Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 16 Oct 2024-10:32 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 16 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • ...गद्दारांना गाडण्याची पवार वेळ आली-  अमोल कोल्हे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Kolhe : उठा उठा निवडणूक आली आता गद्दारांना गाडण्याची पवार वेळ आली असं आवाहन अमोल कोल्हेंनी शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत केलंय... त्याचसोबत मुख्यमंत्रिपदाबाबतही अमोल कोल्हेंनी सूचक विधान केलंय. वाळव्याचा माणूस वर्षावर जायची इच्छा आहे असं म्हणत अमोल कोल्हेंनी जयंत पाटील यांच्याबाबत सूचक विधान केलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • लोकसभेनंतर अमोल कीर्तिकर विधानसभेच्या मैदानात?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Kirtikar : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमोल कीर्तिकर आता विधानसभेच्या मैदानात असणार असल्याचं समजतंय. जोगेश्वरीकरांच्या मनातील आमदार अशी अमोल कीर्तिकरांचे बॅनर ठाकरे गटाच्या पदाधिका-यांकडून झळकवण्यात आलेत. अमोल कीर्तीकर मुंबईत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे पक्षाचे उमेदवार होते. त्यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला होता. शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता. त्यानंतर आता रवींद्र वायकर यांच्या विधानसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मुंबईसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला?

     

    Mumbai Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी मुंबईतील जागावाटपाचं सूत्र ठरल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालीये...ठाकरे पक्षाला मुंबईमध्ये सर्वाधिक 18 जागा मिळणार, काँग्रेसला 14, शरद पवार पक्षाला 2, समाजवादी पक्षाला 1 अशा पद्धतीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...उद्या महाविकास आघाडीची बैठक होणारे आणि त्यानंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे...

  • भारतीय न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली

     

    Indian god of justice : सुप्रीम कोर्टातील भारतीय न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली... सुप्रीम कोर्ट लायब्ररीमध्ये नवी मूर्ती... न्यायदेवता मूर्तीच्या हाती तलवारीऐवजी संविधान... 

  • नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात तुफान राडा

     

    Shyam Manav : नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमात तुफान राडा झालाय...भाजप युवा मोर्च्याचे कार्यकर्ते आक्रमक झालेत..

  • आमदार राजेंद्र शिंगणे तुतारी हाती घेणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rajendra Shingane : अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांचा बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.. या मेळाव्यात आगामी विधानसभेची निवडणूक तुतारी चिन्हावर लढवण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीये.. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलंय.. त्यामुळे राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांना सोडचिठ्ठी देत लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मविआचं मुंबईतील 90% जागावाटप- सूत्र

     

    Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचं मुंबईतील 90 टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती...महाविकास आघाडीच्या मुंबईतील तीन-चार जागांचा तिढा उद्यापर्यंत सुटणार- सूत्रांची माहिती...महाविकास आघाडीतील ठाकरे पक्ष मुंबईतील सर्वाधिक जागा लढवणार- सूत्र मुंबईमध्ये आज झालेल्या बैठकीत मुंबईतील 36 पैकी 32 जागांवर महाविकास आघाडीतील नेत्यांचं एक मत झाल्याची सूत्रांची माहित

  • भाजपची पहिली यादी आज येण्याची शक्यता

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    BJP : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता...झी 24 तासला सूत्रांची माहिती...60 ते 70 उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे...त्यात निवडून येणा-या जागांचाच समावेश असण्याची शक्यता वर्तवली जातेय...त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण आणि गिरीष महाजनांसह इतर मंत्र्यांच्या मतदारसंघांचा समावेश असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीये...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 6 पिकांच्या हमीभावात वाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Guarantee Price of Crops : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये गव्हाच्या हमीभावात दीडशे रुपये वाढवण्यात आलेत. हरभ-याच्या हमीभावात 210 रुपये, मोहरीसाठी तिनशे रुपये, जवसच्या हमीभावात 130 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर मसुरचा हमीभाव 275 आणि करडईचा हमीभाव 140 रुपयांनी वाढवण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

     

  • महायुतीला मोठा धक्का, महादेव जानकर महायुतीतून बाहेर 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahadev Jankar : महायुतीला मोठा धक्का बसलाय...महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडले आहेत...महायुतीत जानकर नाराज होते    

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • शरद पवार पक्षाची पहिली यादी शुक्रवारी?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत 50 उमेदरांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याचं समजतंय. तर उर्वरित जागांवर आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा झाल्यानंतर दुसरी यादी जाहीर केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'महायुतीत कुणालाही डोहाळे लागले नाही', मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Eknath Shinde : मुख्यमंत्री पदाच्या चेह-यावरुन उद्धव ठाकरेंनी केलेल्या आव्हानाला आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय.. आधी शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा असं आव्हान फडणवीसांनी केलंय.. तर महायुतीमध्ये कुणालाही मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'महायुतीचं रिपोर्ट नाही डिपोर्ट कार्ड',आदित्य ठाकरेंची टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aditya Thackeray On Mahayuti Deport Card : महायुतीचं रिपोर्ट नाही डिपोर्ट कार्ड...महायुतीच्या रिपोर्ट कार्डवर ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केलीये...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • टोलमाफीच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

     

    Sanjay Raut Vs Raj Thackeray : टोलमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय.. टोल माफीचा निर्णय हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.. तर निवडणुका डोळ्यासमोर घेऊन टोलमाफीचा निर्णय घेतला असेल तर तसं करु देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.. 

  • जनता पुन्हा महायुतीला साथ देणार - शिंदे

     

    Mahayuti Press Conference : अडीच वर्षात जनतेच्या प्रगतीसाठी काम केलंय त्यामुळे जनता महायुतीला पुन्हा साथ देणार असल्याचा विश्वास शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी व्यक्त केलाय.. गेल्या अडीच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून महायुतीनं जनतेसमोर ठेवलाय... महायुतीनं सुरू केलेल्या योजना मविआ बंद करणार आहे. त्यामुळे चांगल्या योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नसल्याचं शिंदे म्हणालेत.. तसेच लाडकी बहीण योजनेला टच केल्यास तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिलाय.. 

  • 'लाडक्या बहिणी'वरुन रणकंदन

     

    Ladki Bahin Yojana : केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण योजना  सुरु केली असून या या योजनेमुळे राज्य कंगाल होईल अशी टीका राज ठाकरेंनी केलीये.. दरम्यान ही योजना बंद होऊ देणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय.. तर या योजनेला टच केलात तर लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय... 

  • दिल्लीत भाजप आणि काँग्रेसची महत्त्वाची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhansabha Election : राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तिकडे दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय.. दिल्लीत एकीकडे भाजप तर दुसरीकडे काँग्रेसची बैठक आज पार पडणारेय. भाजपच्या विधानसभेच्या  उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.. मोदी, शाह आणि जेपी नड्डांच्या उपस्थितीत दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे आज काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक पार पडणार आहे.. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.. राज्यातील प्रमुख नेते दिल्लीत जाणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबई-बंगळुरु महामार्गावर कार अडवून 3 कोटींची लूट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Satara : साता-यात मुंबई-बंगळुरु महामार्गावर एका कारमधून तीन कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आलीये. ही कार मुंबई ते बंगळुरु असा प्रवास करत असताना कराड येथील ढेबेवाडी फाट्याजवळ 6 आरोपींनी कार अडवली.. कार चालकाला रिव्हॉल्वर आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार केली.. आरोपींनी या गाडीतील तीन कोटी रूपये घेऊन मुंबईच्या दिशेनं पळ काढला... ही रक्कम हवालाचे असल्याचे समोर आले आहे... या प्रकरणी कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतलंय.. गाडीत पैसे असल्याची माहिती केवळ हवाला कंपनीतील अधिका-यांनाच माहिती होतं.. त्यामुळे पोलिसांनी कंपनीच्या अधिका-यांचीही चौकशी सुरु केलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Congress First List : काँग्रेसची पहिली उमेदवार यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.. पहिल्या यादीत 35 उमेदवारांचा समावेश असेल अशी माहिती सूत्रांनी दिलीये.. दिल्लीत आज काँग्रेसच्या स्किनिंग कमिटीची बैठक होणार आहे.. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अंधेरीत लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Andheri Fire : अंधेरीतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झालाय.. रिया पॅलेस या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर ही आग लागली होती.. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.. या आगीतील तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रत्नागिरी,सिंधुदुर्गात मविआमध्ये ठाकरेंना झुकतं माप?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhansabha Election : कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना झुकतं माप मिळणारेय.  दोन्ही जिल्ह्यातील आठ पैकी सहा जागांवर उद्धव ठाकरेंचे शिलेदार लढणार असल्याची माहिती मिळतेय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याची माहिती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चार जागा उद्धव ठाकरेंकडे तर एक जागा शरद पवार यांच्याकडे जाणारेय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पैकी दोन जागा उद्धव ठाकरेंकडे तर एक जागा शरद पवार यांच्याकडे जाणारेय.  दोन्ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याची माहिती मिळतेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आमदार सतीश चव्हाणांचा महायुतीला घरचा आहेर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Satish Chavan : अजित पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय. प्रसिध्दी पत्रक काढत त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर सवाल उपस्थित केलेत.गेल्या  अडीच वर्षात महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही, सर्वच समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही अशी टीका त्यांनी सरकार वर केलीय. त्यामुळे लवकरच सतीश चव्हाण हे अजित पवार गटाला निरोप देत शरद पवारांना जवळ करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ratnagiri : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळलीये.. चिपळूण जवळील परशुराम घाटात ही घटना घडलीये. यामुळे मुंबई गोवा माहामार्गावरुन एक मार्गीका बंद करण्यात आली असून एकाच लेनवरुन वाहतूक सुरु आहे.. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाची पुन्हा पोलखोल झालीये... गेल्या दोन ते तीन वर्ष परशुराम घाट पूर्णपणे खोदून महामार्ग तयार करण्या आला होता. मात्र या घाटात दरड कोसळणं, डोंगर खचणं अशा घटना सुरुच आहेत... त्यामुळे घाटातील बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अकोटच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Mithkari : अकोटच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच होणार असल्याची माहिती आहे.. अकोला जिल्ह्यातील अकोट मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलीय.. अकोट मतदार संघात चांगलं काम केलंय.. कामाच्या जोरावर जनता आपल्याला विजयी करतील त्यामुळे पक्षानं  अकोटची जागा द्यावी अशी मागणी अमोल मिटकरींनी केलीय.. त्यांच्या या मागणीमुळे आता महायुतीत घुसफुस दिसून येत आहेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Pune Bopdev Case Update : पुण्यातील बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी दारू आणि गांजाचं सेवन केल्याची माहिती मिळतेय. तसंच  तांत्रिक तपासात अडथळे आणण्यासाठी आरोपींनी त्यांचे मोबाइल फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती तपासात मिळालीय. याप्रकरणात आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तर तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय...

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • साताऱ्यात महायुतीत रस्सीखेच

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Satara : आचारसंहिता लागू होताच साता-यातील वाई मतदारसंघात महायुतीमध्ये  रस्सीखेच सुरू झालीये...शिवसेनेच्या शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी वाई मतदारसंघातून बंडाचा झेंडा फडकवलाय...काहीही झाले तरी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात उमेदवारी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलंय...यासाठी त्यांनी गेल्या 15 दिवसांपासून जन संवाद यात्रा काढून लोकांशी संवाद साधतायत...दरम्यान तुतारी हाती घ्यावी लागली तरी घेईन असे संकेत त्यांनी दिलेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Eknath Khadse : विरोधकांना जास्त वेळ मिळू नये म्हणून एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची सरकारची शिफारस  होती अशी टीका एकनाथ खडसे यांनी सरकारवर केलीय. दरवेळी विधानसभेच्या निवडणुका या तीन टप्प्यात किंवा पाच टप्प्यात होतात मात्र आताची विधानसभा निवडणूक फक्त एक टप्प्यात पार पाडली जातेय. जर निवडणुका टप्प्याटप्प्याने पार पाडल्या तर विरोधकांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळतो त्यामुळे वातावरण हे सरकार विरोधी तयार होण्याची भीती असते. त्यामुळे या भीतीपोटी सरकारने एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची शिफारस केलेली दिसते आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मान्सूनची माघार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain Alert : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मान्सूननं माघार घेतलीये... यंदा अपेक्षित वेळेत मान्सून माघारी परतल्याची माहिती हवामान विभागानं दिलीये...पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्याच्या उत्तर भागातून परतीचा प्रवास सुरू झाला होता. दरम्यान बंगालच्या उपसागरात दक्षिण भागात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय.. त्यामुळे किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता  वर्तवण्यता आलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रुपाली चाकणकर पुन्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी

     

    Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलीये.. चाकणकर यांना पुन्हा तीन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आलाय.. महिला आणि बाल विकास विभागाकडून तसा आदेश जारी करण्यात आलाय..  

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link