Maharashtra Breaking News LIVE : जाहीरनाम्यातून आमचं व्हिजन स्पष्ट - अजित पवार

दक्षता ठसाळे-घोसाळकर Wed, 06 Nov 2024-11:49 am,

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून सर्वच मतदारसंघांमधील लढाया कशा असतील हे निश्चित झालं आहे. आजपासूनच प्रचाराचा धुरळा उडणार आहे. निवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून सर्वच मतदारसंघांमधील लढाया कशा असतील हे निश्चित झालं आहे. आजपासूनच प्रचाराचा धुरळा उडणार आहे. निवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...


 

Latest Updates

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचं व्हिजन जाहीरनाम्यातून स्पष्ट केले. यावेळी बारामतीकरांना काय काय मिळणार याबाबत माहिती दिली. बारामतीला पहिलं सौर ऊर्जा शहर बनवणार असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच  
    कर्करोग उपचारासाठी बारामतीत रुग्णालय उभारणार असल्याचही यावेळी अजित पवार म्हणाले. 

  • राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन 
    प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र जाहीरनामा - अजित पवार 
    जाहीरनाम्यातून आमचं व्हिजन स्पष्ट - अजित पवार 
    मतदारसंघाचे 50 जाहीरनामे मांडणार 
    बारामतीमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारणार 

  • फडणवीसांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप 

    गांधींच्या भोवती अर्बन नक्षलवाद असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भारत जोडोत काही संघटना डाव्या विचारी, असा राहुल गांधींवर फडणवीसांचा गंभीर आरोप आहे. राहुल गांधींचा लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा दिला, असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे. 
    लोकांचं मन कलुषीत करण्याचं काम सुरु असल्याचा आरोप देखील केला आहे. राहुल गांधींचा दौरा हा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं देखील फडणवीस म्हणाले. 

  • अमरावतीमध्ये 5 किलो सोनं, चांदी जप्त करण्यात आले आहे. तिवसा चेकपोस्टवर पोलिसांची कारवाई करण्यात आली आहे. पडकलेले सोन्या-चांदीची किंमत 6 कोटींच्या घरात आहे. 

  • 'फडणवीसांनी स्वतःला अभिमन्यू म्हणत, आपण अयशस्वी असल्याच कबूल केलं' ,असा टोला प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी फडणवीस यांना लगावला आहे. 

  • नोव्हेंबर सुरू होऊनही भाज्यांचे 50 टक्के वाढलेलेच आहेत. टोमॅटो, फरसबी, काकडी, तोंडली वगळता सर्वच भाज्यांनी शंभरीचा उंबरठा गाठला आहे. दिवाळीआधी भाज्यांचे दर वाढले होते. नोव्हेंबरच्या तोंडावर भाज्यांचे दर कमी होतील, अशी अपेक्षा असताना हे दर अद्याप कमी झाले नसल्याने सर्वसामान्यांत नाराजी आहे. सध्या नवीन भाज्यांची आवक सुरू झाली नाही. भाज्यांचे दर कमी व्हायला अजून 15 दिवस लागण्याची शक्यता आहे. 50 टक्क्यांनी आवक घटल्याने दर वाढलेले आहेत

  • मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज तीन सभा घेणार आहेत. लातूर जिल्ह्यातील रेणापुरात राज ठकरेंची आजची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर दिलीप धोत्रेंच्या प्रचारासाठी ते पंढपुरात प्रचारसभा घेणार आहेत. त्यानंतर  संध्याकाळी अमरावतीमध्ये पप्पू पाटील यांच्या प्रचारासाठी ते जाहीर सभा घेणार आहेत.

  • 'शरद पवार हे जातीपातीमध्ये द्वेष पसरविणारे संत आहेत' असा टोला राज ठाकरेंनी यवतमाळच्या राळेगावमधील सभेत लगावला आहे. 'माझं सरकार आल्यावर असल्या फुकट गोष्टी मिळणार नाही, मी महिलांना सक्षम करेन, हाताला काम देईल असाही विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

  • मनोज जरांगे आज एकदिवसीय बीड जिल्हा दौ-यावर आहेत. तलवाडा येथील त्वरिता देवीचं दर्शन घेऊन जरांगे या दौ-याला सुरुवात करणारेत. जरांगे एकाच दिवशी 19 गावात भेटी गाठी घेणार आहेत.  

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज वाशिमच्या दौ-यावर आहेत. याठिकाणी त्यांची प्रचार सभा पार पडणार आहे.  महायुतीतील भाजपचे उमेदवार शाम खोडेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 12 वाजता ही सभा होणार आहे. 

  • काँग्रेस नेते राहुल गांधी आज नागपूर दौ-यावर आहेत. ते दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत. यावेळी राहुल गांधी संविधान संमेलन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. 

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी 1 वाजता ठाण्यातील प्रमुख पदाधिका-यांसोबत बैठक घेणार आहेत. विधानसभेतील महायुतीचे 4 उमेदवार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा आणि कळवा मुंब्रा विधानसभेतील पदाधिका-यांसोबत ही बैठक असेल. 

  • राहुल गांधी आज महाराष्ट्रात

    आज राहुल गांधी नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनात सहभागी होणार आहेत. संध्याकाळी बीकेसीत मविआची जाहीर सभा देखील होणार आहे. बीकेसीत राहुल गांधींची स्वाभिमान सभा होणार असून मविआचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे या सभेला उपस्थित राहणार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link