Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Mon, 24 Jun 2024-10:33 pm,

LIVE Updates on June 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट द्या', कंगना रनौतच्या मागणीने खळबळ

     

    Kangana Ranaut : भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्रा कंगना रणौतने आपल्या मागणीने खळबळ उडवून दिलीय... खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात दाखल झाली.. आणि महाराष्ट्र सदनातल्या मुख्यमंत्र्यांच्या सूट म्हणजे दालनाची थेट मागणी केली. महाराष्ट्र सदनातल्या इतर रुम छोट्या असल्याने मुख्यमंत्र्यांचा सुट द्यावा अशी मागणी तीने केली. त्यासाठी महाराष्ट्र सदनातूनच महाराष्ट्रातला एका बड्या नेत्याला फोन करुन खटपटही केली.. मात्र मुख्यमंत्र्यांचा सुट देता येत नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सदनने दिलंय. त्यामुळे महाराष्ट्र सदनात राहण्याचा निर्णय कंगना रनौत बदलणार असल्याची चर्चा आहगे.. 

  • के. पी. पाटील यांना दणका, बिद्रीचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प रद्द

     

    K. P. Patil : माजी आमदार के पी पाटील यांच्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प रद्द करण्यात आलाय. इथेनॉल निर्मिती आणि विक्री परवाना रद्द केल्यानं, कोल्हापुरातील या कारखान्याचं तब्बल 130 कोटींचं नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. महायुतीची साथ सोडून के पी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्यानं ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दुपारी कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर, लगेचच राज्य उत्पादन शुल्क विभागानी ही कारवाई केली. याआधी राज्य उत्पादन शुल्क विभागानं या कारखान्यावर धाडही टाकली होती. इथेनॉल प्रकल्पात अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवत तो रद्द केल्याचं कारण सांगितलं जातंय. 

  •  देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौ-यावर आहेत.. फडणवीस आणि बावनकुळे आज दिल्लीत भाजप पक्ष श्रेष्ठींच्या भेटी घेणार आहेत.. विधान परिषदेच्या निवडणुकीवर तसंच मंत्रिमंडळाच्या विस्तारावर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.. तसंच आगामी विधानसबेच्या निवडणुकीच्या ब्ल्यू प्रिंटवरही चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'नवीन चेहऱ्यांना संधी देणार',शरद पवारांचं मोठं वक्तव्य

     

    Sharad Pawar : अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय. तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नवीन चेह-यांना संधी दिली जाणार आहे.मुंबईमध्ये अध्यक्ष शरद पवार यांनी ही माहिती दिली. सोडून गेलेल्या आमदारांच्या जागी नवीन चेहरे दिले जाणार आहेत. तसंच नवीन चेह-यांना संधीबाबत पक्षात सकारात्मक वातावरण असल्याचंही पवार म्हणाले. पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेह-यांना संधी देऊ असं त्यांनी सांगितलं. 

  • पुणे L3 बार प्रकरण, 8 आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune L3 Bar Drug Case : पुण्यातील L3 बार प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. L3 बार ड्रग्ज विक्री प्रकरणी 8 आरोपींना सत्र न्यायालयानं 29 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणातला 1 आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेली पुण्यनगरी ड्रग्ज फॅक्टरी होत चालली आहे का, असा प्रश्न यामुळे विचारला जातोय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना प्रोटोकॉल देण्यास नकार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ujjwal Nikam : अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना प्रोटोकॉल देण्यास नकार देण्यात आला. राजशिष्टाचार विभागानं उज्ज्वल निकम यांना प्रोटोकॉल द्यायला नकार दर्शवला. निकम यांची 10 जूनला सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीला काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'मी पालकमंत्री असताना असं घडत नव्हतं', चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandrakant Patil Vs Suraj Chavan : पुणे ड्रग्ज प्रकरणावरून आता दादा विरुद्ध दादा वाद रंगलाय... मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा चिंताजनक गोष्टी घडत नव्हत्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय.. त्यांचा रोख विद्यमान पालकमंत्री अजित पवारांवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटानंही त्यावर तिखट पलटवार केलाय... अंमली पदार्थांना उत्तेजन चंद्रकांत पाटील यांच्याच काळात मिळालं. उलट अजित पवारांमुळे अवैध छुपे धंदे उघडकीस आले असा पलटवार अमोल मिटकरींनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • कशेडी बोगद्यात अनेक ठिकाणी गळती

     

    Kashedi Bogda : खेडमधील कशेडी बोगद्यातली गळती वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळे कशेडी बोगद्यातून प्रवास करताना पावसाचा अनुभव येतो. यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या तज्ज्ञांकडून पाहणी केली जाणार आहे. 2 किलोमीटर लांबीचा कशेडी बोगदा 2 महिन्यापूर्वी वाहतुकीस खुला झालाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाकरे पक्षानं आंदोलनाचा इशारा दिलाय. 

  • भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीत मीडियाला घेऊन जाणारी बोट नदीत तुटली

     

    Bhandara Wainganga River :  भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीत बोट तुटली... मीडियाला घेउन जाणारी बोट नदीत तुटली...बचाव पथक वेळेवर पोहोचल्यानं अनर्थ टळला..

  • नाशिक शिक्षक मतदारसंघात तक्रार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Teachers Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षकांना पैठणी, सफारीचे कापड आणि नथ वाटप करणा-यांची चौकशी होणाराय...सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आलीय...विभागीय आयुक्त कार्यालयाने मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात त्वरीत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिलेयत...नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. बुधवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीच्या आदेशाने वाटप करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

     

  • जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना दूर ठेवा - राज ठाकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raj Thacekray : राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाष्य केलंय...सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून मतं घेतायत...जातीपातीचं विष महाराष्ट्रात कधी नव्हतं...जातीपातीमुळे महाराष्ट्रात खून होतील...जातीपातीचं विष कालवणा-यांना महाराष्ट्राने दूर ठेवावं...असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar : शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुक आयोगाला पत्र देण्यात आलंय. फ्री सिम्बॉल मधून पिपाणी चिन्ह वगळण्याची  विनंती या पत्राद्वारे करण्यात आलंय. लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षता घेतली जातेय. फ्री सिम्बॉल मध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारामाणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येतं  असल्याचा पत्रात उल्लेख केलाय. 

    बातमी पाहा - महाराष्ट्रात लोकसभेत 'पिपाणी'मुळे 'तुतारी'चा खेळ बिघडला? विधानसभेसाठी शरद पवारांनी 'हे' चिन्ह...

  • पुण्यातील एल 3 बारची तोडफोड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune L3 Bar Todfod : पुण्यातील एल 3 बारची तोडफोड करण्यात आलीय...पतित पावन संघटनेकडून बारची तोडफोड केल्याची माहिती मिळतेय...याच बारमध्ये ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं...त्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेनं या बारची तोडफोड केलीय...ड्रग्ज प्रकरणानंतर बार सील करण्यात आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • के. पी. पाटलांवरील कारवाईचा मुश्रीफांकडून निषेध

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur Hasan Mushrif : के. पी. पाटलांच्या कारखान्यावर केलेल्या कारवाईचा मंत्री हसन मुश्रीफांनी निषेध केलाय. मविआत जात असल्यामुळे कारवाई होत असेल तर निषेध करतो, अशा शब्दांत मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केलीय. के. पी. पाटलांच्या घरावरच ईडी, सीबीआयचा छापा टाकल्यानं मुश्रीफांनी उत्पादन शुल्क मंत्रालयाला खडेबोल सुनावलेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Manoj Jarange Vs Chagan Bhujbal : मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या जरांगेंच्या मागणीवर भुजबळांनी उत्तर दिलंय...मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे...मुस्लिमांना खूश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतात असं भुजबळ म्हणालेयत...मुस्लीम समाजाच्याही कुणबी नोंदी सापडल्यायत...त्यामुळे मुस्लीम समाजालाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली...त्यावर भुजबळांनी पलटवार केलाय...

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • Anil Parab : मुंबईत बांधण्यात येणा-या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या अनिल परबांनी केलीय. घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून होणारं स्थलांतर रोखण्यासाठी परबांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केलंय. घरं आरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहील. विकासकानं तसं न केल्यास विकासकाला सहा महिने तुरुंगवास किंवा 10 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा यांची मागणी परब यांनी केलीय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Nagpur Anil Deshmukh : पुण्यामध्ये अशा घटना वारंवार घडत असतील तर सरकारनं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केलंय. एक-दोन अधिकारीच नाही तर सर्व दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केलीय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन जयंत पाटलांचा सरकरावर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jayant Patil On Pune Drugs : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांनी पोलिसांसह सरकारवर निशाणा साधलाय... गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठलाय...ललित पाटील प्रकरणानंतर ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडिओ काल व्हायरल झाले...पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळतेय...तर विद्येच्या माहेरघराची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर होतंय...पुणे शहर सत्ताधारी भाजप, शिंदे सरकारमुळे बदनाम होतंय...असा निशाणा जयंत पाटलांनी साधलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मराठवाडा आणि विदर्भात ढगफुटीसदृश पाऊस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Marathwada & Vidharbha Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर दिसून येतोय. संभाजीनगर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झालाय. त्यामुळे त्यामुळे या शिवारातील असणारे छोटे मोठे ओढे आणि नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. सिल्लोडमध्ये झालेल्या पावसानं शेतक-यांना दिलासा मिळणारेय. तर तिकडे अमरावती, यवतमाळमध्येही जोरदार पाऊस बरसतोय. अमरावती जिल्ह्यात पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलीय.मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलंय. तर यवतमाळच्या आसेगावदेवीतही ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. त्यामुळे नाल्यांना पूर येऊन पाणी गावात शिरले. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उल्हासनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ulhasnagar Crime : उल्हासनगरात 21 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडलीय...10 ते 15 जणांच्या टोळीने हातात चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केलाय...ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीय...गुटखा न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा हल्ला झालाय...सद्या मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्यायत...अनिल कोरी असं जखमी तरुणाचं नाव असून, उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी रात्री चहा प्यायला गेला होता...त्यावेळी आरोपी अविने अनिल कडे गुटखा मागितला...अनिलने गुटखा दिला नाही म्हणून साथीदारांच्या मदतीने अविने हल्ला केला...यात अनिल कोरी जखमी झाला असून, पोलीस अधिक तपास करतायत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उद्या कोल्हापूर बंदची हाक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur : उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलीय...शहर हद्दवाढ आणि सर्किट बेंच प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलीय...कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यातच आज मध्यरात्रीपासून रिक्षा आणि टॅक्सी देखील बंद ठेवण्यात येणार आहे...वाहनांसाठी पासिंग विलंब शुल्क आकारणी रद्द करावी यासाठी आज मध्यरात्रीपासून कोल्हापूर रिक्षा टॅक्सी वाहनधारक समितीतर्फे देखील आंदोलन छेडण्यात आलंय...उद्या गनिमी काव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दापोली-जामगे रस्ता खचला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ratnagiri Road Close : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जामगे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ता खचलाय...डोंगरातून येणा-या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास 150 मीटर खचल्याने रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद करण्यात आलाय...जामगे रस्ता डोंगरातील मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पावसाच्या ठिकठिकाणी धोकादायक बनलाय. त्यामुळे प्रशासन पर्यायी मार्गाच्या शोधात आहे. परंतु संभाव्य धोका लक्षात घेता हा मुख्य रस्ता अनिश्चित काळासाठी काळासाठी बंद करण्यात आलाय...सध्या दापोली खेड राज्य मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून जामगे शिवतर रोडचा वापर केला जातोय...रस्ता खचल्याने दापोली प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ड्रग्ज प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Drugs Update : पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी आता कारवाईला वेग आलाय...पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बारमालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल केलाय...एकूण चार कलम लावण्यात आलीय...कालच बारच्या टॉयलेटमध्ये ड्रग्जचं सेवन करतानाचा प्रकार उघडकीस आला होता...त्याप्रकरणी कारवाई करण्यात आलीय...आज दुपारी आठही जणांना कोर्टात हजर केलं जाणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला जखमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Hyderabad Dog Attack : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला तब्बल 15 भटक्या कुत्र्यांनी घेरून तिच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय...धक्कादायक बाब म्हणजे महिला या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करत होती...मात्र, सगळे कुत्रे महिलेच्या अंगावर धावून जात होते...महिलेला खाली पाडून तिचा चावा घेण्याचा प्रयत्न केला...अखेर या महिलेनं कशीबशी या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून प्राण वाचवले...हा धक्कादायक व्हिडिओ हैदराबादच्या मणिकोंडा येथील चित्रपुरी हिल्समध्ये घडलीय...यापूर्वी याच परिसरात भटक्या कुत्र्यांनी या महिलेच्या मुलावरही हल्ला केला होता...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • टी-20 वर्ल्ड कप - भारत वि. ऑस्ट्रेलिया मॅच

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    T-20 World Cup India Vs Australia Match : टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा थरार रंगणाराय.... सुपर 8 मध्ये अफगाणिस्ताननं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं आव्हान धोक्यात आलंय. आजच्या मॅचमध्ये कांगारूंची करो या मरोची स्थिती आहे. स्पर्धेत विराट-रोहित या ओपनर जोडीला दरमादर ओपनिंग करता आली नाही. त्यामुळे त्यांच्या खेळीकडं भारतीयांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, गेल्या वन-डे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी आज रोहित सेना मैदानात उतरणारेय. मात्र, आजच्या मॅचवर पावसाचं सावट आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात पुढील 8 दिवस पावसाचे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    IMD Rain Alert : राज्यातील पुढील 8 दिवस मोसमी पावसाचे असणारेत. कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. मुंबईसह पश्चिम किनारपट्टी आणि कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर असणारेय. पुढील चार दिवस मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai MNS Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे नेते आणि पदाधिका-यांची आज बैठक होणार आहे...विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असून, मनसेकडून विधानसभेसाठी राज्यभरात उमेदवारांची चाचपणी केली जातेय...त्याबाबत आज बैठकीत चर्चा होण्याची शक्यताय...त्यामुळे मनसे विधानसभेला महायुतीतून लढणार की वेगळे लढणार याकडे लक्ष लागलंय...सकाळी 10 वाजता वांद्रे मधील MIG क्लब इथे बैठक होणार असून, या बैठकीला राज्यभरातील मनसेचे प्रमुख नेते, सरचिटणीस, तसेच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सूर्यकांता पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Suryakanta Patil : माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी नुकताच भाजप पक्षाला रामराम ठोकलाय. सूर्यकांता पाटील यांचा आजच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यताय. शरद पवार मुंबईत असल्याने दुपारनंतर पक्ष कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची शक्यताय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कोंडेश्वर धबधब्यावर तरुणांची स्टंटबाजी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Badlapur Kondeshwar Dam : बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर अतिउत्साही तरुण स्टंट करताना दिसतायत. त्यात लहान मुलांचाही समावेश असल्याचं समोर येतं. उत्साही पर्यटक कोंडेश्वर धबधब्यावर जातात आणि आपल्या जीवाला मुकतात. गेल्या 5 वर्षांत याच धबधब्यावरील कुंडात पाण्याचा अंदाज येत नसल्यानं 70हून अधिक तरूणांनी आपला जीव गमावलाय. त्यामुळे पर्यंटकांनो, धबधब्यावर जात असाल तर जरा जपून...स्वत:ची काळजी घेऊनच मौजमजा करा.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • NEET घोटाळ्याचा लातूर पॅटर्न?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur NEET Connections : NEET परीक्षेतल्या घोटाळ्यावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. आता NEET घोटाळ्याचं लातूर कनेक्शन उघड झालंय. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांसह अन्य दोघांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नवीन पेपरफुटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातल्या एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. नांदेडच्या एटीएस पथकानं शनिवारी 2 जिल्हा परिषद शिक्षकांना लातूरमधून चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं होतं.  अखेर आता काल रात्री उशीरा या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय तुकाराम जाधव, जलील उमरखान पठाण, ईरन्ना मष्णाजी कोनगलवार आणि गंगाधर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संसदेचं आजपासून अधिवेशन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Delhi Sansad Adhiveshan : आजपासून अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे...आज पहिलाच दिवस असून, नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेचं कामकाज सुरू होईल... शपथविधीचा कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे...आज पहिल्या दिवशी 280 खासदार शपथ घेतील...तर उद्या 264 खासदारांना शपथ दिली जाईल...नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांची राष्ट्रपतींनी निवड केलीय...26 तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे...27 तारखेला दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होणाराय...पंतप्रधान 2 जुलैला लोकसभेत तर दुस-या दिवशी राज्यसभेत उत्तर देणार आहेत...यावेळी विरोधी पक्षातील 235 खासदारांचं नेतृत्त्व हे राहुल गांधी करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय...त्यामुळे यावेळी विरोधक नीट परीक्षा, वारंवार रद्द होणा-या परीक्षा, शेतकरी प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरून संसदेत सरकारची कोंडी करण्याची शक्यताय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link