Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sun, 10 Nov 2024-5:33 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 10 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • विक्रोळीत व्हॅनमधून 6.5 टन चांदीच्या विटा जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Silver Bricks Seized in Vikroli  : मुंबईतील विक्रोळीत एका व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत...विक्रोळी पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केलीये...चांदिच्या विटा मुलुंडमधील एका गोदामात ब्रिक्स कंपनीच्या गाडीतून नेण्यात येत होत्या...याबाबत निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलीस अधिक तपास करत आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात- राज ठाकरे

     

    Raj Thackeray on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असं भाकित राज ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात केलंय.. देवेंद्र फडणवीसांना राजकारणाची चांगली जाण असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असून मनसे किंगमेकर असणार असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.. 

  • राज्यात 50 खोक्यांचं सरकार- मल्लिकार्जुन खरगे

     

    Mallikarjun Kharge : भाजपने आमदरांची खरेदी केली-खरगे...राज्यात 50 खोक्यांचं सरकार-खरगे... '50 खोके एकदम ओके, घरात भरून ठेवा'...खोके घरात ठेवा सरकार चालवा-खरगे

  • निवडणूक निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री ठरवणार- अमित शाह

     

    Amit Shah : अमित शाहांनी भाजपच्या जाहीरनामा प्रकाशनावेळी मोठं विधान केलंय..निवडणूक निकालानंतर महायुती मुख्यमंत्री ठरवणार...मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं स्पष्टीकरण...मुख्यमंत्री कोण याबाबत घोषणा करणं टाळलं...निकालानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील?

  • तुळजापुरात वंचित उमेदवार स्नेहा सोनकाटेंना निवडणूक आयोगाची नोटीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Election Commission Notice To Sneha Sontake : तुळजापूर विधानसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. प्रचार साहित्यामध्ये विनासंदर्भ आक्षेपार्ह मजकूर छापल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. निवडणूक आयोगावर भाजपाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दबाव आहे, असा आरोप स्नेहा सोनकाटेंनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • मुंबईत भाजपच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन, अमित शाहांच्या हस्ते प्रकाशन

     

    BJP : भाजपच्या जाहीरनाम्यात राज्यातील जनतेला 25 आश्वासनं देण्यात आलीय... राज्यातील प्रत्येक व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन जाहीरानामा प्रसिद्द केल्याचं अमित शाहा यावेळी म्हणालेतशेतकरी, सर्वसामान्य नागरिक, तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याचं शाह म्हणालेत...

  • आम्ही लाडक्या बहिणांना मदत केली म्हणून मविआला जाग- रामदास कदम

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ramdas Kadam on MVA : मविआच्या जाहीरनाम्यावरून रामदास कदमांची टीका...'आम्ही लाडक्या बहिणांना मदत केली म्हणून मविआला जाग'... 'मविआतील नेते आधी झोपले होते का?'...मविआच्या जाहीरनाम्यात महिलांना 3000 रुपये देण्याचं आश्वासन

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • ठाकरे बंधूं शिवाजी पार्कसाठी आमनेसामने

     

    Dadar Shivaji Park : मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये शेवटची प्रचार सभा घेण्यासाठी ठाकरे बंधू आमने-सामने आलेत. 17 नोव्हेंबरला शिवाजीपार्कमध्ये शेवटची प्रचार सभा घेता यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं अर्ज केला होता. मात्र सुरुवातीला या दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली होती. वर्षाला 45 दिवस मैदान वापरण्याची मर्यादा संपल्याने ही परवानगी नाकारण्यात आली होती. आज शिवसेनेला शिवाजी पार्कात सभा घेण्याची परवानगी देण्यात आलीये.मात्र आज शिवसेनेची शिवाजी पार्कात सभा होण्याची चिन्ह कमी असल्याने आजचा एक दिवस बाद होऊ शकतो. आणि त्यामुळेच मनसे आणि शिवसेना UBT पैकी एकाला परवानगी मिळू शकतेय. या दोन्ही पक्षांचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल

  • काँग्रेस फेक नरेटिव्ह पसरवत आहेत- धनंजय महाडिक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dhananjay Mahadik Vs Satej Patil : भाजप खासदार धनंजय महाडिकांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या विधानावरून विरोधक आक्रमक झालेत. काँग्रेस नेते सतेज पाटलांनाही त्यांच्यावर टीका केलीये. धनंजय महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे त्यामुळेच त्यांनी महिलांचा अपमान केला. भाजपच्या खासदाराच्या या विधानावरून त्यांचा खरा चेहरा समोर आला, असं पाटील म्हणालेत. तर काँग्रेसचे नेते फेक नरेटीव्ह पसरवत आहेत, असा आरोप धनंजय महाडिकांनी केलाय. लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणा-या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, असं वादग्रस्त विधान भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी केलं होतं

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • ...बारामती, मढा मतदारसंघात आमची वाट लागली- अजित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : लोकसभेत फेक नरेटिव्हमुळे लोकांनी आमच्या विरोधात मतदान केलं.. त्यामुळे बारामती, माढा मतदारसंघात आमची वाट लागली... साता-यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला असं वक्तव्य अजित पवारंनी जाहीर सभेत केलंय.. फलटण येथील साखरवाडीच्या सभेत ते बोलत होते.. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं महायुतीची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • सलग 9 दिवस चांदीच्या दरात घसरण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Silver Price : चांदीच्या दरात घसरण सुरुच आहे.. चांदीच्या भावात पुन्हा एक हजार रुपयांची घसरण झालीय.. त्यामुळे चांदीचे भाव 92 हजार रुपयांवर आले आहेत... तसेच सोन्याच्या भावातही 100 रुपयांची घसरण झाल्याने, सोन्याचे भाव 78 हजार 200 रुपये प्रति तोळ्यावर आलेत.... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • पुढील 4 महिने कांदा, लसूण आणखी महागणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Onion, Garlic Prices increased : किरकोळ बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झालाय... कांदा 80 रुपये किलोवर गेलाय... तर लसूण 400 रुपये किलोवर गेलाय... कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे.... पुढील 3 ते 4 महिने कांदा आणि लसणाचे दर चढेच राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांसह शेतक-यांवर ही होतोय... जोरदार पावसामुळे कांदा सडल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झालीय... दरम्यान खरिपातील कांद्याची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात काहीसा दिलासा मिळेल .. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद

     

    Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील आज भूमिका जाहीर करणार..आज सकाळी जरांगेंची पत्रकार परिषद..मनोज जरांगे काय भूमिका घेणार?..कुणाला पाडायचं.. कुणाला निवडून आणायचं हे ठरवण्याची शक्यता..

  • अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amit Shah : आज पुन्हा राज्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणारेय. केंद्रीय गृहमंत्री आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. बुलढाणा आणि जळगावात प्रचार सभा घेणारेत. अमित शाहांच्या हस्ते आज महायुतीच्या संकल्पपत्राचं प्रकाशनदेखील केलं जाणारे. महिला, तरुण, बेरोजगारीसारखे विषय या संकल्पपत्रात मांडले जाण्याची शक्यताये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link