Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 29 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
BCCIकडून टीम इंडियाला 125 कोटींचं बक्षीस जाहीर
BCCI : बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय...टी-२० वर्ल्डकप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन करताना जय शाहा यांनी हे बक्षीस जाहीर केलंय...ही बक्षीस रक्कम जाहीर करताना आनंद होत असल्याचं ते म्हणालेत...सोशल मीडिया साईट एक्सवर त्यांनी याबाबत माहिती दिलीये...संपूर्ण स्पर्धेत संघाने अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन केल्याबाबत त्यांनी टीम इंडियाचं कौतुक केलंय...उत्कृष्ट कामगिरीबाबद सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचंही त्यांनी अभिनंदन केलंय...
प्रसाद लाड विधानसभा लढण्यास इच्छुक
Prasad Lad : भाजप नेते आमदार प्रसाद लाड हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्यांनी सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलीय. पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढणार, असं लाड यांनी म्हटलंय. सध्या सायनमध्ये भाजपचेच आमदार आहेत...त्यामुळे सायनमधून लाड यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानं भाजपमध्ये वाद होण्याची शक्यताय...
'मातोरीतील दगडफेकीमागे भुजबळ', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : बीडच्या मातोरीत झालेली दगडफेक छगन भुजबळांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय...मातोरीतील दगडफेक नियोजित होती...हाकेंची रॅली चार वाजता आली आणि ते आठ वाजता का आले? असा सवाल करत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय.....
बातमीचा व्हिडीओ पाहा-
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का?
Ajit Pawar Group : पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय...शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राहुल भोसले, समीर मासुळकर, पंकज भालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...या भेटीचं वृत्त खरं असल्याचं पवारांनी म्हटलंय...महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र राहावं असं त्यांना वाटतं...आम्ही त्यांचं स्वागत करू असं पवारांनी म्हटलंय...भेट घेणाऱ्यांमध्ये माझी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडेंचं ही नाव असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय...त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू आहे...
रवींद्र जडेजा इंटरनॅशनल T-20 स्पर्धेतून निवृत्त
Ravindra Jadeja : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यानंही आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धेमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अत्यंत कृतज्ञतेनं आपण आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धेतून निवृत्ती घेत असल्याचं, रवींद्र जडेजानं इंस्टाग्रामवर पोस्ट करुन जाहीर केलं. देशासाठी नेहमीच आपण सर्वोत्तम दिलं आणि यापुढेही क्रिकेटच्या इतर फॉम्रॅटमध्ये ते देत राहू असा विश्वासही त्यानं दिला. तर टी-20 वर्ल्ड कप जिंकणं हे स्वप्न होतं ते सत्यात उतरलं. तसंच आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधला तो सर्वोच्च क्षण होता, अशी अत्यंत आनंद आणि गौरवाची भावना त्यानं व्यक्त केली. सोबतच अगणित आठवणी, प्रोत्साहन आणि ठाम पाठिंब्यासाठी त्यानं देशवासीयं आणि चाहत्यांचे आभारही मानलेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
अबू सालेमला विशेष कोर्टाकडून दिलासा
Abu Salem : 1993 सालातील मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम याला विशेष कोर्टाकडून दिलासा मिळालाय. खटल्या दरम्यान तुरुंगात काढलेल्या दिवसांची मोजतात जन्मठेपेच्या शिक्षेत करण्यात यावी, अशी मागणी आरोपी अबू सालेमनं कोर्टाकडं केली होती. कोर्टानं ही मागणी मान्य केलीय. त्यामुळे सालेमच्या शिक्षा कमी होणारेय. तब्बल 12 वर्षांची शिक्षा कमी होणार आहे. त्यामुळे गुंड सालेम लवकरच तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.
सुजाता सौनिक पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्त
Sujata Saunik : ज्येष्ठ IAS अधिकारी सुजाता सौनिक यांना राज्याच्या पहिली महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला IAS अधिका-याची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकार महिलांचा सन्मान करत असल्याचा संदेश यातून महायुती सरकारनं दिला आहे. सुजाता सौनिक गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या 1987 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. आज संध्याकाळी डॉक्टर नितीन करीर यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील 5 जण गेले वाहून
Bhushi Dam : लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. भुशी डॅम पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो. वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश असून, त्यांचं शोधकार्य सुरू आहे.
पुणे पोलिसांची भिडे गुरूजींना नोटीस
Sambhaji Bhide : पुणे पोलिसांनी भिडे गुरूजींना नोटीस बजावली आहे. तुकाराम महाराज पालखी दर्शनावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या अशी नोटीस पोलिसांनी बजावलीये. यापूर्वी भिडे गुरूजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणली होती, तसंच तेढ निर्माण करणारी भाषणंही केली होती. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची नोटीस पोलिसांनी त्यांना दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
नाशिक रोड परिसरात दोन गटांत राडा
Nashik : वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषादरम्यान नाशिकरोड परिसरात दोन गटात तुफान राडा झाला... यावेळी एकमेकांवर गोळीबार आणि कोयत्याचे वारही करण्यात आले.. देवळाली गाव आणि विहितगाव दरम्यान हा राडा झाला.. यात 5जण जखमी झालेत.. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय. तर सर्व जखमींना नाशिकच्या खाजगी रुंगणल्यात दाखल करण्यात आलंय.
बातमी पाहा -
कोस्टल रोडवर कारचा अपघात
Mumbai Coastal Road Accident : कोस्टल रोडच्या भुयारी मार्गामध्ये BMW कारचा अपघात झालाय. भरधाव वेगाने जात असताना कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार भुयारी मार्गातील भिंतीला धडकली. आज रविवार असल्यानं भुयारी मार्गात वाहनांची वर्दळ कमी होती. याचा फायदा घेत कारचालक सुसाट कार चालवत होता. मात्र, कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
'एकला चलो रे ची भूमिका नको'
Mumbai BJP Meeting : महायुतीतल्या घटक पक्षांना एकत्र घेऊन आगामी निवडणुकीला सामोरे जायचंय...आता एकला चलो रे ची भूमिका नको, स्थानिक पातळीवर समन्वय राखा असे आदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रभारींनी दिलेयत...काल भाजप कोअर कमिटीची बैठक राज्याचे नवे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली...बैठकीत प्रभारींनी उपस्थित नेत्यांना हे आदेश दिलेयतय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पिंपरीत अजित पवार गटाला धक्का?
Pimpri Ajit Pawar Camp : पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राहुल भोसले, समीर मासुळकर, पंकज भालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...भेट घेणाऱ्यांमध्ये माझी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडेंचं ही नाव असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय...त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मोरपीस विक्रीला बंदी
Pune Peacock Feather Crime : मोरपिसाची विक्री केल्यास आता कठोर कारवाई होणार आहे. राज्य सरकारने मोराची पिसं अथवा साहित्य विक्रीला बंदी घातलीय. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मोरांची शिकार करून मोरपिसांची विक्री करणं हा गुन्हा आहे. मोराची शिकार करून मोरपिसे विकणाऱ्याला तीन वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे कुठेही मोरपीस विक्री होत असेल तर वनविभागाला संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
एल 3 बार प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
Pune L3 Bar Update : पुण्यातील एल थ्री बार प्रकरणातील सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीये. या आरोपींनी शहरातील अन्य बार तसेच पब मध्ये अमली पदार्थांची विक्री केल्याचा संशय पोलिसांना आहे.. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची कोठडी वाढवून मागीतली.. त्यानंतर न्यायालयानं या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत 2 जुलैपर्यंत वाढ केलीये...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राहुल द्रविडकडून टीम इंडियाचं कौतुक
Rahul Dravid On Team India : टीम इंडियानं वर्ल्डकप जिंकून कोच राहुल द्रविडला निरोपाची भेट दिलीय. तर टीम इंडियाची ही तर सुरुवात आहे, असं कौतुक कोच राहुल द्रविडनं केलंय. टीम इंडिया भविष्यात अनेक ट्रॉफी जिंकणार, असा विश्वासही द्रविडनं व्यक्त केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पालखी सोहळ्यात ड्रोन वापराला बंदी
Pune Drone : पुण्यात पालखी सोहळ्यात खासगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमे-याच्या वापरला बंदी घालण्यात आलीये.. खासगी चित्रीकरणासाठी पोलिसांकडून परवानगी मिळवणं गरजेचं आहे.. बेकायदा चित्रीकरण केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पुणे पोलिसांनी दिलाय.. ड्रोन कॅमे-याच्या चित्रिकरणाचा गैरवापर होऊ शकतो तसंच संभाव्य घातपात टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतलाय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
Beed Murder : बीडच्या परळीत रात्री झालेल्या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे जागीच ठार झालेयत...तर ग्यानबा गिते गंभीर जखमी झालेयत...शहरातील बँक कॉलनीत ही घटना घडलीय...या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीय...जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत...दरम्यान रात्री बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी यातील आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना केल्यायत...दरम्यान मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बाजूने होते...परंतु काही काळानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी जवळीक साधली होती. यानंतर आता ही घटना घडल्याने यामागे काही राजकीय वाद होता का? हे पोलीस तपासात स्पष्ट होऊ शकणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Maauli Palkhi : विठू नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगाचे स्वर याने संपूर्ण आळंदी नगरी भक्तीमय रसात नाहून निघालीये... आळंदीच्या गांधीवाडा इथं मुक्काम घेतल्यानंतर माऊलींची पालखी आज पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झालीये.. संगमवाडीमध्ये माऊलींची पालखी दुपारचा विसावा घेईल.. त्यानंतर पुण्यातील भवानी पेठ इथं पालखीचा रात्रीचा मुक्काम असेल..
रोहित शर्माची टी-20 मधून निवृत्ती
Rohit Sharma & Virat Kohli Retirement : टीम इंडियानं वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष साजरा केला जात आहे... यातच कॅप्टन रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. तर विराट कोहलीने फायनलमध्ये सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर टी-20 वर्ल्डकपमधून निवृत्ती होत असल्याची माहिती दिली. हा माझा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असल्याचं कोहली म्हणाला
Railway Megablock : रेल्वेमार्गावरील रुळांच्या देखभाल दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या व सहाव्या मार्गिकवर, तर हार्बर ते मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुसरीकडे बोरिवली आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान अप डाऊन जलदमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.