Pune Police Action on L3 Bar : पुण्याच्या L3 बारवर पोलिसांची कारवाई

Sun, 23 Jun 2024-8:13 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • पुण्यातील L3 बार सील होण्याची शक्यता, बार मालक, पार्टनर, मॅनेजरसह 5 जण ताब्यात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Police Action to L3 Bar : पुणे ड्रग्ज विक्री प्रकरण उजेडात आल्यानंतर आता पोलीस कारवाईला वेग आलाय... फर्ग्युसन रोडवरील L3 बारमधील ड्रग्ज सेवन प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 5 जणांना ताब्यात घेतलंय. त्यामध्ये बार मालक मानस मलिक, बारचे 3 पार्टनर आणि मॅनेजर संतोष कामठे यांचाही समावेश आहे. रवी माहेश्वरी, योगेंद्र आणि शर्मा अशी अन्य तिघांची नावं आहेत. हा L 3 बार सील होण्याची शक्यता आहे.. तिथले सीसीटीव्ही आणि साऊंड सिस्टीम पोलिसांनी जप्त केलीय.. तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं दारूसाठा जप्त केलाय.

     

  • पुण्यातील लिक्विड लिझर लाऊंजमध्ये रात्री उशिरा चालणाऱ्या पार्ट्यांत ड्रग्ज विक्री

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Hotel Drugs : पुण्यातील बारमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय... पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज सेवन सुरू असल्याची नवी माहिती उघड झालीय... पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लिझर लाऊंज मधील एक व्हिडिओ व्हायरल झालाय.. या व्हिडिओत काही तरुण बाथरुममध्ये ड्रग्ज सेवन करताना दिसतायत... याठिकाणी अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती, असंही आढळून आलंय... दरम्यान, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • 'पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल', काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा दावा

     

    Vishwajeet Kadam : पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून येतील...राज्यात वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजीत कदम यांच्या रुपात मुख्यमंत्री होणार असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय...यावेळी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल असा दावा काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी केलाय...

  • 'चिखल असला तरी कमळ येऊ देणार नाही', आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

     

    Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय...मैदानात चिखल आहे, पण इथे कमळ येऊ देणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय...वरळीतील फुटबॉल स्पर्धेच्या उद्धाटनाला आदित्य ठाकरे उपस्थित होते...यावेळी मैदानात चिखल असल्यावरून त्यांनी भाजपला टोला लगावला

  • NEET प्रकरणाची CBI करणार चौकशी

     

    CBI on NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरणाची आता CBI चौकशी करणारेय. बिहारमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारावर CBI नवीन गुन्हा दाखल करणारे. संपूर्ण प्रकरण आपल्या हातात घेऊन पेपरफुटीची चौकशी करणारेय.

  • मुंबईतील बेलासिस उड्डाणपूल उद्यापासून बंद होणार 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Bellasis Bridge Closed​ : मुंबईतला बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून बंद होणार आहे. मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा हा १३१ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल आहे. सोमवारपासून पुढील १८ महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे.. या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणारेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'मुख्यमंत्री शेअर बाजारसारखा शिक्षकांचा भाव लावतात',संजय राऊतांचा गंभीर आरोप

     

    Sanjay Raut  CM Shinde : मुख्यमंत्री शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांचा भाव लावतात, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केलाय. जळगावच्या सभेत शिक्षक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता. अंधारे यांची पाठराखण करताना राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय. शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराच राऊतांनी शिंदेंना दिलाय. पोलिंग एजेंटच्या याद्यांसोबत खर्चाला 500 रुपये दिले जातात. ही निवडणुकीची प्रक्रिया आहे, असं समर्थन मंत्री गुलाबराव पाटलांनी या पैसे वाटपाचं केलंय.

  • '...विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रुसेल', मनोज जरांगेंचा इशारा

     

    Manoj Jarange : मराठा आणि कुणबी हा एकच असून, नोंदी मिळालेल्यांना आरक्षण द्या...अशी मागणी जरांगेंनी केलीय...तर सगेसोयरेसंदर्भात वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका...नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रुसेल असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय...

  • संभाजीनगरात 2 गटात हाणामारी, 4 जण गंभीर जखमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajinagar Rada : दुचाकींचा धक्का लागल्याने संभाजीनगरात मध्यरात्री प्रचंड राडा झालाय. 2 गटात हाणामारी झाली. राजाबाजार भागातील एका गटाने दोन दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांना बेदम मारहाण केली. यात चौघेही जखमी झाले . तर स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनीही मारहाण करणाऱ्यांवर हल्ला केला. त्यात काही जण जखमी झाले. एकमेकांसमोर आल्याने बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी परिस्थितीवर पहाटेपर्यंत नियंत्रण मिळवले. घटनेची माहिती कळताच दोन्ही गटांतील प्रत्येकी ५० हून अधिक लोक किराणा चावडी भागात जमले. एक जमाव हल्लेखोरांना शोधत होता. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने या भागात बंदोबस्त वाढवला आणि जमावाला पांगवले.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • पेट्रोल, डिझेल GSTच्या कक्षेत येणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nirmala Sitharama : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 53 व्या जीएसटी परिषदेच्या बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी भारतीय रेल्वेच्या अनेक सेवा जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली.. पेट्रोल आणि डिझेल GSTच्या कक्षेत अणण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे मात्र त्यासाठी सर्व राज्यांनी येऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विजयी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    T20 World Cup 2024 : टी- 20 वर्ल्डकमध्ये एक धक्कादायक निकाल समोर आलाय. सुपर - 8 मध्ये दुबळ्या अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला हरवलं. अफगाणिस्तानसाठी हा ऐतिहासिक विजय ठरलाय. अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर 21 रन्सनं मात केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • विधानसभेसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये

     

    BJP : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये आलंय...राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांना घेऊन पक्षात अंतर्गत जोरदार तयारी सुरू झालीय...मागच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या जागा, निवडून आलेले आमदार आणि इतर विषयांवर पक्षातील नेत्यांनी चर्चा सुरू केलीय...विधानसभा जागांवरून भाजप नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली असून, दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर राज्यात बैठकांच सत्र सुरू झालंय...लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये या बाबतीत पक्ष खबरदारी घेतली जातेय...तसंच
    पक्षाअंतर्गत चर्चा झाल्यानंतर मित्र पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा केली जाणार आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मनोज जरांगेंच्या नेतृत्त्वात विधानसभा लढणार?

     

    Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापर्यंत 100 मतदारसंघाची चाचपणी करण्यात आलीय...अशी माहिती सूत्रांनी दिलीय..यात गेल्या 10 वर्षांपासून मराठा आमदार विजयी झालेले मराठा मतांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांना प्राधान्य देण्यात येत आहे...तर पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जालना ,बीड, धाराशिव जिल्ह्यातील काही मतदार संघाची चाचपणी करण्यात आलीय...अशी माहिती सूत्रांनी दिलीय...

  • उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

     

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय...मतदानावेळी दिरंगाई केली जात असल्याचा निवडणूक आयोगावर ठाकरेंनी आरोप केला होता...त्याप्रकरणी निवडणूक आयोगाने जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागवलाय...निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर शहानिशा सुरू असून, निवडणूक आयोगाकडून ठाकरेंवर कारवाईची शक्यता आहे...
     

  • सिंधुदुर्गात ऑरेंज, रत्नागिरीत यलो अलर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    IMD Alert : पुढील ५ दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन, 2 शिक्षकांना अटक

     

    Latur NEET Connection : NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता थेट लातूरपर्यंत पोहोचलेत. नांदेडच्या ATS पथकानं लातूरच्या दोन शिक्षकांना अटक केली. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण हे दोन्ही पीएच.डी धारक आरोपी जिल्हा परिषदेत शिक्षक आहेत. ते शिक्षक असले तरी लातूरमध्ये ते खासगी क्लासेस घेतात. रात्री उशिरा ATS ने छामेमारी करत त्यांना अटक केली. NEETचा पेपर फोडून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सहभाग आहे, या संशयावरून दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे.

  • खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याने दुचाकीस्वार तरुणाला चिरडलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Accident : खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याने दुचाकीस्वार तरुणाला चिरडलंय...या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय...पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे जवळील ही घटना घडलीय...विरुद्ध दिशेने आलेल्या फॉर्च्यूनर कारची दुचाकीला समोरासमोर धडक झाली...यात 19 वर्षीय ओम भालेरावचा मृत्यू झालाय...अपघातानंतर मयुर मोहिते कारमध्ये बसुनच असल्याचे कँमेरात कैद झालंय...दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्युनंतर नातेवाईकांची पोलीस स्टेशनला धाव घेतली असून, दुचाकीस्वाराच्या मृत्यु प्रकरणी मंचर पोलीसांत आमदार पुतण्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आलाय...अपघातानंतर मंचर पोलीस स्टेशनला तणावपूर्ण परिस्थिती आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • खासदार जनसंपर्क कार्यालयावरून वाद, यशोमती ठाकूर, बळवंत वानखडेंवर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Yashomati Thakur : काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडेंसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...कार्यालयाचे कुलूप तोडणे यशोमती ठाकूर यांना भोवलंय...अमरावतीत खासदार जनसंपर्क कार्यालयावरून भाजप-काँग्रेसमध्ये संघर्ष पेटलाय...यावरून अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेयत...
    खासदार जनसंपर्क कार्यालयाचा कुलूप तोडून ताबा घेणाऱ्या नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह दहा जणांवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link