Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 12 Nov 2024-10:51 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 12 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मुंबईतील डबेवाला संघटनेत फूट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Dabbawala : राजकीय पाठिंब्यावरून डबेवाला संघटनेत उभी फूट पडलीये....डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकरांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला पाठिंबा दिलाय..तर उल्हास मुखे आणि रामदास करवंदेंच्या संघटनेने महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय...डबेवाल्याच्या एका गटाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा तर दुस-या गटाकडून भाजप महायुतीला समर्थन देण्याची घोषणा केल्यानं मुंबईतील डबेवाला संघटनेमध्ये फूट पडल्याचं दिसतंय..
     

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्याला पाठिंबा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jaydutt Kshirsagar : बीड मधील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या योगेश क्षीरसागरांना पाठिंबा जाहीर केलाय...जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत आपले आशीर्वाद योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केलंय.. दोन पुतणे विरुद्ध काका अशी लढत झाल्यास मतविभाजन होऊन त्याचा फटका तिघांना बसेल ही शक्यता लक्षात घेऊन त्यांनी माघार घेतल्याची चर्चा होती...दरम्यान त्यांनी कार्यकर्ता बैठक घेत आपण योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केलं..

     

  • 'पैसे सुटत नाहीत त्याच्या बॅगेत काय सापडणार?',राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

     

    Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन राज ठाकरेंचा टोला...'2 पैसे सुटत नाहीत त्याच्या बॅगेत काय सापडणार?'...'बॅगमध्ये हातरुमाल आणि कोमट पाण्याची बाटली असेल'...बॅग तपासणीचं अवडंबर कशाला?- राज ठाकरे
     

  • मोदी महाराष्ट्रातून परतताना बॅगा तपासा- उद्धव ठाकरे 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची आज पुन्हा तपासणी करण्यात आली. लातूरमधील औसा हेलिपॅडवर बॅगांची तपासणी केली गेली. ठाकरे प्रचार सभेसाठी धाराशिवला जाण्यासाठी हेलिकॉप्टरनं औसा हेलिपॅडवर उतरले. तिथे त्यांच्या बॅगांची तपासणी झाली. विशेष म्हणजे कालही यवतमाळमध्ये उद्धव यांच्या बॅगांची तपासणी झाली होती. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले होते. तर पथकाला काही वाटलं असेल म्हणून तपासणी केली असेल असं यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मनसेच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MNS on Sanjay Raut : राज ठाकरेंच्या विक्रोळी मध्ये होणा-या सभेला मनसेकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आलंय...संजय राऊत काहीही बोलतात. त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी त्यांना निमंत्रण दिल्याचं मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांची माहीती दिलीये...संजय राऊत यांच्यासाठी सभेठिकाणी एक खुर्ची रिकामी देखील ठेवण्यात येणार असल्याचही चव्हाण यांनी म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  •  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची बॅगांची तपासणी

     

    Nitin Gadkari : उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी झाल्याचं प्रकरण गाजत असतानाच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही बॅगची तपासणी केली गेली. निवडणूक विभागाच्या पथकानं गडकरींच्या बॅगची तपासणी केली. लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी, गडकरी हेलिकॉप्टरने किल्लारीत उतरले. तिथे हेलिपॅडवर त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. 

  • प्रियंका गांधींचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Priyanka Gandhi : प्रियंका गांधी प्रचारासाठी 3 दिवस महाराष्ट्र दौ-यावर...15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान प्रियंका महाराष्ट्रात...प्रियंका गांधी 6 ते 7 सभा घेण्याची शक्यता...विदर्भ मराठवाड्यात प्रियंका गांधी सभा घेणार...महाराष्ट्रासह वायनाडमध्येही प्रियंकांचा प्रचार सुरु...वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका उमेदवार

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'चुकीला एकवेळ माफी, गद्दारीला माफी नाही', अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Kolhe On Ajit Pawar : चुकीला एकवेळ माफी होते, मात्र गद्दारीला माफी नाही, अशी टीका खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर केलीय. जनतेचा मूड काय हे अजित पवारांना समजलं, त्यामुळे गावोगावी जाऊन त्यांना भावनिक आवाहन करावं लागतंय, असा टोला कोल्हेंनी अजित पवारांना लगावलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • उद्धव ठाकरे नैराश्येत गेलेत- श्रीकांत शिंदे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shrikant Shinde on Uddhav Thakare : श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान केलंय..दिवसरात्र आम्हाला शिव्याशाप देत असतात, त्यांमुळे रात्री स्वप्नातही ते शिव्या देत असतील आणि कुटुंबासोबतही तिच भाषा वापरत असतील असं वादग्रस्त विधान श्रीकांत शिंदेंनी केलंय... उद्धव ठाकरे नैराश्येत गेल्यामुळे ते शिव्या देत असल्याचं पंढरपूरमधील सभेत श्रीकांत शिंदे म्हणालेत.. 
     

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • उद्धव ठाकरेंच्या बॅगांची पुन्हा तपासणी

     

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅगांची पुन्हा तपासणी...धाराशिवला जात असताना औसामध्ये तपासणी ...उद्धव ठाकरेंच्या बॅगांची यवतमाळमध्येही तपासणी..

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

  • मुंबई एअरपोर्टवर 3 किलोचं सोनं जप्त

     

    Mumbai Airport Gold Seized : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन किलोचं सोन जप्त करण्यात आलंय. कस्टम विभागानं ही मोठी कारवाई केलीय. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत दोन कोटी २७ लाख रुपये इतकी आहे. दुबईहून आलेल्या प्रवाशाकडे हे सोनं आढळून आलंय. त्याच्याकडे प्रत्येकी एक किलो वजनाच्या 24 कॅरेटच्या तीन सोन्याच्या विटा होत्या. तपासणीदरम्यान सोन्याच्या विटा सापडल्यात.

  • मनोज जरांगेंचा पुन्हा सामूहिक उपोषणाचा इशारा

     

    Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिलाय. सामूहिक आमरण उपोषणाची तयारी सुरू करा, असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला दिलंय. जालनाच्या अंतरवाली सराटीत जरांगे पुन्हा उपोषण सुरू करणारेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तारीख जाहीर करणार असल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलंय. तर हे भारतातलं सर्वात मोठं आमरण उपोषण असल्याचं जरांगेंनी सांगितलंय.

  • नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

     

    Nawab Malik : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.. एका व्यक्तीनं मलिकांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलीये.. वैद्यकीय कारणांसाठी देण्यात आलेल्या अंतरिम जामिनाचा मलिकांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय.. ईडीनं दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणी मलिकांना अटक झाली होती.. दरम्यान प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. मात्र जामीन मिळाल्यानंतर मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभेच्या रिंगणात उतरलेत.. त्यामुळे त्यांच्याकडून अंतरीम जामीनाचा गैरवापर होत असल्याचा  आरोप याचिकेतून करण्यात आला... 

  • अजित पवारांचा वार, शरद पवारांचा पलटवार

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही लोकसभेत  आमचा करेक्ट कार्यक्रम केला.. आम्ही ही करेक्ट कार्यक्रम स्वीकारला.. आमच्याच लोकांनी केल्यानंतर तो स्वीकारावा लागलाय.. पण आता विधानसभेत आम्हाला साथ द्या. असं आव्हान अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय..तर अजित पवारांच्या टीकेला आता शरद पवारांनी उत्तर दिलंय.. निवडणुकींनंतर जनता उत्तर देणार असल्याचं शरद पवार म्हणालेत.. 

  • सुप्रीम कोर्टानं आरक्षणाचा खेळ केलाय - प्रकाश आंबेडकर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prakash Ambedkar : सुप्रीम कोर्टानं आरक्षणाचा फुटबॉल केलाय, अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलीय. यवतमाळच्या प्रचार सभेत आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं. तर सुप्रीम कोर्टानं आरक्षणाचा मान-सन्मान, प्रतिष्ठा संपवल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षणावरून आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टावर निशाणा साधलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे - शरद पवार

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंची काल बॅग तपासण्यात आली होती.. त्यावरून शरद पवारांनी सरकारवर टीका केलीय.. सत्तेचा  गैरवापर करून विरोधकांना त्रास दिला जात असल्याचं शरद पवार म्हणालेत.. तर मोदी, अमित शाह आणि शिंदेंच्याही बॅगा तपासा असं आदित्य ठाकरे म्हणालेत.. 

  • संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एकनाथ शिंदेंच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोहोचलेत, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आलीये. यावरून राऊतांनी महायुतीवर निशाणा साधलाय. दरम्यान निवडणूक आयोगावर निशाणा साधत, महिलांच्या पर्स तपासण्यापर्यंत मजल जातेय, अशी टीका राऊतांनी केलीय. तर निवडणूक आयोगानं निष्पक्षपातीपणानं तपासणी करायला पाहिजे, असं राऊतांनी म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात आतापर्यंत 493 कोटी जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात 493 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. मुंबईत सर्वाधिक 183 कोटी जप्त करण्यात आले. तर बुलढाणामध्ये 6.59 कोटी, गोंदियात 5.53 कोटी, नागपुरात 37.53 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ आणि मौल्यवान धातूंचा यात समावेश आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उद्धव ठाकरेंच्या कोकणात 3 जाहीर सभा

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एकमेकांचे कट्टर विरोधी उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.. उद्धव ठाकरे उद्या राणेंच्या बालेकिल्ल्यात दाखल होणार आहेत.. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.. कणकवली आणि कुडाळमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. त्यामुळे राणेबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.. 

  • चंद्रपुरात देशी दारुचा साठा जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandrapur Liquor Seized : निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपुरात देशी दारुचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. कोरपना -अदिलाबाद महामार्गावर हा देशी दारुचा साठा जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर, आरटीओ विभाग, पोलीस आणि महसुल विभागाच्या अधिका-यांनी  ही कारवाई केलीये. कारवाईत 485 देशी दारुच्या बाटल्यांसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेलयंत.. तपासात  ही देशी दारू ही बनावट असल्याची माहिती समोर आलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज ठाकरेंचा मोदींच्या मुंबईतील सभेवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबईत 14 नोव्हेंबरला होणा-या पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी दिवाळीचे लाईट काढून टाकले, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. 14 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर मोदींची सभा पार पडणारेय. यावरून राज ठाकरेंनी मोदींच्या सभेवर निशाणा साधलाय. दरम्यान दिवाळीच्या लाईटमध्ये मोदींच्या सुरक्षेचा काय संबंध, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचार सभांचा धडाका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचारसभेचा आजही धडाका पाहायला मिळतोय... एकनाथ शिंदे यांची बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात आज सभा होणार आहे...  तसेच दर्यापूरमध्येही मुख्यमंत्री शिंदेंची सभा पार पडणार आहे.. महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या प्रचारासाठी शिंदे सभा घेणार आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शरद पवार बरीच वर्षे म्हातारे होऊ नयेत - विनोद तावडे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवार बरीच वर्षं म्हातारे होऊ नयेत, त्यांनी आता नाही तर पुढील 5 वर्षं सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करावेत. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो या शुभेच्छा अशी प्रतिक्रिया भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली. कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपण अजून म्हातारे झालो नसल्याचं नुकतंच एका प्रचार सभेत शरद पवार म्हणाले होते. तसंच सत्ता परिवर्तन केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यावर विनोद तावडेंनी ही प्रतिक्रिया दिली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • देवेंद्र फडणवीसांची असदुद्दीन ओवैसींवर टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबईतल्या मालाडमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी असदुद्दीन ओवैसींवर टीकास्त्र डागलंय...सून लो ओवैसी आम्ही पाकिस्तानमध्ये तिरंगा फडकवू असं फडणवीस म्हणालेत..यावेळी फडणवीस यांनी मविआवरही टीका केलीय... ओवैसी तुम्ही हैदराबादेत राहा इथं तुमचं काहीही काम नसल्याचं फडणवीस म्हणालेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बिल्डरच्या घरातून अडीच कोटी जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Navi Mumbai Cash Seized : नवी मुंबईच्या नेरुळमधून एका बिल्डरच्या घरातून तब्बल 2 कोटी 60 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये. निवडणुकीच्या काळात इतकी मोठी बिल्डरच्या घरातून जप्त करण्यात आलीये. नेरुळ पोलिसांनी ही मोठी कारवाई केलीय. एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत ही 2 कोटी 60 लाखांची रोकड जप्त केलीय. ही रक्कम कोणत्या उद्देशानं घरात ठेवली होती, याचा तपास पोलीस करतायेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Solapur Narsayya Adam Master : माकपाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरावर काल रात्री दगडफेक झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप नरसय्या आडम यांनी केलाय. ते घरात नसताना हा प्रकार घडलाय. काही काळापासून काँग्रेस आणि माकप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानं तणाव निर्माण झाल्याची माहिती आडम यांनी दिलीय. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप आडमांनी केलाय. दगडफेक करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सध्या नरसय्या आडम मविआतून बंडखोरी करत माकपकडून निवडणूक रिंगणात आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मविआ नेत्यांच्या प्रचार सभांचा राज्यात धडाका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या नेत्यांच्याही राज्यात आज अनेक ठिकाणी सभा पार पडणार आहे.. राहुल गांधी यांची पहिली सभा दुपारी चिखलीत पार पडणार आहे.. तर दुपारी साडेतीन वाजता गोंदिया राहुल गांधींची सभा होणार आहे.. तर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा बार्शी आणि धाराशिवमध्ये पार पडणार आहे..  तर शरद पवारांचीही नाशिकमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे..  दिंडोरी, निफाड, येवला, कोपरगाव आणि नाशिक पूर्व मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात भाजप नेत्यांच्या प्रचाराचा धडाका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपचे केंद्रीय नेते आज राज्यात प्रचारासाठी येणार आहेत.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा चंद्रपुरात सकाळी 11 वाजता होणार आहे त्यानंतर मोदी संध्याकाळी पुण्यात जाहीर सभा होणार आहे.. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची संध्याकाळी बोरीवली आणि घाटकोपरमध्ये सभा होणार आहे..  तर नितीन गडकरी यांच्याही आज अनेक ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.. देवेंद्र फडणवीस यांच्या डहाणू आणि रिसोडमध्ये सभा होणार आहे तर  योगी आदित्य नाथ यांची अकोला, अमरावती नागपूरमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link