Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Thu, 14 Nov 2024-6:37 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 14 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'यंदा देवेंद्र फडणवीस निवडणूक हरतील', नाना पटोलेंचा दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nana Patole on Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हरतील असा मोठा दावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केलं. फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून प्रफुल गुडधे निवडणूक रिंगणात आहेत. विदर्भात महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट 90 टक्के इतका असेल असं भाकितही त्यांनी यावेळी वर्तवलं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'आधी लग्न करुन बघ, मग तुला कळेल', रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ramdas kadam On Aditya Thackeray : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केलीये...बर्फाच्या लादीवर झोपवण्याची भाषा करतोस..आधी लग्न करुन बघ मग तुला कळेल अशा भाषेत आदित्य ठाकरेंवर कदम यांनी हल्लाबोल केलाय...तसेच आदित्य ठाकरेंना कदम यांनी लग्नाचा सल्ला देखील दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'शिंदेंसोबतच जाणार होतो महायुतीमध्ये', अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar :  नाशिकमध्ये अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट...'शिंदेंसोबतच जाणार होतो महायुतीमध्ये'... 'आमच्या सर्व NCPच्या आमदारांनी ठरविलं होतं'... महायुतीत जाण्यावरुन अजित दादाचं मोठं विधान 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड

     

    Dombivali BJP OfficeTodfod : डोंबिवलीमध्ये भाजपच्या कार्यालयाची तोडफोड केलीये.. डोंबिवली पश्चिमेतील गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीये.. तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी अचानक येत शिविगाळ करत ही तोडफोड केली.. या घटनेची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालीत.. डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्यात लढत आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • अभिमन्यू पवारांना धमकीचा फोन?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur Abhimanyu Pawar : भाजपा आमदार तसंच औसा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांना धमकीचा फोन आल्याचा दावा त्यांनी केलाय.... याबाबत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच पोलीस महासंचालकांकडे तक्रारही केलीये.  मतदारसंघात बाहेरच्या राज्यातील गुंड फिरत आहेत... असा आरोप त्यांनी या तक्रारीतून केलाय.. दरम्यान कार्यकर्त्यांनी घाबरू नये असं आवाहनही त्यांनी केलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • लोकप्रिय योजनांबाबत नितीन गडकरींचं रोखठोक विधान

     

    To The Point Nitin Gadkari : लाडकी बहिणसारख्या योजनांबद्दल नितीन गडकरींनी झी 24 तासच्या टू द पॉईंटमधील मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडलीय. फ्रीबीजच्या मुद्दयावर बोलताना गडकरींना अशा योजनांची घोषणा करण्यात सत्ताधारी किंवा विरोधक दोघेही याला अपवाद नाहीत असं म्हणालेत.. शिवाय सर्वच पक्ष निवडणूक जिंकण्याचा आधी विचार करतात त्यातून नवनव्या योजनांची घोषणा करतात. परंतु अशा योजनांना कसा प्रतिसाद द्यायचा हे लोकांच्या हातात असतं असं गडकरींना झी 24 तासच्या टू द पॉईंटच्या मुलाखतीत सांगितलंय. जनतेला देशाचं हीत कशात आहे हे माहित असतं त्याबद्दल जनता निर्णय घेते आणि त्या जनतेच्या निर्णयाप्रमाणे नेतेही बदलतात असं स्पष्ट मत गडकरींनी या विशेष मुलाखतीत मांडलंय. 

  • वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये 21 लाख 89 हजारांची रोकड जप्त

     

    Wardha Cash Seized : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्ध्यातही मोठी रक्कम जप्त करण्यात आलीये.. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये FSTपथक आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 21 लाख 89 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीये.. हिंगणघाटमधील तीन चेकपोस्टवर ही कारवाई करण्यात आली... यात दारोडा चेकपोस्टवर 18 लाख 63 हजार, आरंभा चेकपोस्टवर 2 लाख 25 हजार तर वडकी चेकपोस्टवर 1 लाख 10 हजार रुपये जप्त करण्यात आलेत.. वाहनांच्या तपासणी दरम्यान ही रोकड जप्त करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. .

  • शरद पवारांचा पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीला धक्का

     

    Pune Sharad Pawar : शरद पवारांनी पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीला धक्का दिलाय. शरदचंद्र  पवारांच्या राष्ट्रवादीत रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरेंनी प्रवेश केलाय तर हडपसरचे दिलीप तुपे आणि अनिल तुपे यांनीही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय. तसंच खडकवासलातले भाजपचे समीर धनकवडेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरलीय.

  • सिडकोच्या लॉटरीला मुदतवाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Cidco Lottery : सिडकोच्या 26 हजार घरांच्या सोडत प्रक्रियेच्या अर्जनोंदणीला मुदतवाढ देण्यात आलीये.. त्यामुळे आता इच्छुकांना 11 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.. आतापर्यंत सिडकोच्या घरांसाठी 88 हजारांहून अधिक अर्ज दाखल झालेत.. दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिल्यानं  या योजनेसाठी अर्ज करणान्यांची संख्या सव्वा लाखांपर्यंत पोहचेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनसेची 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर सभा

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे.. शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या सभेला मुंबई महानगर पालिकेनं परवानगी दिलीये.. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदीन आहे... त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही सभेची परवानगी मागितली होती.. मात्र आधी मनसेचा अर्ज आल्यानं बीएमसीनं मनसेला प्राधान्य दिलंय. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सभा बीकेसीमध्ये होणार आहे.. 

  • नागपुरात 1 कोटी 35 लाखांची रोकड जप्त

     

    Nagpur Cash Seized : नागपुरात पोलिसांनी 1 कोटी 35 लाखांची रक्कम जप्त केलीये.. याप्रकरणी पोलिसांनी शाकीर खान नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय.. विशेष म्हणजे स्कूटीवरुन हा व्यक्ती कोट्यवधींची रक्कम घेऊन चालला होता.. पोलिसांनी चौकशी केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली.. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं. एका बांधकाम व्यावसायिकाची ही रक्कम असल्याचा दावा त्यानं केलाय... पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत..

  • OBC विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण वाट बिकट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    OBC Student Scholarship : 60 टक्क्यांची अट घातल्यामुळे ओबीसी उमेदवारांची उच्च शिक्षणाची वाट बिकट झाली आहे. जुन्या नियमानुसार ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आधीच फॉर्म भरले आहेत. मात्र, सरकारने नुकतीच शिष्यवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध केल्याने या नव्या अटीमुळे लाभार्थी संभ्रमात पडलेत. तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, फार्मसी शिक्षण, वास्तूकला शिक्षण अशा महाविद्यालयांतून ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारने प्रोत्साहनपर योजनां जाहीर केल्यात.. मात्र नव्या अटीमुळे  बारावीनंतर शिक्षण घेणारे विद्यार्थीच या योजनांपासून वंचित राहणार आहेत... त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विधानसभा काबिज करण्यासाठी भाजपची रणनीती

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा काबिज करण्यासाठी भाजपकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय.. भाजप आता माझा बूथ, सर्वात मजबूत बूथ अभियान सुरु करणार आहे..  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १६ नोव्हेंबरला या अभियानाची  सुरुवात होणार आहे. यावेळी  महाराष्ट्रातील एक लाख बूथ प्रमुखांशी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार  आहेत..

  • पंतप्रधान मोदींच्या राज्यात आज 3 प्रचार सभा

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात आज मोदींच्या तीन जाहीर सभा पार पडणार आहे.. मोदींची आज दुपारी 12 वाजता संभाजीनगरमधील चिखलठाण्यातील एमआयडीसीत जाहीर सभा पार पडणार आहे. तर  दुपारी 4 वाजता नरेंद्र मोदी यांची खारघर येथे सभा होणार आहे तर संध्याकाळी 6 वाजता मोदींची शिवाजी पार्कात जाहीर सभा पार पडणार आहे.. त्यांच्या सभेसाठी मुंबईतील शिवाजी पार्कात जय्यत तयारी करण्यात आलीय.. 

  • खासदार असदुद्दीन ओवैसींना प्रचार सभेतच पोलिसांची नोटीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओविसी यांना सोलापूर पोलिसांनी काल नोटीस दिली.. सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेदरम्यान पोलिसांनी ओवेसींना ही नोटीस बजावली.. भाषणातून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावू नका तसंच प्रक्शोभक भाषण करू नका असं या नोटीसमधून सांगण्यात आलं.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link