Breaking News LIVE Updates: मी आज महाराष्ट्राचा निकाल सांगतो, महायुतीचं सरकार येणार - अमित शाह
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राजकीय प्रचाराचा चढलेला जोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अमित शाहांसहीत शरद पवार, उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि बरंच काही केवळ एका क्लिकवर...
Latest Updates
महायुतीचं सरकार येणार - अमित शाह
मी आज महाराष्ट्राचा निकाल सांगतो, येथे महायुतीच सरकार येणार, महाविकास आघाडीचे सुपडासाफ होणार
खरगे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना सांगितले वादा असे करा तो पूर्ण करू शकतो.
काँग्रेस अध्यक्ष यांनी दिलेली आश्वासनं त्यावर विश्वास नाही मग जनतेचा विश्वास कसा बसेल
पण मोदी यांची स्वत: गॅरंटी दिली आहे जनतेन पाहिले
आम्ही 370 हटवले, भारतात काश्मीर जोडण्याचं काम केलं. शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे सगळेजण विरोध करत राहिले. 370 हटवले तर रक्ताचे पाट वाहतील असं विरोधक म्हणत होते.
महाराष्ट्रातील सरकार पाडा, आमदारांना खरेदी करा असं संविधानात लिहिलं आहे का? - राहुल गांधी
आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी काँग्रेस नेते राहूल गांधी गोंदियात आले असता विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. संविधानात कुठे उल्लेख आहे की महाराष्ट्रातील सरकार पाडा. आमदारांना खरेदी करा असं संविधानात लिहिलं आहे का? तरी यांनी हे कृत्य केलं. त्यामुळे भाजपला संविधान संपवायचं आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे
नितीन गडकरी यांच्याही बॅगची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासारशिरसी येथे आज महविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त हेलिकॉप्टरने आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बॅगची निवडणूक विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आल्याची बातमी ताजी असतानाच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही बॅगची निवडणूक विभागाच्या पथकाने तपासणी केल्याची माहिती समोर आलीय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज हेलिकॉप्टरने किल्लारी येथे आले असता त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आलीय.
- छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवला मतदारसंघात शरद पवार दाखल
- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभेला सुरुवात
- शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदेंच्या प्रचारार्थ सभेचे आयोजननिवडणूक आयोगाला बॅगा तपासण्याचा अधिकार - प्रवीण दरेकर
उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ हा बालिशपणा आहे. उद्धव ठाकरेंनी सभ्यतेनं वागायला हवं . आता त्यांच्या हाती काहीही उरलेलं नाही. पैशांचे वाटप होऊ नये असं आयोगाला वाटत असेल. प्रलोभन देऊ नये यासाठी आयोग सतर्क दिसत आहे. आयोगाला काही संशय असेल त्यामुळे तपासणी केली असेल असं भाजपा नेते प्रवीण दरेरकर म्हणाले आहेत.
पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी! औसा हेलिपॅडवर घडला हा प्रकार
उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरदेखील होते. काल जालना येथे दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती.
रायगड: मध्यरात्री CM शिंदेंच्या पदाधिकाऱ्याची कार फोडली
रायगडच्या विळे गावात मध्यरात्री गाड्यांची तडफोड करण्यात आली. विळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवसेना शिंदे गटाचे गजानन मोहिते यांची गाडी अज्ञात इसमांनी फोडली. निजामपूर भागात शिवसेना विळे शाखेसमोर ही गाडी उभी होती. अज्ञात इसमांनी केलेल्या हल्ल्यात गाडीचे नुकसान झालंय. विरोधकांनी आपली गाडी फोडल्याचा आरोप मोहिते यांनी केलाय. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थानी रास्ता रोको केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
जरांगेंचं मराठ्यांना आवाहन! म्हणाले, 'यांना सत्तेत येऊच...'
सामूहिक आमरण उपोषणाची तयारी सुरु करा असं सांगत जरांगे यांनी अंतरवालीसहीत संपुर्ण राज्यातील मराठे सामूहिक उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. निवडणूक झाल्यानंतर तारीख जाहीर करणार असल्याचं देखील जरांगे यांनी स्पष्ट केलं. यांना सत्तेत येऊच देऊ नका, असं आवाहन देखील जरांगे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे इतके हलके निघाले की...; आदित्य ठाकरेंचा टोला
'मला हल्क्यात घेतले म्हणून सरकार पाडले', या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रेवर आदित्य ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. "ते इतके हलके ते आहेत की वाहत सुरत आणि गुवाहाटीकडे गेले. फक्त हे आता मान्य केले की गद्दार लोकांनी सरकार पाडले," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
राहुल गांधींची चिखलीमधील सभा अचानक रद्द
राहुल गांधींची चिखलीची सभा रद्द झाली आहे. विमानात बिघाड झाल्यानं राहुल गांधी चिखली येथील सभा रद्द करावी लागल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे. आता राहुल गांधी थेट गोंदिया इथल्या सभेला पोहोचणार आहेत.
राहुल गांधींनी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने उड्डाण घेतलं मागे परतले कारण...
राहुल गांधी दिल्लीहून विमानाने छत्रपती संभाजीनगरला निघाले होते. संभाजीनगर येथून ते बुलढाणा येथे जाणार होते. मात्र विमानात तांत्रिक अडचण आल्याने राहुल गांधी यांना संभाजीनगर येण्यापूर्वी पुन्हा दिल्लीकडे परतावे लागले आहे. त्यांचा दौरा दुपारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उद्धव ठाकरे राणेंच्या बालेकिल्ल्यात! राणेंच्या मुलांबद्दल काय बोलणार?
नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. एकमेकांचे कट्टर विरोधी उद्या एकमेकांसमोर येणार आङेत. उद्या उद्धव ठाकरे यांच्या कोकणात तीन सभा होणार आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या सभा होणार आहेत. कणकवली आणि कुडाळ येथे नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राणेंबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष? उध्दव ठाकरे यांच्या कोकणातील सभेतून कोणाला करतील लक्ष्य आणि कोणावर लक्ष?
नाशिकमध्ये गावगुंडाकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण
नाशिक शहरात गुंडगिरीने गाठला कळस, पंचवटी थेट पोलीस उपनिरीक्षकांना मारहाण करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले प्रकाश नेमाने यांच्यावर रात्री जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रकाश नेमाने कर्तव्यावरून घरी जात असताना त्यांनी गावगुंडांना हटकवले आणि या गावगुंडांना त्याचा राग आल्याने त्यांनी थेट दगडाने मारहाण केली. प्रकाश नेमाने हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आङेत. नेमाने यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात थेट पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला झालल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारीची चर्चा सुरू आहे.
मुंबईकरांनो, स्वत:ला जपा! मलेरिया आजारांचं घोंघावतं संकट
मुंबईमध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दरदिवशी 22 नव्या रुग्णांची नोंद होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मलेरिया झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. मुंबईसह राज्यभरात सगळीकडे साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर सगळीकडे डेंग्यू, मलेरिया, कावीळ इत्यादी आजारांचे रुग्ण वाढू लागेल आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. मलेरिया झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडते. बीएमसी आरोग्याकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार, मुंबईमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 6419 लोकांना मलेरियाची लागण झाली आहे. मलेरिया हा साथीचा आजार असून दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे होण्याची शक्यता असते.
मोदी पुण्यात येणार असल्याने शहराला छावणीचं स्वरुप
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी देखील पुण्यात तैनात करण्यात आलेत. विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तास तैनात राहणार आहे. सभा होत असलेल्या मैदानावर 1000 पेक्षा अधिक पोलीस तैनात असतील. 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त, 23 सहायक पोलीस आयुक्त, 135 पोलीस निरीक्षक, 570 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.
राज ठाकरे पुण्यात घेणार 2 सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पुन्हा सभा घेणार आहेत. 14 नोव्हेंबर रोजी राज ठाकरेंच्या पुण्यात दोन सभा घेतील. खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी राज ठाकरे यांच्या पुण्यात सभा होतील. या आधी कोथरूड आणि कसबा विधानसभा मतदारसंघासाठी राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्या होत्या.
शिवाजी पार्कमधील लाईट काढल्याने राज ठाकरे संतापले
दिंडोशीमधील जाहीर सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यावरुन देखील निशाणा साधला. आपण तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी साजरी करतो. दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कवर आपण 14-15 वर्षांपासून दीपउत्सव साजरा करतो. मात्र काल अचानक सगळे लाईट बंद करुन टाकले. 14 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कला सभा आहे. त्यामुळे ते लाईट काढून टाकले आहेत, असं राज ठाकरेंनी सांगितले.
उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे फोटो लावून...; राज ठाकरेंचा टोला
सोमवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिंडोशीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आहे? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. बाळासाहेबांचे फोटो लावून मतं मागतात उद्धव ठाकरे. उध्दव ठाकरे पंजाचा प्रचार करतात. काँग्रेस, पवार गट बाळासाहेबांचं नावही घेत नाही, असा टोला राज यांनी लगावला.
मोदींच्या सभेनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय तर आज सायंकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत प्रमुख रस्त्यांवर वाहनेत लावण्यास मनाई करण्यात आली आहे. जंगली महाराज रस्ता, शास्त्री रोड, फर्ग्युसन रस्ता, टिळक रोड या मार्गांवर कोणत्याही प्रकारचे वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. आज सायंकाळी पाच ते सहा यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एस. पी. कॉलेज मैदानावर सभा होती त्यासाठी शहरात चोख बंदोबस्त ही तैनात करण्यात आले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईत आज तीन प्रचार सभा
चांदिवली, भांडुप आणि विक्रोळीत सायंकाळी होणार सभा
माधुरी हॉटेल व गुरुदेव मेडिकल, साईबाबा मंदिर मार्ग, मोहिली व्हिलेज, पाईप लाईन, साकीनाका, चांदिवली येथे सायंकाळी पाच वाजता होणार जाहीर सभा.
90 फिट रोड, खडी मशीन, भांडूपमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता तर कन्नमवार बस डेपो जवळ, बिल्डिंग 139, विक्रोळी पूर्व येथे रात्री आठ वाजता तिसरी सभा होईल.
एसटीच्या 9232 बस दोन दिवस सेवेत नसणार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) 9232 बस निवडणूक आयोगाला आणि पोलिस प्रशासनाला देण्यात येणार आहेत. या बस 19 आणि 20 नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी प्रासंगिक भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मात्र, या बसची मागणी दिवसातील ठरावीक कालावधीसाठी असल्याने नियमित प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
उद्धव ठाकरे यांची आज बार्शीमध्ये जाहीर सभा
उद्धव ठाकरे यांची बार्शी शहरात सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उद्या धाराशिव जिल्ह्यात दोन प्रचार सभा होणार आहेत. उमरगा विधानसभेचे ठाकरेंचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्यासाठी लोहारा येथे एक वाजता तर धाराशिव विधानसभेचे उमेदवार कैलास पाटील यांच्यासाठी धाराशिव शहरात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. केज मतदार संघामध्ये नितीन गडकरी यांची सभा होणार आहे सकाळी 11 ते 12 दरम्यान ही सभा सुरू होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज 4 जाहीर सभा
दर्यापूर येथे सकाळी 11 वाजता महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मेहकर वेळ दुपारी 1 वाजता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊळगाव राजा दुपारी 3 वाजता
रिसोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या दुपारी 2 वाजता जाहीर सभा आहे.
योगींच्या आज राज्यात तीन सभा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज महाराष्ट्रात तीन सभा होणार आहेत. अकोल्यात दुपारी 2 वाजता सभा होणार. अमरावतीत दुपारी साडेतीन वाजता होणार सभा. तर नागपूरमध्ये सायंकाळी 6 वाजता होणार सभा.
शरद पवार यांच्या आज तब्बल 6 जाहीर सभा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून एकाच दिवशी ते सहा जाहीर सभा घेणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता कळवणमध्ये त्यांची पहिली सभा पार पडणार असून त्यानंतर दिंडोरी, निफाड, येवला, कोपरगाव आणि नाशिक पूर्व मतदारसंघात त्यांची तोफ धडाडणार आहे.
फडणवीसांच्या डहाणू, रिसोड आणि कल्याणमध्ये सभा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांचे निवडणुक प्रचारानिमित्त जाहीर सभा घेणार आहेत. सकाळी 11.30 वाजता ही सभा होणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता कल्याण पूर्व येथील कोळशेवाडीतील पोटे मैदान येथे फडणवीस जाहीर सभा घेतील.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा
दुपारी 12 वाजता चिखली येथे चिखलीचे काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी प्रचारसभा घेणार.
दुपारी साडेतीन वाजता गोंदिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोपाल अग्रवाल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रात 2 आज जाहीर सभा
जाहीर सभा (घाटकोपर पूर्व विधानसभा) सायंकाळी 05:30 वाजता स्थळ: जनरल अरुणकुमार वैद्य मैदान, मुंबई
जाहीर सभा (बोरिवली विधानसभा) संध्याकाळी 07:30 स्थळ: सप्तहिक मैदान, कांदिवली पश्चिम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात आज 3 जाहीर सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे जाहीर सभा. सकाळी - 11 वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पुण्यात सभा - 12 वाजता
सोलापूर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा दुपारी - 2 वाजता