Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
एन डी स्टुडिओ आता सरकारच्या ताब्यात
ND Studio : एन डी स्टुडिओ आता सरकारच्या गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात...राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेंनी एन डी स्टुडिओची पाहणी केली...एन डी स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात...दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाईंचा स्टुडिओ... एन डी स्टुडिओ गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात... एन डी स्टुडिओतच नितीन देसाईंनी केलेली आत्महत्या
बातमीचा व्हिडीओ पाहा-
बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 27 हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा
BEST Employees Diwali Bonus : अखेर बेस्ट कर्मचा-यांना आज दिवाळी बोनस देण्यात आला आहे... दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे बेस्टचे चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, आता दिवाळीनंतर एक महिन्याने 27 हजार बेस्ट कर्मचा-यांच्या बँक खात्यात दिवाळी भेट जमा झाली आहे. त्यामुळे बेस्टचे कर्मचारी सुखावले आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
शिंदे, फडणवीसांसह शाहांसोबत रात्री चर्चा- अजित पवार
Ajit Pawar : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह रात्री अमित शाहांसोबत बैठक असून त्या बैठकीमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा होणार असल्याचं अजित पवार म्हणालेत...दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवारांची कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली...त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत होते...
बातमी व्हिडीओ पाहा-
अक्कलकुवात आमदार आमश्या पाडवींच्या मिरवणुकीत राडा
Amsha Padvi : नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींच्या मिरवणुकीत राडा झाला... यामुळे आमदार आमशा पाडवींच्या भव्य विजय रॅलीला गालबोट लागलं... रॅलीत दोन गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली... याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये....
बातमीचा व्हिडीओ पाहा-
ठाकरेंचं नाव CMपदासाठी जाहीर करायला हवं होत- अंबादास दानवे
Ambadas Danve : उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर झालं असतं तर विधानसभेत जागा वाढल्या असत्या, असं विधान अंबादास दानवे यांनी केलाय. मात्र, काँग्रेसचे 10 नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. केवळ मंत्रिपदावरच चर्चा करत होते, असा टोलाही अंबादास दानवेंनी काँग्रेस नेत्यांना लगावलाय. लोकसभा जिंकल्यानंतर अती आत्मविश्वास निर्माण झाला, असं दानवे म्हणालेत. तर यावर आपण नंतर मित्रपक्षांना उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
नालासोपाऱ्यात 41 अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात
Nalasopara : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने नालासोपाऱ्यात ४१ अनाधिकृत इमारतींवर कारवाईला सुरूवात झाली आहे...नालासोपारा पूर्वेच्या आचोळे परिसरातील महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर या इमारती बांधण्यात आल्या आहेत... शेकडो रहिवासी या इमारतीमध्ये वास्तव्य असल्याने या कारवाईमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होणार आहेत.. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यास या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
नवनीत राणांचा संजय राऊतांना टोला
Navneet Rana On Sanjay Raut : फणडवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागत करणार का? या पत्रकाराच्या प्रश्नावर संजय राऊतांनी मुख्यमंत्री हा राज्याचा असतो त्यामुळे जो होईल त्याचं स्वागत करू असं वक्तव्य केलंय, याच त्यांच्या वक्तव्यावरून नवनीत राणा यांनी राऊतांना टोला लगावलाय. संजय राऊत यांचे सूरच बदलले नाहीत तर त्यांची दिशाही खूप लवकरच बदलेल असं नवनीत राणा यांनी म्हटलंय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सियाचीन, कारगिल युद्धभूमीवर पर्यटन करता येणार
Siyachin-Kargil Tourism : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद ते पर्यटन असा बदल झालाय. देशाच्या सीमावर्ती भागातील ४८ ठिकाणी पर्यटनासाठी जाता येणारेय. त्या दृष्टीने साहसी खेळ, गिर्यारोहण, ट्रेकिंग अशा उप्रक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत असून सियाचिन, गलवान, कारगिल युद्धभूमी पर्यटकांना खुली करण्यात येणार आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ही माहिती दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
भाजपकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावाची घोषणा
BJP Observer : राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्यातील भाजप संघटना यांच्या समन्वयासाठी भाजपकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची पुन्हा उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.. विनोद तावडेंना ही जबाबदारी दिल्याने त्यांचं राजकीय वजन वाढणार आहे.. त्यांच्या मदतीसाठी संजीव चौरसिया, संजय भाटिया आणि लाल सिंग आर्य यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र आणि गोव्याचे निरीक्षक म्हणून सरचिटणीस अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आलीये.. देशभरातील भाजप संघटनेत बूथ अध्यक्षांच्या निवडणुका होत होत्या. आता भाजप मंडल अध्यक्षांची निवडणूक 15 डिसेंबरपर्यंत, तर जिल्हाध्यक्षांची निवडणूक 30 डिसेंबरपर्यंत होणार आहे. यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत एक मोठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
प्रियंका गांधींना लोकसभेच्या खासदारकीची शपथ
Delhi Priyanka Gandhi : प्रियंका गांधींनी आज लोकसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली.... वायनाडच्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी वाड्रा विक्रमी मतांनी विजयी झाल्यात.. भाकपचे सत्यन मोकेरी आणि प्रियंका गांधी यांच्यात ही लढत झाली होती यात प्रियंका गांधी 6.22 लाख मतांनी विजयी झाल्यात.. प्रियंका गांधीयांच्यासह नांदेड पोटनिवडणुकीत विजयी झालेले रविंद्र चव्हाण यांनीही खासदारकीची शपथ घेतली
संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना इशारा
Sanjay Raut On Eknath Shinde : शिवसेना खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना इशारा दिलाय. काल शिंदेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्याचं स्पष्ट केलं. मोदी आणि अमित शाहा जो निर्णय घेतील तो मान्य असणार असं एकनाथ शिंदे म्हणालेत...त्यावरून संजय राऊतांनी शिंदेंना खडे बोल सुनावलेत, जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत मोदी, शहा निर्णय घेणार असतील तर शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असा इशारा राऊतांनी शिंदेंना दिलाय. तसंच आता दिल्ली ठरवेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा टोलाही लगावलाय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शिवसेना UBT मविआतून बाहेर पडणार नाही - संजय राऊत
Delhi Sanjay Raut : शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही, अशी माहिती खासदार राऊतांनी दिलीय. शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर चर्चांवर आज संजय राऊतांनी पडदा टाकलाय. स्वबळावर निवडणुका लढणार नाही आणि यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेऊ, असं राऊतांनी स्पष्ट केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
धारावीतील २५ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण
Dharavi : धारावीतील २५ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय. रहिवाशांच्या पात्रता आणि अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अजूनही मोठ्या प्रमाणात झोपड्यांचे सर्वेक्षण शिल्लक असून, त्याला गती देण्यासाठी आणखी पथकं लवकरच तैनात केली जाणार आहेत, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिली. रोज 50हून अधिक पथकं सर्वेक्षणाचं काम करत आहेत. या पथकांद्वारे दिवसाला सरासरी ३०० ते ४०० झोपड्यांची गणना करून २०० ते २५० घरांची पडताळणी केली जाते.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 ते 4 दिवसांत शपथविधी होणार - छगन भुजबळ
Changan Bhujbal : दोन ते तीन दिवसांत शपथविधी होणार असा दावा छगन भुजबळांनी केलाय.. बहुमत असल्यानं भाजचे सर्वाधिक मंत्री होणार हे स्वभाविक आहे असं भुजबळ म्हणालेत.. 132आमदार आल्यानं भाजपचा मुख्यमंत्री हे स्वाभाविक आहे असा दावाही त्यांनी केलाय..
संभाजीनगरमध्ये फडणवीसांचे बॅनर, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उल्लेख
Sambhajinagar Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांचे संभाजीनरमध्ये बॅनर झळकलेत. जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, या अशायाची बॅनरबाजी करण्यात आलीय. 2 दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या सुपारी मारुती मंदिरात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे यासाठी महाआरतीदेखील करण्यात आली होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अमरावतीत भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू
Amravti Accident : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात बेनोडा अमरावती रोडवरील लखारा फाट्याजवळ आयशर आणि पिकअपच्या धडकेत काल रात्री तिघांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात अचलपूर येथील दोन तर पांढरघाटी येथील एकाचा मृत्यू झाल्याची माहीती पुढे आली आहे. अनेक लोक जखमी देखील झाले आहे. अपघातामुळे पुन्हा सर्वसामान्य नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली असून अवैध वाहतुकीवर आळा घालण्याची मागणी होत आहे. अपघातातील जखमी रुग्णावर वरूड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सांगलीत कार नदीत कोसळली, 3 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
Sangli Accident : सांगलीमध्ये एक भरधाव कार नदीत कोसळून तिघांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत.. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडलीये.. सांगलीच्या अंकलीजवळ रात्री एकच्या सुमारास हा अपघात झालाय.. गाडीतील सर्व प्रवासी हे कोल्हापूरहून लग्नकार्य आटपून सांगलीला परत येत होते.. यावेळी अंकलीच्या पुलावरून ही गाडी थेट कृष्णा नदीपात्रात कोसळली...
हायकोर्टाचा अब्दुल सत्तारांना दणका
Highcourt On Abdul Sattar : एकीकडे राज्यात सरकार स्थापनेची हालचाली सुरू असतानाच दुसरीकडे महायुतीचे नेते अब्दुल सत्तारांना उच्च न्यायालयाने आणखी एक दणका दिलाय...राज्यपालांची मान्यता नसताना आचारसंहितेपूर्वी घाईगडबडीत सिल्लोड तालुक्यातील भराडी निम्न मध्यम प्रकल्पाला तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजुरी मिळवून घेतली.याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर करण्यात आली होती. सुनावणीवेळी या प्रकल्पाला स्थगिती दिली. पाणलोट क्षेत्रात पुरेसं पाणी नसल्याने संबंधित प्रकल्पात पाणी साठणार नाही असा 'मेरी'चा अहवाल असतांना, या अहवालाकडे अब्दुल सत्तार यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं. नव्याने कोट्यवधी रुपये खर्च करणे हा पैशाचा अपव्यय ठरेल, असा ठपका देखील न्यायालयाने ठेवला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पालिका निवडणुकांचा मुहूर्त नवीन वर्षात ठरणार?
Mahapalika Election : महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मुहूर्त नवीन वर्षातच ठरण्याची शक्यताय. एकनाथ शिंदे सरकारच्या 2022 मधील अध्यादेशामुळे निवडणुका रखडल्यात. या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांकडे सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधण्यात आले. त्यावर न्यायालयाने 22 जानेवारी 2025 रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यानं राज्यघटनेच्या तरतुदींचे उल्लंघन होत आहे. निवडणुका घेण्यासाठी सर्वेच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांवर त्वरित सुनावणी घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यानं केलीय. याची दखल घेत कोर्टानं प्रलंबित याचिकांवर सुनावणी निश्चित केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बदलापूर उड्डाणपुलावर धुळीचं साम्राज्य
Badlapur Road : बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या एकमेव उड्डाणपूलावर रस्त्याची पुरती दुर्दशा झालीय. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत, हे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेल्या ग्रीड खडीमुळे संपूर्ण रस्त्यावर धुळीचं साम्राज्य निर्माण होतंय.वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीतून आणि खड्ड्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय. निवडणूक आचारसंहिता लागल्याने गेला महिनाभर या रस्त्याचं काम रखडलं होतं मात्र आता आचारसंहिता संपली असून आता तरी रस्त्याचं काम करा अशी मागणी वाहन चालक करतायतय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर निशाणा
Bacchu Kadu On Ravi Rana : रवी राणांनी अपक्ष म्हणून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान बच्चू कडूंनी राणांना दिलंय. राणा दाम्पत्यानी पराभवाचं श्रेय घेऊ नये. संपूर्ण राज्याचं चित्र बदललंय. कोणत्याही एक मतदारसंघातून निवडूक लढण्यास तयार आहे. राणांनीही अपक्ष म्हणून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलंय.
16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी?
Social Media : 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची योजना आखण्यात आलीये... ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.. ऑस्ट्रेलियन संसदेत बुधवारी यासंबंधीचे विधेयकही मंजुर करण्यात आलंय.. या विधेयकावर अंतिम मोहोर उमटवण्याची जबाबदारी आता सिनेटवर आहे. या विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाल्यास अल्पवयीन मुलांना सोशल मीडियापासून रोखणारा हा जगभरातील पहिलाच कायदा असेल. या विधेयकानुसार, जर X, टिकटॉक, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारखे प्लॅटफॉर्म लहान मुलांना खाती उघडण्यापासून रोखू शकले नाहीत तर त्यांना 32.5 दशलक्ष डॉलर्सपर्यंत दंड भरावा लागणार आहे.. या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय..
KDMCतील 65 बेकायदा इमारतींवर हातोडा पडणार
Kalyan-Dombivli Illegal Building : खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळविल्याचं भासवत 'रेरा' प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविणाऱ्या 65 बेकायदा इमारती येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करा, असे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिले. त्यामुळे या बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या डोक्यावर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मावळमध्ये पेट्रोल पंपावर दुचाकीने घेतला पेट
Maval Bike Fire : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला.सोमाटणे फाट्याजवळच्या लडकत पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पेट्रोल भरण्यापूर्वी दुचाकीस्वार दुचाकीच्या पेट्रोल टाकीचं झाकण उघडत होता. त्यावेळी अचानक दुचाकीने पेट घेतला.दुचाकीने पेट घेताच दुचाकीस्वार खाली उतरला. त्यामुळे जीवित हानी टळली... पेट्रोल पंप कर्मचा-यांनीही तातडीने उपाययोजना केल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
तटकरे कुटुंबाविरोधात महेंद्र थोरवेंचा एल्गार
Raigad Mahendra Thorve : कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात एल्गार पुकारलाय. कर्जत मध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार अपक्ष उभा करून त्याचे सर्व नियोजन तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलं. महायुती मध्ये राहून तटकरे कुटुंबीयांनी गद्दारी केली. अशांना सरकार मध्ये सहभागी करून घेऊ नये अशी मागणी महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केलीय
राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा
State Cold : राज्यतील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.. उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर नाशिक, नगर, पुण्यात थंडीच्या लाटेची शक्यता आहे.. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याचं तापमान 10 अंशांवर गेलंय.. तर मुंबईची पाराही 17 अंशांवर गेलाय..