Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातला वाद आणखी विकोपाला

Sat, 22 Jun 2024-7:57 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • छगन भुजबळ दोन समाजांत तेढ निर्माण करतायत- मनोज जरांगे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jarange on Reservation : छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातला वाद आणखी विकोपाला... हम किसी के बापसे डरते नही है... शेरोशायरीतून भुजबळांचा हल्लाबोल... तर मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही, असा मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार, भुजबळ दोन समाजांत तेढ निर्माण करतायत असं जरांगेंनी विधान केलंय... भुजबळांचं ऐकून सरकारनं आमचं नुकसान करू नये.. असंही जरांगे म्हणालेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • उपोषण मागे, आंदोलन सुरूच राहणार - लक्ष्मण हाके

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Hunger Strike Suspended : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्रीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय.. सरकारच्या आश्वासनानंतर तूर्तास उपोषण स्थगित करण्याचा निर्णय प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी घेतलाय... ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही सरकारी शिष्टमंडळानं उपोषणकर्त्यांना दिली. ओबीसींच्या उर्वरित मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन सरकारच्यावतीनं छगन भुजबळांनी दिलं. तर मराठा आणि ओबीसी समाजात तेढ नको, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 3 हजार रुपयांचा दंड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आलाय...सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यानं 3 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय...महाविकास आघाडी सरकरच्या काळात कोरोना असताना वीज दरवाढीविरुद्ध भाजपनं आंदोलन केलं होतं...त्या आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याचाही आरोप नार्वेकरांवर आहे...भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू असून, 8 जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश कोर्टाकडून जारी करण्यात आलेयत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगे आणि बबनराव तायवाडेंमध्ये कलगीतुरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange Vs Babanrao Taiwade : ओबीसी नेते बबनराव तायवाडेंच्या टीकेला जरांगे पाटलांनी जोरदार उत्तर दिलंय. भुजबळांसोबत स्टेजवर असताना तुमची भाषा तुम्हाला लक्षात नाही का असा सवाल जरांगेंनी केलाय. जरांगेंची भाषा ओबीसी नेत्यांवर दिवसेंदिवस खालच्या स्तरावर जातेय अशी टीका तायवाडेंनी केली होती. त्यांची उंची काय असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर जरांगेंनी उत्तर दिलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • जातनिहाय जनगणना करुन आरक्षण द्या - उदयनराजे भोसले

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Satara Udayanraje Bhosale : आरक्षणासंदर्भात भाजप खासदार उदयनराजेंनी रोखठोक भूमिका मांडलीय...जातनिहाय जनगणना करून वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाका...अशी भूमिका उदयनराजेंनी मांडलीय...मराठा आरक्षणप्रश्नी 23 मार्च 1994 चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे...त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी असे सर्वांना आरक्षण देण्यात आलं... त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जातीत दुफळी माजत असल्याचे उदयनराजे भोसलेंनी म्हटलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शेतीच्या पाणीपट्टीत दहापट वाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Water Tax : राज्यातील शेतक-यांवर पाणीपट्टीचं सुलतानी संकट ओढावलंय...राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीच्या पाणीपट्टीत दहापट वाढ केलीय...यामुळे 500 रुपयांच्या जागी 5 हजार रुपये मोजावे लागणार आहेत...2018-19 साली बारमाही पिकांसाठी पाणीपट्टीचा दर हा स्थानिक करांसह वार्षिक एकरी 538 रुपये इतका होता...मात्र, आता नवीन दरवाढीनुसार हा दर बागायती शेतक-यांसाठी वार्षिक एकरी 5 हजार 443 रुपये इतका होणार आहे....एका झटक्यात झालेली ही दहापट दरवाढ बागायतदार शेतक-यांचे कंबरडे मोडणाराय...राज्यात ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला याचा मोठा फटका बसणार आहे...जलसंपदा विभागाने 29 मार्च 2022 रोजी जलदराचे पुनर्विलोकन व सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक अध्यादेश जारी केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रिक्षाचालकांचा संपाचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur : कोल्हापुरात पन्नास रुपये पासिंग दंड रद्द करावा या मागणीसाठी रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समिती आक्रमक झालीय. 25 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौ-यावर आहेत. याच दिवशी रिक्षा आणि टॅक्सी एक दिवसीय संपावर जाण्याचा इशारा या समितीनं दिलाय. या संपात 16 हजार रिक्षा आणि टॅक्सी सहभागी होतील, असा दावाही या समितीनं केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रस्ते कामात भ्रष्टाचाराचा कळस?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Washim : वाशिमच्या मालेगावमध्ये रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. अमनवाडी ते माळेगाव या रस्त्याचं काम गेल्या 8 दिवसांपासून सुरू करण्यात आलंय. मात्र, हा नवीन तयार केलेला रस्ता नागरिकांनी चक्क हातानं उकरून काढलाय. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याचं काम बंद पाडलं. वारंवार तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. जोपर्यंत अधिकार येत नाहीत तोपर्यंत काम होऊ देणार नाही, अशी भूमिका या नागरिकांनी घेतलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • देशात पेपरफुटीविरोधात कायदा लागू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Paper Leak Law : शासकीय भरती परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.. पेपरफुटीविरोधात कायदा लागू करण्यात आलाय.. मध्यरात्री केंद्राने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. या कायद्यानुसार 10 वर्षाचा तुरुंगवास आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद आहे..तर परीक्षेला डमी उमेदवार दिल्यास 3 ते 5 वर्षांची शिक्षा आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आलीये.. देशात पेपरफुटीच्या घटना वाढल्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संसदेने हा कायदा पुन्हा लागू केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amravati Bacchu Kadu : भाजपनंच एकनाथ शिंदे यांचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून भाजपनं असं करणं योग्य नसल्याचं सांगत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपला घरचा आहेर दिला. विरोध असेल तिथं उमेदवार बदलला नाही. त्याच वेळी सहकारी पक्षांवर मात्र उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप करीत त्यांनी भाजपला आव्हान दिलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aditya Thackeray : आदित्य ठाकरे आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत...MHT CET परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याप्रकरणी दुपारी 2 वाजता राज्यपालांना भेटणार आहेत...राज्यात अभियांत्रिकी प्रवेशासाठी झालेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या निकाला संदर्भात अनेक तक्रारी केल्या आहेत...या संपूर्ण परीक्षेत एकूण 54 चुका असून  विद्यार्थ्यांना मिळालेल्या परसेंटाईल संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत ...त्यामुळे या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेणार आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पत्र्याची शेड टर्फवर कोसळली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thane : ठाण्यात फुटबॉल टर्फवर इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळून 6 जण जखमी झालेयत...जखमी झालेल्या 6 जणांवर ठाण्याच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत...ठाण्याच्या गावंडबाग परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडलीय...फुटबॉल टर्फमध्ये 17 विद्यार्थी खेळत होते...त्यावेळी मुसळधार पावसामुळे रौनक पार्क फेस 2 च्या इमारतीवरील पत्र्याची शेड टर्फवर कोसळली...या दुर्घटनेत 15 वर्षांचे 6 खेळाडू जखमी झालेत...यातील 3 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत...या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून, पत्र्याच्या शेडखाली विद्यार्थी अडकलेले दिसतायत...तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं...याबाबत पोलिसांत तक्रारही करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करतायत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 10वा दिवस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Laxman Hake : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे.आज मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते हाके यांची दुपारी 02:00 वाजता भेट घेणार आहेत.काल राज्यातील ओबीसी नेत्यांसह हाकेंच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मुंबईत बैठक पार पडली.या बैठकीत 4 ते 5 मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून आज भुजबळांसोबत चर्चा करून उपोषणाबाबत योग्य निर्णय घेऊ असं हाके यांनी स्पष्ट केलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link