Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Thu, 17 Oct 2024-10:27 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद 

     

    MVA Press conference : उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.. शिवालयात दुपारी 12 वाजता दरम्यान पत्रकार परिषद होणार असून यामध्ये जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.. तर मविआत कोण किती जागा लढणार याचा फॉर्म्यूला सुद्धा उद्याच जाहीर होण्याची शक्यता आहे.. या पत्रकार परिषदेला नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत उपस्थित राहणार आहे...

  • मविआचं शिष्टमंडळ उद्या निवडणूक आयोगात जाणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MVA Meet Election commission : महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार....सकाळी 11 वाजता हे शिष्टमंडळ भेटेल...आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारने घेतलेले निर्णय,तसंच विविध महामंडळावरी नियुक्ती याविषयी निवेदन दिले जाणार

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • उद्धव ठाकरे आमदारांना AB फॉर्म देणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray : मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही.. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे आपल्या पक्षातल्या आमदारांना AB फॉर्म वाटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदारांना एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून दिला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 15 विद्यमान आमदार आहेत त्यातील बहुतांश आमदारांचे या विधानसभा निवडणुकीचे तिकीट निश्चित मानले जातंय..विद्यमान आमदारांना उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणारेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • जे.पी. नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर

     

    J. P. Nadda : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांसोबत आणि ट्रस्टींसोबत नड्डा संवाद साधणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री आणि प्रभारी भूपेंद्र यादव हे देखील उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी 3.45 वाजता विलेपार्लेच्या पाटीदार हॉलमध्ये हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • मविआचा 260 जागांचा तिढा सुटला-सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahavikas Aghadi Seat Sharing : 260 जागांवर महाविकास आघाडीतील तिढा सुटला-सुत्रांची माहिती...20 ते 25 जागांवर तिढा कायम, या जागांवर तिन्ही पक्षांचा दावा- सूत्र

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न',आदित्य ठाकरेंचा महायुतीवर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aditya Thakare vs Ashish shelar : अदानीच्या घशात मुंबई घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी बुधवारी केला होता...त्याला आशीष शेलारांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय...त्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • नाशिक जिल्हा रुग्णालयातील 8 जण निलंबित, कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik District Hospital Updated : नाशिक जिल्हा रुग्णालयातील बाळाच्या आदलाबदली प्रकरणानं वेगळंच वळण घेतलंय.. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बाळांची आदलाबदल झालीच नसल्याचा अहवाल दिलाय..रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाळाचा रिपोर्ट तयार करताना फीमेल ऐवजी मेल असं लिहून पुढे रिपोर्ट तयार केला आणि त्यामुळे सगळा गोंधळ झाल्याची माहिती समितीनं दिलीये. अहवालात सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या तपासणीचाही उल्लेख करण्यात आलाय.. दरम्यान या प्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत रुग्णालयातील 8 कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.. यात 4 मुख्य डॉक्टर 3 शिकाऊ डॉक्टर आणि एका परिचारिकेचा समावेश आहे.. तसंच यात आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • उद्या भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार?

     

    BJP : भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता...पहिल्या यादीत नाव अपेक्षित असलेल्या उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून सूचना-सूत्र...यादी जाहीर होण्याआधीच उमेदवारांना निवडणुकीसाठी कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना-सूत्र...भाजपच्या पहिल्या यादीत १०० पेक्षा अधिक जणांचा समावेश असण्याची शक्यता-सूत्र

  • रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Railway Reservation Rule Changed : रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेत.. रेल्वे तिकीट बुकींगचा कालावधी कमी करण्यात आलाय.. पूर्वी प्रवाशांना चार महिने आधी रेल्वेचं तिकीट बुक करता याययचं मात्र आता हा कालावधी घटवून केवळ 2 महिन्यांचा करण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांना केवळ 2 महिने आधीच रेल्वेचं तिकीट बुक करता येणार आहे.. 1 नोव्हेंबरपासून हा नवा नियम लागू होणार आहे. दरम्यान ज्यांनी आतापर्यंत बुकिंग केलंय त्यांचं आरक्षण मात्र कायम राहणार आहे... शिवाय प्रवासी 31 ऑक्टोबरपर्यंत प्रवासी 120 दिवसांच्या आत आरक्षण करु शकतील.. त्यानंतर मात्र नवा नियम लागू होईल... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • इम्तियाज जलील पोटनिवडणूक लढवणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील नांदेड मधून लोकसभा पोट निवडणूक लढण्याचा तयारीत...अंतिम निर्णय असद ओवेसी घेणार...कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आमची तयारी सुरू आहे, इम्तियाज जलील यांची माहिती

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • IPS अधिकारी भाग्यश्री नवटाकेंवर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    IPS officer ​Bhagyashree Navtake : सीबीआयने आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्यावर गुन्हा दाखल केला...त्या पुण्यात DCP, EOW पदावर कार्यरत होत्या....जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) राज्य सहकारी पतसंस्थेच्या 1,200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे...2020-21 दरम्यान हा घोटाळा झाला होता...महाराष्ट्र राज्य सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची शिफारस केली...सीबीआयने आता याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • आम्ही आमच्या आमदारकी गुवाहटी जाऊन पणाला लावल्या- शहाजी बापू 

     

    Shahaji Bapu Patil on BJP : आम्ही धाडसं केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्वं होतं? अशा शब्दांत सांगोला शिवसेनेचे आमदार शहाजी बापू यांनी भाजपला सुनावलंय...आम्ही आमची आमदारकी पणाला लावल्याचंही ते यावेळी म्हणालेत...

  • नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाणांना उमेदवारी

     

    Ravindra Chavan : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक, काँग्रेसचा उमेदवार जाहीर....काँग्रेसकडून रवींद्र चव्हाणांना उमेदवारी जाहीर....नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर

  • नागपुरात राहुल गांधींविरोधात बॅनरबाजी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Rahul Gandhi : नागपुरात राहुल गांधींवर टीका करणारे होर्डिंग लावण्यात आले आहे... अमेरिकेत राहुल गांधींनी केलेल्या आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्यावरून  हे होर्डिंग लावले आहेत... राहुल गांधींनी आमचं आरक्षण संपवण्याची भाषा केली,  आणि आम्ही तुम्हाला हरियाणामध्ये जागा दाखवली, अश्या आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिण्यात आलाय...महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना, राहुल गांधींच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पवारांची घोषणा, ठाकरे सावध

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : शरद पवारांनी जयंत पाटलांना मोठी जबाबदारी देणार अशी घोषणा वाळव्याच्या सभेत केली. या घोषणेवरुन शिवसेना ठाकरे गट नाराज झालाय. एका पक्षात दोन-दोन मुख्यमंत्री कसे असू शकतात असा सवाल संजय राऊतांनी केलाय. शरद पवारांनी रोहित पवारांवरही मोठी जबाबदारी देण्याची घोषणा केली होती त्याचा अर्थ काय असा सवालही त्यांनी केलाय. शरद पवार मुख्यमंत्रिपदाबाबत असे कोणतेही संकेत देत नाही. मग त्यांच्या मोठ्या जबाबदारीबाबतच्या वक्तव्याचा अर्थ काय असावा असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • गोंदियात भाजपचं टेन्शन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gondiya Rajkumar Badole : माजी मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले यांनी हातावर घड्याळ बांधण्याच्या चर्चा फेटाळून लावल्यात..कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळेल असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केलाय..पक्ष नेतृत्वावर विश्वास असल्याचंही बडोले म्हणालेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ब्राह्मण समाज 30 जागांसाठी आग्रही

     

    Pune Brahman Samaj : राज्यातील 288 पैकी 30 जागांवर ब्राह्मण समाजाचा उमेदवारा द्यावा अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाने केलीये. पुण्यातील कसबा मतदारसंघही ब्राह्मण समाजालाच द्यावा आणि त्या जागेवर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंना उमेदवारी द्यावी अशी मागणीही ब्राह्मण समाजाने केलीये.

  • बिहारमध्ये विषारी दारुमुळे 20 जणांचा बळी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bihar Liquor Death : बिहारमध्ये विषारी दारुमुळे 20जणांचा बळी गेलाय.. सिवानमध्ये ही धक्कादायक घटना घडलीये.. हा अवैध दारूचा ठेका होता..दारू प्यायल्यानंतर मजुरांची प्रकृती बीघडली...अनेकांना रुग्णालयात दाखल केलंय....दरम्यान 20 मजुरांचा दारूने बळी घेतलाय.. या प्रकरणाच्या चौकशीसाठी SITस्थापन करण्यात आलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात-सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sameer Wankhede : IRSअधिकारी समीर वानखेडे राजकारणात उतरणार आहेत... समीर वानखेडे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे... समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. मात्र राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागेल. त्यानंतरच राजकारणातील त्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीचे अनेक कारनामे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Bopdev Ghat Case Update : पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अख्तर शेख याचे धक्कादायक कारनामे पोलीस चौकशीत उघडकीस आलेत.. अख्तर शेखनं आतापर्यंत 3 महिलांशी लग्न केल्याची माहिती उघडकीस आलीये.. यातील दोन महिला नागपुरातील तर एक उत्तर प्रदेशातील आहे.. याशीवाय आणखी एका तरुणीशीही त्याचे संबंध होते.. बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार करण्यापूर्वी या आरोपीनं गांजाचं सेवन केल्याची प्राथमिक माहितीही समोर आलीये.. त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल होते.. दरम्यान त्याला कोर्टात हजर केलं असता 22 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.

    बातमी पाहा - 3 लग्न, 1 अफेयर; बोपदेव घाट अत्याचारातील मुख्य सुत्रधाराचे प्रताप ऐकून येईल चीड

  • इच्छुकांना महामंडळ महायुतीचं डॅमेज कंट्रोल?

     

    Mahamandal : विधानसभा निवडणुकीत ज्या इच्छुकांना उमेदवारी देता येणार नाही त्यांची महामडंळांवर वर्णी महायुतीनं लावल्याचं पाहायला मिळतंय. इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा महामंडळ पॅटर्न पाहायला मिळाला. यावेळी महायुतीत इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सगळ्यांनाच उमेदवारी देणं शक्य नसल्यानं ज्यांना उमेदवारी मिळणार नाही. त्यांना महामंडळं देण्यात आलीयेत.

  • चाकणमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Suicide : पुण्यातील चाकणमध्ये एका 27 वर्षाच्या तरुणाने प्रेम प्रकरणामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय... लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेऊन या तरुणाने आत्महत्या केली.  तरुणाचा मृतदेह तब्बल 370 फूट खोल दरीत आढळला... तरुणाने  आत्महत्या करण्यापूर्वी 2 सेकंदाचा व्हिडिओ बनवून  घरी पाठवला...  या  व्हिडिओच्या आधारे  लोणावळा शिवदुर्गच्या पथकाने मृतदेह शोधून काढला....  तरुणाच्या  प्रेयसीचं दुस-या  तरुणाशी प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या संशयामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलंय..

    बातमी पाहा - प्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण, तरुणाने नैराश्यातून राजमाची दरीत उडी घेतली, 'त्या' व्हिडिओमुळं उकललं गूढ

  • सरकारकडून आचारसंहिता भंग?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State Government Decision : आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारनं काही तातडीनं निर्णय घेतले..मात्र सरकारचे निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं आचारसंहिता लागल्यानंतर काही निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय..त्यामुळे सरकारनं आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यता आलाय.. सरकारकडून काही निर्णय आधी घेण्यात आले आणि त्यावर पुढील तारीख टाकल्याचा आऱोपही करण्यात आलाय.. यावर आता निवडणूक आयोगानं सरकारचे निर्णय़ तपासू आणि त्यानंतर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय.. त्यामुळे सरकारनं घेतलेले काही निर्णय आचारसंहितेच्या कटाच्यात सापडण्याची शक्यता आहे..  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • BDD चाळ रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Worli BDD Chawl : मुंबईतल्या वरळी इथल्या बीडीडी चाळ रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. बी.डी.डी. चाळ क्रमांक १ ते ७  मधल्या रहिवाश्यांनी महाराष्ट्र शासन आणि म्हाडाच्या घरकुल वितरणावर नाराजी व्यक्त करत  निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.  रहिवाश्यानी ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार असे बॅनर लावलेत इतकंच नाही तर कोणत्याही राजकीय पक्षाला मतं मागण्यासाठी इमारतीत येऊ नये, असा कडक इशारा दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संगमनेरमधून सुजय विखेंना उमेदवारी नाही?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sujay Vikhe : अहिल्यानगरच्या संगमनेर मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे पाटील यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी दाखवली होती.. मात्र एकाच घरत दोघांना उमेदवारी नको असं सांगत भाजपनं त्यांना तिकीट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. महायुतीमध्ये संगमनेरची जागा ही शिवसेनेकडे आहे.. त्यामुळे या जागेवर कोणता उमेदवार असणार याबाबत चर्चा रंगलीये.. दरम्यान सुजय विखे पाटलांना उमेदवारी नाकारल्यानं बाळासाहेब थोरात आणि सुयज विखेमधील बिग फाईट टळण्याची शक्यता आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • लातूरमध्ये पॅरोलवरील गुन्हेगाराकडून पत्नीची हत्या

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur Murder : लातूरमध्ये पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराने घरी येताच आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केलीये...उदगीर शहरातील अमित नाटकरे हा आरोपी 2 खूनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता..यातील एका खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.... पॅरोलवर सुट्टी घेवून तो उदगीरला आला होता....2 केसमध्ये कोर्टात अपील करण्यासाठी पैसे नसल्याने त्याने  पत्नीला माहेरहून पैसे घेवून ये म्हणत तीला मारहाण केली...या वादातून आरोपीने पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यात तीचा जागीच मृत्यू झाला.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 10वी आणि 12वीचं वेळापत्रक अद्याप जाहीर नाही

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    SSC & HSC Exam Time Table : मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाहीए. असं स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने केलंय. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांची समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेली वेळापत्रकं ग्राह्य धरू नयेत असं आवाहनही करण्यात आलंय. राज्य मंडळाचे बोधचिन्ह, नावाचा वापर करून परीक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ठाणे, रायगड, रत्नागिरीला यलो अलर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    IMD Rain Alert : एकीकडे तापमान वाढलेलं असताना दुसरीकडे ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रविवारपर्यंत तसंच पालघर जिल्ह्यात आज आणि शनिवारी, रविवारी यलो अलर्ट देण्यात आलाय... अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर इथे रविवारपर्यंत, सांगली, कोल्हापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, संभाजीनगर इथे शनिवारपर्यंत यलो अलर्ट जाहीर केलाय.. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळमध्ये शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आलाय.. मेघगर्जनेसह विजा तसेच पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी 3 पिस्तुलांचा वापर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Baba Siddique Murder Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिलीये. आरोपींनी एक ऑस्ट्रेलियन बनावटीची ग्लॉक पिस्तूलही वापरली होती.. तसंच तुर्की पिस्तुल आणि एक देशी बनावटीची पिस्तुलाचाही वापर केला होता.. पोलिसांनी ही तीनही शस्त्रे जप्त केली आहेत..12 ऑक्टोबर रोजी निर्मल नगर येथील जीशान सिद्दीकी कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुणे शहरात आज पाणीपुरवठा बंद

     

    Pune Water : पुणे शहर आणि उपनगरात आज पाणीपुरवठा बंद असणार आहे.. जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. शिवाय शुक्रवारीही उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

  • मुंबईत मविआची जागावाटपावर बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vidhansabha Election 2024 : मविआमध्ये अद्याप काही जागांचा तिढा कायम असल्याचं समजतंय त्यामुळे आजही महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम चर्चा होणार असल्याचंही समजतंय दरम्यान,  मुंबईतील जागावाटपाचं सूत्रही ठरल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालीये...ठाकरे पक्षाला मुंबईमध्ये सर्वाधिक 18 जागा मिळणार, काँग्रेसला 14, शरद पवार पक्षाला 2, समाजवादी पक्षाला 1 अशा पद्धतीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मात्र आजच्या अंतिम बैठकीत काय निर्णय होतोय. जागावाटप जाही करणार का याकडे आता लक्ष लागलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

    आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत दिग्गज नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता. पुढील काही तासात भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. हरियाणाचे मुख्यमंत्र्यांचा चंदीगडमध्ये शपथविधी पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्यानंत अमित शाहांसोबत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत अमित शाहांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link