Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 03 Jul 2024-10:54 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • कोल्हापुरात विजेच्या धक्क्यानं 2 सख्ख्या भावांचा मृत्यू 

     

    Kolhapur Boy Death : कोल्हापुरात विजेच्या धक्क्यानं 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डेमधली ही दुर्घटना आहे. सुहास पाटील, स्वप्नील पाटील अशी त्यांची नावं आहेत. शेतात अतिउच्च दाबाच्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. शेतात रोप लावून तणनाशक मारण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली. 

  • 'पोषण आहारात साप सापडला, कुत्राही सापडेल', जितेंद्र आव्हाडांचा  टोला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jitendra Awhad : राज्य सरकारच्या पोषण आहारात सापच काय, काही दिवसांनी कुत्राही सापडेल असा टोला, शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. काहीही करुन वजन वाढवायचं त्यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. सांगलीच्या पलूसमध्ये गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणा-या पूरक पोषण आहारात चक्क मृत वाळा साप आढळला. त्यावर आव्हाडांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • ठाकरेंचा खासदार शिंदेंच्या संपर्कात?

     

    Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका लागल्या असताना हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची मुंबईत गुप्त भेट झाली. मुंबईतील एका बंगल्यावर ही गुप्त भेट झाली... लोकसभा निवडणूक प्रचारात आष्टीकर आणि बांगर यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मात्र निवडणुकीनंतर आता ते एकत्र आल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झालाय.. आष्टीकर-बांगर-सत्तार भेटीत नेमकं दडलंय काय? असा सवाल आता उपस्थित होतोय..

  • दिल्लीत पंतप्रधान घेणार टीम इंडियाची भेट

     

    Team India Return : टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून T-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया बार्बाडोसहून दिल्लीला रवाना झालीय. उद्या सकाळी 6 वाजता ते दिल्ली विमानतळावर उतरतील. तिथून ते थेट ITC मौर्य हॉटेलवर जातील. त्यानंतर त्यांची पंतप्रधानांशी भेट घडवली जाईल. पंतप्रधान निवासस्थानी सकाळी 11 वाजता त्यांची पंतप्रधानांशी भेट होईल. मोदींसोबत टीम इंडिया ब्रेकफास्टही करणार असल्याची माहिती आहे.. त्यानंतर ते थेट मुंबईसाठी रवाना होतील. तर मुंबईत संध्याकाळी 5 वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे. विशेष म्हणजे आम्हाला तुम्हा सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे येथे विजय परेडसह हा विजय साजरा करूया, असं आवाहन कॅप्टन रोहित शर्माने मुंबईकरांना केलंय. 

  • नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेची साईट उपलब्ध नाही

     

    Nashik Ladki Bahini Yojana : नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेची साईट उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आलाय. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, ज्या साईटवर कागदपत्रांची पूर्तता केली जाते, ती साईटच अस्तित्वात नसल्याची माहिती सेतू कार्यालयाचे इन्चार्ज उबेद शेख यांनी दिलीय. त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुही ही साईट सुरू करा अशी मागणी महिलांनी प्रशासनानं केलीय. 

  • मराठा आरक्षण सुनावणीत खंड पडण्याची भीती 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टातून मोठी अपडेट आली आहे. मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावरून निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. कालच्या सुनावणीत विरोध केलेल्या याचिकाकर्त्यांनी आता मागासवर्ग आयोगाला याचिकेत प्रतिवादी करायला तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये खंड पडण्याची भीती आता टळली आहे. तसंच मागासवर्ग आयोगाला कोर्टानं नोटीस जारी केली आहे. त्यावर 10 जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत मोठे बदल 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    CM Ladki Bahini Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत काही महत्त्वाचे मोठे बदल करण्यात आलेत. अदिती तटकरेंनी सभागृहात योजनेबाबतची माहिती दिलीये. आता ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आलीये. तसंच 21 ते 65 वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळणारेय. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एखाद्या परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या पुरुषाशी विवाह झाल्यास ती महिलाही या योजनेची लाभार्थी ठरणारेय.
     

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • अंबादास दानवे यांचा निर्णय उद्या होणार?

     

    Ambadas Danve : अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यता...अंबादास दानवेंच्या निलंबनाचा फेरविचार... दानवे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त... उपसभापतींना अंबादास दानवे यांचं पत्र...अंबादास दानवे यांचा निर्णय उद्या होण्याची शक्यता...मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता 

  • Bhai Jagtap, Yashomati Thakur & Pratap Sirnaik : धनदांडग्यांच्या घशात शाळा घालायच्या असल्याचा आरोप काँग्रेस आमदार भाई जगतापांनी केलाय तर सरकारला ZP शाळा बंद करायच्या आहेत असं काँग्रेस आमदार यशोमती ठाकुरांनी म्हटलंय. तर शाळांच्या दुरुस्तीचे प्रयत्न करणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांनी म्हटलंय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पोषण आहारात 'साप'

     

    Vidhansabha Vishwajeet Kadam : सांगलीतल्या या घटनेचे पडसाद सभागृहातही पडताना दिसले..काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदमांनी विधानसभेत पोषण आहारासंदर्भात सरकारला जाब विचारला...आणि  दोषींवर तातडीनं कारवाई करण्याची मागणीही केली...

  • मंत्रिमहोदय, सांगा कसं शिकायचं?

     

    State ZP School : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय... प्रेक्षकहो, तुमची मुलं चांगल्या शाळेत जात असतील, ते एसीमध्ये शिक्षण घेत असतील. मात्र राज्यातल्या अनेक शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांचाच अभाव आहे. राज्यभरातल्या अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गळकं छत, पडक्या भिंती असलेल्या... कुठे फुटक्या फरश्या दिसून येतायत... प्रातिनिधिक स्वरुपात आपण स्क्रीनवर हिंगोली, सातारा, कोल्हापूर, नांदेडमधलं वास्तव पाहतायत... मात्र अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे हाल सुरुयत... मुलभूत सुविधांचाही इथं मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतायत. तेव्हा याकडे मंत्रिमहोदय कधी लक्ष देणार? या मुलांना सोयीसुविधा कधी मिळणार असा प्रश्न निर्माण होतोय. 

  • मंत्रिमहोदय, सांगा कसं शिकायचं?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nanded ZP School : कधीही कोसळेल असं छत... भेगाळलेल्या, ओल आलेल्या भिंती... फुटलेल्या फरश्या... असं चित्र आहे नांदेडच्या हदगावमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं... नांदेडमधल्या 400 जिल्हा परिषद शाळांची अशी दुरवस्था झालीय. झी २४ तासच्या माध्यमातून आपण हे वास्तव पाहू शकत आहात. हदगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत पावसामुळे वर्ग खोल्यांची गळती होतेय. भिंतींमधून पाणी झिरपत असल्यानं भिंतींच्या खपल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडत आहे. तर अनेक वर्गात वीजपुरवठा नसल्यानं फॅन, लाईट बंद आहेत. शौच्छालय मोडकळीस आल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होतेय. अशा परिस्थितीत गोरगरीब विद्यार्थी नाईलाजानं इथं शिक्षण घेताहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संजय राऊतांचा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

     

    Delhi Sanjay Raut : खासदास संजय राऊतांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवलीये.. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बाल बुद्धीचा नेता म्हणणं हा लोकशाहीचा  अपमान असल्याचं राऊत म्हणालेत.. महायुतीमध्ये कोणीही वाघ नाही तर लांडगे आणि कोल्हे असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.. 

  • नाना पटोले क्रिकेटच्या मैदानात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड झालीय. नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदार असतील. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर नाना पटोले माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करणारेत. त्यामुळे आता पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढतील अशी चर्चा आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक रंगतदार होऊ शकते.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कोल्हापुरात नरबळीचा प्रकार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur : गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. कौलव गावातल्या एका घरामध्ये तीन फूट खड्डा खणला असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी राधानगरी पोलिसात जादूटोणा कायदा अंतर्गत 6 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दीक्षाभूमीवरील तोडफोड प्रकरण, 15 जणांवर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur : नागपुरातल्या दीक्षाभूमीवर 1 जुलैला घडलेल्या तोडफोड प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. विविध सामाजिक संघटनांच्या 15 ज्ञात आणि इतर अनेक अज्ञात जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दीक्षाभूमीवर झालेले हिंसक आंदोलन आणि बांधकाम साहित्याची तोडफोड तसंच आग लवल्याच्या घटनेबाबत ही कारवाई करण्यात आलीय. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडेंचंही नाव आहे. याशिवाय इतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • हाथरस चेंगराचेंगरीनंतर बाबा साकार हरी फरार

     

    Uttar Pradesh Hathras Update : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर बाबा साकार हरी फरार झालाय. पोलिसांकडून बाबाचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचा 24 तासांमध्ये अहवाल मागवलाय. आज ते या घटनास्थळाला भेट देणार आहेत. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुख्य सचिवांना हाथरसमध्ये तळ ठोकून राहण्याचे आदेश देण्यात आलेत. या ठिकाणी STF तैनात करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

  • NEET Exam : NEET परीक्षा घोटाळ्यांनंतर केंद्र सरकार कामाला लागलंय.. NEET PG परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी गृहमंत्रालयानं महत्त्वाची बैठक बोलावली..  या बैठकीमध्ये परीक्षेच्या पूर्व तयारीबाबत चर्चा करण्यात आली.. तसंच काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले.. पेपरच्या काही तास आधी प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे.. परीक्षेत कोणतीही गडबड  होऊनये म्हणून वेगवेगळ्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे.  परीक्षेची तारीख ठरताच महिनाभराच्या आतच ही परीक्षा घेतली जाणार आहे.. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संसद अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

     

    Sansad Session : संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देणार आहेत. राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर मोदी दुपारी 1 वाजता सभागृहात बोलतील. 18 व्या लोकसभेचं अधिवेशन 24 जूनला सुरू झालं होतं. या अधिवेशनात  539 सदस्यांनी शपथ घेतली.

  • म्हाडाच्या 2 हजार घरांची लवकरच लॉटरी

     

    Mhada Lottery : मुंबईत आपलं हक्काचे घर असावं असं स्वप्न पाहणा-यांसाठी आनंदाची बातमी... म्हाडा मुंबईत 2 हजार घरांची सोडत काढणारेय. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हाडा घरांच्या लॉटरीची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे. खिशाला परवडेल अशा किंमतीत सर्वसामान्यांना ही घरं मिळणारेत. म्हाडाची ही घरं मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी कन्नमवार नगर या भागांमध्ये उपलब्ध असणारेत.

  • NEETसह इतर 2 परीक्षेत आरोपींची हेराफेरी?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Neet Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणी मागील १० दिवसांपासून लातूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींनी 'नीट' सह अन्य परीक्षांमध्येही हेराफेरी केल्याचाही CBI ला संशय आहे.. यात आणखी काही आरोपी सहभागी असल्याचे धागेदोरे CBI ला मिळालेत. या दोघांच्या मोबाइलमधून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील तोडकर, उप्पलवार आणि डोंगरे या तिघांकडे संशयाची सुई वळली आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link