Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
अजित पवारांची अरविंद सावंतांवर टीका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शायना एनसी यांच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही अरविंद सावंतांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय...शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अशी वक्तव्य शोभत नसल्याचं अजित पवार म्हणालेत...लाडक्या बहिणींचा सन्मान करणा-या राज्यात अशा वक्तव्यांना स्थान नसल्याचं अजित पवार ट्विटकरत म्हणालेत...पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अजित पवार काय म्हणालेत...
अरविंद सावंतांच्या विधानाचा नीलम गोऱ्हेंकडून समाचार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार अरविंद सावंत यांच्या शायना एनसी संदर्भातील विधानाचा, शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी खरपूस समाचार घेतला. मराठी ग्राम्य भाषेत माल हा शब्द अपमानास्पद स्वरुपात वापरला जातो. या प्रकरणी आपण अरविंद सावंतांविरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहोत. तसंच त्यांच्यावर कारवाईची मागणीही आपण करणार असल्याचं नीलम गो-हे यांनी सांगितलं.
25 नोव्हेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन?
Sansad Winter Session : 25 नोव्हेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन चालणार असल्याचं समजतंय. तर जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये 26 नोव्हेंबरला दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन होणार असल्याचं सांगण्यात आलंय. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी जुन्या संसद भवनामधील सेंट्रल हॉलमध्ये राज्यघटना स्वीकारली गेली होती. त्याला यंदा 75 वर्षं पूर्ण होत आहे. त्या ऐतिहासिक दिवसाचं स्मरण म्हणून, सेंट्रल हॉलमध्ये संयुक्त अधिवेशन घेतलं जाणार असल्याचं समजतंय.
विधानसभेतील बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेतील बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु केलेत.. भाजपातील नाराजांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुढाकार घेणार आहेत.. परिस्थिती नुसार बंडखोरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यावरही भर देण्यात येणार आहे... त्यामुळे देवेंद्र फडणवीस बोरिवलीतील बंडखोर नेते गोपाळ शेट्टींचीही भेट घेण्याची दाट शक्यता आहे..
कोल्हापुरात अश्लील पार्टीवर पोलिसांचा छापा
Kolhapur Party : कोल्हापुरात अश्लील पार्टीवर पोलिसांनी छापा मारलाय.. गगनबावड्यातील कोदे इथल्या नयनिल फार्म रिसॉर्टवर पोलिसांनी ही कारवाई केलीये.. या कारवाईदरम्यान 9 तरुणींसह 31जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात मुंबई, पुणे, सांगलीसह कोल्हापुरातील नागरिकांचा समावेश आहे.. पार्टीत या तरुणी अश्लील हावभाव करत असल्याचं आढळून आलंय. या कारवाईत पोलिसांनी दारु, मोबाईलसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.
नांदेडमध्ये मविआत बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नांदेडच्या नायगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यानं बंडखोरी केलीय.राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे पूत्र शिरीष गोरठेकर यांनी बंड पुकारलाय. समर्थकांची बैठक घेऊन अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. या मतदारसंघात काँग्रेसकडून मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळालीय. त्या अशोक चव्हाणांचे मेव्हणे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या सून आहेत. या बंडामुळे मीनल खतगावकरांना फटका बसण्याची शक्यता आहे.
माल शब्दावरुन आरोप-प्रत्यारोप
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अरविंद सावंत यांनी माल म्हणून संबोधल्याचा आरोप शायना एनसी यांनी केलाय. तसा व्हिडिओ त्यांनी दाखवून सावंत यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. यातून सावंत आणि ठाकरेंच्या शिवसेनेची मानसिकता दिसत असल्याचं त्यांनी म्हटलंय.. तर माल या शब्दाचा चुकीचा अर्थ शायना एनसी यांनी घेतल्याचं सावंत म्हणालेत.. त्यांच्याविषयी माल शब्द वापरला नसल्याचं स्पष्टीकरण सावंत यांनी दिलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबरला नाशिकमध्ये येणार आहेत... धुळ्यांनतर नाशिकमध्येही त्यांची जाहीर सभा होणार आहे.. निवडणुकीसाठी महायुतीनं स्टार प्रचारकांना मैदानात उतरवलंय. नाशिकमध्ये मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे यांच्याही प्रचार सभांची मागणी करण्यात आलीये.गिरीष महाजनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळाची पाहणी केली...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
रश्मी शुक्लांना पदावरून हटवा- संजय राऊत
Sanjay Raut on Rashmika Shukla : काँग्रेस नेते नाना पटोलेंपाठोपाठ खासदार संजय राऊतांनीही रश्मी शुक्लांवर आरोप केलेत. रश्मी शुक्ला आजही महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन टॅप करतात, असा आरोप राऊतांनी केलाय. पदाधिका-यांना तडीपार करून राज्यातील निवडणुका ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरूये आणि याचा सूत्रधार रश्मी शुक्ला आहेत. निवडणूक आयोग त्यांना पदावरून का हटवत नाही? असा सवाल राऊतांनी निवडणूक आयोगाला विचारलाय.
माहीममध्ये सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम
Sada Sarvankar : सदा सरवणकर माहीम मतदार संघातून लढण्यावर ठाम आहेत.. माघार घेणार नसल्याचं सरवणकर म्हणालेत.. महायुतीनं तिकीट दिलं असून आता माघार घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.. निवडणूक लढू आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. वर्षा बंगल्यावर कोणतीही बैठक झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.. राज ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली त्यांनी वेळ दिल्यावर भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलंय..
अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांचं निधन
DR. Bibek Debroy : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. देबरॉय यांनी यापूर्वी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलपती म्हणून काम पाहिलंय... पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मानही करण्यात आला होता..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
ट्रम्पेट चिन्हामुळे अनेकांचा गोंधळ उडाला - शरद पवार
Sharad Pawar : तुतारी वाजवणा-या माणसातला माणूस महत्त्वाचा-पवार... ट्रम्पेटचा उल्लेख आता ट्रम्पेटच होणार-शरद पवार...ट्रम्पेट चिन्हामुळे अनेकांचा गोंधळ उडाला -पवार...ट्रम्पेट चिन्हामुळे चुकीच्या ठिकाणी मतदान झाले- शरद पवार...दरम्यान काल निवडणूक आयोगाकडून शरद पवारांना दिलासा होता. ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचा उल्लेख ट्रम्पेट असाच राहणारेय, असा महत्त्वाचा निर्णय दिला होता. चिन्हामुळे गेल्या निवडणुकीत फटका बसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवली...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढली...फोर्स वनचे सहा कमांडो फडणवीसांच्या सुरक्षेत तैनात
बातमीचा व्हिडीओ पाहा-
वाशिमचे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात
Washim Tomato Farmers : वाशिमच्या मालेगावात टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत.. बदलत्या हवामानामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झालाय.. यामुळे टोमॅटोची गळ वाढलीये... उत्पादनात घट झाल्यानं लागवडीचा खर्चतरी निघतो का असा प्रश्न या शेतक-यांपुढे निर्माण झालाय
बातमीचा व्हिडीओ पाहा-
राज्यात शंभरी पार केलेले 47 हजार मतदार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात शंभरी पार केलेले 47 हजार मतदार...18 ते 19 वयोगटातील मतदारांचा आकडाही लक्षवेधी...निवडणुकीत 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार...18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार 392 मतदार
बातमीचा व्हिडीओ पाहा-
कुलाब्यात 9 कोटी रुपये किमतीचे डॉलर्स जप्त
9 crore dollars seized in Mumbai : मुंबईत 9 कोटी रुपयांचं परकीय चलन जप्त...कुलाब्यात 9 कोटी रुपये किमतीचे डॉलर्स जप्त...कुलाबा मतदारसंघात निवडणुक आयोगाच्या पथकाची कारवाई...बँकेचे पैसे असल्याची प्राथमिक माहिती
लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा- अजित पवार
Ajit Pawar : काही लोकांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना निवडून दिलं. लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा, असं काही लोकांनी ठरवलंय, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. गेल्या विधानसभेत मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलात. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वाधिक निधी बारामतीसाठी आणला, अशी माहितीही अजित पवारांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
नवी मुंबईत मद्यपी कारचालकानं 3 जणांना उडवलं
Navi Mumbai Drunk and Drive : ऐन दिवाळीत नवी मुंबईत ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडलीये.. सानपाडा यथे रात्री उशिरा ही दुर्घटना घडलीये... दारुच्या नशेत एका कार चालकानं रस्त्यावर उभ्या असलेल्या तघांना उडवलं.. या दुर्गटनेत तिघे जखमी झालेत.. दारुच्या नशेमुळे कारचालकाला गर्दीचा अंदाज आला नाही. दरम्यान नागरिकांनी या कारचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुख्यमंत्री शिंदे-सदा सरवणकर यांच्यात चर्चा
Sada Sarvankar : मुख्यमंत्री शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात वर्षा बंगल्यावर चर्चा...जवळपास 2 तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि सरवणकरांमध्ये चर्चा...सरवणकर आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे,- सूत्र...उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याची माहिती- सूत्र...उमेदवारीबाबत पुन्हा विचार करण्याचा मुख्यमंत्री यांचा सल्ला..तर उद्या पुन्हा मुख्यमंत्री सोबत सरवणकर यांची चर्चा होण्याची शक्यता सूत्रांची माहिती
व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ
LPG Gas Cylender Rate Hike : व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ...LPG सिलेंडरमध्ये 62 रुपयांची वाढ.19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला..घरगुती गॅसच्या किमतीत वाढ नाही
बातमीचा व्हिडीओ पाहा-
आंध्र प्रदेशमध्ये फटाक्यांचा भीषण स्फोट, एकाचा मृत्यू
Blast in Andhra Pradesh : ऐन दिवाळीत आंध्र प्रदेशात फटाक्यांचा भीषण स्फोट झालाय. दुचाकीवरून फटाके नेत असताना ही घटना घडलीय. एलुरू शहरातील 2 तरुण दुचाकीवरून फटाक्यांची पिशवी घेऊन जात होते. दरम्यान, दुचकीचं टायर खड्ड्यात गेल्याने चालकाचा तोल गेला आणि फटाक्यांची पिशवी खाली पडली. यावेळी मोठा स्फोट झाला. या घटनेत 1 तरुणाचा मृत्यू झालाय. तर 6 जण जखमी झालेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही चित्रित झालीय. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुणालयात हलवले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-