हा पालकमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thane Palakmantri : ठाणे जिल्हा पालकमंत्रिपदावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळतंय..शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरुये...तर गणेश नाईक यांनी सुद्धा पालकमंत्री पदासाठी जोर लावलाय...या आधी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक दोघे देखील ठाणे पालकमंत्री राहिले आहेत... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा

  • राहुल गांधींकडून सूर्यवंशी कुटुंबीयांचं सांत्वन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Parbhani Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींची हत्याच केली, पोलिसांनीच त्यांची हत्या केली असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याबाबत खोटी माहिती दिली असा आरोपही राहुल गांधींनी केलाय.  राहुल गांधींशी बोलताना सूर्यवंशी कुटुंब खूप भावूक झालं होतं. आम्हाला न्याय द्या, आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सूर्यवंशी कुटुंबीयांनी राहुल गांधींकडे केली 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • धुळ्यात 4 बांगलादेशी नागरिकांना अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dhule 4 Bangladeshi People Arrested : धुळे शहरात 4 बांगलादेशी नागरिकांना अटक...4 बांगलादेशींमध्ये 3 महिलांचा समावेश... शहारातील आग्रा रोगडवरील खासगी लॉजमधून अटक...धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • प्रत्येकाला पालकमंत्रिपद हवं असतं-आदिती तटकरे

     

    Aditi Tatkare : प्रत्येकाला पालकमंत्रिपद हवं असतं-आदिती तटकरे.. नेतृत्वाची संधी मिळावी असं प्रत्येकाला वाटत-तटकरे.. महायुतीतील 3 नेते निर्णय घेतील-आदिती तटकरे... 'फडणवीस, शिंदे, अजित पवार निर्णय घेतील' मंत्री आदिती तटकरेंची माहिती

  • राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार?

     

    Sanjay Raut : दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास आनंद- संजय राऊत...राज,उद्धव ठाकरे भेटीवर संजय राऊतांचं सूचक विधान...दोन्ही ठाकरेंवर महाराष्ट्राचं प्रेम- संजय राऊत...जे महाराष्ट्राच्या मनात तेच मलाही वाटतं - संजय राऊत... राज ठाकरेंच्या भाच्याचा लग्नसोहळा मुंबईतल्या दादरमध्ये पार पडला...या लग्न सोहळ्यात संपूर्ण ठाकरे कुटुंबिय एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय..राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बराचवेळ एकमेकांशी चर्चा करत असल्याचं दिसलंय.य.

  • ओबीसींच्या प्रश्नावर पुन्हा 8-10 दिवसानंतर फडणवीसांसोबत बैठक - छगन भुजबळ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    Chhagan Bhujbal  : ओबीसींवर अन्याय होऊ देणार असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती भेटीनंतर छगन भुजबळांनी दिलीय....ओबीसींच्या प्रश्नावर पुन्हा 8-10 दिवसानंतर फडणवीसांसोबत बैठक होणार'..जे घडलं त्यावर मार्ग काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन'...NCPला पर्याय म्हणून भाजपची निवड करणार का? प्रश्नाचं उत्तर भुजबळांनी टाळलं
     

  • छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट

     

    Chhagan Bhujbal met CM Fadnavis : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट... सागर बंगल्यावर अर्धा तास दोघांमध्ये चर्चा...भुजबळ थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार...मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज

  • छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल..छगन भुजबळ सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला...मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • गुजरातमधील अहमदाबादमध्ये पार्सलमध्ये स्फोट, 3 जण जखमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Blast in Gujarat : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका पार्सलमध्ये स्फोट झालाय.. दाम्पत्याचा घटस्फोट झाल्यानंतर बदला घेण्यासाठी पार्सलमध्ये स्फोट घडवून आणण्यात आलाय.. पार्सल स्फोटात तिघे जखमी झाले झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.. ..जावयानं सासरे, मेहुणा आणि पत्नीच्या मित्राला धडा शिकवण्यासाठी पार्सल स्फोट घडवून आणल्याचं तपासातून समोर आलंय...रुपेन बरोट हा स्फोटाचा मुख्य आरोपी आहे.. पोलिसांनी त्याच्यासह तिघांना अटक केलीय. 
     

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • सनी लिओनी छत्तीसगड सरकारी योजनेची लाभार्थी?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sunny Leone : राज्यातील गोरगरिबांना आर्थिक मदत व्हावी म्हणून योजना आणल्या जातात. मात्र जर आम्ही तुम्लाहा सांगितलं एक सुप्रसिद्ध अभिनेत्री सरकारी योजनेचा लाभ घेतेय. तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. अभिनेत्री सनी लिओनी सरकारी योजनेची लाभार्थी ठरलेय. छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेचा सनी लिओनीला लाभ मिळतोय. सनी लिओनीला दरमहा 1 हजार रुपये मिळतायत. सनी लिओनीच्य नावाचा नोंदणी फॉर्म व्हायरल होतोय. त्यामुळे खरचं अभिनेत्री सनी लिओनी हा लाभ घेतेय का अशी चर्चा सुरू झालीये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • यंदा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Chitrarath still not included in Republic day : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा दिसणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे.. कारण यंदा 15 राज्ये आणि केंद्रशासित राज्यांचे चित्ररथ निवडण्यात आलेत... मात्र या यादीत महाराष्ट्राला सध्या स्थान देण्यात आलेलं नाहीये.. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार की नाही याबाबत तूर्तास निश्चितता नाहीये.. तसेच दिल्लीतील चित्ररथालाही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती आहे... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • धनंजय मुंडे आज घेणार पत्रकार परिषद

     

    Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज घेणार पत्रकार परिषद...बीडमध्ये दुपारी 3 वाजता मुंडेंची पत्रकार परिषद होणार...धनंजय मुंडे पत्रकार परिषदेत काय बोलणार?..-देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपाला उत्तर देणार?...मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंडे माध्यमांशी बोलणार

  • एसटी महामंडळ संकटात, एसटी तोट्यात

     

    ST Mahamandal : एसटी महामंडळ संकटात, एसटी तोट्यात..रोज तीन ते साडेतीन कोटींचा तोटा..आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी निधीची प्रतीक्षा... स्वमालकीच्या 3 हजारांहून जास्त बस घेण्याची फक्त घोषणाच

  • राहुल गांधी आज परभणीत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rahul Gandhi : राहुल गांधी आज परभणीत...सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट...सूर्यवंशी कुटुंबीयांचं राहुल गांधी कऱणार सात्वंन...सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठीत झाला होता मृत्यू..परभणी हिंसाचारानंतर सूर्यवंशी यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात...राहुल गांधी दुपारी सव्वादोन वाजता सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेणार आहे...तसेच आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकोडे यांच ह्रदय विकाराने निधन झालं होतं, दुपारी 3 वाजता वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट राहुल गांधी घेणार आहेत,

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं, तिघांचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Accident : पुण्यात भीषण अपघात... फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडले...या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती...यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे तर सहा जण जखमी झाले आहेत...जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे...ही घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वाघोलीतील केसनंद फाटा येथे घडली...डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता असल्याची प्राथमिक माहिती...जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे....अपघातात जखमी झालेले सर्व जणं कामगार आहेत. रविवारी रात्रीच ते अमरावती येथून कामासाठी आले होते...या फूटपाथ वर एकूण १२ जण झोपले होते. तर बाकी फूटपाथ च्या बाजूला झोपड्यात झोपले होते...भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link