Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Thu, 31 Oct 2024-5:23 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 31 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  •  तब्बल 100 तासांनंतर श्रीनिवास वनगा राहत्या घरी परतले

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shrinivas Vanaga Returns : पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा तब्बल 100 तासांनंतर राहत्या घरी परतलेत...शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यामुळे वनगा नॉट रिचेबल होते...तिकीट न मिळाल्यामुळे नातेवाईकांकडे गेल्याचं वनगांनी स्वत: सांगितलं...नॉट रिचेबल होण्यापूर्वी वनगांनी झी 24 तास सोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत नाराजी व्यक्त केली होती...मात्र आता घरी परतल्यानंतर शिवसेना नेते शंभुराज देसाईंनी फोनवरून संपर्क साधत वनगांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला...देसाईंच्या फोननंतर समाधानी असल्याचं वनगांनी सांगितलं.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • भाजप 110 ते 115 जागांवर विजयी होईल- मोहित कंबोज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mohit Kambhoj :  भाजप 150 पैकी 110 ते 115 जागा जिंकणार-मोहित कंबोज...भाजप नेते मोहित कंबोज यांचा ट्विट करून दावा...भाजप ११०-११५ जागा निश्चित जिंकेल...भाजप प्रदेश कार्यालयात २३ नोव्हेंबरला पुन्हा दिवाळी साजरी होणार... भाजप नेते मोहित कंबोज यांना विजयाचा विश्वास

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

     

  • पाडव्याच्या मुहूर्तावर पवार कुटुंबीयांनी एकत्र यावं- छगन भुजबळ

     

    Chhagan Bhujbal : राज्यामध्ये दिवाळी साजरी होत असताना, राजकीय फटाकेही मोठ्या प्रमाणात फुटतायेत...या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एक इच्छा व्यक्त केलीये...पाडव्याच्या मुहूर्तावर पवार कुटुंबीयांनी एकत्र यावं, वाढलेली कटूता कमी व्हावी असं ते म्हणालेत...

  • नागपूरमध्ये वेणा नदीकाठी फेकले 800 आधार कार्ड

     

    Nagpur Aadhar Card : नागपूरातील हिंगणा तालुक्यातील वेणा नदीकाठी 800 आधार कार्ड फेकलेले आढळून आलेत. हे आधार कार्ड पोलिसांनी जप्त केलेत. दोन दिवसांपूर्वी स्थानिक लोकांना नदी पात्रात अनेक आधार कार्ड दिसून आले. याबाबतची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर प्राथमिक तपासानुसार हे आधार कार्ड वानाडोंगरी पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या वर्षभरापासून पडलेले असून कर्मचा-यांनी ते आधार कार्ड नदीत फेकून दिल्याचं समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरूये.

  • 'शत्रूंसोबत हातमिळवणी म्हणजे शहिदांचा अपमान', संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    Sanjay Raut on Raj Thackeray : खासदार संजय राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.महाराष्ट्रावर चाल करून येणारे शत्रू महाराष्ट्राचे तारणहार वाटू लागलेत. शत्रूंसोबत हातमिळवणी म्हणजे महाराष्ट्रासाठी हुतात्म्य पत्कारणा-यांचा हा अपमान, अशा शब्दांत राऊत राज यांच्या निशाणा साधलाय. तर अमित ठाकरे हे आमच्या परिवारातले. प्रत्येक वडील आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असतो, असंही राऊत म्हणाले.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • काँग्रेस नेते रवी राजांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

     

    Ravi Raja : काँग्रेस नेते रवी राजांचा भाजपमध्ये प्रवेश...देवेंद्र फडणवीसाच्या उपस्थितीत पक्षप्रवेश...सायन विधानसभा मतदारसंघातून होते इच्छुक... काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नसल्याने रवी राजा नाराज होते.... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे पाठवला राजीनामा

  • आज, उद्या उमेदवारांवर मार्ग काढणार- शरद पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar  : महाविकास आघाडीतील इच्छुक ऊमेदवारांनी 10 ते 12 मतदारसंघात दोन अर्ज दाखल केलेत. अशा उमेदवारांबाबत आज किंवा उद्या मार्ग काढणार, अशी माहिती शरद पवारांनी दिलीय. मैत्रीपूर्ण लढतीबाबत माहिती नसल्याचं पवारांनी म्हटलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • ठाणे महापालिकेच्या आशा सेविकांची दिवाळी गोड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Asha Sevaika : ठाणे महापालिका कर्मचा-यांसह आशा सेविकांनाही दिवाळी भेट देण्यात आलीये..आशा सेविकांना 6 हजार रुपयांची दिवाळी भेट दिवाळीपूर्वीच सेवीकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलीय....ठाणे महापालिकेचे 2 ते 4 या संवर्गातील 6 हजार 300 कर्मचारी तसेत इतर सर्व कर्मचा-यांना मिळून २२ कोटी रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात आलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • रवी राजांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

     

    Ravi Raja : काँग्रेस नेते रवी राजांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा...रवी राजा आजच भाजपमध्ये प्रवेश करणार...सायन विधानसभा मतदारसंघातून होते इच्छुक...उमेदवारी न मिळाल्याने होते नाराज...काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे पाठवला राजीनामा...पक्षाने गणेश यादव यांना उमेदवारी दिल्यानंतर रवी राजा यांचा राजीनामा

  • अमरावतीत मुलीवर सामूहिक बलात्कार

     

    Gang rape in Amravati : सामूहिक बलात्कारानं अमरावती हादरलंय. आईसोबत झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून घराबाहेर पडलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आलाय. पाच आरोपींनी नांदगाव पेठ परिसरात मुलीला दारू पाजून अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आलीय. गाडगे नगर पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केलीय. त्यांच्याकडून 2 दुचाकी आणि कार जप्त करण्यात आलीय.

  • मनोज जरांगेंची दलित, मुस्लीम धर्मगुरूंसोबत आज बैठक

     

    Manoj Jarange :  मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीत दलित आणि मुस्लीम समाजाच्या धर्मगुरूंची बैठक घेणार आहेत.या बैठकीत निवडणुकीसाठी मराठा,मुस्लीम आणि दलितांचं समीकरण जुळतं की नाही याबाबत चाचपणी केली जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता बैठकीला सुरूवात होणार आहे.. अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे.
     

  • संभाजीनगरात भेसळयुक्त खवा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा

     

    Sambhajinagar : संभाजीनगरच्या पडेगाव परिसरामध्ये भेसळयुक्त खवा तयार करणारा प्रकार उघडकीस आलाय... या कारखान्यामध्ये पामतेल, वनस्पती तूप, खाण्याचा सोडा, मिल्क क्रीम वापरून भेसळयुक्त खवा तयार करत होते... मिल्क अँड डेअरी प्रॉडक्टच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला.. यावेळी पोलिसांनी 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त केलाय... तर याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलंय...

  • शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे- रामदास कदम

     

    Ramdas Kadam : रामदास कदम यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलंय.. एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचं कदम म्हणालेत.. लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री शिंदेंनी मदत करून त्यांना आर्थिक सक्षम केलंय.. त्यामुळे लाडक्या बहिणींनी शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन रामदास कदम यांनी केलंय.. 

  • पुण्यात आतापर्यंत 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

     

    So far 14 crore worth of valuables have been seized in Pune : आचारसंहिता लागू झाल्यापासून पुण्यात आतापर्यंत सुमारे 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.. भरारी पथकांनी कारवाई करत रक्कम जप्त केलीय.... पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 998 तक्रारी प्रशासनाला मिळाल्यात. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, सोने, चांदी यासह अमली पदार्थांचा समावेश आहे.

  • तयार फराळाच्या किमतीत 20% वाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Faral : तयार फराळाच्या मागणीत ७० टक्क्यांनी वाढ झालीय....सुट्टी नसल्यामुळे बहुतांश महिलांनी घरी फराळ करण्याऐवजी तयार फराळ घेण्यास पसंती दर्शवली आहे. यामुळे यंदा महिला बचत गट आणि गृहउद्योगांकडे फराळाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याच वेळी महागाईमुळे फराळांचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link