Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 19 Nov 2024-5:04 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 19 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • डहाणूमध्ये बविआला मोठा धक्का

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Suresh Padvi in ​​BJP : डहाणू विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला. या घडामोडींमुळे डहाणू मतदारसंघातील निवडणुकीत भाजपची ताकद वाढली असून विरोधी पक्षांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरली आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Virar Case Update : पैसे वाटल्याच्या आरोपावरून विरारमध्ये भाजप आणि बविआत राडा.. विरारमधील हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा  क्षितिज ठाकूरांचा आरोप.. विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल. 
    आचारसंहितेदरम्यान पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप...  भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा... आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

     

  • निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी - विनोद तावडे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vinod Tawde on Virar Case  : पैसे वाटल्याच्या आरोपावरून विरारमध्ये भाजप आणि बविआत राडा.. विरारमधील हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत क्षितिज ठाकूर आणि बविआच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ.. डायरी आणि बॅग दाखवून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलाय...तर विनोद तावडेंनी सर्व आरोप फेटाळलेत.. निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करण्याची विनोद तावडेंची मागणी.. कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती असं तावडे म्हणाले.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • विनोद तावडेंकडे 5 कोटी रुपये होते- हितेंद्र ठाकूर

     

    Hitendra Thakur : तावडेंकडे 5 कोटी रुपये होते- हितेंद्र ठाकूर...काही डाय-याही मिळाल्या- हितेंद्र ठाकूर...तावडेंनी मला 25 फोन केले- हितेंद्र ठाकूर... 'पोलीस, निवडणूक आयोगाच्या कारवाईकडे लक्ष'.. भाजपच्याच नेत्यानं माहिती दिली- हितेंद्र ठाकूर....झी 24 ताससोबत फोनवरून बोलताना हितेंद्र ठाकूरांनी हे आरोप केलेत...

  • निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो, इकडे शेपूट घालतो- संजय राऊत

     

    Sanjay Raut : विरारमध्ये भाजप-बविआ राड्यानतंर खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.. भाजपचा खेळ खल्लास!... जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले!..निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो!..अशी बोचरी टीका संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर केलीये

  • विरारमध्ये भाजप-बविआत तुफान राडा 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Virar Rada : विरारमध्ये भाजप-बविआत तुफान राडा झालाय..विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप..क्षितिज ठाकूरांसह कार्यकर्त्यांचा राडा...क्षितिज ठाकूरांसह कार्यकर्त्यांचा राडा

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणेंची पक्षातून हकालपट्टी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Sonawane : शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांची पक्षातून हकालपट्टी...पक्ष विरोधी कृती केल्यान शरद सोनावणे पक्षातून निलंबित..महायुतीतील राष्ट्रवादीच्या अतुल बेनकेंविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूकीला उभं राहिल्याने कारवाई...शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार एकनाथ शिंदेंच्या आदेशावरून कारवाई

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

     

    Melghat : अमरावतीमधील अतिदुर्ग मेळघाटात 6 गावांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय.. आदिवासींना रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्याने आदिवासी बांधव आक्रमक झालेत.. रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार अशा गावांचा यात समावेश आहे.. या सहा गावांमध्ये 1 हजार 300 मतदार आहेत.. मुलभत सुविधा मिळत नसल्यानं उद्या मतदान न करण्याचा निर्णय या गावक-यांनी घेतलाय... 

  • निवडणूक आयोगाची शिवसेनेला नोटीस

     

    Election Commission on Shivsena : निवडणूक आयोगाची शिवसेनेला नोटीस...खासगी वाहिन्यांच्या मालिकेत प्रचार केल्याचा ठपका...24 तासात उत्तर देण्याचे निर्देश ...-काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या तक्रारीनंतर नोटीस

  • अंतरवली सराटीत संजय शिरसाटांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

     

    Sanjay Shirsata met Manoj Jarange : संजय शिरसाट अंतरवली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...मनोज जारांगे यांच्याबाबत कालीचरण महाराज यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती..संजय शिरसाठ यांच्या मतदार संघात कालीचरण महाराज यांनी टीका केली होती...त्यामुळे संजय शिरसाट हे जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झालेत..
     

  • बारामती शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन

     

    Baramati Sharayu Motors : बारामती शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन...श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरशन...शरयू मोटर्स कंपनीचे मालक आहेत श्रीनिवास पवार...श्रीनिवास पवार युगेंद्र पवारांचे वडील...तक्रारीनंतर तपास केला मात्र त्या ठिकाणी काही आढळून आले नाही प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची माहिती...

  • कळमनुरीमध्ये वंचित उमेदवार दिलीप मस्केंवर हल्ला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dilip Musk Attack :  कळनुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.. सेलसुरा भागात पाच ते सहा जणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.. तसंच त्यांना मारहाण केली.. या घटनेत दिलीप मस्के गंभीर जखमी झालेत..त्यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला असून त्यांना उपचारासाठी नांदेडला पाठण्यात आलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • विधानसभेच्या निवडणुकीत गुन्हेगारांचाच बोलबाला

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेल्या 4 हजार उमेदवारांपैकी अनेकांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत..यात 19% टक्के उमेदवारांवर बलात्कार, महिलांवरील अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत..तर 29% उमेदवारांवर इतर गुन्हे दाखल आहेत...सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने उमेदवारांवरील गुन्ह्यांचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले होते..त्यात ही माहिती समोर आलीय...38 % म्हणजेच 829 उमेदवार कोट्यधीश असल्याची माहितीय..दरम्यान 26 उमेदवारांनी आपल्याकडे 1 रुपयांचीही मालमत्ता नसल्याचे नमूद केलंय...22 % उमेदवारांकडे 5 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचं उघड झालंय़..

  • आचारसंहितेदरम्यान 660 कोटी मालमत्ता जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Election Commission : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 2019 सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तब्बल पाचपट अधिक मालमत्ता जप्त केली. १५ ऑक्टोबरपासून पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातूंविरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात मुंबई शहर आणि उपनगरांत सर्वाधिक मालमत्तेची जप्ती झाली. २०१९ विधानसभा निवडणुकीत १२२.६७ कोटी रुपयांची मालमत्ता
    जप्त केली होती.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मुंबईत चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Chikungunya : मुंबईत डेंग्यू आणि मलेरियानंतर आता चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होतेय.... महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या तीन वर्षांमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. 2022मध्ये मुंबईत चिकनगुनियाचे 22 रुग्ण होते. 2023 मध्ये ही रुग्ण संख्या वाढून 250 वर गेली. तर यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत 578 रुग्णसंख्या नोंदवण्यात आलीय. मुंबईतच नव्हे, तर राज्यभरात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. ऑक्टोबर महिन्यापर्यंत नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ११९९, पुण्यात ७०५ तर मुंबईमध्ये ५७८ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. ताप, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ, थकवा, सांधेदुखी अशी तीव्र स्वरुपाची लक्षणं या आजारात दिसून येतात.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • संभाजीनगरमध्ये कॅश फॉर व्होटचा प्रकार उघड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajinagar : संभाजीगरमध्ये कॅश फॉर वोट चा एक प्रकार उघडकीस आला.. या प्रकरणी पोलिसांनी संशयित व्यक्तीला अटक केलीये... संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघात मुस्लिम मतदारांना 1 हजार देण्याचे आमिष दाखवले जात होतं.. मतदारांना पैसे देऊन त्यांच्या बोटाला शाई लावली जात होती आणि त्यांचं मतदार कार्ड घेतलं जात होतं.. हा सगळा सगळा प्रकार एक व्यक्तीनं लपून रेकॉर्ड केला, आणि हा व्हीडिओ व्हायरल केला.. तसंच पोलिसांनाही याची माहिती दिली.. त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.. हा सगळा प्रकार उघकीस आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर चांगलाच गोंधळ घातला.. त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • राहुल गांधींना पुणे कोर्टाचं समन्स

     

    Rahul Gandhi : राहुल गांधींना पुणे कोर्टाचं समन्स...2 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश...स्वातंत्र्यवीर सावरकर अवमानप्रकरणी समन्स...स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावकरांचा राहुल गांधींविरोधात दावा

  • अनमोल बिश्नोईला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Anmol Bishnoi Arrested :  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून पोलिसांनी अटक केली. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडातला अनमोल बिश्नोई आरोपी आहे.अनमोलवर राष्ट्रीय तपास एजन्सीतर्फे 2 केस दाखल असून 18 अन्य आरोपही दाखल आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन आठवड्यांपूर्वीच गँगस्टर अनमोल बिश्नोईविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं.अनमोलवर NIA ने 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link