Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 20 Jul 2024-10:32 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन

     

    Dilip Patil : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर ते कोल्हापुरात आले असता पुन्हा त्रास सुरु झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना पुण्याला नेलं जात होतं. मात्र वाटेतच त्यांचं निधन झालं. मराठा आरक्षण आणि EWS संदर्भात दिलीप पाटील यांनी न्यायालयीन लढाई लढली होती. तसंच मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईचे ते प्रमुख याचिकाकर्ते होते. 

  • 'अदानी स्पर्धक उद्योगपती लाभासाठी आरोप?',राहुल शेवाळेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rahul Shewale on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शिंदे पक्षाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. अदानी यांना स्पर्धक असलेल्या उद्योगपतीला फायदा व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद होती का असा सवाल त्यांनी केला. तसंच नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे पक्षाला निधी संकलनासाठी मंजुरी दिली आहे. त्यासाठी पत्रकार परिषदेतून आरोप केले गेले का असा प्रश्नही शेवाळेंनी यावेळी उपस्थित केला. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'मराठा आरक्षण झुलवत ठेवलं जाणार', प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prakash Ambedkar : मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्व राजकीय पक्ष विधानसभेपर्यंत झुलवत ठेवतील, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी केलीय. मराठा आरक्षणाबाबत राजकीय पक्षांची काय भूमिका आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना पत्र लिहिले होते. मात्र कोणीही उत्तर न दिल्यामुळं आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • ठाकरे गटाचं शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024 

     

    Uddhav Thackeray : मुंबईत झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना नवी मोहीम दिलीय. 'शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024' असं या मोहिमेचं नाव असून यामध्ये विविध काम करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना देण्यात आलंय. तसेच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून संपर्कप्रमुखांकडून इच्छुक उमेदवारांची नावे देखील मागवण्यात आलंय...

  • मनोरमा खेडकरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manorama Khedkar : मनोरमा खेडकरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी....शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी कारवाई

     

  • पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार आमनेसामने 

     

    Sharad Pawar- Ajit Pawar : पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार आमने सामने आले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीसाठी दोघे एकत्र आले. पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतेय. खासदार शरद पवार यांच्यासह, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हेही यामध्ये उपस्थित आहेत. पुण्यातील विधान भवनामध्ये ही बैठक सुरु आहे. 

  • पोलीस अधिकारी विजय कोठावळे वादात, गुन्हेगारासोबत पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस

     

    Nashik Police : नाशिकमधील वणी पोलीस ठाण्यातच पोलीस अधिका-यानी दारू तस्कर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमांसोबत वाढदिवस साजरा केला..विजय कोठावळे असे अधिकाऱ्याचे नाव असून ते पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे.. अवैध धंदेचालकांनी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करत पोलिसांसोबत असलेले सबंध उघड केलंय...त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीसांचा कारभाराच सध्या वादात ठरतोय...

  • 'पुढील 41 दिवसात आचार संहिता लागेल, जोमाने कामाला लागा', उद्धव ठाकरेंचे निर्देश

     

    Uddhav Thackeray :  शिवसेना UBT पक्षाची सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली.....पुढील 41 दिवसात आचार संहिता लागेल, त्यामुळे जोमाने करा, उद्धव ठाकरे यांचे निर्देश...4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचे विधानसभा संपर्कप्रमुखांना निर्देश....या भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची...आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 4 महिन्यात पंधरा दिवसातून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात आढावा घेण्याचे उद्धव ठाकरे यांचे संपर्कप्रमुखांना निर्देश 

  • NEETपेपरफुटी प्रकरणी CBI तपासात अनेक खुलासे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Neet Paper Leak Update : लातूर NEET पेपरफुटी प्रकरणात आत्तापर्यंत CBIच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. सुरुवातीला इराण्णा कोगलवार याला नांदेड एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं यावेळी इराण्णाने एटीएसची दिशाभूल केल्याचं समोर आलंय. इराण्णाच्या मुलीचे गुण वाढवण्यासाठी गंगाधर आणि  इराण्णाला यांच्यात 15 लाखांचा सौदा ठरला होता. यात एक लाख रुपये ऍडव्हान्स देण्याचे ठरलं होतं दोघे 2023 पासून संपर्कात होते असं  सीबीआय चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्राने दिली आहे. आरोपी जाधव आणि पठाण यांच्यातील महत्त्वाचा दुवा हा इराण्णा असल्याचा संशय सीबीआयला आहे

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Raigad Rain : रायगडच्या रोहा आणि परिसरात पावसाचा जोर वाढलाय.. कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडलीये.. कुंदलिकेची इशारा पातळी 23 मीटर, सध्याची पाणी पातळी 23.65 मीटर एवढी झालीये.. जिल्ह्यातील इतर नद्याही दुथडीभरुन वाहत आहेत.. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Maharashtra Breaking News LIVE : मुंबईतील ग्रँड रोड येथे म्हाडाच्या इमारतीची बाल्कनी कोसळली

    ग्रँट रोड स्टेशनजवळच्या चार मजली म्हाडा इमारतीची बाल्कनी कोसळली. काही लोक ढिगा-याखाली सापडल्याची माहिती समोर येतेय.रूबिनिस्सा मंझिल असं इमारतीचे नाव असून म्हाडाने धोकादायक असल्याची नोटीस दिली होती. आज सकाळी ११ वाजताची घटना. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू

  • नागपूरला मुसळधार पावसानं झोडपलं

     

    Nagpur Rain : राज्याची उपराजधानी नागपूरला पावसानं झोडपून काढलंय.. नागपरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय.. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं अनेक नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय.. 

  • अतुल बेनके आणि शरद पवारांची भेट

     

    Atul Benke Meet Sharad Pawar : अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतलीय...त्यामुळं आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा रंगलेली आहे. खासदार अमोल कोल्हेंच्या घरी ही भेट घडली...याला शरद पवारांनी ही दुजोरा दिलाय...ज्यांनी लोकसभेत आमचं काम केलं ते आमचे आहेत असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशावर सूतोवाच केलंय...तर बेनकेंनी भेट घेतली म्हणून काय झालं?...त्यांनाच विचारा असं म्हणत अजित पवारांनी बोलणं टाळलंय...

  • UPSC अध्यक्ष मनोज सोनींचा राजीनामा-सूत्र

     

    UPSC : UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...वैयक्तिक कारणास्तव  UPSCच्या अध्यक्षाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय...कार्यकाळ संपण्यापूर्वीच मनोज सोनींनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलंय...मात्र, UPSCअध्यक्षांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिलीय...

  • Maharashtra Breaking News Live Update: मनोरमा खेडकर यांना आज कोर्टात हजर केले जाणार

    मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. मुळशीतील शेतकऱ्यांना हातात पिस्तूल घेत धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मनोरमा खेडकर या पूजा खेडकर यांच्या आई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

  • Amravati Rain : अमरावतीतील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस पडलाय...चांदुर बाजार तालुक्यातील माधान, ब्राह्मणवाडा थंडी, सोनोरी गावातील रस्त्याला नदीचे स्वरूप आलंय...अनेक गावातील नदी नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी गावात शिरलंय...त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झालंय...शेती पिकांचेही नुकसान झालं असून, जमिनी खरडून गेल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावलंय...

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • JNPT : नवी मुंबईतल्या JNPT बंदरात कंटेनर्सच्या रांगा लागल्यात.. जवळपास 7 हजार 500 कंटेनर्स निर्यातीच्या प्रतीक्षेत आहेत.. मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे कंटेनर्सची नोंदणी रखडली...कंटेनर गेटमध्ये सोडण्यासाठी अर्ध्या तासाऐवजी 13ते 14 तास लागत आहेत.. तसंच गुजरात ते केरळपर्यंत अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झालाय.. त्यामुळे मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस  सुरु आहे.. याचा फटका JNPTतील भाजीपाल्याच्या कंटेनर्सला बसतोय.. कंटेनर्स बंदरातच रखडल्यानं इंधनासाठी तब्बल 3 कोटी रुपये जादा खर्च होतोय.. ही परिस्थीती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील अशी माहिती देण्यात आलीये. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • येवल्यात हिट अँड रनची घटना, 3 गंभीर जखमी

     

    Nashik Hit And Run : येवल्यात हिट अँड रनची घटना. शुक्रवारी संभाजीनगर महामार्गावर अंदरसुल काळमाथा जवळ स्विफ्ट कारने दुचाकीवरील तिघांना पाठीमागून जोरात धडक दिली .या धडकेत मोटरसायकल वरील तीन जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून कारचालक पळून जात होता. मात्र कोटमगाव इथे काही तरुणांनी कार चालकाला अडवलं.मात्र कार मधील दोनजण फरार झाले असून जमावाने कारचालकाला चोप दिला. 

  • 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain Alert : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतय.. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीये...हवामान विभागाने 2 जिल्हयांत रेड तर 9 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vidharbha Rain : विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय...चंद्रपूरला रेड अलर्ट तर नागपूर,वर्धा, अमरावती आणि गडचिरोली येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय...नागपुरात पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढलाय...बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, विदर्भात आज दमदार पावसाची शक्यता आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईत मुसळधार पाऊस

     

    Mumbai Rain : मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय...ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला असून, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे...मुंबईत सायन, भांडूपमध्ये सकल भागात पाणी साचलंय...

  • मनोज जरांगेंचं आजपासून उपोषण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करावा या मागण्यांसाठी सकाळी 10वाजल्यापासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. गेल्या वर्षभरातलं जरांगेंचं हे 5वं आमरण उपोषण असेल.जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली होती. मात्र राज्य सरकारकडून मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतलाय. राज्यातले 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याचा निर्णयही होणार असल्याचं समजतंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link