Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sun, 29 Dec 2024-5:52 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 29 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले- अंजली दमानियांचं खळबळजनक ट्विट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Anjali Damania Tweet :  सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरण दिवसेंदिवस तापतंय... मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षी नेत्यांनी एकमुखी मागणी केलीय.. त्यानंतर आता अंजली दमानियांनी थेट बीडमध्ये धरणं आंदोलन सुरू केलंय. या प्रकरणात सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले असल्याचं खळबळजनक ट्विट अंजली दमानिया यांनी केलंय.. मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय त्यामध्ये सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ असल्याचं ट्विट दमानिया यांनी केलंय.. सरपंच हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी दमानिया यांनी लावून धरलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • विधानसभा निकालाबाबत उत्तम जानकरांचा मोठा दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uttam Jankar On Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार 20 हजार मतांनी पराभव झालाय, असा दावा आमदार उत्तम जानकरांनी केलाय. राष्ट्रवादीचे 12 आमदार निवडून आलेत. तर महायुतीचे एकूण 107 आमदार निवडून आल्याचा दावा जानकरांनी केलाय. चार महिन्यांच्या आत हे सरकार उद्ध्वस्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रुपाली ठोंबरेंसह 8 जणांवर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rupali Thombare : रुपाली ठोंबरेंना आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नावानं एक व्हाट्सअप चॅट व्हायरल करणं महागात पडलंय. रुपाली ठोंबरेंसह 8 जणांवर बीडमध्ये गुन्हा दाखल झालंय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोहसिन शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडमधील मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांचा फोटो आणि मोबाईल क्रमांक वापरून बनावट व्हाट्सअप चॅट व्हायरल केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आरोपी हर्षकुमारचं पोलिसांना सात पानी पत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajinagar : संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळा राज्यात गाजत असताना आता आरोपी हर्षकुमारच्या लेटरबॉम्बनं खळबळ उडालीय....क्रीडा संकुल घोटाळा आपण केला नाही तर आपल्याला करायला लावला असा दावा आरोपी हर्षकुमानं केलाय.. तसं लेटरच त्यानं लिहिलंय.. क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरून निधी लंपास केला. पैसे कढण्यासाठी संजय सबनीस यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती असा आरोप हर्षकुमारनं केलाय. संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून 21. 59 कोटींचा घोटाळा करण्यात आला.. पैसे घेऊन आरोपी हर्षकुमार क्षीरसागरनं फरार झालाय.. त्यानं पत्र लिहून चौकशीला तयार असल्याचं म्हलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • हर्षकुमार क्षीरसागरच्या मैत्रिणीला अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करून पसार झालेल्या हर्षकुमार क्षीरसागरच्या मैत्रिणीला अटक करण्यात आलीय. अर्पिता असं या मैत्रिणीचं नाव आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधून बेड्या ठोकल्यात. यामुळे हर्षकुमारच्या घोटाळ्याच्या रकमेबाबत मोठा उलगडा होण्याची शक्यताये. हर्षकुमारनं अवघ्या 11 महिन्यांत 21.59  कोटींचा घोटाळा करून कोट्यवधींचे फ्लॅट्स, महागड्या गाड्या खरेदी केल्यात. त्यांनी मैत्रीण अर्पितालादेखील या घोटाळ्याचा भागीदार केलं होतं. अर्पिताच्या नावानेच दीड कोटी रुपयांचा लक्झरियस फ्लॅट खरेदी केला होता. महत्त्वाचं म्हणजे हा फ्लॅट खरेदी करताना ते दोघे हजर आणि हा फ्लॅट रोखीने विकत द्यावा अशी गळ ही मंडळी बिल्डरला घालत असल्याचं समोर आलंय. बी. ए. च्या तिस-या वर्गात शिकणारी अर्पिता कोपरखैरणे भागात दोन खोल्यांच्या घरात राहत असल्याचीदेखील माहिती समोर आलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नागपुरात 2 चिमुकल्या मुलींचा विनयभंग

     

    Nagpur Crime : नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील दिघोरा गावात एका नराधमानं दोन चिमुकल्यांचा विनयभंग केलाय..  या दोन्ही मुली घरासमोर खेळत होता.. त्यावेळी नराधमानं त्यांना खेळणं देण्याचं आमिष दाखवून घरीनेलं आणि त्यांचा विनयभंग केला.. मुलींनी घरी सगळा प्रकार सांगीतल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धावघेतली.. त्यानंतर पोलिसांनी या नराधमाला अटक केली.. 

  • नंदुरबारच्या सातपुड्यात अवैध दारुसाठा जप्त

     

    Nandurbar Liquor Seized : नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागातील सावऱ्या डिगर येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई करत, अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. पोलिसांना अवैधरीत्या साठा करून ठेवळ्याची माहिती मिळाली होती, या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या करावीत चार लाखाचा मद्यसाठा जप्त मरण्यात आला आहे. यात विदेशी मद्य आणि बियर चा समावेश आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकांची कारवाई ही कारवी केली आहे. गुजरात राज्यात तस्करीसाठी ह मद्यसाठा करून ठेवल्याचा अंदाज असून, नवं वर्षच्या स्वागतासाठी त्याचा उपयोग केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गुजरात च्या सीमावरती भागात जिल्हा पोलीस दलाची करडी नजर असून, जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीच्या विरोधात येणाऱ्या कळत ही मोहीम सर्च राहणार आहे

  • इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Alandi Indrayani River : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.. इंद्रायणी  नदी आळंदीमध्ये पुन्हा एकदा फेसाळली आहे. आतापर्यंत असंख्य वेळा आश्वासन देऊन ही सरकार, स्थानिक प्रशासन यांच्याकडून आळंदी मध्ये इंद्रायणी प्रदूषण रोखण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय...! या प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या कंपन्यांवर केवळ कारवाईचा फार्स केला जात असून इंद्रायणी नदी मध्ये केमिकल युक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कसलीही कारवाई होत नसल्याच यातून पुन्हा अधोरेखित होतंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सोलापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

     

    Solapur Crime : सोलापुरात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालाय.. बारामतीमधून बार्शीकडे येणा-या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.. आरोपीनं अल्पवयीन मुलीला मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवत तिचा विनयभंग केला..  हा प्रकार मुलीच्या पालकांना कळताच त्यांनी बार्शी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल  केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.. 

  • भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं सूचक विधान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sudhir Mungantiwar : आयुष्यात काही काळ धुके येतात मात्र ते कायम नसतात, असं विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. चंद्रपुरातील घुग्गुस या शहरात त्यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी त्यांनी एक सूचक विधान केलंय. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा होती. मंत्रिपद का दिलं नाही, असा सवालही मुनगंटीवारांच्या समर्थकांनी केला होता. सत्कार कार्यक्रमात त्यांनी एक किस्साही उपस्थितांना सांगितला.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raigad Crime : रायगडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय.. मुरूडच्या कोर्लई गावात ही घटना घडलीये..  सात वर्षांची ही मुलगी भावासोबत कोर्लई समुद्र किनारी गेली होती. .त्यावेळी आरोपीनं तिला बोटीवर नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला.. या प्रकरणी आरोपीविरोधात रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेनंतर कोर्लई गावात संतापाचं वातावरण आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईत हवेचा दर्जा खराब

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Air Pollution : मुंबईत हवेचा दर्जा दिवसेंदिवस खराब होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण प्रचंड वाढले असताना आता दररोज विषारी धुरक्याची चादरही पसरलीय. बोरिवली, मालाड, माझगाव, कुलाबा, वरळी आणि भायखळ्यामध्ये हवेचा 'एक्यूआय' 250 च्यावर नोंदवलाय. त्यामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार बळावण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे नागरिकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात CNGच्या दरात 1 रुपये 10 पैशांची वाढ

     

    Pune CNG Price Hike : पुण्यात CNG च्या दरात वाढ झालीयं... पर्यावरणपूरक आणि तुलनेने स्वस्त असणा-या  CNG गॅसच्या दरात प्रतिकिलो 1 रुपये 10 पैशांची वाढ करण्यात आलीयं...  28 डिसेंबर पासून हे दर लागू करण्यात आलेत. आहेत...  त्यामुळे नव्या दरानुसार CNG 89 रुपये किलोने मिळणारेय....  दरात वाढ झाल्याने वाहन चालकांनाही आर्थिक फटका सहन करावा लागणारेय... 

  • नवी मुंबई एअरपोर्टवर व्यावसायिक विमानाचं लँडिंग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Navi Mumbai Air Port : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे... दुपारी 12 वाजता पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे..  व्यावसायिक विमानाचे लँडिंग. रन वे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्वाची कामे पूर्ण झालीय..  31 मार्च 2025 विमानतळ सुरू होण्याची डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीय. महिन्याभरापूर्वी करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आता व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे . 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दक्षिण कोरियात विमानाचा अपघात, 28 प्रवाशांचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    South Korea Plane Crash : दक्षिण कोरियामध्ये एका विमाचा अपघात झालाय.. मुआन एअरपोर्टवर ही दुर्घटना घडलीये... या विमान अपघातामध्ये 28 प्रवाशांचा मृत्यू झालाय.. हे विमान बँकॉकवरुन दक्षिण कोरियामध्ये आलं होतं.. या विमानामध्ये 175 प्रवासी होते.. लँडिंग गिअर फेल झाल्यामुळे एअरपोर्टवर हे विमान कोसळलं त्यानंतर विमानाच्या पुढच्या भागाला भीषण आग लागली.. यात 28 प्रवाशांचा मृत्यू झाला.. 

    बातमी पाहा - साऊथ कोरियात मोठी दुर्घटना; लॅडिंग करताना विमानाचे दोन तुकडे, 28 जणांचा जागीच मृत्यू

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link