Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Fri, 06 Sep 2024-7:53 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 06 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • महायुतीत कन्फ्युजन नाही - देवेंद्र फडणवीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Devendra Fadanvis : महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याबाबत कोणतंही कन्फ्युजन नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच चेह-यात महायुती निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचंही फडणवीस म्हणालेत.. भाजपचा पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षांचे नेते बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अर्थ खातं हे सर्वात नालायक खातं - गुलाबराव पाटील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalgaon Gulabrao Patil : महायुतीतील वाद वाढण्याची शक्यता आहे...जळगावमधील कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरलीये...अर्थ खातं सर्वात नालायक खातं असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत...पाणी पुरवठी खात्याची फाईल मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे तब्बल दहा वेळा पाठवली आणि परत आली...मात्र, पाठपुरावा सोडला नाही...त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात येणा-या काळात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

     

    Vinesh Phogat & Bajrang Punia Joins Congress : विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. हरियाणा निवडणुकीच्या अगोदर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती.  विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आजचा दिवस काँग्रेससाठी मोठा असल्याचे केसी वेणुगोपाल यांनी म्हटलंय...

  • संवेदनशील असतात ते माफी मागतात - फडणवीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Devendra Fadanvis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलेल्या माफीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले होते...त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय...जे संवेदनशील असतात ते माफी मागतात जे मुजोर असतात त्यांच्या ते कधी लक्षात येऊ शकत नाही...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मद्यधुंद रिक्षाचालकाची वाहतूक पोलिसाला मारहाण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये एका वाहतूक पोलिसाला मद्यपी अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाने आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केलीये..रिक्षा चालकाने एका तरुणीला रिक्षाची धडक दिली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस मोहन पाटील यांनी त्याला पकडले. मात्र तो रिक्षा सोडून पळून गेला. काही वेळाने पुन्हा तो रिक्षा चालक आपली रिक्षा घेण्यासाठी आला. यावेळी वाहतूक पोलीस आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली. यानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही सगळी दृश्य मोबाईल मध्ये चित्रित करण्यात आलीये. दरम्यान यातील मारहाण करणाऱ्या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुये.

     

  • कॅबिनेटमधील कृती बहीण-भावाच्या नात्याचा अपमान - सुप्रिया सुळे

     

    Supriya Sule : कॅबिनेटमध्ये झालेली कृती ही बहीण-भावाच्या नात्याचा अपमान असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीये...मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून अजित पवार गटाविरोधात शिंदे गटानं कॅबिनेट बैठकीत आक्षेप नोंदवला...त्याबाबत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी टीका केलीये...

  • माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरुन कॅबिनेटमध्ये जुंपली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shambhuraj Desai : कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली होती..त्याला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिलाय...काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये शिंदे गटानं अजित पवार गटाच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर आक्षेप घेतल्याचं समोर आलं होतं...मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री हा शब्द वगळल्याने शिंदे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती...त्याला आज शंभूराज देसाई यांनी अप्रत्यक्षरित्या दुजोराच दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 'राज्यातील कंपन्या गुजरातला गेल्या', विजय वडेट्टीवारांचा आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar​ vs Devendra Fadnavis : जे राज्य मागं आहे त्याला पुढं आहे म्हणणं हा महाराष्ट्रद्रोह नाही का? असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी विजय वडेट्टीवारांना दिलंय. राज्यातल्या कंपन्या गुजरातला गेल्या. सर्व गुजरातकडं गहाण ठेऊन खूर्ची वाचवण्याचं काम राज्य सरकार करतंय, असा आरोप वडेट्टीवारांनी केला. याला फडणवीसांनी उत्तर दिलंय. वडेट्टीवारांना गुजरातचं गुणगाण गाण्यात रस आहे. त्यांनी महाराष्ट्र पुढं गेलाय हे मान्य करायला हवं, अशा टोलाही फडणवीसांनी लगावलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'जयदीप आपटेला राऊतांनी लपवून ठेवलं होतं', देवेंद्र फडणवीसांचा आरोप

     

    Devendra Fadnavis on Sanjay Raut : जयदीप आपटेला राऊतांनी लपवून ठेवलं होतं, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर केलाय. जयदीप आपटेला अटक करण्याच्या अगोदर 8 दिवसांपासून त्याच्या सुटकेची तयारी सुरू आहे. यासंदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायेत, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला होता. याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊतांना काहीही बोलण्याची सवय असल्याचं फडणवीस म्हणाले.

  • विधानसभेसाठी​ भाजपच्या प्रचाराची धुरा चौघांवर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    BJP Star Campaigners : विधानसभेसाठी भाजपच्या प्रचाराची धूरा चौघांवर-बावनकुळे...फडणवीस, गडकरी, बावनकुळे आणि दानवे सांभाळणार प्रचार...केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा प्रचारात विशेष समावेश...फडणवीसांसह गडकरी राज्यात पूर्णवेळ एक महिना प्रचार करणार...दानवेंसह संयोजन समितीमधील 21 नेते निवडणुकीच्या रिंगणात

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'अजितदादांना मोदी दयेवर जगावं लागेल', विजय वडेट्टीवारांची टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar on Ajit Pawar : विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. अजित पवारांना मोदी-शाहांच्या दयेवर जगावं लागेल, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केलाय. भाजपवाले जे देतील ते त्यांना घ्याव लागेल. कारणर भाजपनं अजित पवारांना गृहीत धरलंय, असा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय. तर कोण किती जागा लढायंच यावर अजून चर्चा झाली नाही. केवळ जिंकण्यासाठी लढायचंय, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'विधानसभेच्या 60 जागांवर लढण्याची तयारी', अजित पवारांची भूमिका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar On Seat Sharing : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागावाटपाबाबत रोखठोक भूमिका मांडलीये.. आम्ही विधानसभेच्या 60 जागांवर लढण्याची तयारी केलीये... पण त्यापेक्षा अधिक जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे असं अजित पावारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय... आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत आलो आहोत. यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली जाणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.. मुख्यमंत्री महायुतीचाच होईल असा दावा यावेळी त्यांनी केला.. सध्या तिनही घटक पक्ष महायुतीला बहुमत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याबाबत चर्चा होईल असं ते म्हणाले.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • JNPTमहामार्गावर महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Longest Tunnel : बडोदा जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आलाय. बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. या बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आलंय. या बोगद्यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणारेय. हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणारेत.सध्या बोगद्यांच्या आतमध्ये प्लॅस्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणारेत. बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे. तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटात करता येणार आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  •  'मी देव झालो, असं स्वतः म्हणू नये', मोहन भागवतांचं वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mohan Bhagwat :  मी देव झालो, असे स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या,’ अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवतांनी बौद्धिक घेतलं...पुण्यात पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने भय्याजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.. यावेळी भागवतांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरु झालीये.. या वक्तव्यामुळे मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्यात.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jitendra Awhad : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल झालाय. खोटी माहिती प्रसारित करुन शेतक-यांची दिशाभूल केल्याच्या मुद्द्यावरून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. लाडकी बहिण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तसेच चुकिची माहिती प्रसारित करून सरकारची बदनामी केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jitendra Awhad : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल झालाय. खोटी माहिती प्रसारित करुन शेतक-यांची दिशाभूल केल्याच्या मुद्द्यावरून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. लाडकी बहिण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तसेच चुकिची माहिती प्रसारित करून सरकारची बदनामी केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत एक आनंदाची बातमी शेअर केलीय. गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आलीय. असं ट्विट फडणवीसांनी केलंय. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आलीय. दुस-या क्रमाकावर कर्नाटक आणि तिस-या क्रमांकावर दिल्ली आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे असल्याचं दिसतंय', एकनाथ खडसेंची टीका

    Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपमध्ये प्रवेश झाला. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जर विरोध करत असतील तर ते जेपी नड्डांपेक्षा मोठे असावेत, असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी केलाय. खडसेंनी महाजन आणि फडणवीसांचं नावं घेतल्यानं राजकारणात मोठी खळबळ उडालीय. प्रवेश झाल्याचं नड्डांनी जाहीर करावं, अशी मागणीही खडसेंनी केलीय. भाजप प्रवेश जाहीर करत नसेल तर त्यांना माझी गरज नाही, असं दिसतंय, असंही खडसे म्हणाले.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'केंद्राची राज्याला सावत्र आईची वागणूक?', नाना पटोलेंचा सवाल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nana Patole : केंद्र सरकार राज्याला सावत्र आईची वागणूक का देत आहे?, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सरकारला केलाय. तेलंगणा, आंध्र प्रदेशातही पावसामुळे शेतक-यांचं नुकसान झालं. तिथं केंद्राची दोन मंत्रालये तैनात करण्यात आली. मात्र, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्याचं कारण काय? महायुतीचे नेते केंद्राकडे मदत का मागत नाहीत? असा सवाल पटोलेंनी ट्वीटरवरून केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ZP School Teacher : राज्यातील जिल्हा परिषदांच्या २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्याचा नवा निर्णय घेण्यात आलाय.डी.एड., बी.एड. झालेल्या उमेदवारांची १५ हजार रुपये मासिक मानधनावर कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती होणारेय.२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेवर दोन शिक्षकांपैकी एका जागेवर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने याआधीच घेतला होता.मात्र, सेवानिवृत्त शिक्षक न मिळाल्यास पद रिक्त राहून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. त्यामुळे आता डी.एड., बी.एड. झालेल्या शिक्षकांना संधी देण्यात येणारेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • उद्या मुंबई,ठाणे,रायगड,पालघरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

     

    Rain Alert : गणरायाच्या आगमन सोहळ्यात पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.उद्यापासून सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यताय...

  • अदानी, मुख्यमंत्र्यांमध्ये 1 तास चर्चा-सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Politics : मुंबईत गौतम अदानी, मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक-सूत्र...दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा-सूत्र...धारावीसह राज्यातील इतर प्रोजेक्टवर चर्चा-सूत्र...अदानी, मुख्यमंत्र्यांमध्ये 1 तास चर्चा-सूत्र

     

  • मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीला आग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Fire : मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीला आग... एक तासापूर्वी लागली आग...अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल...अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link