Maharashtra Breaking News LIVE: गीता गवळी ठाकरेंच्या संपर्कात

Thu, 03 Oct 2024-4:41 pm,

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घेऊया या लाइव्ह ब्लॉगमधून

Maharashtra Breaking News LIVE: आजपासून राज्यात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. राज्यात चैतन्याचे वातावरण आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींनाही वेग आला आहे. 

Latest Updates

  •  Maharashtra Breaking News LIVE: गीता गवळी ठाकरेंच्या संपर्कात 

    अरुण गवळींची मुलगी गीता गवळी ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. गीता गवळी यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: आई भवानी..सावत्र भावांना सुद्धबुद्धी दे - एकनाथ शिंदे

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज  बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा बुलडाणा जिल्हा दौरा होता. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, नवरात्र उत्सवात आई भवानी सावत्र भावांना सूदबुद्धी दे, लाडकी बहीण योजनेत कोणताही खोडा आणू नये, तसे विघ्न आणले तरी कुठलेही फरक पडणार नाही. ही योजना चालूच राहणार असे ते म्हणाले. 

  • Maharashtra Breaking News LIVE: हैदराबाद गॅझेटमध्ये स्वतंत्र कुणबी नोंदी सापडत नसल्याचा चंद्रकांत पाटील यांचा दावा

    हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबीच्या स्वतंत्र नोंदी सापडत नाहीत परंतु मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा कुणबी नोंदी वाढल्या असं सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हैदराबाद गॅझेटच्या कुणबी नोंदीबाबत अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित केला आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी? 

    पश्चिम महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: जागा वाटपाचा तिढा दसऱ्यापूर्वी सुटेल : चंद्रकांत पाटील

    महायुतीमध्ये जागा वाटपाचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत .फडणवीस हे मुख्यमंत्री व अजित पवार यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा करत आहेत . 10 ते 12 जागा वगळता एकमत झाले आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा प्रश्न लवकरच म्हणजे दसऱ्यापूर्वीच सुटेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: राज्य सरकार अकार्यक्षम : नाना पटोले

    महाराष्ट्रात हे न थांबणार काम आहे. कारण राज्यातील सरकार अकार्यक्षम आहे. महिलांवरील अत्याचार राज्यात वाढत आहेत. हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणार आहे. बदलापूर प्रकरणात उच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला ट्रस्टी कुठे गेले आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापुरात अंतर्गत भाजपच्या बैठकीत गोंधळ

    बदलापुरात भाजपच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. विधानसभेच्या उमेदवारांची नावे देण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. यावेळी भाजप आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ झाला.

  • Maharashtra Breaking News LIVE: मशाल हाती घे, सत्वर भुवरीये.., ठाकरेंच्या शिवसेनेचं मशाल गीत लॉन्च

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मशाल गीत लॉन्च करण्यात आलं आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: राज्यात अराजकता सुरू आहेः उद्धव ठाकरेंची टीका

     

  • Maharashtra Breaking News LIVE: उद्धव ठाकरेंच्या सेनेचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार

    शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा दसरा पार्कवरच होणार आहे. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने परवानगी दिली आहे. पक्षाने 14 मार्चला परवानगी मागितली होती. त्यानंतर तीन स्मरणपत्रेही पालिकेला पाठवली होती. 

  • Maharashtra Breaking News LIVE: ग्रँण्ट रोडवरील युनायटेड चेंबर इमारतीचा स्लॅब कोसळला

    ग्रँण्ट रोडवरील युनायटेड चेंबर इमारतीचा स्लॅब कोसळला. दुस-या व चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला असून काहीजण ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या

  • Maharashtra Breaking News LIVE:  'स्वराज्य पक्षाचे पहिलं आंदोलन हे अरबी समुद्रात शिवस्मारक झाले आहे का हे पाहण्यासाठी'

    महाराष्ट्र स्वराज पक्षाची स्थापना तीन दिवसांपूर्वी झाली आहे. स्वराज्य संघटना म्हणून आम्ही यापूर्वी पुढे जात होतो, पण आता मात्र स्वराज्य पक्ष म्हणून आम्ही पुढे जात आहोत. स्वराज्य पक्षाचे पहिलं आंदोलन हे अरबी समुद्रात शिवस्मारक झाले आहे का हे पाहण्यासाठी आहे. 11 तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्वराज्य पक्षाचे लॉन्चिंग पुण्यात करणार आहे , त्यानंतर नाशिक नांदेड आणि महाराष्ट्र दौरा असणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: दसरा मेळाव्याचे राजकीय अर्थ काढू नकाः जरांगे पाटील

    राज्यातील मराठयांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यासाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटल मधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: नाशिक शहरातील सिडकोची घरे फ्रीहोल्ड करण्याचा शासनाचा निर्णय 

    नाशिक शहरात तील सिडकोची घर फ्री होल्ड करावी अशी मागणी गेल्या दोन दशकांपासून होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिककरांची मागणी लक्षात घेऊन ही सर्व घरे फ्री होल्ड केल्याने आता सिडको धारक आत्यानंदीत झाले आहेत. त्यांना स्वतःच्या घराची जागा स्वतःच्या मालकीच्या नावावर मिळणार आहे. या निर्णयामुळे नाशिक शहरात गुलाल उधळून तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला

  • Maharashtra Breaking News LIVE: राज्यात शक्ती अभियान सुरू करणार; अजित पवारांची घोषणा

    बारामतीत जशा घटना घडतायत अशा घटना घडायला नको, याची काळजी घेण्यासाठी काही पावलं तातडीने उचलण्याची गरज आहे. आज सकाळी बारामतीमधल्या सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी माझी बैठक झाली. शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मुलींना आपली तक्रार मांडण्याकरता एसटी स्टँड कोचिंग क्लासेस शाळा हायस्कूल महाविद्यालय या ठिकाणी शक्ती बॉक्स तक्रारपेटी लावली जाणार

  • Maharashtra Breaking News LIVE:  सोलापूर जिल्ह्यात ज्योत घेऊन जाणाऱ्या देवी भक्तांवर काळाचा घाला

    तुळजापूरहुन मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे जाताना कामती येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात चारचाकी पिकअप पलटी झाला. या अपघातात प्रदीप क्षीरसागर आणि नेताजी कराळे हे दोघे जागीच ठार झाले आहेत. तर बाकीचे सहा जण आहेत गंभीर जखमी झाले आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE:  मविआतील लहान घटक पक्षांची ३० हून अधिक जागांची मागणी; सूत्रांची माहिती

    काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना हे तीन पक्ष सुमारे २८२ जागा आपल्याकडे ठेवतील, तर ऊर्वरीत पाच ते सहा जागा छोट्या घटक पक्षांना सोडण्याची शक्यता. मविआतील लहान घटक पक्षांची ३० हून अधिक जागांची मागणी असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: नागपूर शहर बससेवा ठप्प

    नागपूर शहर बससेवा ठप्प शहर बससेवेतील आपली बसचे कर्मचारी संपवार गेले आहेत. पगार वाढीच्या मागणीकरता आपली बस कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. मोरभवन बसस्टॅण्ड येथे आंदोलन सुरु आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: शिर्डी - कारची दुचाकीला जोराची धडक, एकाचा मृत्यू

    शिर्डी विमानतळ रस्त्यावर कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झालाय.. राहुल भाऊसाहेब विखे वय वर्षे 35, असे मयत युवकाचे नाव असून तो ड्युटीसाठी कोऱ्हाळे येथून शिर्डीकडे निघाला होता

  • Maharashtra Breaking News LIVE: अंबाबाई मंदिरात घटस्थापना केल्यानंतर नवरात्र उत्सवाला होणार सुरुवात

    साडेतीन शक्तीपीठापैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी झाली आहे.. सकाळी साडेआठ वाजता मंदिर परिसरात तोफेची सलामी दिल्यानंतर मंदिरात घटस्थापना केली जाणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: रेणुका मातेच्या माहुर गडावर आज दुपारी होणार घट स्थापना

    देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्हयातील माहूर गडावरील रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला आज पासुन सुरूवात झाली. नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी माहूर गडावर करतायत आली आहे. आज दुपारी साडे बारा वाजता गडावर विधिवत घट स्थापना केली जाणार आहे. घट स्थापने नंतर मुख्य पूजा होईल

  • Maharashtra Breaking News LIVE: राज ठाकरे शनिवारी-रविवारी नाशिक दौऱ्यावर

    विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता मनसेने देखील टॉप गिअर टाकला असून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून तसेच संभाव्य इच्छुकांची चाचणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रदीर्घ कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या शनिवार व रविवारी ५ व ६ ऑक्टोबर दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: कापूस आणि तुरीच्या शेतात गांजाची शेती, पोलिसांनी झाडे केली जप्त

    आदिवासी वन परिक्षेत्र असलेल्या ठिकाणी लावण्यात आलेली गांजाची झाडे पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यातील दिग्रस आणि डोंगरगाव शिवारात गांजाची झाडे पोलीसांनी पकडली. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शिवारात गांजाची शेती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

  • Maharashtra Breaking News LIVE: देवी तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान, पहाटे दोन वाजता पारंपारीक विधी करुन देवीची प्रतिष्ठापना 

    9 दिवसाच्या घोर निद्रेनंतर श्री तुळजाभवानी माता आज पहाटे दोन वाजता पलंगावरून सिंहासनावर विराजमान झाली. सकाळी आभिषेक पुजा करुन दुपारी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विधीवत घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महत्वाचे म्हणजे तुळजाभवानीची मुर्ती ही चल मूर्ती असल्याने इकडून तिकडे हलवण्यात येते.

  • Maharashtra Breaking News LIVE: अखेर भाऊसाहेब भोईर यांनी सोडली अजित पवारांची साथ

    अजितदादांचे खंदे सर्मथक असलेले पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यालाच भगदाड पाडलंय.मागील तीन दशकांपासून भाऊसाहेब भोइर हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक मोठे नेते राहिले आहेत 

  • Maharashtra Breaking News LIVE: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुपारी १ वाजता सेना भवनात पत्रकार परिषद

  • Maharashtra Breaking News LIVE: कार्ला गडावरील एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात

    महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. आजपासून म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून महानवमी होमापर्यत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत होणार असून आज सकाळी 8 वाजता कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन

    धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दुःखद निधन झालं आहे. फुफुसला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link