Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 06 Nov 2024-1:19 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 06 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • निलेश राणेंना मंत्रिपदाचे वेध

     

    Nilesh Rane : निलेश राणेंना मंत्रिपदाचे वेध लागलेत.. मालवण येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.. ज्या ठिकाणी नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच मला निवडून यायचं आहे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.. पाहुयात निलेश राणे काय म्हणालेत..

  • मोदींच्या सभांचा राज्यात प्रचाराचा धडाका, 7 दिवसांत 11 सभा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 7 दिवसांत  11 सभा घेणार आहेत. 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान मोदी राज्याच्या दौऱ्यावर येणारेत. 8 नोव्हेंबरला धुळे आणि नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. 9 नोव्हेंबरला अकोला आणि नांदेडमध्ये मोदी प्रचार सभेला संबोधित करतील. त्यानंतर मोदी 12 नोव्हेंबरला मोदींची चंद्रपूर, चिमूर, सोलापूर आणि पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. 14 नोव्हेंबरला मोदींच्या संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबईत प्रचार सभा घेणार आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :  सामाजिक विकासाचा वादा असं म्हणत अजित  पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.. सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना देण्यात येणा-या निधीत वाढ करुन हा निधी पंधराशेवरुन एकवीसशे रुपये करण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आल

  • फडणवीसांच्या आरोपांवर विरोधकांचा पलटवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar, Sanjay Raut On Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टवार आणि खासदार संजय राऊतांनी याचा चांगलाच समाचार घेतलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राहुल गांधींच्या भोवती शहरी नक्षलवादाचं कोंडाळं - फडणवीस

     

    Devendra Fadanvis On Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भोवती शहरी नक्षलवाद्यांचं कोंडाळं असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केलाय... भारत जोडो अभियानात अनेक डाव्या विचारसणीच्या संघटनांनी सहभाग घेतल्याचा दावा फडणवीसांनी केलाय..

  • अमरावतीत सोनं आणि चांदी जप्त

     

    Amravati Gold & Silver Sized : अमरावतीमध्ये 5 किलो सोनं, चांदी जप्त करण्यात आलंय. तिवसा चेकपोस्टवर पोलिसांनी ही कारवाई केली. पकडलेल्या सोन्या-चांदीची किंमत 6 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीये.

  • राज ठाकरेंच्या प्रचार सभांचा धडाका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raj Thackeray Rally : मनसे  उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज तीन सभा घेणार आहे.. लातूर जिल्ह्यातील रेणापुरात राज ठकरेंची आजची पहिली  सभा होणार आहे. लातूर ग्रामीणचे संतोष नागरगोजे, औसा येथील शिवकुमार नागराले, अहमदपूरचे डॉ. नरसिंह भिकाने या उमेदवारांचा प्रचार ते करणार आहेत. त्यानंतर दिलीप धोत्रेंच्या प्रचारासाठी ते पंढपुरात प्रचारसभा घेणार आहेत. त्यानंतर  संध्याकाळी अमरावतीमध्ये पप्पू पाटील यांच्या प्रचारासाठी ते जाहीर सभा घेणार आहेत.. त्यामुळे आजच्या सभांमधून राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • वसईत मोठा शस्त्रसाठा जप्त, 8 जणांना अटक

     

    Vasai : निवडणुकीच्या तोंडावर वसईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. कारवाईत 9 पिस्तूल, 21 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलीय. तर याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. वसईच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलीय.

  • शिवसेना बंडखोर महेश गायकवाडांची हकालपट्टी

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कल्याण पूर्व शिवसेना बंडखोर शहर प्रमुख महेश गायकवाड याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीये.... महायुती उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी त्यांच्यावर ही कारवाई केलीये. तर शिवसेना माजी नगरसेवक विशाल पावशे सुद्धा  वंचित कडून कल्याण पूर्व मधून उमेदवार म्हणून उभे राहिल्याने त्यांचीही हकालपट्टी करण्यात आलीये. 

  • उल्हासनगरात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ulhasnagar Crime : अत्याचाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलंय.. 3 वर्षाच्या एका चिमुकलीवर एका 18 वर्षाच्या नराधमानं अत्याचार केलाय. पोलिसांनी अवघ्या काही तासात या आरोपीला अटक केली.. त्याला न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.  बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर उल्हासनगरात घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरून गेलं आहे

     

  • बंडखोर 40 नेत्यांची भाजपतून हकालपट्टी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज कायम ठेवणाऱ्या 40 जणांची भाजपतून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षादेश असूनही शेवटच्या तारखेपर्यंत विधानसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं भाजपनं कारवाईचा बडगा उचललाय. विशाल परब, सुवर्णा पाचपुते आणि श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय यांच्यावर भाजपनं हकालपट्टीची कारवाई केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात आजही प्रचाराची रणधुमाळी

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी नागपूरला असणार... संविधान संमेलन कार्यक्रमाकरिता ते नागपुरात येत आहेत.. या कार्यक्रमानंतर ते रेशीमबाग येथील भट सभागृह येथे संविधान सन्मान संमेलनात सहभागी होतील..यानंतर राहुल गांधींची मुंबईतील BKC मैदानावर जाहीर  सभा होणार आहे. या सभेसाठी राहुल गांधी ,खरंगे ,उद्धव ठाकरे ,शरद पवार प्रमुख उपस्थितीत असणार आहेत.. दुसरी कडे भाजपनं योगी आदित्य नाथांना प्रचारात उतरवलंय. आज योगींच्या राज्यात तीन प्रचारसभा होणार आहेत. अमरावती, वाशिम आणि ओकोल्यात ते प्रचारसभा घेणार आहेत.. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कराड आणि जतमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. राज ठाकरेंच्याही आज तीन सभा असतील.. लातूर पंढरपूर आणि अमरावतीमध्ये राज ठाकरेंचीत तोफ धडाडणार आहे.. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link