Maharashtra Breaking News Today LIVE Updates:एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पवारांमध्ये सविस्तर चर्चा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्याला नवीन सरकार कधी मिळणार, मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्तर आजच मिळतील. दिवसभारतील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी...
Latest Updates
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पवारांमध्ये सविस्तर चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये कॅान्फरन्स फोनवरून सविस्तर चर्चा झाली.
सरकार स्थापनेसंदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
तसेच दिल्लीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसोबत उद्या चर्चा होणार असल्याची माहिती.
दिल्लीतील बैठक संपल्यावर मुंबईत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येणार
वर्षावर महिलांकडून एकनाथ शिंदेंचं औक्षण
वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला महिलांची गर्दी झाली आहे. यावेळी महिलांकडून एकनाथ शिंदे यांचं औक्षण करण्यात आलं. तसंच लाडकी योजनेबाबत धन्यवाद मानले. पुढील ५ वर्षांसाठी शिंदे मुख्यमंत्री झालेच पाहिजे असं यावेळी निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
शिवसेना मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देणार- सूत्र
जुन्या मंत्र्यांचा पत्ता कट होऊन नवीन चेहऱ्यांना संधी देणार
जुन्या वादग्रस्त मंदिरांचा नवीन मंत्रिमंडळात पत्ता कट
केंद्रीय वाहतूक, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सागरवरून निघाले. ते अडीच तास सागरवर होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांचे सूचक ट्विट
येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये काही आमदारांचा प्रवेश होणार का? पार्थ पवारांच्या ट्विटमुळे शरद पवारांच्या पक्षातील कोणी आमदार अजित पवार यांच्याकडे येणार असल्याचे सूचक संकेत
महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या आमदारांना शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊ इच्छिणाऱ्या सर्व आमदारांचे मी स्वागत करतो. आपण सर्व अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र येऊन महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जाऊ अशा प्रकारचे त्यांनी सूचक ट्विट केले
रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर दाखल
अजित पवारांकडून शरद पवारांचे आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न
अजित पवारांकडून शरद पवारांचे आमदार आणि प्रतिनिधी गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.यासंदर्भात अजित पवारांकडून शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांना आणि निवडून आलेल्या आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता
आयोगाच्या निकष आहे कुठलाही पक्षाला 8% किंवा 6% किंवा 3% टक्के मत नाय भेटला तर त्या पक्षाचं मान्यताराद्य होण्याची शक्यता होती.त्याच प्रमाणे त्या पक्षाला एक दोन किंवा तीन आमदार निवडून आला पाहिजे.मात्र मनसेला या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार किंवा टोटल मतदानाचा टक्केवारी मध्ये सहा,सात,आठ टक्के पेक्षा कमी मत मिळाल्यामुळे मनसेचे मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांची कार्यकर्त्यांसोबत बैठक
शरद पवारांच्या उपस्थितीत कराडच्या हॉटेल मध्ये बैठक सुरू झाली आहे.कराड भागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रमुख कार्यकर्त्यांची ही बैठक होते आहे.या मध्ये कराड उत्तर आणि कराड दक्षिण मतदारसंघात झालेल्या पराभवाचा कारणांवरून चर्चा सुरू आहे.
प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी निवडणुकीत दिलेल्या योगदानबद्दल फडणवीसांनी समाधान व्यक्त केले. तसेच आमदार प्रवीण दरेकर यांचे कौतुक केले.
नवे सरकार स्थापन करण्याच्या घडमोडींना वेग
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 30 तास होत असतानाच राजकीय पक्षांपाठोपाठ निवडणूक आणि राज्यपालांच्या पातळीवरही राज्यात नवे सरकार स्थापन करण्याच्या घडमोडी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगासोबत चर्चा होताच, नोटिफिकेश काढण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल झाले आहेत. राज्याचे निवडणूक आयुक्त एस. चोककलिंगम यांच्यासमवेत अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना भेटणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतील. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना दिली जाईल. यानंतर निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवली जाईल. त्यानंतर राज्यपालांकडून नवी 15 वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल.मनसेची मान्यता कायम राहणार?
एकदा महाराष्ट्राची एक हाती सत्ता द्या असं आवाहन करणा-या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. सोबतच मनसेची मतांची टक्केवारीही घसरली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला अवघी 1 पॉईंट 55 टक्के इतकीच मतं मिळाली आहेत. त्यामुळे रेल्वे इंजिन हे मनसेचं चिन्ह राहणार का? तसंच मनसेची नोंदणीकृत पक्ष म्हणूनही मान्यता कायम राहणार का? असे तांत्रिक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
वाचा सविस्तर - एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?
निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल
निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतील. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना दिली जाणार आहे. निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवली जाणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडून नवी 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल.
महायुतीचा उद्या शपथविधा
महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा नावावर आज रात्री शिक्कामोर्तब होणार असं सांगण्यात आलंय. सोमवारी महायुतीचा शपथविधी होणार असून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरलाय. त्यासोबत मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आहे, यावरही विचार झाल्याची माहिती समोर आलीय.
अधिक माहितीसाठी हे वाचा - Mahayuti Government 2.0 : उद्या शपथविधी... मंत्रिमंडळात 'या' 27 चेहऱ्यांना मिळणार संधी? पाहा कसं असू शकतं नवं Cabinet
निवडणुकीत वंचितचा मविआला फटका
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र महाविकास आघाडीला वंचितनं जोरदार फटका दिला. खास करुन मराठवाड्यात वंचितमुळे मविआचं मोठं नुकसान झालं.
उद्धव ठाकरेंनी उद्या बोलवली नवनिर्वाचित आमदारांची बैठक
उद्धव ठाकरेंनी यांनी सोमवारी 25 नोव्हेंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवली आहे. मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेण्यात येणार आहे.
विजयाचा जल्लोष टाळत जयंत पाटील तातडीने मुंबईला रवाना
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत. इस्लामपूरमधून वाहनाने जयंत पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीच्या पराभवानंतर इस्लामपूर मधील विजयाचा जल्लोष टाळात जयंत पाटलांनी मौन बाळगलं आहे. आज सकाळी ते मुंबईकडे तातडीने रवाना झाले आहेत. ते शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण 'त्या' आमदाराला भोवलं; पराभवानंतर अजित पवारांना भेटून...
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील पराभवाची अजित पवारांनी कारणे समजून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे या मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुनील टिंगरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. पराभवाला पुणे पोर्शे अपघात प्रकरणाबरोबरच शरद पवार गटातील दिग्गज नेत्यांचा सभांचा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने देखील या मतदारसंघात काम केलं नसल्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवारांवर सोपवण्यात आली मोठी जबाबदारी; राष्ट्रवादीच्या नवनियुक्त आमदारांचा निर्णय
अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीमधून मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर अजित पवारांची आता पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर गॅस टँकर पलटला; वाहतूक ठप्प
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प. वारजे पुलाजवळ गॅस टँकर हायवेवर पलटी. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली. टँकर बाजूला करण्यासाठी प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत.
महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार
विधानसभेत डावललेल्या नाराजांना मिळणार विधान परिषदेवर संधी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परिषदेतील 4 आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली आहे. त्यामुळं भाजपच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत. अनेक नाराज मंडळींपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष
एकनाथ शिंदे यांना बंडात साथ दिलेले शिवसेनेचे पाच आमदार पराभूत
सदा सरवणकर
यामिनी जाधव
शहाजीबापू पाटील
संजय रायमूलकर
ज्ञानराज चौगुलेकोल्हापुरातील महायुतीच्या आमदारांना घेऊन विशेष विमान मुंबईकडे रवाना
कोल्हापुरातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत माहितीचे दहा आमदार विजयी झालेत. या आमदारांना घेऊन कोल्हापुरातून खासदार धनंजय महाडिक विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झालेत. कोल्हापुरातील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल आवाडे,अमल महाडिक, प्रकाश आबिटकर , शिवाजी पाटील, चंद्रदीप नरके यांच्यासह अन्य महायुतीच्या आमदारांचा समावेश आहे.
मुंबईतील हॉटेलमध्ये शिंदेंचे आमदार एकत्र येण्यास सुरुवात
शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे आमदार मुंबईत यायला सुरूवात. मुंबईच्या वांद्रे येथील ताज अॅन्ड लॅड्समध्ये आतापर्यंत 29 आमदार उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती आहे. हॉटेलमध्येच सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार आहे. उपस्थित आमदारांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.
प्रणिती शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय
सोलापूर शहर मध्य मतदार संघाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होईल असा अनेक राजकीय विश्लेषकांनी देखील अंदाज व्यक्त केला होता. शहर मध्य मतदारसंघ हा खासदार प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. प्रणिती शिंदे या तीन वेळा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र आता हा गड भाजपाने काबीज केला आहे. कालचा प्रत्यक्ष निकाल पाहता ही निवडणूक एकतर्फी झाली असून एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दि यांचा 48 हजार 850 मतांनी पराभव करत भाजपचे देवेंद्र कोठे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना आयोगाकडून कळवली जाणार. सोबतच, निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली जाणार . त्यानंतर राज्यपालांकडून १५ वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढत सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु करणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार?
ओबीसी बाबत कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुका घेतल्या जाणार. सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे.
'फडणवीस भावी मुख्यमंत्री'; पुण्यात जागोजागी झळकले बॅनर्स
पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात लागले देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर्स. महायुतीच्या राज्यातील विजयानंतर पुण्यात फडणवीस यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत. पुण्यातील आजी-माजी नगरसेवकांकडून फडणवीसांची बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुण्यातील बाणेर बालेवाडी परिसरात लावण्यात आले बॅनर्स.
महाराष्ट्रातील NOTA चं प्रमाण किती? निवडणूक आयोगाने सांगितली आकडेवारी
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात विधानसभा 288 जागांसाठी एका टक्क्यापेक्षा (0.75 टक्के) कमी मतदारांनी नोटा (नन ऑफ दि अबाव्हू) या पर्यायाचा वापर केला. आम्हाला कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नाही असे मतदाराला दर्शवायचे असेल तर तो ईव्हीएमवरील नोटाचे बटन दाबतो. झारखंडमध्ये 1.31 टक्के मतदारांनी नोटाची निवड केली.
महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार
महाराष्ट्राला यंदाच्या विधानसभेमध्ये सर्वात कमी वयाचा आमदार मिळाला आहे. सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
विजयी मिरवणुकीमध्येच भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
"पंकजाताई, तुम्ही माझ्या बाबतीत असं वागायला नको होतं. "भाजपचा उमेदवार असूनही पंकजा मुंडेंनी माझ्या पराभवसाठी प्रयत्न केले," अशी विधानं भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केली आहेत. विजयी मिरवणुकीतच भाजप आमदार सुरेश धस यांचे पंकजा मुंडेंवर आरोप केले आहेत. या माध्यमातून बीड भाजपमधील अंतर्गत वाद विकोपाला पोहोचला आहे.
राणेंच्या घरात एक खासदार, दोन आमदार
माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे काणवकवलीतून, तर त्यांचे सख्खे भाऊ नीलेश राणे (शिंदेसेना) कुडाळमधून जिंकले, आता राणेंच्या घरात ते स्वतः खासदार आणि दोन मुले आमदार अशी सत्ता आली आहे.
अजित पवारांची काकांना धोबीपछाड! विधानसभेला शरद पवारांपेक्षा पॉवरफूल
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार या लढाईत लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना फटका बसला होता, मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार पॉवरफूल ठरले असून शरद पवारांचा करिष्मा या निवडणुकीत चालला नाही. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते, इथून अजित पवार मोठ्या मतांच्या आघाडीने विजयी झाले आहेत. विधानसभेच्या 36 मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा थेट मुकाबला होता. त्यातील केवळ 5 मतदारसंघात शरद पवारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर 29 मतदारसंघात अजित पवारांच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर दोन मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
पालघर, रायगड, मावळमध्ये शिंदे-भाजपाचा जोर
पालघर रायगड मावळमधील 13 जागांपैकी एकही जागा काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना जिंकता आली नाही. याउलट भाजपने पालघर मध्ये 3, रायगडमध्ये 1 आणि मावळमध्ये 2 अशा 6 जागा जिंकल्या. शिंदे यांच्या शिवसेनेने देखील पालघर 2, रायगड 2 आणि मावळ 1 अशा जागा जिंकल्या.
मनसेमुळे भाजपाचा मार्ग झाला मोकळा
ठाणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणी मिळून मनसेने 41 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही. मात्र, मनसेने मिळविलेल्या मतांमुळे भाजपच्या यशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिंदेंच्या ठाण्यात भाजपाचा स्ट्राइक रेट 100 टक्के
एकनाथ शिंदे यांनी मुंबईत 14 जागी उमेदवार उभे केले होते. त्यातील 4 उमेदवार विजयी झाले. याउलट ठाण्यात घडले. ठाण्यात विधानसभेच्या 18 जागा आहेत. तेथे ठाकरे यांनी १० उमेदवार उभे केले होते. ते सर्वच्या सर्व पराभूत झाले. याउलट भाजपने ठाण्यात 100 टक्के यश मिळवत उभे केलेले सर्व 9 उमेदवार विजयी केले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 7 उमेदवार ठाण्यात उभे केले. त्यातील 6 विजयी झाले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह समाजवादी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले.
मुंबईत ठाकरेंचा स्ट्राइक रेट 50 टक्क्यांवर
मुंबई कुणाची... शिवसेनेची... अशा घोषणा मुंबईत सतत ऐकायला मिळतात. या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मुंबई भाजपची आणि उद्धव ठाकरे यांची, तर ठाणे मात्र एकनाथ शिंदेंचे यावर शिक्कामोर्तब केले आहे. या सगळ्या गदारोळात काँग्रेस पक्षाने मात्र स्वतःची अवस्था अत्यंत दारुण करून घेतली आहे. काँग्रेसच्या या अवस्थेला काँग्रेसच जबाबदार आहे. मुंबईत 36 जागा आहेत, भाजपने 19 जागी उमेदवार उभे केले होते, त्यातले 16 उमेदवार विजयी झाले. उद्धव ठाकरे यांनी 22 जागा लढवल्या, त्यातील 11 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश आले.
अजित पवारांची राष्ट्रवादी आज घेणार मोठा निर्णय
आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विधीमंडळ नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेता निवडला जाणार आहे. अजित पवारांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'देवगिरी' बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे. पक्षातील विजयी उमेदवारांनी आपले प्रमाणपत्र घेऊन येण्याचे निर्देश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपची सरशी
14 राज्यांतील 48 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक 20 जागा जिंकत भाजपने आघाडी मिळवली असून उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मात देत राजस्थानातही आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसने 7 जागा मिळवल्या आहेत. उत्तर प्रदेशातील 9, राजस्थान-7, पश्चिम बंगाल- 6, आसाम-4, पंजाब-4, बिहार-4, कर्नाटक-3, केरळ-3, मध्य प्रदेश-2 तर छत्तीसगड, गुजरात, उत्तराखंड आणि मेघालयातील प्रत्येकी एका जागेसाठी ही मतमोजणी झाली. उत्तर प्रदेशात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 7 जागा जिंकल्या आहेत. राजस्थानात 7 पैकी 5 जागा जिंकून राज्यात आपली शक्ती सिद्ध केली.
सरकार स्थापन करण्यासाठी कराव्या लागणार 'या' 5 गोष्टी
> भाजपाकडून आता केंद्रीय निरीक्षक नेमणूक होईल.
> केंद्रीय निरीक्षक नेमणूक झाल्यावर भाजपा पक्षाची अंतर्गत बैठक होईल.
> या बैठकीत भाजपा गटनेता निवडला जाईल.
> गटनेता निवडीनंतर भाजपा गटनेते हे राज्यपालांकडे सत्ता स्थापन दावा करण्यासाठी जातील.
> राज्यपाल वेळ देतील आणि नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल.
पुण्यात विजयी जल्लोष; अनुचित घटना नाहीत! पोलिसांचा कडक बंदोबस्त
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहरात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. पोलिसांनी शहर, तसेच उपनगरात कडक बंदोबस्त ठेवला होता. शहरात कोठेही अनुचित घटना घडली नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहर, तसेच उपनगरात दुपारनंतर जल्लोष करण्यात आला. जल्लोषानंतर कार्यकर्त्यांमध्ये होणारे वादावादीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी, अडीच हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल, तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तास तैनात करण्यात आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. श्री जोगेश्वरी मंदिर, लाल महाल चौक, मंडई, शनिपार चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. चैाकचौकात आतषबाजी करण्यात आली, तसेच गुलाल उघळण्यात आला.
मुंबईमध्ये 'या' मतदारसंघात सर्वाधिक NOTA मतं
विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांत 70 हजारांहून अधिक मतदारांनी हक्क बजावताना 'नोटा' मतांना पसंती दिली. यामध्ये सर्वाधिक नोटा मते अणुशक्तीनगरमध्ये असून त्याची संख्या 3884 आहेत तर सगळ्यात कमी नोटा मते मानखुर्द शिवाजी नगरमध्ये असून त्यांची संख्या फक्त 130 आहे. उमेदवाराबाबत नाराजी आणि नापसंती दर्शवण्यासाठी मुंबईकरांनी 'नोटा' पर्याय स्वीकारलेला दिसून आले.
महायुती सरकारचा शपथविधी उद्याच? मात्र, राज्यपालांकडून...
महायुती सरकारचा शपथविधी उद्या म्हणजेच 25 तारखेला पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मात्र, राज्यपालांकडून अद्याप कुठल्याही पक्षाला सरकार स्थापनेचे निमंत्रण नसल्याचीही माहिती समोर येत आहे.
महायुती सरकारचा शपथविधी शिवाजी पार्कवर?
नव्या सरकारच्या शपथविधीसाठी महायुतीचा शिवाजी पार्कसाठी आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. निकालाच्या दिवशी 2014 प्रमाणे शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता हा शपथविधी शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी पार्कवर घेण्याचा आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.