Maharashtra Breaking News LIVE :बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

Tue, 20 Aug 2024-9:09 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत. राज्यासह देश-विदेशातील इतर घडामोडींचा आढावा जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत. राज्यासह देश-विदेशातील इतर घडामोडींचा आढावा जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 

Latest Updates

  • बदलापूर अत्याचार दुर्घटना प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

    वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली होणार तपास

  • अखेर बदलापूर स्थानकावरुन लोकल रवाना, 10 तासांनी लोकल कर्जतच्या दिशेने रवाना

  • कर्जत आणि कल्याण रेल्वे स्थानकावरून बदलापूरच्या दिशेने बदलापूरच्या दिशेने इंजिन  टेस्टिंग पाठवणार आहे,  इंजिन पास झाल्यानंतर लोकल सेवा सुरू होणार

     

  • भाजपाकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

    - भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी
    - धैर्यशील पाटील यांनी 2023 मध्ये शेकाप मधून भाजप मध्ये प्रवेश केला
    - 2014 ला पेण मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. 
    -  2019 च्या विधानसभा  निवडणुकीत झाला होता पराभव

  • बदलापूरमध्ये पोलिसांकडून आंदोलक प्रवाशांवर लाठीचार्ज सुुरु, प्रवाशांकडून पोलिसांवर दगडफेक

  • बदलापूर प्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह हेडकॉन्स्टेबलचं निलंबन, फडणवीसांचे आदेश

    बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना आदेश दिले आहेत. 

  • नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात दोन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    25 ऑगस्टला लखपती दीदी कार्यक्रमाला पंतप्रधान यांची हजेरी

    30 ऑगस्ट ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा महाराष्ट्र दौरा

    वाढवण बंदर भूमिपूजनाचा कार्यक्रम 30 तारखेला होणार

  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बदलापूरला रवाना

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन घटनास्थळी भेट देणार

    थोड्याच वेळात पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार

    पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवाद साधणार

    परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गिरीश महाजन मैदानात

    आंदोलनकर्त्यांसोबतही गिरीश महाजन करणार चर्चा

  • पुणे - पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनमधून दोघांना अटक 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    दोघांना आज कोर्टात हजर केलं आहे

    रक्त चाचणी फेरफार प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली आहे

  • घटनांचा राजकारणासाठी वापर- ठाकरे 

    देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या तर त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास SIT करणार

    बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. 
    दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर अत्याचार प्रकरणः संतप्त पालकांकडून पोलिसांवर दगडफेक

    बदलापूर अत्याचार प्रकरणात पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज सकाळपासून शाळेच्या गेटवर ठिय्या मांडला होता. तर संतप्त पालकांनी रेल रोको केला. आता या प्रकरणी, संतप्त पालकांनी दगडफेक केली आहे. तर, पोलिसांनीही पालकांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर अत्याचार प्रकरणात 'त्या' शाळेला कारणे दाखवा नोटिस

    बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी अटक असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झालेली आहे. शाळेने संबंधितांना निलंबित केले आहे. आता ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल

    बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी अटक असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झालेली आहे. शाळेने संबंधितांना निलंबित केले आहे. आता या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: शाळेत तक्रारपेटी बसवण्यात येणार; केसरकरांची घोषणा

    बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज्यात तणावस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी  शाळेत तक्रारपेटी बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: कळवा, बदलापूर प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर प्रकरणी 2 तासात आरोपीला अटक; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया 

    बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
    हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर शहरातून पूल आंदोलकांनी बंद पाडला

    बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाण पूल संतप्त नागरिकांनी बंद केला

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा रेल रोको, वाहतूक ठप्प

    बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर बलात्कार प्रकरणी पालकांनी संतप्त भूमिका घेतली आहे. शाळेच्या गेटजवळ ठिय्या आंदोलनानंतर आता बदलापूरकरांनी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: महायुती हा शब्द गोंडस: संजय राऊतांचा टोला

    अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  तीन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही महायुती हा शब्द गोंडस आहे. ती युती नसून संघर्ष. रोज त्यांच्या मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापूरात मुलीवर अत्याचार; संतप्त नागरिकांचा रेल रोको

    बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील मुलीवरील अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांचा रेल रोको. आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रुळावर उतरून रेल्वे मार्ग धरला रोखून धरला.  प्रवाशांचं रेल्वे ट्रॅक वर उतरून आंदोलन बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा आंदोलन पीडित मुलींना न्याय मिळावा यासाठी

  • Maharashtra Breaking News LIVE: यूजीसी- नेट जून २०२४ परीक्षेच्या तारखेत बदल

    नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या (नेट) जून २०२४ परीक्षेच्या पुनर्परीक्षेच्या पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार २६ ऑगस्ट रोजी प्रस्तावित परीक्षा आता २७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: कोलकत्ता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आज सुनावणी

    कोलकत्ता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी संपूर्ण प्रकरणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सकाळी साडेदहा वाजता सुनावणी.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर होणार सुनावणी. कोलकत्या मधील प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून घेतली आहे दखल. सीबीआयचे वकीलही सुप्रीम कोर्टात उपस्थित राहणार

  • Maharashtra Breaking News LIVE: कोलकत्ता बलात्कार प्रकरण; प. बंगाल सरकारनं एसआयटी केली स्थापन

    आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. एका महिन्यात समिती अहवाल सादर करणार. पोलिस महानिदेशक डॅा प्रणव कुमार एसआयटी प्रमुख असणार आहेत. तीन सदस्य एसआयटी मध्ये असतील

  • Maharashtra Breaking News LIVE: पुणे शहराचा पाणीपुरवठा येथे गुरुवारी बंद राहणार

    पुणे शहराचा पाणीपुरवठा येथे गुरुवारी बंद राहणार आहे. खडकवासला जॅकवेल तसेच पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह इतर ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद राहील. शुक्रवारी सकाळी उशिराने तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

  • Maharashtra Breaking News LIVE: अँटिलियाप्रकरणी एनआयच्या तपासाला सचिन वाझेचे आव्हान

    अँटिलिया स्फोटक प्रकरणात यूएपीए लागू करण्याच्या निर्णयाला तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एनआयएने केलेल्या तपासाला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
    याबाबत वाझे याने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. भारती डांग्रे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. तेव्हा खंडपीठाने एनआयएला याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले

  • Maharashtra Breaking News LIVE: कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज निकाल

    अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालय निकाल देणार आहे. आरोपींच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष आणि बचाव पक्षाने युक्तिवाद पूर्ण केला आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: राज ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा उद्या सकाळपासून सुरू होणार आहे.ते आज सायंकाळी सात वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहून गोंदियाकडे रवाना होणार आहेत. 21 तारखेला गोंदिया पासून सुरु होणारा हा दौरा 26 तारखेला बुलढाणा येथे संपणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: बीडच्या धारुर तालुक्यातील चोरांबा येथे सरस्वती नदीला पूर

    बीडच्या धारुर तालुक्यातील चोरांबा येथे नदीला पूर आला.धारूर तालुक्यातील चोरांबा येथे मुसळधार पाऊस पडल्याने येथील सरस्वती नदीला पूर आला आहे ‌.चोरांबा ते वडवणी तालुक्यातील चिंचवण मुख्य रस्ता वाहुन गेला आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर अत्याचार; पालकांचे शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन

    बदलापुरात एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केले होते. याप्रकरणी शाळा प्रशासनाने कोणतेही गांभीर्य न दाखवल्याने शाळा प्रशासनाच्या विरोधात बदलापूरकर आक्रमक झाले आहेत. आज सकाळ पासूनच पालकांसह बदलापूरकर नागरिकांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link