Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 05 Oct 2024-2:23 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 05 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • पेसा भरतीबाबत सरकारकडून GR जाहीर, आदिवासी आमदारांच्या आंदोलनाला यश

     

    PESA Bharti : पेसाभरतीसाठी आदिवासी आमदारांची मंत्रालयात केलेल्या आंदोलनाला यश आलंय.. राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत GR काढण्यात आलाय.. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवगरगर्तील सरळसेवेची पदे भरण्याबाबत सरकारनं परवानगी दिलीये..पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी आमदारांनी काल मंत्रालयाच्या संरक्षण जाळ्यांवर उड्या मारुन आंदोलन केलं होतं.. तसंच काल दिवसभर सरकार विरोधात धरणं आंदोलनही केलं होतं.. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असतांनाही सरकारनं हा जीआर काढला असून कोर्टाच्या आधीन राहून मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 

  • 'नियत खोटी असल्यानं शिवरायांचा पुतळा पडला',राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

     

    Rahul Gandhi : कोल्हापूरच्या सभेतून आज राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. देशात दोन विचारसरणी आहेत. त्यातील एक विचारसरणी संविधान संपवतेय, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केलाय. याच विचारसरणीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक होऊ दिला नाही. नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडलाय, अशी टीका राहुल गांधींनी केलीय. विचारसरणीची लढाई हजारो वर्षापूर्वींची आहे. त्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराजही लढले आणि आज काँग्रेसही लढत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केलाय. 

  • 'शिंदेंची वाढलेली ताकद भाजपला नापसंत', टू द पॉईंटमध्ये रोहित पवारांचा दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rohit pawar On CM Shinde : महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंची वाढलेली ताकद भाजपला आवडलेली नाही.. अशा खळबळजनक दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. टू द पॉईंट मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी हा मोठा दावा केलाय. त्याचसोबत शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी कुटुंब फोडलं असा मोठा आरोपही रोहित पवारांनी केलाय.. मात्र लोकं ही शरद पवारांची ताकद आहेत असा इशारा रोहित पवारांनी सत्ताधा-यांना दिलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मालेगावात होमिओपॅथिक क्लिनिकसह 2 ठिकाणी NIAचे छापे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Malegaon NIA Raid Homeopathy Clinic : नाशिकच्या मालेगावात NIAचा छापा...होमिओपॅथिक क्लिनिकसह दोन ठिकाणी कारवाई...मालेगाव शहरातील अब्दुल्ला नगरमध्ये छापा...रात्रीपासून NIAच्या पथकाकडून चौकशी सुरु

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  •  छत्तीसगडमध्ये सुरक्षादल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 40 नक्षलवादी ठार

     

    Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक...चकमकीमध्ये 40 नक्षलवादी ठार...नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त...घातपाताचा मोठा कट उधळला

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'भाजपने पुढे केलेली टीम तर नाही ना?', रोहित पवारांची तिसरी आघाडीवर शंका 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rohit Pawar : तिसरी आघाडी म्हणजे भाजपने पुढे केलेली टीम तर नाही ना अशी शंका आमदार रोहित पवारांनी उपस्थित केलीय. मतविभाजन करण्यासाठीच तिसरी आघाडी उघडल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत रोहित पवारांनी हे विधान केलंय. महायुती आणि महाविकास आघाडीला सक्षम पर्याय म्हणून संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. याच तिस-या आघाडीवर रोहित पवारांनी आपली शंका बोलून दाखवली आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • कोल्हापुरात राहुल गांधींच्या दौऱ्यावरून भाजप आक्रमक

     

    BJP on Rahul Gandhi : कोल्हापुरात भाजपचं आंदोलन सुरूये...राहुल गांधींच्या दौऱ्यावरून भाजप आक्रमक झालीये...भाजपने राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले...

  • संभाजीनगरमधून 3 संशयित तरुण ताब्यात. NIA, ATSची कारवाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Big action by NIA and ATS in Maharashtra : महाराष्ट्रात NIA आणि ATSनं मोठी कारवाई केलीय. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात ही संयुक्त कारवाई करण्यात आलीय. देशविरोधी कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून काही संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आलंय.. संभाजीनगरमधून तीघांना ताब्यात घेतलं असून किराडपुरा भागातून मौलाना सय्यद इलियास यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. जालन्यातल्या गांधीनगरमध्ये ATSनं कारवाई केलीये.. सकाळी चार वाजल्यापासून पथकानं ही कारवाई केली असून एकाला ताब्यात घेण्यात आलंय.. समद सौदागर असं या संशयित व्यक्तीचं नाव असून तो चामड्याचा व्यापारी असल्याचं कळतंय. मालेगावातही NIA आणि ATSनं छापेमारी केलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • पुणे सामूहिक अत्याचार प्रकरण, संशयित आरोपींचं CCTV फुटेज ताब्यात

     

    Pune Gang Rape Case : पुणे बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट समोर येतीय...संशयित आरोपींचं CCTV फुटेज पोलिसांच्या ताब्यात आलंय...बोपदेव घाटात नराधमांचा तरुणीवर बलात्कार...कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

  • 'देवेंद्र फडणवीसांनी जामखेडमधून लढावं', रोहित पवारांचं आव्हान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rohit Pawar on Devendra Fadnavis : दुसऱ्यांना झुंजवण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून लढावं असं आव्हान रोहित पवारांनी दिलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलंय. जामखेडमधून अजित पवार निवडणूक लढणार का या प्रश्नावर बोलताना त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. कर्जत जामखेड हा मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळं अजित पवारांना जामखेडमधून उतरवण्यापेक्षा फडणवीसांनी जामखेड लढवावं असं रोहित पवार म्हणालेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • अमरावती पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Stone pelting at Amravati Police Station : अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आलीय...जमावाकडून पोलीस स्टेशनची तोडफोड करण्यात आलीय.. दगडफेकीत 21 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेत.. तर 10 पोलिस व्हॅनचं नुकसान झालंय.. दगडफेक कऱणाऱ्या 1200 जणांवर गुन्हे दाखल कऱण्यात आलेत.. तर 26 लोकांची ओळख पटली आहे.. त्यांना अटक करण्यासाठी पोलिस पथकांची टीम रवाना झालीय..उत्तर प्रदेशाशातील गाझियाबाद मधील यती नरसिंह आनंद यांच्या विरोध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रात्री पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे तब्बल 14 वर्षानंतर आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणारेत. या दौऱ्यामध्ये कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण राहुल गांधींच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला देखील राहुल गांधी भेट देणार आहेत. त्यानंतर ते हॉटेल सयाजी इथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती लावणार आहे. संविधान सन्मान संमेलन दुपारी चार पर्यंत चालणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा पश्चिम महाराष्ट्रातील हा दुसरा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • राज्यात NIA, ATSची मोठी कारवाई

     

    Big action by NIA and ATS in Maharashtra : महाराष्ट्रात NIA आणि ATSनं मोठी कारवाई केलीय. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात ही संयुक्त कारवाई करण्यात आलीय. काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहितीही समोर येतीय. देशविरोधी कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. 

  • राज ठाकरेंचा आज संभाजीनगर दौरा

     

    Raj Thackeray : विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरे सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे आजपासून 3 दिवस दौ-यावर असणार आहेत. आज ते संभाजीनगरचा दौरा करतील. तर उद्या  राज ठाकरे नाशिकमध्ये असतील आणि 7 ऑक्टोबरला ते पुण्याला भेट देतील. याआधी राज यांनी विदर्भ, मराठवाड्याचा दौरा केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्धार मनसेनं केलाय. यामध्ये इच्छुक उमेदवारांसोबत ते बैठक घेणार आहेत. 

  • पंतप्रधान आज वाशिम दौऱ्यावर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा आहे... मोदी सकाळी वाशिम दौ-यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता विशेष हेलिकॉप्टरन पोहरादेवीला पोहोचणारेत. त्यानंतर ते जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज आणि धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील.त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link