Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 09 Oct 2024-11:55 am,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • अमरावतीत कडू विरुद्ध राणा वाद शिगेला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amravati : अमरावतीत आमदार राणा विरुद्ध आमदार बच्चू कडू वाद शिगेला पोहोचलाय. राजकुमार पटेलांना शिंदेंच्या पक्षात पाठवण्याची बच्चू कडूंचीच खेळी आहे. एकनाथ शिंदेंनी पटेलांना तिकीट दिलं तर त्याविरोधात काम करू, असा इशारा रवी राणांनी महायुतीतील नेत्यांना दिला. कडू आणि पटेलांनी लोकसभेत युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप करत येणा-या काळात बच्चू कडूंचा हिशोब ठेवणार, असाही इशारा राणांनी दिलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • स्वबळावर लढायचं असेल तर काँग्रेसनं जाहीर करावं - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Sanjay Raut : काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी, असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय. हरियाणाच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी ही भूमिका मांडलीय. राज्यात कुणीही स्वत:ला छोटा किंवा मोठा भाऊ समजू नये, असा चिमटाही राऊतांनी काँग्रेसला काढलाय. तर हरियाणातील निकालाचा परिणाम महाराष्ट्रातील निवडणुकीवर होणार नसल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नवी मुंबईत लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Navi Mumbai Police : नवी मुंबईत अँटिकरप्शन ब्युरोची मोठी कारवाई केलीये...एन.आर.आय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना अँटिकरप्शन ब्युरोने अटक केलीये.....सतीश कदम यांनी शहाबाज गावातील ईमारत दुर्घटना प्रकरणातील बिल्डर महेश कुंभारला विविध गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 50 लाखांची लाच मागितली... सेटलमेंट झाल्यानंतर 18 लाखांची रक्कम ठरली...त्यातील 14 लाखांची रक्कम स्विकारण्यात आली....आणि उरलेले 4 लाख स्विकारताना सतीश कदम यांना राहत्या घरातून अँटिकरप्शन ब्युरोने अटक केलीये..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सामना अग्रलेखातून काँग्रेसला टोले

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Saamana Editorial On Congress : हरियाणातील पराभवावरुन सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीका करण्यात आलीये.. हरियाणात मित्रपक्षांना दूर ठेवल्याचा काँग्रेसला फटका बसलाय.. त्यामुळे या निकालातून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी धडा घ्यावा असा सल्ला सामनातून देण्यात आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अजित पवारांकडून रोहित पवारांचं कौतुक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar On Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर सभेत आमदार रोहित पवारांचं कौतुक केलंय. रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये चांगलं काम करतोय, अशा शब्दांत अजित पवारांनी कौतुक केलंय. राजकीय भूमिका बदलताना शरद पवारांनी अगोदर होकार दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली, असा गौप्यस्फोटही  अजित पवारांनी केलाय. तर घरामध्ये पुरूष मंडळी असेपर्यंत घर एकत्र असतं विधान अजित पवारांनी केलंय. अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे? याबाबत चर्चा रंगू लागलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुणे-नगर रस्त्यावरील बीआरटी प्रकल्प हटवला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune BRT : पुण्यातील नगर रस्त्यावरील बीआरटी प्रकल्प अखेर हटवण्यात आलाय... येरवडा ते वडगाव शेरी मार्गावरील बीआरटी च्या दुभाजकावर रात्री बुलडोझर चालवण्यात आला. वीस वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत हाती घेण्यात आलेला बस रॅपिड ट्रांजिट म्हणजेच बीआरटी प्रकल्प अपयशी ठरलाय.. त्यामुळे नगर रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर बीआरटीचे कठडे हटवण्यात आले असून आता हा मार्ग सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुणे मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Mahapalika Diwali Bonus : पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचारी आणि  अधिका-यांना दिवाळी बोनस मिळणारेय... 8.33% बोनस तसेच 23 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणारेय....कर्मचारी आणि अधिका-यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा होणारेय.....महापालिकेच्या वित्त आणि लेखा विभागाने त्याबाबतचं परिपत्रक काढलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईत पुढील वर्षी म्हाडाची 2 हजार घरं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Mhada Home Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बामती आहे. पुढील वर्षी म्हाडच्या 2 हजार घरांची लॉटरी निघणार आहे.. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी लॉटरीची घोषणा केलीय.. मार्च ते जून 2025 ला लॉटरी निघणार आहे. सिडकोच्या कोकण विभागाचीही लॉटरी निघणार आहे.. 12 हजार घरांची लॉटरी लॉटरी प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होणार आहे..आज कोकणातील म्हाडाच्या लॉटरीसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • महायुतीच्या समन्वय समितीची आज पत्रकार परिषद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahayuti Press Conference : महायुतीच्या समन्वय समितीची पत्रकार परिषद आज होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते शंभूराज देसाई, महायुतीचे समन्वय आमदार प्रसाद लाड यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय. 11 वाजता ही पत्रकार परिषद होणार असून महायुतीच्या जागावाटपाबाबत काही घोषणा होते का याकडे सर्वांचं लक्ष आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. पहिल्या यादीत हमखास निवडून येणारे आमदार असण्याची शक्यता आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • EVMशी छेडछाड झालेली नाही - निवडणूक आयोग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Election Commission On EVM : EVMशी छेडछाड झालेली नाही, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय. काँग्रेसनं EVM बॅटरीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित करत आक्षेप घेतला होता. यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय. EVMच्या बॅटरीचा निवडणूक निकालाशी काहीही संबंध नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण कार्यक्रमावर पावसाचं सावट

     

    Raigad Rain : आज माणगाव इथं होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण वचनपूर्ती सोहळ्यावर पावसाचं सावट आहे. रात्रीपासून दक्षिण रायगडमध्ये परतीचा पाऊस बरसतोय... त्यामुळे कार्यक्रमा ठिकाणी चिखल झालाय. सभा मंडप तसेच बाहेरील मोकळ्या जागेत चिखलाचं साम्राज्य पसरलंय.. पार्किंग जागेतही चिखल झालाये... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम माणगाव मोरबा रोडवर होणार आहे. यापूर्वीही 2 वेळा पावसामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे आजचा कार्यक्रम होणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलंय. 

  • माणगावात लाडकी बहीण योजनेची वचनपूर्ती

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mangaon Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा वचनपूर्ती महोत्सव आज रायगड जिल्ह्यातील माणगाव इथं होतोय. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे , खासदार सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात लाभार्थी महिलांशी संवाद साधला जाणार आहे. दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होईल. आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी हा लाडकी बहीण योजनेचा शेवटचा कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link