Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
मनसेची तिसरी यादी जाहीर
MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर करण्यात आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
शिवसेना UBTचे उमेदवार जाहीर
Shiv Sena UBT Vidhan Sabha Election : शिवसेना UBTचे उमेदवार जाहीर ...शिवसेना UBTची 65 उमेदवारांची यादी जाहीर
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मविआतील जागांचा तिढा सुटला - विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा सुटला असून, केवळ 5 जागांबाबतचा प्रश्न बाकी आहे. त्याबाबतचा निर्णय हाय कमांडवर सोडला असल्याची माहिती, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्याबाबत माहिती देताना, मविआची जागावाटपासाठीची चर्चा आज संपणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसंच आजच पत्रकार परिषदेत जागांची विभागणी आणि जागावाटप मविआकडून जाहीर केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा
Chhota Rajan : गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे....हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे....याशिवाय याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे...या शिक्षेला छोटा राजननं दिलेलं आव्हान निकाली लागत नाही, तोपर्यंत स्थगिती कायम राहील, असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय.
2019पासून राजकारणाचा चिखल झालाय- अमित ठाकरे
Amit Thackeray : 2019 पासून राजकारणात चिखल झालाय. असं राजकारण मला लोकांपर्यंत नाही न्यायचं, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिलीय. मनसेकडून अमित ठाकरेंना माहिममधून उमेदवारी घोषित करण्यात आलीये. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं. दरम्यान वरळीतील समुद्र किनाराही साफ करून देईल, असा मिश्किल टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय.
बाळ मानेंचा शिवसेना (UBT)मध्ये प्रवेश
Bala Mane Join Uddhav Thackeray Party : बाळ माने यांचा शिवसेना (UBT)मध्ये प्रवेश केलाय...उदय सामंत यांच्या विरोधात उबाटाचा उमेदवार ठरला...भाजपमधून बाळ माने यांचा शिवसेनेत प्रवेश... उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बाळ माने यांचा प्रवेश
दादर माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात महेश सावंत लढणार
Mahim Assembly Election 2024 : अमित ठाकरें विरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार...दादर माहिममधून शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांची उमेदवारी निश्चित....शिवसेना पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केल्याची माहिती
मनसेच्या यादीत आयाराम, गयारामांना संधी नाही - अविनाश जाधव
Avinash Jadhav : 'मनसेची दुसरी यादी आज, उद्या जाहीर होणार', अशी माहिती मनसेचे अविनाश जाधव यांनी दिलीये. तर आमच्या यादीत आयाराम गयारामला स्थान नाही, असं विधानही केलंय. मनसेकडून अविनाश जाधवांना उमेदवारी दिल्यानं त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानलेत. यासाठी ते शिवतीर्थावर आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Maharashtra Election 2024 : राष्ट्रवादीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय.. पहिल्या यादीत 38 उमेदवारांचा समावेश करण्यात आलाय.. बारामतीमधून अजित पवारांच्या नावाची घोषणा कऱण्यात आली तर येवल्यातून पुन्हा छगन भुजबळांना उमेदवार देण्यात आलीय.. आंबेगावातून दिलीप वळसे यांना उमेदवारी देण्यात आलीय.. तर दिंडोरीमधून नरहरी झिरवाळ आणि पऱळीतून धनंजय मुंडेंच्या नावाची घोषणा करण्यात आलीय..
निवडणुकांनंतर संजय राऊत पुस्तक प्रकाशित करणार
Sanjay Raut Book : निवडणुका झाल्यावर संजय राऊत पुस्तक प्रकाशित करणार आहेत.. या पुस्तकाचं 90 टक्के काम झाल्याची माहिती राऊतांनी यावेळी दिलीये.. नरकातला स्वर्ग असं या पुस्तकाचं नाव असेल असं राऊतांनी सांगितलंय.. त्यांच्या या पुस्तकावर शिवसेना नेते संजय शिरसाटांनी चांगलंच तोंडसूख घेतलंय..
जागावाटप, विजयातही सेंच्युरी मारु - संजय राऊत
Sanjay Raut : केवळ जागावाटपातच नाही तर विजयातही शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागणार असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय. शिवसेना या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे असा दावा त्यांनी केलाय. दरम्यान महाविकास आघाडीत नेतृत्त्व कोण करणार याची माहिती 23 तारखेला देणार असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलं..
महायुतीत 18 जागांवर तिढा कायम-सूत्र
Maharashtra Election 2024 : महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर झाली असं असलं तरी तिन्ही पक्षात 18 जागांवरून तिढा कायम असल्याची माहिती आहे.. मुंबईतील काही जागांवर अजूनही तिन्ही पक्षात तिढा कायम आहे.. काही जागांवर उमेदवार जाहीर केल्यास बंड होण्याची भीती महायुतीतील तिन्ही पक्षांना आहे.. त्यामुळे बंड होऊ नये यासाठी तिन्ही पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय.. तर काही जागांवर मविआचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे.. भाजपनं ९९, शिवसेनेनं ४५ तर अजित पवारांनी काही उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत...
खडकवासलामधून मराठा उमेदवार देण्याची तयारी
Maharashtra Election 2024 : मराठा क्रांती मोर्चानं पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी सुरु केलीये. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा यांनी ठराव करून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव केलाय. दीपक मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आहेत. मात्र त्यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी न मिळाल्यानं ते नाराज आहेत. त्यामुळे आता ते मराठा उमेदवार म्हणून निवडणूक लढणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.
कोपरगावात महायुतीत नाराजी
Maharashtra Election 2024 : कोपरगाव मतदारसंघात महायुतीमध्ये नाराजी निर्माण झालीये.. राष्ट्रवादीकडून कोपरगावात आशुतोष काळेंना उमेदवारी देण्यात आलीये. मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप करत शिवसैनीकांनी आशुतोष काळे यांच्या विरोधात बंडाची भूमिका जाहीर केलीये.. त्यामुळे ही बंडखोरी मिटवण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर आहे..
नाशिकमध्ये मनसेला उमेदवार मिळेना?
Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मनसेची यादी जाहीर झालीये. या यादीत 45 जणांपैकी बालेकिल्ला नाशिक शहरातील एकही उमेदवार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जातेय .इतकच नाही तर नाशिक जिल्ह्यातही उमेदवार दिलेला नाही... त्यामुळे नाशिकमधून मनसेची हवा गेली की काय अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी नाशिक शहरात तीन आमदार तसंच नाशिक महापालिका पूर्णपणे मनसेच्या ताब्यात होती... जिल्हा परिषद ग्रामपंचायतींवरही अनेक ठिकाणी मनसेचा झेंडा होता मात्र आता पहिल्या यादीत नाशिकचा एकही उमेदवार नसल्यान मनसेला नाशिकमद्ये उमेदवार मिळतनाही की काय अशी चर्चा जोर धरु लागलीये.
शेतकरी कामगार पक्षाकडून 6 उमेदवारांची घोषणा
Maharashtra Election 2024 : अलिबागमध्ये शक्ती प्रदर्शन करत शेकापच्या 6 उमेदवारांची घोषणा जयंत पाटलांनी केलीय... यामध्ये शेकापने नवीन तरुण चेह-यांना संधी दिलीय... अलिबाग मधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रे , तर उरण मतदार संघातून प्रीतम म्हात्रे हे नवीन चेहरे रिंगणात उतरवले आहेत.... तर पनवेलमधून माजी आमदार बाळाराम पाटील, सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख हे उमेदवार असतील... लोहा कंधार मधून विद्यमान आमदार श्याम सुंदर शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय.. तसेच आणखी 2-3 जागा आम्हाला हव्या आहेत... मात्र युतीच्या विरोधातील वातावरणाला गालबोट लागेल असं कृत्य आमच्याकडून होणार नाही, असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय...व
निलेश राणे आज शिवसेनेत प्रवेश करणार
Nilesh Rane : निलेश राणे आज शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, दादा भुसे आणि अन्य नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत... कुडाळ हायस्कूल पटांगणात भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्ता मेळाव्याला जवळपास १५ हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज शिवसेनेच्या पदाधिका-यांनी व्यक्त केलाय.
अजित रानडेंची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मागे
Pune Ajit Ranade : डॉ. अजित रानडेंची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती, गोखले इन्स्टिट्यूटनं न्यायालयात दिलीय.. रानडे यांची गोखले राज्यसात्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.. त्याविरोधात डॉ. अजित रानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करून न्याय देण्याची मागणी केलीय.. त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश विद्यापीठाच्या कुलपतींनी मागे घेतल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आलीय. त्यामुळे अजित रानडेंनी मुंबई हायकोर्टातील याचिका मागे घेतलीय..
शिवसेनेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Maharashtra Election 2024 : शिवसेनेची विधानसभा उमेदवारींची पहिला यादी जाहीर झालीय.. पहिल्या यादीत 45 नेत्यांना संधी देण्यात आली... सोबत गेलेल्या सर्वच आमदारांना पुन्हा संधी देण्यात आलीय.. राज ठाकरे यांच्या मुलाविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला आहे.. सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे असा माहीम मतदारसंघातून सामना होणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -