Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 25 Jun 2024-10:41 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 25 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांना CBIकडून अटक

     

    Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांना CBIकडून अटक करण्यात आलीये..उद्या CBI केजरीवालांना कोर्टात हजर करणार 

  • राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड

     

    Rahul Gandhi : राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आलीये...विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झाल्याचं समजतंय..काँग्रेसच्या कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसनं एकमतानं राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली होती...त्यानंतर राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला होता...आता आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्येही विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची निवड करण्यात आलीये..

  • घाटकोपर होर्डिंग प्रकरण, रेल्वे पो. आयुक्त कैसर खालीदांचं निलंबन

     

    Ghatkopar Hoarding  Accident Case : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांचे निलंबन....घाटकोपर प्रकरणात होर्डिंगला परवानगी देताना गैरप्रकार आि प्रशाकीय निष्काळजी पणा झाला असल्याचा ठपका...सरकारच्या गृह विभागाने केले खालीद यांचे निलंबन.....या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल पोलिस महासंचालकांनी राज्य सरकारला सोपवला होता...16 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले होते होर्डींग

  • पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोपीची सुटका

     

    Pune Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची सुटका झालीय. मुंबई हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केलाय...त्याला तात्काळ आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत.. त्यानंतर त्याची बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने हायकोर्टात याचिका केली होती...अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यानंतर पुन्हा त्याला ताब्यात घेण्यात आलं ही अटक बेकायदा असल्याचं त्याच्या आत्यानं हायकोर्टातील याचिकेत म्हटलं होतं... त्याचबरोबर अल्पवयीन आरोपीचे आई-वडिल अटकेत असल्याने त्याला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत... न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिलेत...

  • PWD कंत्राटदारांवर मेहेरबान?

     

    PWD Scam : महाराष्ट्र सरकारचं सार्वजनिक बांधकाम खातं अर्थात PWD कंत्राटदारांवर कसं मेहेरबान झालंय, याची धक्कादायक माहिती हाती आलीय... मंत्र्यांच्या 36 बंगल्यांच्या पाणी आणि वीज बिलापोटी 2017 ते 2023 या काळात तब्बल 52 कोटी रुपये खर्च आला... त्यातील 26 कोटी रुपये बेकायदेशीरपणे खासगी कंत्राटदाराच्या खात्यात वळवण्यात आले, असा दावा महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केलाय... पाणी बिल आणि वीज बिलाची रक्कम बीएमसी आणि बेस्टच्या खात्यात जमा न होता, थेट कंत्राटदारांच्या खात्यात कशी गेली ? असा सवाल आता उपस्थित होतोय.. मंत्र्यांच्या बंगल्यांचे नुतनीकरण आणि दुरूस्तीपोटी ही रक्कम कंत्राटदाराला दिल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागानं केलाय... हा सगळा खर्च गेल्या ६ वर्षांतला म्हणजे याआधीचं महाविकास आघाडी सरकार आणि सध्याचं महायुती सरकार यांच्या काळातला असल्याची माहिती हाती आलीय.. 

  • 'शरद पवारांकडून पाठिंब्याचं पत्र घ्या', सदाभाऊ खोतांचं मनोज जरांगेंना आव्हान

     

    Sadabhau Khot on Manoj Jarange  :  मनोज जरांगेंनी शरद पवारांसह महाविकास आघाडीतील खासदारांकडून पाठिंब्यासंदर्भात पत्र लिहून  घ्यावं...शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी जरांगेंना आव्हान दिलंय... मराठा बांधवांचा ओबीसीत समावेश होईपर्यंत शरद पवार, सुप्रिया सुळेंसह निवडून आलेल्या मविआ खासदार पाठिंबा देतील, अशा आशयाचं पत्र जरांगेंनी पवारांकडून लिहून घ्यावं...तसं न केल्यास जरांगे शरद पवारांसाठी काम करत होते ही भावना निर्माण होईल, असं सदाभाऊ खोत म्हणालेत... 

  • 'भुजबळांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप

     

    Manoj Jarange : अंतरवाली सराटीमध्ये पोहोचताच मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय...भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत असा आरोप जरांगेंनी केलाय... त्याचबरोबर 6 जुलैपासून पहा काय होतं ते, असा इशाराही जरांगेंनी दिलाय.....छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेतल्यानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना डिस्चार्ज देण्यात आला...त्यानंतर ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले...फटाक्यांच्या आतषबाजीत जरांगेंचं स्वागत करण्यात आलं...तर महिलांनी जरांगेंचं औक्षण केलं...यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली...
     

  • देवेंद्र फडणवीसांची बँकांना तंबी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadnavis : पीक कर्ज देताना बँकांनी शेतक-यांकडे CIBILची मागणी केल्यास त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात येईल...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना हा इशारा दिलाय...राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी फडणवीसांनी हा इशारा दिलाय...गेल्यावेळी सुद्धा तेच सांगितले मात्र, बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज असल्याचं फडणवीस म्हणालेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • लोकसभेत ओवैसींचा 'जय पॅलेस्टाईन'चा नारा

     

    Asaduddin Owais : लोकसभेत ओवैसींचा 'जय पॅलेस्टाईन'चा नारा...खासदारकीची शपथ घेतल्यानंतर 'जय पॅलेस्टाईन'ची घोषणा....ओवैसींच्या वक्तव्यामुळं नवा वाद
     

  • 'सोडून गेलेल्या काहींना दरवाजे खुले', शरद पवारांचं मोठं विधान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar  : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीय केलंय.. त्यासाठीच शरद पवारांनी नवा डाव टाकलाय. सोडून गेलेल्या काहींना पक्षाचे दरवाजे खुले आहेत असं महत्त्वाचं विधान शरद पवारांनी केलंय.. सरसकट सर्वांना पक्षात पुन्हा प्रवेश देता येणार नाही. मात्र जिथे पक्षाला मदत होईल तिथे काहींना घेता येईल असं विधान करत पक्षापासून दूर गेलेल्या जुन्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शरद पवारांनी सूचक संकेत दिले आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

     

    Pune Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय...त्याला तात्काळ आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत...अल्पवयीन आरोपीच्या आत्याने हायकोर्टात याचिका केली होती...अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यानंतर पुन्हा त्याला ताब्यात घेण्यात आलं ही अटक बेकायदा असल्याचं त्याच्या आत्यानं हायकोर्टातील याचिकेत म्हटलं होतं...त्याचबरोबर अल्पवयीन आरोपीचे आई-वडिल अटकेत असल्याने त्याला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत...न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिलेत...

  • छगन भुजबळांचा किशोर दरांडेंवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chagan Bhujbal On Kishor Darade : नाशिक शिक्षक मतदारसंघात प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना मैदानात उतरवण्याची गरज काय होती? असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी केलाय. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार आमनेसामने आहेत. शिंदे गटाकडून किशोर दराडे रिंगणात आहेत. त्यांच्यावरच भुजबळांनी टीका केलीय. दराडेंनी 6 वर्षांत डोंगराएवढी कामं केली तर मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवण्याची गरज काय पडली असा सवाल भुजबळांनी केलाय

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नाशिकच्या खासगी शाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik School Girl Death : नाशिकमध्ये सहावीत शिकणा-या 11 वर्षांच्या मुलीचा शाळेत संशयास्पद मृत्यू झालाय...बेंचवर बसताना चक्कर आल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती शिक्षकांनी दिलीय...दिव्या त्रिपाठी असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून, तिच्या मृत्यूने खळबळ उडालीय...नाशिकच्या सिडको परिसरातील शाळेत ही घटना घडलीय...मात्र, विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुणे ड्रग्ज आणि गुन्हेगारीचं मुख्य केंद्र - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून राऊतांनी गृहमंत्री, पालकमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केलाय...ड्रग्ज प्रकरणाला गृहमंत्री, पालकमंत्री जबाबदार असल्याचं राऊतांनी म्हटलंय...महाराष्ट्रात पुणे ड्रग्जचं मुख्य केंद्र असून, गुजरातमधून ड्रग्ज महाराष्ट्रात येतंय असा आरोप केलाय...ड्रग्जचा पैसा राजकीय कार्यक्रमांसाठी वापरला जात असून, याची चौकशी व्हावी अशी मागणी राऊतांनी केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Pune L3 Bar Update : पुणे ड्रग्स प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने L 3 बारवर केलेल्या कारवाईचा हा  व्हिडिओ आहे. मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करतानाचा व्हिडिओ समोर आलाय.L3 मधून 241 लिटर विदेशी मद्य राज्य उत्पादन विभागाकडून जप्त करण्यात आलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित हॉटेल सील करत परवाना रद्द करण्यात आलाय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Ravindra Waikar : उत्तर पश्चिमचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकरांनी सदस्यत्वाची शपथ घेतली...रवींद्र वायकरांना लोकसभा अध्यक्षांनी शपथ देऊ नये अशी मागणी ठाकरे गटाने केली होती...मात्र,वायकरांनी आज शपथ घेतली...वायकरांचा 48 मतांनी विजय झालाय...वायकरांना विजयी जाहीर करताना निवडणूक अधिका-यांनी घोळ केल्याचा दावा ठाकरे गटाने केलाय...त्याला निवडणूक आयोगात आव्हानही दिलंय..मात्र, आज वायकरांचा शपथविधी सोहळा सुरळीत पार पडला...त्यामुळे आता ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे...

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • निलेश लंकेंनी इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nilesh Lanke : अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी लोकसभेचा सद्सय म्हणून इंग्रजीतून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात निलेश लंकेंच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणवलं होतं. त्यात सुजय विखे पाटील यांनी भाषणात निलेश लंके इंग्रजीतून कसं बोलणार? त्यांना इंग्रजी येतं का? असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांचा पराभव करत दिल्ली गाठली. दिल्लीच्या संसदेत जाताना खासदार निलेश लंके यांनी संसदेच्या पाय-यांवर डोकं टेकलं. त्यानंतर सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना इंग्रजीतून शपथ घेतली. दरम्यान पवारांनीही यावरुन सुजय विखेंना टोला लगावलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा !

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Water : पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांमध्ये मिळून अवघा 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना 2 धरणांमधून राखीव कोट्यातील जलसाठ्यातून पाणी उपलब्ध केलं जातंय. त्यामुळे तूर्तास पाणीकपातीत आणखी वाढ करण्याचा कुठलाही विचार नसल्यानं बीएमसीनं स्पष्ट केलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • L3 बारची फॉरेन्सिक तपासणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune L3 Bar Forensic Inspection : पुण्यातील L 3 बार मध्ये फॉरेन्सिक पथकाकडून ड्रग्स प्रकरणी तपासणी करण्यात आलीये. बार मधून काही नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेत.. यात बारमध्ये पार्टी करणा-या दोघांचं ब्लड सॅम्पल पोलिसांनी घेतलंय. या रक्ततपासणीतून पार्टीत ड्रग्ज सेवन करण्यात आलं का याचा तपास केला जाणार आहे.. शिवाय पार्टीमध्ये सहभागी झालेल्या इतर लोकांनाही चौकशीसाठी बोलालं जाणार आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • टी-20 वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलिया बाहेर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    T-20 World Cup Afghanistan Win : अफगाणिस्ताननं टी-20 वर्ल्डकपमध्ये इतिहास घडवलाय...बलाढ्य ऑस्ट्रेलियापाठोपाठ बांग्लादेशलाही पराभवाची धूळ चारलीय. अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तान 8 रन्सनं विजय मिळवलाय. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं टी-वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आलं. तर अफगाणिस्त पहिल्यांदाच मोठ्या एॅटीत सेमीफायनलमध्ये एन्ट्री केलीय. आता सेमीफायनलमध्ये  आफगाणिस्तची दक्षिण आफ्रिकेशी लढत होणारेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Mumbai Foot Path : मुंबईतील रस्ते आणि फुटपाथवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टानं बीएमसी तसंच राज्य सरकारला फटकारलंय. शहरात कुणी व्हीव्हीआयपी येणार असेल तेव्हाच फुटपाथवरील फेरीवाल्यांना तातडीनं हटवता मात्र इतर दिवशी कुठलीही कारवाई का केली जात नाही अशा शब्दांत खडंपीठानं प्रशासनाला सुनावलंय. एवढंच नाही तर स्वच्छ आणि मोकळ्या फुटपाथवरून चालणं हा व्यक्तीचा मुलभूत अधिकार असून बीएमसी आणि राज्य सरकार त्यासाठी बांधील असल्याची आठवण हायकोर्टानं करून दिली.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar Maharashtra Tour : लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार महाराष्ट्र दौरा करणारेत. महाराष्ट्र दौ-याच्या निमित्तानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असणारेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 100 जागा लढवण्याचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडून जागांची निश्चिती होण्याची शक्यताय. विधानसभेच्या प्रत्येक पक्षाचा जागा निश्चित झाल्या की शरद पवार महाराष्ट्र दौरा करणारेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • UPSC परीक्षांवर आता AI कॅमेऱ्यांची नजर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    UPSC Exam : NEET-UG, NET अशा महत्त्वांच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण उजेडात आल्याने देशभरात गदारोळ माजलाय...आता असाच गोंधळ यूपीएससीतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांमध्ये होऊ नये म्हणून त्या संस्थेनं तातडीने काही पावले उचललीयत...UPSC परीक्षांमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षांर्थींची ओळख पटविण्याकरिता फेशियल रेकग्निशन तंत्राचा वापर केला जाणार आहे...आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे संचालित होणारे सीसीटीव्ही यांचा वापर करण्याचे यूपीएससीनं ठरवलंय..त्यामुळे गैरप्रकार रोखले जाण्याची शक्यताय...यंदा 26 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत...दर 24 परीक्षार्थींमागे एक सीसीटीव्ही बसवला जाणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुणे ड्रग्ज प्रकरण, आणखी एक अधिकारी निलंबित

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Drugs Case Update : पुणे ड्रग्स प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस सहनिरीक्षक अनंत पाटील यांचं निलंबन केलंय.  आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्याचं, दोन पोलीस निरीक्षकांचं आणि दोन बीट मार्शल अशा एकूण सहा जणांचं  निलंबन याप्रकरणी करण्यात आलंय. पुण्यातील L3 बारमधल्या पार्टी संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अर्चना पुट्टेवारच्या संपत्तीची चौकशी होण्याची शक्यता

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Hit & Run Case Update : नागपुरातीत पुट्टेवार हिट अँड रन प्रकरणी अर्चना पुट्टेवार यांच्या संपत्तीची चौकशी होण्याची शक्यता आहे..  एसीबीकडे अर्चनाविरुद्ध तक्रार प्राप्त झालीये. सासरे पुतषोत्तम पुटेवार यांची सुपारी देऊन हत्या करण्यात अर्चनाचा भाऊ प्रशांत पार्लेवार असे एकूण सात जणाना अटक झाल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आलीये. दरम्यान अर्चना पुट्टेवार गडचिरोली जिल्ह्याच्या नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक म्हणून काम करताना मोठी संपत्ती जमावल्याची बाब समोर आलीये.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा 

  • NEET पेपरफुटी प्रकरणात दोघांना अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur : NEET चं लातूर कनेक्शन उघड झालंय...पेपरफुटी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय.....जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक जलील पठाणला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय...तर दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधवला शिवाजी नगर पोलिसांनी रात्री अटक केलीय...तर दुस-या दोन आरोपींचा शोध पोलीस घेतायत...एकंदरीतच या प्रकरणात दररोज तपासात नवीन नवीन माहिती समोर येत आहे. गुणवाढीच्या दृष्टीने दिल्लीतील आरोपी गंगाधर मुंडे याच्याशी संपर्क असलेला उमरगा येथील इरण्णा कोनगलवार लातूरमधील दोघा शिक्षकांकडून प्रवेशपत्र मागून घेत होता...50 हजारांत बोलणी व्हायची...गुण वाढवण्यासाठी पूर्ण कामाचे 5 लाख ठरायचे अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे आलीय...आतापर्यंत दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, बाकी दोघांचा शोध पोलीस घेत आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 'त्या' 12 विद्यार्थी, पालकांची होणार चौकशी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    NEET Exam Paper Scam Update : लातूरच्या नीट घोटाळा प्रकरणी आता पालक आणि विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उमरग्याच्या इराण्णा कोनगलवारच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळेस त्याच्या घरात 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली. ज्या विद्यार्थ्यांची ही हॉल तिकीट आहेत, त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पोलीस चौकशीला बोलवणारेत. तर कोनगलवारच्या घरातून 6 मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेत. त्यात पठाणचे तीन मोबाईल, जाधवचे दोन आणि कोनगलवारचा एक मोबाईल आहे. कोनगलवार अजूनही फरार आहे. संशयास्पद व्यवहाराची चौकशी करण्यासाठी या तिघांचेही बँक पासबुक जप्त करण्यात आलेत. आरोपींच्या मोबाइलमध्ये सांकेतिक भाषा वापरून मेसेज पाठवण्यात आलेत. तो डेटा फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पाकिस्तान कांगो व्हायरसमुळं हैराण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pakistan Congo Virus : अगोदरच महागाईच्या कचाट्यात सापडलेला पाकिस्तान सध्या कांगो व्हायरसमुळे हैराण झालाय. कांगो व्हायरसच्या वाढत्या रुग्णामुळे पाकिस्तानची डोखेदुखी वाढलीय. आतापर्यंत 13 जणांना कांगो व्हायरसची लागण झालीय. आरोग्य मंत्रालयानं देशभरात अलर्ट जारी केलाय. अनेक शहरांमधील नागरिकांमध्ये कांगोची लक्षणे आढळून येत आहेत. तर बलुचिस्तानात एका 32 वर्षीय तरुणाला कांगोची लागण झाल्याचंही समोर आलंय. दरम्यान, पाकिस्तानात कांगोचा फैलाव लक्षात घेता भारत सरकारही सतर्क झालंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pension Scheme : राज्यातील सरकारी कर्मचा-यांसाठी महत्त्वाची बातमी... सुधारित पेन्शन योजना 1 मार्च 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिलीय. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या जवळपास साडे आठ लाख कर्मचा-यांना या निर्णयाचा फायदा होणारेय. राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचा-यांच्या सुधारित पेन्शनच्या संदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर होण्याची चिन्हं आहेत. पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    T-20 World Cup India Win : टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. रोहित शर्माच्या शानदार 92 रन्सच्या जोरावर टीम इंडियानं हा विजय साकारलाय. भारतानं पहिल्यांदा बॅटिंग करत ऑस्ट्रेलियापुढं 206 रन्संच टार्गेट दिलं होतं. मात्र, कांगारुंना 181 रन्सपर्यंत मजल मारता आली.  मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलदीपनं या दोघांनाही आऊट करून विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वन-डे वर्ल्डकपमधील बदला टीम इंडियाने घेतलाय...या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्ताच्या मॅचवर ऑस्ट्रेलियाचं भवितव्य अवलंबून असणारेय. या विजयासह टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक मॅच जिंकण्याच्या वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत 50 सामने खेळलेत. त्यातील 34 सामने जिंकलेयक...तर 15 सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कोकण, कोल्हापुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain Alert : किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे...सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर विदर्भ, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय.. दक्षिण गुजरातवर हवेच्या वरच्या स्तरात वा-याची चक्रिय स्थिती निर्माण झालीये.. त्यामुळे बंगालच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ही हवामानविषयक स्थिती मान्सूनच्या पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे पुढील तिन दिवस पावसाचे असतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सूर्यकांता पाटील पवार गटात प्रवेश करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Suryakanta Patil : माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश करणार आहेत...आज सकाळी 11 वाजता पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे...सूर्यकांता पाटील यांनी नुकताच भाजप पक्षाला रामराम ठोकलाय. शरद पवारांच्या उपस्थितीत सुर्यकांता पाटील या शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link