Breaking News LIVE: बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपीला शुभम लोणकरची मदत

दक्षता ठसाळे-घोसाळकर Mon, 14 Oct 2024-11:17 am,

दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 


 

Latest Updates

  • टोलमाफीवर दादा भुसे यांची प्रतिक्रिया 

    रोज साडेतीन लाख वाहने ये जा करतात. हलक्या वाहनांना टोलमाफी व्हावी अशी मागणी होती. जड वाहने सोडून आज रात्री 12 पासून टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 45 व 75 रूपये टोल होता. 2026 पर्यंत टोलची मुदत होती. 2 लाख 80 हजार वाहनांना फायदा होईल. आर्थिक भाराची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाईल.

  • बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपीला शुभम लोणकर आणि त्याच्या भावानं मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी शिवा हा पुण्यात राहायला होता. वारजे भागात भंगार गोळा करत होता. हत्येआधी आरोपीनं मुंबईत येऊन रेखी केल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी काल शुभच्या भावाला अटक केली. तर शुभमचा शोध सुरू आहे.

  • गुजरातमधून सूत्र चालतं - संजय राऊत 

    शिंदेंनी कायदा सुव्यवस्थेवर लक्ष द्यावं - संजय राऊत 

  • MMRDA नं भूखंड विक्रीचा सपाटा लावला आहे. मुंबईतल्या बीकेसी मधले आणखी 3 भूखंड विक्रीकरता निविदा काढल्या आहेत. यापूर्वी बीकेसीतल्या 7 भूखंडाच्या विक्रीसाठी निविदा निघाल्या आहेत. भूखंड विक्रीतून 5 हजार 946 कोटींची उभारणी होईल,असा अंदाज आहे. 

     

  • भाजपकडून 160 जणांची यादी?

    भाजपकडून 160 मतदारसंघातील नावे आज दिल्लीला पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून झी 24 तासला मिळत आहे. 160 मतदारसंघातून बंद लिफाफ्यातून मागावलेली प्रत्येकी 3 नावे पक्ष श्रेष्ठींसमोर सादर केली जाणार असल्याची माहिती आहे. काल प्रदेश मुख्यालयात झालेल्या बैठकीत  नावे पाठवण्यावर सहमती झाल्याची माहिती आहे.  महाराष्ट्र भाजपच्या यादीवर आज दिल्लीत पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत राज्यातील नेत्यांची चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे पंकजा मुंडे रवींद्र चव्हाण आशिष शेलार सुधीर मुनगंटीवार दिल्लीला बैठकीसाठी जाणार आहे.. 

  • छगन भुजबळांची चिंता वाढणार?

    विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर, महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या दोषमुक्ती विरोधात आव्हान याचिका दाखल झाल्यात. त्यावर तातडीनं सुनावणी घ्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. - 9 सप्टेंबर 2021 ला ACBच्या विशेष न्यायालयानं छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त केलं होतं. मात्र त्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, दीपक देशपांडे यांच्यासह आमदार सुहास कांदे यांनी तीन स्वतंत्र याचिका दाखल करत आव्हान दिलं होतं. या याचिकांमुळे न्यायालयानं एप्रिलमध्ये भुजबळ कुटुंबियांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र त्यानंतर सुनावणी थंडावली होती.  याच आव्हान याचिकांवर तातडीनं सुनावणी व्हावी, यासाठी याचिकाकर्ते आग्रही आहेत. 

  • एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात 10 %  वाढ केली आहे. सर्व प्रकारच्या बसेससाठी 25 ऑक्टोबरपासून दरवाढ लागू असेल. साध्या बसचे भाडे 8 रूपये 70 पैसे आहे रुपये आहे.10% भाडंवाढ करून आता 10 रुपये मोजावे लागणार आहेत. हंगाम संपल्यानंतर 26 नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होईल.

  • बस तिकीट दरात सूट 

    नवी मुंबई एनएमएमटी बसमध्ये तिकीट दरात महिलांना 50 टक्के सूट देण्यात आली आहे. आजपासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या निर्णयामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

     

  • बातमी सिडकोच्या घरांबाबत 

    सिडकोच्या घरांसाठी ग्राहकांनी गेल्या 24 तासांत 12 हजार 400 अर्ज भरलेत. 12 ऑक्टोबरपासून माझे पसंतीचे घर या योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झालीये. सिडकोच्या घरांसाठी 11 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणारेय.

  • पुण्यात पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे फळभाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. फळभाज्यांच्या दरात वाढ झाल्यानं, गृहिनींचं बजेट कोलमडलं आहे.

  • अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरची पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संबंध असल्याचं समोर आल्यानंतर सुरक्षेत वाढ केली आहे. 
     

  • बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचचं पथक उज्जैनला पोहोचलं आहे. मुंबई क्राईम ब्रँचचं 7 जणांचं पथक उज्जैनमध्ये तपास करत आहे. तिथे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 2 संशयित असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. 

  • बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातली महत्त्वाची बातमी....

    बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातला दुसरा आरोपी अल्पवयीन नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई क्राईम ब्रँचकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती या दोन्ही आरोपींना सुट्टी कालीन न्यायालय असलेल्या किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं.. न्यायालयाने आरोपींना त्याचं वय विचारले असता आरोपी धर्मराज कश्यप याने आपण सतरा वर्षाचे असल्याचे सांगितलं. मात्र आधारकार्डप्रमाणे आरोपीचं वय हे 21 वर्ष असल्याचं समोर आलं. मात्र आरोपीच्या वकीलाकडून आर्ग्युमेंट होत असल्यामुळे अखेर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यात तो अल्पवयीन नसल्याचं समोर आलं. न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.  

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link