PM Modi`s Big Announcement : मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Sat, 13 Jul 2024-9:52 pm,

Latest Updates

  • महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार.. पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    PM Modi's Big Announcement : लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच मुंबई दौरा.. महाराष्ट्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबईत केली.. पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी आज पहिल्यांदाच मुंबईत आले होते.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी 29 हजार 400 कोटींच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.. मुंबई शहर वेगवान होण्यास या प्रकल्पांमुळे फायदा होणार असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलंय.. नरेंद्र मोदींनी मुंबईतल्या आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • लोकसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिलाच मुंबई दौरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    PM Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत.. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौ-यात महायुती विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याची शक्यता आहे. लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. त्यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन होणाराय. राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मंचावर आगमन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर येताच उपस्थितांच्या मोदी.. मोदी.. घोषणा.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • 'मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय...विरोधकांचं कारण सरकारने आम्हाला सांगू नये...विरोधकांचं कारण सांगून आरक्षण द्यायचं नाहीये का? असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारलाय...अजूनही वेळ गेलेला नाही, आमच्या हक्काचं आरक्षण द्या...मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही...आरक्षण दिलं नाही तर 288 आमदार 100 टक्के पाडणार असा इशारा जरांगेंनी दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'भाजपने काँग्रेससारख्या चुका करू नयेत', नितीन गडकरींचं पक्षाबाबत विधान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nitin Gadkari On BJP : भाजपने काँग्रेससारख्या चुका करू नयेत, काँग्रेस करत होती तेच आपण करत राहिलो तर फायदा नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गोव्यामध्ये केलंय...भाजप एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष असून, त्यामुळेच तो वारंवार जनतेचा विश्वास जिंकत आहे...मात्र, ज्यामुळे लोकांनी काँग्रेसला सत्तेबाहेर काढलं, त्याच चुका आपण करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेतून जाण्यात आणि आपण सत्तेत येण्याला काही अर्थ राहत नाही...काँग्रेसच्या चुकांमुळेच भाजपला निवडून दिलंय असं गडकरी म्हणालेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'काल आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी', संजय राऊतांचा आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : कालच्या विधान परिषद निवडणुकीत आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी इतका होता...आमदारांना 2 एकर जमीन आणि पैशांचं वाटप केलं...ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती असा आरोप राऊतांनी केलाय...तर संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशहा आहे...अशी टीका शेलारांनी राऊतांवर केलीय...तर महाराष्ट्राची जनता राऊतांकडे करमणूक म्हणून बघते असा टोला केसरकरांनी लगावलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला', जयंत पाटील यांचं वक्तव्य

     

    Jayant Patil : विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडाबाजार झाला...असं कधीही राजकारण पाहिलेलं नाही...आत्मचिंतन करून पराभवावर बोलेन असं  जयंत पाटील म्हणाले.... राष्ट्रवादी शरद पवार गटाचं एक मत फुटलं...काँग्रेसने दुस-या पसंतीची मतं सारखी दिली नाही....जयंत पाटलांची काँग्रेसवर नाराजी...

  •  पंढरपुरात शालेय पोषण आहारात मृत बेडूक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pandharpur : पंढरपुरात शालेय पोषण आहारात चक्क मेलेला बेडूक सापडलाय... पंढरपूरच्या कासेगावातील भुसेनगर इथं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.. अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात मृत बेडूक सापडल्यानं संतप्त पालकांनी प्रशासकीय अधिका-यांना जाब विचारलाय.. पोषण आहारात मृत साप, पक्षी, उंदीर आढलून आल्यानंतर आता मृत बेडूक आढळल्यानं हा आहार चिमुकल्यांच्या जीवावर उठलाय का असा सवाल पालकांनी केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • राज्यात कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Onion : महाराष्ट्रात कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याचं दिसतंय. कांदा उत्पादक शेतकरी संघटना आयातीवरून आक्रमक झालीय. आधीच नाफेडच्या खरेदीवरून शेतक-यांमध्ये नाराजी आहे. त्यात आता आयातीची भर पडलीय. अफगाणिस्तानवरून कांदा आयात केला जात असल्यानं भाव पडण्याची शेतक-यांना भीती आहे. अफगाणिस्तानवरून जवळपास 200 टन कांदा आयात केलाय. लोकसभेला कांद्याचा फटका बसलाय तसाच विधानसभेला बसणार नाही याची दखल घ्या असा इशारा शेतक-यांनी दिलाय. निर्यातीसाठी किमान निर्यात शुल्क ही जाचक अटही रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आयात करून कांद्याचे दर पडले तर राज्यभर रास्ता रोको आणि रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'शरद पवारांनी जयंत पाटलांना पाडलं'​ सदाभाऊ खोतांचा आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sadabhau Khot on Jayant Patil : शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका विधानपरिषदेवर निवडून आलेल्या सदाभाऊ खोतांनी केलीय. राज्यात शेकाप संपवण्याचं काम शरद पवारांनी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तर शरद पवारांनी जयंत पाटलांना निवडून आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केल्याचा पलटवार संजय राऊतांनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक',संजय राऊतांची टीका

     

    Sanjay Raut : विधान परिषद निवडणूक निकालावरून राऊतांनी शिंदे आणि अजित पवार गटावर निशाणा साधलाय...शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला उन्माद करतायत...हे दोन्ही गट गद्दार आहेत...गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी ही निवडणूक होती...त्यात आश्चर्य काय असा निशाणा राऊतांनी साधलाय...

  • समृद्धीवर भेगा पडल्यानंतर MSRDCला खडबडून जाग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Samruddhi Mahamarg Route :  समृद्धी महामार्गावर माळीवाडा इंटरचेंजजवळ समृद्धी महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याचे बातमी पुढं आल्यानंतर आता एमएसआरडीसीला खडबडून जाग आलीय. रस्ता बांधणा-या कंपनीला नोटीस देत त्यांचे 10 कोटी रुपयांचं बिल प्रशासनानं थांबवलंय. इतकंच नाही तर समृद्धी महामार्ग झाल्यानंतर एमएसआरडीसीनं 4 वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदार कंपनीचे 50 कोटी राखून ठेवलेत. मात्र, कंपनीनं दुरुस्तीची कामे वेळेत न केल्यानं आता हे काम दुस-या कंपनीला देण्याचा इशारा नोटिसीद्वारे त्यांना देण्यात आला. समृद्धी महामार्गाचं कंत्राट मिळालेल्या या कंपनीला गेल्या वर्षभरात एमएसआरडीसीनं 12 वेळा नोटिसा देऊन या रस्त्यावरील भेगा बुजवणे, जर्क कमी करण्याची कामे करायला सांगितली असल्याची माहितीही आता पुढं आलीय. मात्र कंपनी प्रशासनाला जुमानत नाही असं चित्र आहे. रस्त्याचं कंत्राट मिळालेली मेघा इंजिनिअरिंग ही कंपनी भाजपला इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून तब्बल 584 कोटी रुपयांची देणगी देणारी आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • कपिल पाटील इंडिया आघाडीतून बाहेर?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kapil Patil : शेकापचे जयंत पाटील यांच्या नाराजीनंतर इंडिया आघाडीचा भाग असणा-या आणखी एका पक्षाने विधानपरिषदेच्या निकालांबाबत नाराजी व्यक्त केलीये.. समाजवादी गणराज्य पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार कपिल पाटील यांनी ट्विट करुन याबाबत भाष्य केलंय.. कपिल पाटलांनी काय ट्विट केलंय पाहूयात.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या संपर्कात

     

    Sambhajinagar ISIS : संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या संपर्कात...मोहंमद जोएब खानच्या चौकशीत धक्कादायक माहिती....संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याचा होता कट...भारतात घातपात करून तुर्कीत पळून जाण्याचा होता कट

  •  मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

     

    Mumbai-Nashik Expressway Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झालाय.. आयशर ट्रक आणि ब्रेझा कारमध्ये हा अपघात झालाय.. दुर्घटनेतील सर्व मृत हे नाशिकच्या सिडको भागातील रहिवासी आहेत.. आडगावजवळ ही दुर्घटना घडलीये. आयशर विरुद्ध दिशेने येत असल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीये.. 

  • मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा अंदाज

     

    Rain Alert : मुंबईत काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे...मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे..आज सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकरांवर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manorama Khedkar : वादग्रस्त प्रोबेशनरी आयएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. जमिनीच्या वादातून शेतकरी, मजुरांना बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप...पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

     

  • पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर

     

    PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौ-यावर येणारेत.. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौ-यात महायुती विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याची शक्यता आहे. लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणारेय. पंतप्रधानांच्या हस्ते महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन होणारेय. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये संध्याकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणारेय. यावेळी मोदींच्या हस्ते गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचं भूमिपूजन होईल. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणा-या या प्रकल्पामुळे, सव्वा तासात पार होणारं इथलं अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापलं जाणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link