Maharashtra Breaking News LIVE : आनंदाचा शिधा कंत्राट प्रकरणी राज्य सरकारला हायकोर्टाकडून मोठा दिलासा

दक्षता ठसाळे-घोसाळकर Mon, 02 Sep 2024-7:23 pm,

महाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे ताजे अपडेट पाहा झी 24 तासवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 01  महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • नाशिकमध्ये महायुतीत उमेदवारांची रस्सीखेच 

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महायुतीत उमेदवारांची रस्सीखेच पाहायला मिळतेय.. नाशिक मध्य विधानसभेवर अजित पवार गटानं दावा ठोकलाय.. सध्या महायुतीत नाशिक मध्य मतदारसंघ भाजपकडे आहे.. या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा ठोकल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.. राष्ट्रवादीची ताकद दाखविण्यासाठी मतदारसंघातील पदाधिका-यांची मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली होती.

  • बारामतीतून जय पवारांना उमेदवारी?

    अजित पवारांतर्फे बारामतीत जोरदार शक्तिप्रर्शन करण्यात आलं.. भव्य रॅली काढून अजित पवारांनी शक्तिप्रदर्शन केलं.. बारामतीत अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा झाली.. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत जय पवार सहभागी झाले.. झी 24 तासशी बोलतांना  जय पवार यांनी मोठं विधान केलंय. बारामतीतून उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. पण अजित पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया जय पवारांनी दिलीय.

  • वाढवणं बंदरात पर्यटनाला देणार चालना- अजित पवार

    जगातील दहा पैकी एक  वाढवणं बंदर  होत आहे. देशातील जगात आपला माल विकण्यासाठी या बंदराचा मोठा फायदा होणार आहे.यास 76 हजार कोटी खर्च करुन तो तयार केला जात आहे. फलटण शहरात रिंग रोड असेल फलटण पंढरपूर रेल्वे ब्रॉड गेज तयार केला जातोय. पर्यटनाला चालना देण्यासाठी या भागात विकास करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

  • येत्या काळात आणखी महापुरुषांचे पुतळे पडतील- आमदार संजय शिरसाठ

  • अजित पवारांचे भावी सीएम बॅनर

    अजित पवारांच्या बॅनरची राज्यभरात चर्चा होत आहे. बारामतीत अजित पवारांचे शक्तीप्रदर्शन. राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर बारामतीत झळकत आहेत. 

     

  • हार्बर मार्गावरील डाऊन लोकल सेवा विस्कळीत

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बेलापूर स्थानकाजवळ ओव्हर हेडवायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळित

     

  • पुण्यात माजी नगरसेवक वरदान आंदेकर यांची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद 

  • पुण्यात गेल्या 12 तासांत दोन हत्या 

  • परभणीत पावसाचा धुमाकूळ सुरु झाला आहे. पावसाच्या पाण्यात बस वाहून गेली आणि पुढे जाऊन अडकली. 

  • आंध्र, तेलंगणातील पावसामुळे 100 रेल्वे रद्द 

    दक्षिण भारतात पडत असलेल्या सततच्या पावसाचा फटका रेल्वे प्रवासाला बसला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात झालेल्या जोरदार पावसामुळं 100 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आजही हवामान खात्याकडून अलर्ट दिला गेला असल्यान प्रशासन सज्ज झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून सर्व मदत करणार असल्याची ग्वाही दिली आहे. 

  • नितेश राणेंवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल 

    मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी आ.नितेश राणे यांच्यासह आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यावर अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिदमध्ये घुसून एका एकाला मारू असं नितेश राणेंनी वक्तव्य केलं होतं. अहमदनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  • राजकोट महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावर संजय राऊत 

    शिवरायांच्या इतिहासावर भाजपनं चिंतन करावं - राऊत 
    महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही 
    मावळ्यांचं राज्य तुम्ही नष्ट करायला निघालेत 
    नाही तर आम्ही फडणवीसांकडे इतिहासाचा मास्तर पाठवू 

  • शिवरायांचा अपमान का केला? फडणवीसांचा इतिहास वेगळा - राऊत 
    औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन फडणवीस आहेत
    केसरकरांवर पुन्हा एकदा राऊतांचा हल्लाबोल 
    पुण्यात खुलेआम गुंडगिरी सुरु असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणावर दिली प्रतिक्रिया. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुंडगिरीवर बोलावं असं देखील संजय राऊत म्हणाले. 

  • शिवरायांचा अपमान का केला? फडणवीसांचा इतिहास वेगळा - राऊत 

  •  सोमवती अमावस्येच्या निमित्ताने महिलांची रामकुंडावर गर्दी 

    आज सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने रामकुंडावर मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी स्नानासाठी झाली आहे. अखेरचा सोमवार आणि अमावस्येचा पर्वकाल सादर संपूर्ण जिल्ह्यातून भावी रामकुंड परिसरात तसंच त्र्यंबकेश्वरात दाखल झाले आहेत. त्र्यंबकेश्वरातील रामकुंडावरही अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते

  • लालबाग बेस्ट अपघात प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा ट्विट

    मुंबईत बेस्ट प्रशासनाच्या 66 क्रमांकाच्या बसमध्ये लालबाग परिसरात एका मद्यधुंद प्रवाशाने चालकाशी हुज्जत घालून बसच्या स्टेअरिंगला हात घातल्याने अपघात होऊन काही पादचारी तथा वाहनचालक जखमी झाल्याची घटना घडली. हा अतिशय दुर्दैवी व दुःखद प्रकार आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर तातडीने कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरू असून ते सुखरूप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • चिंतामणीच्या आगमनावेळी भक्तांची मोबाईल, सोन्याची चैन चोरी

    चिंतामणीच्या आगमनावेळी भक्तांची मोबाईल, सोन्याची चैन चोरी केल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सहापेक्षा जास्त गुन्हे नोंद केले असून चोरी करणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शनिवारी चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला यावेळी गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशात चोरट्याने गर्दीमध्ये हात सफाई केल्याची माहिती मिळते

    चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाच्या वेळी चोरट्याने हातसफाई केल्याची घटना घडली आहे. चोरट्याने भक्तांचे मोबाईल, सोन्याची चैन चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सहा गुन्हे नोंद केले आहे. तर चोरी करणाऱ्या सुनील म्हस्केला काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

    लालबाग परळमधील प्रसिद्ध गणेश मंडळापैकी एक चिंचपोकळीचा चिंतामणी. शनिवारी चिंतामणीचा आगमन सोहळा होता. या सोहळ्यासाठी वाहतुकीत देखील तात्पुरते बदल करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविक लाडक्या बाप्पाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी दूरदूरहून आले होते. ढोलताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत चोरट्याने चांगलीच हातसफाई केली. गर्दीत नाचत असतानाच चोरट्याने भाविकांचे मोबाईल, सोनसाखळी, पाकीट चोरले. सहा जणांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे.

  • वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यात 

    पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर प्रकरणात 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. कौटुंबिक वाद आणि पैस यावरून हा खून केल्याचा पोलिसांना संशय असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या ३ जणांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि मग कोयत्यांनी वार करुन हत्या केली. वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

  • पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा

    पुणे जिल्ह्यातील ४ धरणात मिळून २८ टी एम सी पाणी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    टेमघर धरणात १०० टक्के पाणीसाठा

    खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सध्या बंद

    खडकवासला: ९३.३१ टक्के

    पानशेत: ९८.९७ टक्के

    वरसगाव: ९९.१० टक्के

    टेमघर: १०० टक्के

  • पाटबंधारे विभागाकडून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    पाटबंधारे विभागाकडून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी ची पाणीपातळी वाढली आहे, त्यात वरच्या धरणातून मोठी आवक सुरुय त्यामुळं कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो, नदी काठ वरील गावांनी सतर्क राहावे, पशुधन किनाऱ्यापासून दूर ठेवावे।।।

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     जायकवाडी पैठण

                 2 सप्टेंबर 2024 
          सकाळी : 6:00  वाजता
    ▶️  पाणी पातळी : 87:03%
    ▶️ फुटात  :1519:56 (1522 पैकी )
     
    ▶️ पाण्याची आवक 34 हाजार 338 क्युसेक
    ▶️ उजवा कालवा माजलगाव धरणासाठी: 700 क्यूसेक पाणी सोड

  • पुण्यात बारा तासात दुसरा खून

    पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर मध्यरात्री फायनँस मॅनेजरची हत्या करण्यात आली आहे. वासुदेव कुलकर्णी असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून कुलकर्णी यांची हत्या केली. 

    नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा पुण्यात दुसरी खूनाची घटना. चाळीस वर्षीय वासुदेव कुलकर्णी हे पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत का कुणाचं कारण अद्यापि स्पष्ट झालं नाही.

  • अजित पवार आज फलटणमध्ये, संध्याकाळी 4 वाजता बैठक 

    फलटण येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
    फलटण येथील अनंतराज मंगल कार्यालयात संध्याकाळी 4 वाजता ही बैठक आयोजित केली आहे या कार्यक्रमासाठी फलटण आणि बारामतीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
    या बैठकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ.जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचला जाणार आहे.

     

  • राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस 

    राज्यात काही ठिकाणी पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीच्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी प्रसिद्ध केला. या अंदाजानुसार राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्याचा जोर साधारण 4 सप्टेंबरपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या

    वनराज आंदेकर यांच्यावर 5 राउंड फायर करून कोयत्याने वारही करण्यात आले. उपचारादरम्यान वनराज यांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि वर्चस्वाच्या वादातून हत्या करण्यात आलीय आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी फारार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

  •  राष्ट्रपती द्रोपदी मुर्म कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर 

     राष्ट्रपती द्रोपदी मुर्म कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असून ते वारणानगर इथल्या महिला सन्मान मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रपती करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link