Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 26 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
रिफायनरी प्रकल्पाबाबत राष्ट्रवादीची सावध भूमिका
Sunil Tatkare : विधानसभा निवडणुकीपासून कोकणातील बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रिफायनरीचा रासायनिक परिणाम किती होईल याची तपशीलवार माहिती घेऊन मगच पुढील निर्णय घेता येईल असे मत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलीये...प्रकल्प व्हावायासाठी भाजपकडून पावले उचलली जात असताना या प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सावध पावित्रा घेतलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद - हसन मुश्रीफ
Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास सर्वात जास्त आनंद आपल्याला होईल अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
साईदरबारी बनावट पासची विक्री
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा देवस्थानमध्ये धक्कादायक प्रकार उघड झालाय. शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची दर्शन पासच्या नावाने फसवणुक झालीय. प्रकाशन विभागातील कर्मचाऱ्यानेच बनावट दर्शनाचे पास तयार केले होते. याप्रकरणी कर्मचारी सागर रमेश आव्हाडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर बनावट पास तयार करून भक्तांसह साई संस्थानचीही फसवणूक झाल्याचं उघड झालंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
धुळ्यात 2 गटांत तुंबळ हाणामारी
Dhule : धुळ्यात 2 गटांत जबर हाणामारी झाली. शेतात गुरे चारण्यावरून ठेलारी आणि चारण यांच्यात शिरपूर तालुक्यातील कळमसरेमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर तुफान मारहाणीत झालं. यात दोन्ही गटाचे 8 जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कळमसरे शिवारात राजेंद्र गुलाबसिंग गिरासे यांचं शेत कापूस उफाळून देण्याच्या मोबदल्यात मेंढ्या चारण्यासाठी ठेलारी यांनी विकत घेतलं होतं. मात्र दुस-या गटातील काही जणांनी शेतात बळजबरीने गुरे घालून चारु लागल्याने वाद झाला, याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर अंजली दमानियांचं ट्विट
Anjali Damania Tweet : बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा ट्विटद्वारे बोट ठेवलं आहे. बीडमधील शस्त्र परवान्यांची चौकशी लावा. तसंच विनाकष्ट पिस्तुल दाखवून पैसे कमवणं त्यांना सोपं वाटतं, अशी टीकाही त्यांनी केली. अशा रिल्सवरुन नवी पिढी काय प्रेरणा घेणार असा सवाल त्यांनी केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सोन्याप्रमाणे चांदीलाही आता हॉलमार्क
Hallmark In Silver : आता सोन्याप्रमाणे चांदीलाही हॉलमार्क येण्याची शक्यता आहे.. सरकार लवकरच याबबात महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.. चांदीला हॉलमार्क मिळाल्यानं ग्राहकांना चांदीच्या शुद्धतेची हमी मिळेल.. तसंच वजन आणि विक्रीच्या ठिकाणाचीही माहिती मिळू शकेल...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण
Balasaheb Thackeray Memorial : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. टक्के काम पूर्ण झाल्याने आता जानेवारीत या टप्प्याचे लोकार्पण करून स्मारक सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.दादर येथील महापौर निवासस्थान येथे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे वारसा जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संग्रहालय बांधण्यात येणार आहे. त्यानुसार येथे ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालय उभारण्यात येत आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सतीश वाघ हत्याप्रकरणी पत्नीच मुख्य सूत्रधार
Satish Wagh Case : सतीश वाघ हत्या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश बलकवडेंनी पत्रकार परिषद घेत अनेक घडामोडींचा उलगडा केलाय. सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ मुख्य सूत्रधार आहे.याप्रकरणी मोहिनी वाघला अटकही करण्यात आलीये. सतीश वाघ यांच्याकडून अनेकदा पत्नीला मारहाण केली जायची. या मारहाणीला कंटाळून पैशांचे सगळे व्यवहार आपल्य हाती घेण्यासाठी हा खून केल्याची कबुली मोहिनी वाघने दिलीये, या खूनाप्रकरणी मोहिनी वाघ आणि तिचा प्रियकर अक्षयला बेड्या ठोकण्यात आल्यात. सतीश वाघ यांच्या हत्येचा कट हा 15 दिवसांपूर्वी रचल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
लोणावळ्यात रक्षकच बनला भक्षक, पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Lonavala Crime : लोणावळ्यात रक्षकच बनला भक्षक...पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग...दारुच्या नशेत पोलिसांचे मुलीशी अश्लील चाळे...विसापूर किल्ल्याच्या पायथ्याजवळील घटना
राजगुरुनगरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करुन हत्या, आरोपी अटकेत
Rajgurunagar Crime :दुहेरी हत्याकांडाने पुण्यातील राजगुरुनगर हादरलं...2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करुन हत्या...पाण्याच्या टाकीत सापडले चिमुकल्यांचे मृतदेह...24तासात आरोपीला पुण्यातून अटक
आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट?
MLA Balaji Kinikar : शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आल्याची माहिती आहे....याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून २ जणांना ताब्यात घेतलं आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा-
नव्या वर्षात ठरणार पालकमंत्री?
Ganesh Naik : पालकमंत्रीपदाचा निर्णय नव्या वर्षात होण्याची शक्यता आहे.. एक जानेवारीनंतर पालकमंत्रिपदाचा निर्णय होणार असल्याचं मोठं विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय. पालकमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.. दरम्यान गणेश नाईकांच्या विधानामुळे आता नव्या वर्षातच पालकमंत्री मिळतील अशी शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
कल्याणमधील अत्याचार, हत्या प्रकरणी विशाल गवळीसह पत्नीला पोलीस कोठडी
Cases of torture, murder in Kalyan : कल्याणमधील अत्याचार, हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळीसह पत्नीला पोलीस कोठडी...2 जानेवारीपर्यंत दोघांना पोलीस कोठडी
राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार
A statue of Shivaji Maharaj will be erected at Rajkot fort : किल्ले राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी कामास सुरुवात...-भव्य दिव्य पुतळ्यासाठी खोदकाम सुरू...शिवरायांचा भव्य ६० फूट उंचीचा पुतळा लवकरच उभा राहणार... खोदकाम सुरू असतांना कठीण खडक सापडलाय...मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या फाउंडेशनचं खोदकाम सुरू झालंय...खोदकाम सुरू असतांना कठीण खडक सापडलाय....राज्य सरकारने याठिकाणी ६० फूट उंच पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
जिल्हा परिषद शाळेतील 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी येईना
ZP School Students : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय.. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय.. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे.. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
राजगुरुनगरमध्ये बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्यांची हत्या
Rajgurunagar Crime : राजगुरुनगरमध्ये काल दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्यांची हत्या झालीये.. या दोघींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आलेत.. काल दुपारी दोघी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजुला दोघींचे मृतदेह एका टाकीत सापडले.. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेत. या मुलींसोबत काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत.
धुरकं आणि प्रदूषणाने मुंबईकरांचा श्वास कोंडला
Mumbai Air Pollution : वातावरणातल्या बदलाचा मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. धुरकं आणि प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडलाय. मुंबईकरांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय. मुंबईतली हवा सध्या वाईट श्रेणीत नोंदवली गेलीय .देवनार, कांदिवली पश्चिम, मालाड, माझगाव, नेव्ही नगर, शिवडी आणि सिद्धार्थ नगर इथली हवा वाईट श्रेणीत आहे. तर बोरिवलीतली हवेची गुणवत्ता अति-वाईट श्रेणीत आहे.
सीएमची ठाणे पोलीस आयुक्तांची फोनवर चर्चा
CM Devendra Fadnavis Speaks To Thane Commissioner of Police For Kalyan Case : कल्याणमधल्या अत्याचाराच्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली. ही घटना गंभीर आहे. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा,आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना दिले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
सव्वा तीन लाख बोगस पीकविमा प्रस्ताव रद्द
Cancel bogus crop insurance proposal : सव्वा तीन लाख बोगस पीकविमा प्रस्ताव रद्द..-प्रत्यक्ष लागवड न करता केवळ कागदोपत्री लागवड..पीकविमा लाटण्याचा काही शेतक-यांकडून प्रयत्न...कृषी विभागाकडून तपासणी केल्यानंतर कारवाई
कल्याण हत्याप्रकरणातील आरोपी कल्याण क्राईम ब्रांचच्या ताब्यात
Cases of torture, murder in Kalyan : कल्याण हत्याप्रकरणातील आरोपी कल्याण क्राईम ब्रांचच्या ताब्यात..मुख्य आरोपी विशाल गवळीला ठाण्यात आणलं-सूत्र..आरोपीला नौपाडा पोलीस ठाण्यात ठेवलं-सूत्र..दुपारनंतर आरोपीला कल्याण कोर्टात हजर करणार
लसणाच्या दरात घसरण
Fall in Garlic Prices : लसणाच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी प्रतिकिलो ५० रुपयांनी देरात घसरण झाली आहे. चांगल्या प्रतीचा लसूण ३५० रुपयांनी विकला जात होता. तो आता ३०० रुपयांवर आला आहे. बाजारात नवीन लसूण दाखल होताच दर आवाक्यात येतील, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बाजारात नव्या लसणाची आवक वाढते त्यामुळे दर आणखी कमी होतील असा अंदाज व्यापा-यांनी वर्तवलाय.
एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत भेटीगाठी करणार आहेत. त्यांची ही सदिच्छा भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह आणखी काही वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत. भेटीनंतर सहकुटुंब काश्मिरला सुट्टीवर जाणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय