Breaking News LIVE: लालबाग राजाच्या चरणी भाविकांकडून करोडोंचं दान
Maharashtra Breaking News LIVE: सार्वजनिक गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशीसाठी सारे सज्ज. राज्यात इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष?
Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.
Latest Updates
लालबाग राजाच्या चरणी भाविकांकडून करोडोंचं दान
मुंबईतील दरवर्षी हजारो भक्त गणेशोत्सवाच्या काळात लालबाग राजाच्या दर्शनाला येत असतात. सोबतच भरभरून दान सुद्धा करतात. यंदाही भक्तांनी लालबाग राजाच्या चरणी करोडोंचं दान दिलं असून दानपेटीत एकूण ५ कोटी ५ लाखांची रोकड जमा झाली आहे. तर ३८५७.६१० ग्रॅम सोनं आणि ५६ किलो ४६३ ग्रॅम चांदी गणरायाच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे. यात 1 किलो सोन्याच्या कॅटबरीचा ही समावेश आहे.
धनगर समाज आरक्षणाच्या उपोषण स्थळी तरुणाने प्यायले विष
धनगर समाज आरक्षणाच्या उपोषण स्थळी आणखी एका तरुणाने विषारी औषध प्यायले आहे. या तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विष प्यायलेल्या तरुणाची नाव संजय चौगुले, ईश्वर वठार अशी असून दोघेही पंढरपूर येथील राहणारे आहेत.
मुंबईत साथीच्या आजारांचं थैमान, चिकुनगुनियाची रुग्णसंख्या 78 वर
मुंबईत साथींच्या आजारांचा धोका वाढत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईत चिकुनगुनियाचे रुग्ण दुपटीने वाढले असून यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच चिकुनगुनियाची रुग्णसंख्या ७८ वर गेली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच डेंग्यु, मलेरिया, गॅस्ट्रो आणि चिकुनगुनीयाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डासांमुळे होणा-या साथीच्या आजारांबाबत जनजागृतीसाठी बीएमसीकडून मुंबईत `भाग मच्छर भाग´ ही मोहीम राबवली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील रुग्णसंख्या- मलेरिया 652, डेंग्यु 705, गॅस्ट्रो 326, चिकुनगुनिया 78
सिडकोच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची नियुक्ती
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आता शक्य नसल्याने संजय शिरसाट याना अखेर सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते, तसंच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवेळी शिरसाट यांचे नाव सतत चर्चेत असायचे मात्र आता मंत्रिपद देणं शक्य नसल्याने सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
उरण मधील ONGC च्या पाईप लाईन मधून तेल गळती
उरण मधील ONGC च्या पाईप लाईन मधून आज सोमवारी तेल गळती झाली. पिरवाडी समुद्र किनारी खोल समुद्रातून ONGC प्रकल्पस्थळी येणाऱ्या पाईप लाईन मधून गळती झाली आहे. लिकेज काढण्यात ONGC कर्मचाऱ्यांना यश आले असून तात्काळ नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या पाईप लाईन दुरुस्थिचे काम सुरु असून संपूर्ण इन्स्पेकशन नंतरच तेल पुन्हा पाईप लाईन द्वारे ONGC प्रकल्पस्थळी सोडण्यात येणार.
उरण मधील ONGC च्या पाईप लाईन मधून तेल गळती
उरण मधील ONGC च्या पाईप लाईन मधून आज सोमवारी तेल गळती झाली. पिरवाडी समुद्र किनारी खोल समुद्रातून ONGC प्रकल्पस्थळी येणाऱ्या पाईप लाईन मधून गळती झाली आहे. लिकेज काढण्यात ONGC कर्मचाऱ्यांना यश आले असून तात्काळ नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या पाईप लाईन दुरुस्थिचे काम सुरु असून संपूर्ण इन्स्पेकशन नंतरच तेल पुन्हा पाईप लाईन द्वारे ONGC प्रकल्पस्थळी सोडण्यात येणार.
अरविंद केजरीवाल उद्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर रविवारी आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी केजरीवाल यांनी आपण पुढील दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असे म्हटले. यानुसार केजरीवालांनी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे वेळ मागितला मागितला असून उद्या केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत आज पासून सुरू होणार
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सोमवार 16 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या पहिल्या वंदे भारतला पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा कंदील दाखवणार असून याला नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत आज पासून सुरू होणार
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सोमवार 16 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या पहिल्या वंदे भारतला पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा कंदील दाखवणार असून याला नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत आज पासून सुरू होणार
नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सोमवार 16 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या पहिल्या वंदे भारतला पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा कंदील दाखवणार असून याला नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra Breaking News LIVE: मुख्यमंत्री लालबागच्या राजाच्या दर्शनाला
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेसळी गणरायाचरणी नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांनी बाप्पाचा आशीर्वाद घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांसह तिथं असणाऱ्या गणेशभक्तांचं अभिवादनही स्वीकारलं.
Mharashtra Breaking News LIVE : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, झाल्यानं प्रवाशांटे हाल. कळवा- मुंब्रा रेल्वे स्थानक मध्ये ओव्हर हेड वायरचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दोन्ही बाजूच्या जलद वाहतूक ठप्प. प्लॅटफॉर्म 5 व 6 वरील जलद गाड्यांची वाहतूक थांबली.
Maharashtra Breaking News LIVE: जळगाव - भाजपला मोठा धक्का?
आगामी विधानसभेच्या धर्तीवर आता घडामोडींना वेग आला असून, जामनेरचे भाजप नेते दिलीप खोडपे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच वेळात शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. जामनेरमधून गिरीष महाजन यांच्याविरोधात लढण्याची चर्चा आहे.
Maharashtra Breaking News LIVE: शरद पवारांनी मागितली मुख्यमंत्र्यांची वेळ
ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी मागितली मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ. स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्यासाठी वेळ हवी अशी मागणी त्यांनी केली असून X च्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.
Maharashtra Breaking News LIVE: खेड आळंदीत मोहिते पाटलांना विरोध करत महायुतीत जुंपली
दिलीप मोहितेपाटील दिलेला शब्द पाळणारा आमदार. कारण दिलीप मोहितेपाटील पुन्हा उभं रहाणार नाही त्यांना त्यांचा पराभव दिसतो त्यामुळे अजित पवारांनी दिलेले मंत्रीपदाचे आश्वासन म्हणजे गाजर दाखवलंय जात असं म्हणत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी मोहितेपाटीलांवर निशाना साधलाय 2019 च्या निवडणुकीत मोहितेपाटीलांनी जनतेला पुन्हा उभं रहाणार नसल्याचे दिले होते आश्वासन यावरुन शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी मोहितेपाटलांना तिकिटच मिळणार नसल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
Maharashtra Breaking News LIVE: वर्ध्याच्या सामन्य रुग्णालयात बनावट औषध पुरवठा प्रकरण
सामान्य रुग्णालयातून अन्न व औषध प्रशासनाकडून बनवट औषधांचा साठा पुन्हा एकदा जप्त केलाय. काही महिन्यांपूर्वी येथेच आठ हजार टॅबलेट बनावट असल्याचे उघड झाले होते. आता पुन्हा एफडीए ने केलेल्या कारवाईत सहा लाख तीस हजार बनावट टॅबलेटचा पुरवठा झाल्याची बाब समोर आली आहे. बनावट टॅबलेट चा पुरवठा करणाऱ्या चार एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ठाणे येथील काबीज जेनेरिक हाऊस,भिवंडी येथील अक्वेटिस बायोटेक, तर सुरत आणि दिंडोली येथील पुरवठादार फर्मासिक्स बायोटेक वर वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट औषध पुरवठा करणारे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Maharashtra Breaking News LIVE: लालबागच्या राजाची दर्शन रांग बंद
लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या पूर्व तयारीसाठी लालबागच्या राजाची चरण स्पर्शची रांग सोमवारी पहाटे 6 वाजता बंद करण्यात आली आहे. तसेच मुखदर्शनाची रांग रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार आहे. उद्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे. आज रोजच्या तुलनेत लालबागच्या परिसरात भाविकांची गर्दी कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे.
Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवादरम्यान पुणेकरांनी रचला नवा विक्रम
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणेमेट्रोने प्रवाशांचा नवा विक्रम केला आहे. शनिवारी एका दिवसात तब्बल 2 लाख 78 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. पुणे मेट्रोच्या इतिहासात हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. गणेशोत्सवाला लाखो भाविक पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध देखावे बघण्यासाठी येतायत. यंदाच्या वर्षी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर मेट्रो सेवा सुरू आहे. शनिवारी सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 2 लाख 78 हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला.
Maharashtra Breaking News LIVE: 25 सप्टेंबरला राज्यातील शाळा बंद
शिक्षक संचमान्यतेचा 15 मार्च 2024 चा आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.
Maharashtra Breaking News LIVE: कर्जतमध्ये ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला दिला धक्का
कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसलाय. 200 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका प्राची डेरवणकर, शहर समन्वयक संजय मोहिते सुदेश देवधरे मनोज जाधव अशा प्रमुख नेत्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नेतृत्व मान्य करीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हादरा बसलाय.
Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील 2 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात?
राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केलाय. ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय रदद करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. येत्या 25 सप्टेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामुहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे आज रात्री 12 वाजेपासून आमरण उपोषण सुरु करणार
मनोज जरांगे पाटील आज रात्री 12 वाजेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु करणार आहेत.गेल्या वर्षभरात जरांगे यांनी 5 उपोषणं केली असून आजचं त्यांचं हे 6 वं उपोषण असेल.हैद्राबाद, सातारा संस्थान आणि बॉंबे संस्थानसह सगे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी जरांगे यांनी केली आहे.दरम्यान ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्यासह अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसण्याचा ईशारा दिलाय. 57 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी आम्ही उपोषण करणार असून जरांगे यांनी उपोषण सुरु केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हीही उपोषण सुरू करु असा ईशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिला.
Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज
गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून मिरवणूक जाणार आहे...मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेसहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
कसा असणार पोलीस बंदोबस्त
अतिरिक्त पोलीस आयुक्त : 4
पोलीस उपायुक्त : 10
सहायक पोलीस आयुक्त : 25
पोलीस निरीक्षक : 135
पोलीस कर्मचारी : पाच हजार 709
राज्य राखीव पोलीस दल : एक तुकडी
गृहरक्षक दलाचे जवान : 394
Maharashtra Breaking News LIVE: कोल्हापुरात 9 वर्षांच्या चिमुकलीवर 73 वर्षांच्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार
खाजगी क्लास मध्ये शिकत असणाऱ्या नववर्षीय चिमुकलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खाजगी क्लास मध्ये 73 वर्षीय श्रीपती भोसले या इसमाने क्लासमध्ये बोलावून संबंधित बालिकेवर अत्याचार केल्याचा गुन्हा राधानगरी पोलिसात दाखल करण्यात आलाय. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या 73 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राधानगरी पोलिसांनी श्रीपती भोसले याला अटक केली आहे.
Maharashtra Breaking News LIVE: धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
Maharashtra Breaking News LIVE: अजित पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी लालबाग राजाचं दर्शन घेतलं. सकाळी सकाळीच अजित पवार लालबाग राजाच्या दर्शनाला आले.
Maharashtra Breaking News LIVE: हे तर गळती सरकार; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर घणाघात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्य तसंच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा संदर्भ देत, त्यांनी वा-याने पुतळा कोसळतो, लोकसभा गळते, राममंदिरही गळतंय, हे गळती सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
Maharashtra Breaking News LIVE: पुन्हा मराठ्यांचा एल्गार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा ऐल्गार. अंतरवाली सराटीतून आजपासून आमरण उपोषण करणार आहेत.