Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 30 Nov 2024-12:11 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 30 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • नागपुरात कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

     

    Nagpur Hit And Run : नागपुरात हिट अँड रनची घटना घडलीये...भरधाव लँड रोव्हरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय.. हुडकेश्वरमध्ये रात्री ही दुर्घटना घडलीये. सॅम्युअल त्रिवेदी असे मृत दुचाकीस्वाराचं नाव असून तो पेशानं पायलट होता..  धंतोलीमधील एका मित्राला भेटून परतत असताना हा अपघात झाला... या अपघातीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झालीत.. दरम्यान या घटनेनंतर लँडरोव्हरचा चालक गाडी सोडून घटनास्थळावरुन पळून गेला.. मात्र पोलिसांनी सकाळी त्याला ताब्यात घेतलं..

  • रिफायनरी समर्थकांच्या हालचालींना वेग

     

    Refinary Project : राज्यात नवं सरकार येण्यापूर्वीच रिफायनरी समर्थकांच्या हालचालींना वेग आलाय.. नव्या मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेठींची तयारी सुरु झालीये..रद्द झालेल्या नाणार प्रकल्पासाठी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत. रिफायनरी प्रकल्प बाहेर जाण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भेटी सुरु झाल्यात.. कोकणात रिफायनरीसाठी उपलब्ध जमीन आणि समर्थन मुख्यमंत्र्यांना सादर केली जाणार आहेत..रिफायनरी प्रकल्प बाहेर जाऊ नये म्हणून राजापूरमधील नाणार परिसरातील रिफायनरी समर्थक पुढे सरसावलेत... नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर लगेचच भेट मिळण्यासाठी आत्तापासूनच जोरदार फील्डिंग लावण्यात आली असून कोकणातील भाजपच्या काही स्थानीक नेत्यांनीही यासाठी पुढाकार घेतलाय.. 

  • निवडणुकीत पैशांचा महापूर - शरद पवार

     

    Pune Sharad Pawar : निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय.. पैशांचा येवढा वापर कधीही झाला नसल्याचंही शरद पवार म्हणालेत.. जनतेनं आता याबाबत उठाव कऱण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणालेत..  तसेच शेवटच्या दोन तासात वाढलेलं मतदान धक्कादायक असल्याचं शरद पवार म्हणालते.. . पुण्यातील बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.. 

  • राजन साळवींची ईव्हीएम, व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी

     

    Rajan Salvi : माजी आमदार राजन साळवींनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पडताळणीची मागणी केलीय. विधानसभा निकालावर आक्षेप घेत त्यांनी निवडणूक अधिका-यांना निवेदन दिलंय. राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक-2 आणि चाफवली मतदान केंद्र क्रमांक 200 तर तुळसवडेचे ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची साळवींची मागणी आहे. यासाठी 94 हजार 400 रुपये शुल्कही भरलंय.

  • 6 डिसेंबरला लोकल रात्रभर सुरू ठेवा - वर्षा गायकवाड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Varsha Gaikwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत दाखल होतात. त्यांच्या सोयीसाठी मुंबईतील लोकल सेवा 5 आणि 6 डिसेंबरला रात्रभर सुरू ठेवावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केलीय. त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्र पाठवल्याची माहितीदिलीय. भीमसैनिकांच्या सोयीसाठी रेल्वेमंत्री ही मागणी ते मान्य करतील अशी अपेक्षा त्यांनी ट्वीटरवर व्यक्त केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बेस्टच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai : मुंबईतल्या बेस्ट बसेसच्या ताफ्यात आणखी 3 हजार 800 ई-बसेसचा समावेश होणारेय. यात 1200 डबल डेकर तर 2 हजार 650 एक मजली बसेसचा समावेश असेल. बेस्टने सादर केलेल्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केलीय. तसंच यंदा भाडेवाढ न करणअयाचाही निर्णय घेतलाय. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांना तिकीट दरवाढीतून सुटका मिळणारेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नवी मुंबईत 527 धोकादायक इमारती

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Navi Mumbai Buidling : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या इमारतींचं सर्वेक्षण करण्यात आलंय. या सर्वेक्षणातून शहरातील 527 धोकादायक इमारती असल्याचं समोर आलंय. तर या इमारतींचं 31 मार्च 2025 पूर्वी संरचनात्मक परिक्षण करून अहवाल पालिकेला सादर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. धोकादायक झालेल्या इमारतींचा, घरांचा वापर केल्यामुळे जिवित आणि वित्त हानी होऊ शकते. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका सतर्क झालीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुख्यमंत्रिपदी माझ्या नावाची चर्चा निरर्थक - मुरलीधर मोहोळ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Murlidhar Mohol : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.. यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. मात्र या चर्चा निरर्थक असल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात NDAचा दीक्षांत सोहळा

     

    Pune NDA : पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीत  दीक्षांत सोहळा पार पडतोय.... खडतर प्रशिक्षणानंतर NDAची 147वी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे.. एनडीएतील खेत्रपाल मैदानावर हा शानदार सोहळा संपन्न  होतोय.. देशाचे हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग दीक्षांत संचालनाचं निरीक्षण करताहेत... लष्करी शिस्त, सेवाभाव आणि राष्ट्रभक्तीचं दर्शन या सोहळ्यातून घडतं... लष्करी हेलिकॉफटर्स तसेच लढाऊ विमानांची सलामी हे या सोहोल्याच विशेष आकर्षण असतं... एनडीए तील प्रशिक्षणादरम्यान विशेष कामगिरी केलेल्या कडेट्स चा याप्रसंगी पदकं देऊन गौरव करण्यात येतो..दीक्षांत संचालनाचा हा सोहळा कडेट्स साठी स्वप्नपूर्तीचा अनुभव असतो...  इथून बाहेर पडल्यानंतर ते सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत...देशवासीयांसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण म्हणता येईल

  • शरद पवार घेणार बाबा आढावांची भेट

     

    Pune Baba Adhav : पुण्यात शरद पवार आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी भेट घेणार आहेत.. आज सकाळी 11 वाजता शरद पवार  फुले वाड्यात बाबा आढाव यांच्या उपोषण स्थळी भेट देणार आहेत. पुण्यात बाबा आढाव यांचं दोन दिवसांपासून आत्मक्लेश उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज तिसरा दिस आहे. निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आढावांनी केलाय. तसंच निवडणुकीत सरकारी पैशांचा खुळखुळा वाजल्याचं आढावांनी म्हटलंय आहे..

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link