Breaking News LIVE Updates: जालन्यात मोसंबी ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Fri, 20 Sep 2024-9:57 am,

Maharashtra Breaking News Live: महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील राजकारण, समाजकारणाबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एकाच ठिकाणी...

Latest Updates

  • मुंबईतील 'या' 3 जागांसाठी महायुतीमधील 3 पक्ष आग्रही

    कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या तीन विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही आग्रही असल्याची सूत्रांची माहिती

    काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट त्यांच्यामध्ये एकूण सहा जागांवर रस्सीखेच
    1)भायखळा
    2)कुर्ला
    3) घाटकोपर पश्चिम
    4)वर्सोवा
    5) जोगेश्वरी पूर्व
    6) माहीम

  • जालन्यात मोसंबी ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

    जालना-बीड मार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. अंबड पासून 10 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.  बस आणि ट्रक मध्ये जखमींना स्थानिक नागरिक बाहेर काढलं आहे. बसमध्ये 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते. मठ तांडा येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • मुख्यमंत्री वयोश्री योजनेत सर्वाधिक अर्ज पुण्यातून

    मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यात 10 लाख ज्येष्ठांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातील आहेत. पुण्यातील जवळपास अडीच लाख ज्येष्ठ नागरिकांनी भरला वयोश्री योजनेचा अर्ज भरला आहे. समाज कल्याण विभागाकडून अर्जाची छाननी सुरु झाली आहे. ज्येष्ठ नागरिकाला बचत गटातून थेट 3 हजार रुपयाचं वितरण होणार आहे. 

  • कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव

    गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरुपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने सोमवारपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश देऊन डॉ. रानडे यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.

  • ...म्हणून पुण्यात पॅराग्लायडिंग, ड्रोन, हेलिकॉप्टर उड्डाण बंदी

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौराच्या पार्श्वभूमीवर 26 आणि 27 सप्टेंबर रोजी खाजगी अवकाश उड्डानांना मनाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन आणि इतर खाजगी हेलिकॉप्टर आणि विमान अवकाश उड्डाणांवर बंदीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

  • नागपूरमधील गणपती विसर्जन मिरवणुकीत 11 महिला भाजल्या

    उमरेडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत फटाक्यामुळे 11 महिला भाजल्याची दुर्घटना घडली आहे. विसर्जन मिरवणुकीत फटाके आतिषबाजी सुरू असताना ही दुर्घटना घडली. गर्दीत असुरक्षित पद्धतीने ही फटाक्यांची ही आतिषबाजी सुरू असताना दुर्घटना घडली. काही महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. फटाक्यांची मोठी आतिषबाजी करताना परवानगी घेतली नव्हती व सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाही करण्यात आल्या नसल्याचही माहिती पुढे येत आहे.

  • पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतून 300 मोबाईल चोरीला

    पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरीच्या अनेक घटना असून गणपती मिरवणुकीदरम्यान 300 जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्यात. नाशिकमध्ये पकडलेल्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीकडून हजारोच्या संख्येत मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

  • बदलापूर अत्याचार प्रकरणात चार्जशीट दाखल

    एसआयटीकडून कल्याण सत्र न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. एसआयटीच्या प्रमुख आयपीएस अधिकारी आरती सिंग यांनी ही पुष्टी केली आहे. दोन गुन्ह्यांच्या दोन स्वतंत्र चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. यात विविध तांत्रिक पुरावे, जबाब समाविष्ट असलेली 500 पेक्षा जास्त पानांची चार्जशीट दाखल केली आहे. या सोबतच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील देण्याचीही मागणी एसआयटीने राज्य सरकारकडे केली आहे. 

  • पुण्यातून आता या दोन देशांसाठी थेट फ्लाइट

    पुणे विमानतळावरून दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासासाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या 27 ऑक्टोबर पासून सुरु होत आहेत. पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे अशा दोन मार्गांवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होत आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करून पुण्यातून दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत असल्याचे जाहीर केला आहे.

  • श्रीकांत शिंदेंच्या जनसंवाद यात्रेचा आज तिसरा टप्पा

    शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा आज पार पडत असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत आजी - माजी खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेना विभाग स्तरावरील पदाधिकारी, विधानसभा स्तरावरील पदाधिकारी, उपविभाग स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  • नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

    नांदेड लोकसभा पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा काँग्रेसचे रमेश चेन्निताल घेणार आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासह अनेक नेते या आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 12 वाजता टिळक भवनमध्ये ही बैठक पार पडणार आहे.

     

  • महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक

    दुपारी तीन वाजता बीकेसी सोफिटल येथे महाविकास आघाडी जागा वाटप चर्चा बैठक होणार.

  • महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार -

    - 24 आणि 25 सप्टेंबर रोजी अमित शाह महाराष्ट्रात

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये होणार महायुतीची अत्यंत महत्त्वाची बैठक

    - संभाजीनगरला होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत होणार महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

    - मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह निवडक नेत्यांची अमित शाहांसोबत बैठक

    - दोन दिवसीय दौऱ्यात शाह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशीही शाह संवाद साधणार

  • सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांचं मतदारांना पत्र

    22 सप्टेंबर रोजी सिनेटची निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीत ठाकरेंची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची थेट लढत होणार आहे. मागील 2 निवडणुकांप्रमाणेच, यंदाही युवासेनेने सर्व 10 उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत आणि मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की तुमचे प्रेम आणि तुमची मते आम्हाला आशीर्वाद म्हणून नक्की द्या. सिनेट निवडणुकीत मतदान करताना तुम्ही भावी पिढ्यासाठी योग्य निर्णय घेण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी सिनेट मतदारांना केली आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link