Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Thu, 03 Oct 2024-5:41 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • बदलापुरात भाजपमध्ये वाद

     

    Badlapur BJP : बदलापुरात भाजपच्या बैठकीत गोंधळ...किसन कथोरे, कपिल पाटलांच्या समर्थकांचा गोंधळ...उमेदवारांच्या नावावरुन दोन गटांत वाद...गोंधळामुळे भाजपची बैठक रद्द...पक्षाचे निरीक्षक गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत ही अंतर्गत बैठक सुरू होती. यावेळी दोघा नेत्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. गोंधळामुळे निरीक्षकांना बैठक रद्द करावी लागली.

  • पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

     

    Megablock on Western Railway Today : पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून मेगाब्लॉक असणार आहे... चार तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे..त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहे.. आज रात्री साडेबारा वाजेपासून ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे... ब्लॉक दरम्यान बोरीवली ते अंधेरी दरम्यान सर्व लोकल धीम्या मार्गावर धावणार आहे.. तर लांब पल्ल्याच्या गाड्याही 10 ते 20 मिनिटं उशीरानं धावणार आहे..  
     

  • गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात

     

    Geeta Gawli : अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची दगडी चाळमध्ये जाऊन भेट घेतलीये.. गीता गवळी या मुंबई महानगरपालिकेच्या दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी त्या भायखळा मतदारसंघातून इच्छुक असल्याची सूत्रांनी माहिती दिलीये.. सध्या भायखळा मतदारसंघातून शिंदे गटाच्या यामिनी जाधव या आमदार आहेत.. त्यामुळे गीता गवळी या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आल्यास आगामी निवडणुकीत गवळी विरुद्ध जाधव असा सामना होण्याची शक्यता आहे..

  • 'महायुतीचं जागावाटप दसऱ्या पूर्वीच होणार', चंद्रकांत पाटलांची माहिती

    Chandrakant Patil : 'महायुतीचं जागावाटप दस-यापूर्वीच होणार'...'महायुतीत 10-12 जागा वगळता सर्व जागांवर एकमत'....'जागावाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडे'...मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

  • हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचं ठरलं...हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट...इंदापूरमधून उमेदवनारी बाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती....हर्षवर्धन पाटील भाजपला राम राम करून हाती घेणार तुतारी ?

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • राज्यात अराजकता सुरू आहे - उद्धव ठाकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांचा दसरा मेळाव्यात समाचार घेणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. तसेच अमित शाहांच्या आरोपांचाही समाचार घेणार असल्याचं ठाकरे म्हणालेत तसेच राज्यात अराजकता माजली असून ती मशाल हाती घेऊन संपवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय... अराजकता संपवण्यासाठी ठाकरेंनी गाणं लॉन्च केलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Manoj Jarange, Sambhajiraje, Laxman Hake : आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना पाडण्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूये. मराठा समाजाच्या बैठकीत कुणाला पाडयचं याबाबत ठरणार असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं. तर जरांगेंनी पाडापाडी करण्यापेक्षा परिवर्तन महाशक्ती आघाडीत यावं, असं आवाहन संभाजीराजेंनी केलंय. तर ज्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंना रसद पुरवलीय. अशा लोकांना पाडण्याचं धोरण ठरल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींसोबत अश्लील चाळे

     

    Pune Crime : स्कूल बस मधून प्रवास करणा-या चिमुकल्यांसोबत बस ड्रायव्हरने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलाय... पुण्यातील वानवडी परिसरात 30 सप्टेंबर रोजी ही घटना घडलीये.. याप्रकरणी संजय जेटींग रेड्डी या 45 वर्षीय बस ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलंय.. स्कूल बस मधून प्रवास करत असताना हा ड्रायव्हर पीडित मुलींना बसच्या पहिल्या सीटवर बसवायचा आणि त्यानंतर त्यांच्यासोबत छेडछाड करायचा. एका पीडित मुलीनं  तिच्या आईला हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर बस ड्रायव्हर विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील स्कूलबस पूर्व भागातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करते.

  • मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान - संभाजी भिडे

     

    Sambhaji Bhide : सतत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलंय. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान, असं वक्तव्य भिडेंनी केलंय. सत्ताकारण आणि अर्थकारण शूद्र आहेत. ते थुंकण्याच्या लायकीचे विषय असल्याचं भिडे म्हणालेत. देशातील उत्सवांवरही त्यांनी भाष्य केलंय.. 

  • दसऱ्यापूर्वी जागावाटप जाहीर होईल - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : दस-यापूर्वी जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिलीय.  महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणं हेच सूत्र असल्याचं राऊतांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवरही निशाणा साधलाय. पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित  शाह  स्थानिक पातळीवर प्रचार करतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नाशिक दौरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Raj Thackeray : मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5, 6 ऑक्टोबरला नाशिक दौ-यावर आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार असल्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. नाशिकमध्ये सध्या मनसेची स्थिती फारशी समाधानकारक नाही. पक्षांतर्गत वारंवार पदाधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जातातेत. दरम्यानच्या काळात राज यांनीही नाशिकमधील संघटनेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता नाशिक दौ-यावर येत आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Crime :  बदलापूरची घटना ताजी असतानाच पुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये 2 चिमुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये.. पुण्यातील वानवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय.. याप्रकरणी 45 वर्षीय नराधम स्कूल बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. हा बस चालक 6 वर्षाच्या चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या 4 दिवसांपासून अत्याचार करत होता.. चिमुकलीनं घरी तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.. 

    बातमी पाहा - बदलापूरसारखाच प्रकार पुण्यात! स्कूल बसमध्ये 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार; चालकानेच

  • राज्य सरकारची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' मोहीम

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : महिलांच्या सुरक्षेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून शक्ती अभियानाची घोषणा केली. त्या अंतर्गत 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' ही मोहीम राबवली जाणारेय. बारामती शहरात शक्तीपेटी तयार केली जाणारेय, अशी माहिती अजित पवारांनी दिलीय. यातून महिलांवरील अत्याचारासंदर्भातील तक्रार स्वीकारण्यात येणारेय. मुलींनी तक्रार पेटीत तक्रारी कराव्यात, असं आवाहन अजित पवारांनी केलंय. यावेळी त्यांनी एक हेल्पलाईन नंबरही जारी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नागपुरातील शहर बससेवा ठप्प

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur : ऐन सणाच्या दिवसांत नागपूर शहरातील बस सेवा ठप्प झालीये.. पगारवाढीच्या मागणीसाठी शहरातील 'आपली बस' या बस सेवेतील कर्मचा-यांनी संप पुकारलाय.. मोरभवन बसडेपोमध्ये कर्म-यांचं हे आंदोलन सुरु आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • State Weather : राज्यात यंदा ऑक्टोबर हिटचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. राज्याती काही भागात उन्हाच्या झळा बसण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.. तर मुंबईतही तीव्र उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे राज्यात यंदा थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे.  सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं थंडीही अधिक पडणार आहे..  त्यामुळे ऐन दिवाळी थंडीहस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.. तर  मुंबई, पुण्यातून १० ऑक्टोबर दरम्यान मोसमी पाऊस  माघारी परतण्याचा अंदाज आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पंतप्रधान मोदींचा 5 ऑक्टोबरला वाशिम दौरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prime Minister Narendra Modi Visit Washim : पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला वाशिम दौ-यावर येणार आहेत. ते पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत. राज्य सरकारनं तयार केलेल्या विरासत-ए-बंजारा या जागतिक दर्जाच्या वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारेय. मोदींच्या दौ-याची मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात

     

    Navratra : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीय. भाविकांनी तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय. पहाटे 2 वाजता पारंपरिक विधी करुन देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली.  9 दिवसाच्या घोर निद्रेनंतर, श्री तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान झाली. सकाळी अभिषेक पूजा झाली. दुपारी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना केली जाणारेय. महत्त्वाचे म्हणजे तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने इकडून तिकडे हलवण्यात येतेय.

  • माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Imtiaz Jaleel : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर नावाच्या पाटीला काळं फासून विद्रुपीकरण केल्या प्रकरणी पुण्यातील कोंढवामध्ये जलील यांच्यासह MIM च्या पदाधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 23 सप्टेंबरला सकाळी संभाजीनगर-जालना महामार्गावरील देवळवाडी फाटा परिसरात पाटीला काळं फासण्यात आलं होतं. यावेळी समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा देण्यात आल्या होत्या... याबाबत महेश भोईवार यांनी पोलिसांकडं तक्रार दिली होती तक्रार अर्जाची पडताळणी करून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण संभाजीनगर पोलिसांकडं तपासासाठी वर्ग करण्यात आलं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Western Railway Megablock : पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक असणार आहे... चार तासांचा ब्लॉक असणार आहे..त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहे. तर काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहे.. आज रात्री साडेबारा वाजेपासून ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे... ब्लॉक दरम्यान बोरीवली ते अंधेरी दरम्यान सर्व लोकल धीम्या मार्गावर धावणार आहे.. तर लांब पल्ल्याच्या गाडग्याही 10 ते 20 मिनिटं उशीरानं धावणार आहे..  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

     

    Delhi : शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकऱणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी लांबवीवर पडतेय....

  • Maharashtra Breaking News LIVE: कार्ला गडावरील एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात

    महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. आजपासून म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून महानवमी होमापर्यत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत होणार असून आज सकाळी 8 वाजता कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: देवी तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान, पहाटे दोन वाजता पारंपारीक विधी करुन देवीची प्रतिष्ठापणा 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link