Maharashtra Breaking News LIVE: ईद-ए-मिलादच्या वेळी डीजे, बीम लाइट्सच्या वापरावर बंदीची मागणी उच्च न्यायालयाने नाकारली

Tue, 10 Sep 2024-7:39 pm,

Maharashtra Breaking News LIVE: मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, याच गणेशोत्सवादरम्यान राजकीय नेतेमंडीळींचाही उत्साह लक्ष वेधत आहे.

Maharashtra Breaking News LIVE: आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? कोणत्या Updates वर राहणार लक्ष? पाहा सर्व अपडेट एका क्लिकवर...


Latest Updates

  • ईद-ए-मिलादच्या वेळी डीजे, बीम लाइट्सच्या वापरावर बंदीची मागणी उच्च न्यायालयाने नाकारली

    ईद-ए-मिलादच्यावेळी डीजे, बीम लाइट्सच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नाकारली आहे. पुणे शहरातील चार रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून डीजे आणि बीम लाइटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालावी आणि ईद-ए-मिलादच्या वेळी मुस्लिम तरुण डीजेच्या तालावर नाचू शकत नाहीत, कारण यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा दावा केला होता. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद साजरी होणार असून या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांचे यावेळी डीजे, बीम लाइट्सच्या वापरावर बंदीची मागणी केली होती. मात्र मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

  • किरीट सोमैयांनी नाकारलं भाजप प्रचार समिती सदस्यपद

    भाजपाचे माजी खासदार किरीट सौमैया यांची भाजप प्रचार समितीचे सदस्य म्हणून नेमणूक केली होती. मात्र भाजप प्रचार समिती सदस्यपद सोमैयांनी नाकारलं आहे. किरीट सोमैया यांनी ट्विट करून लिहिले की, "मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल मी भाजप महाराष्ट्राचे आभार मानले आणि खेद व्यक्त केला आणि ते करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. मी महाराष्ट्र भाजप अध्यक्षांना लिहिले आहे की, गेली 5 आणि 1/2 वर्षे (18/2/2019 पासून) मी भाजपचे काम सामान्य सदस्य म्हणून करत आहे आणि सामान्य सदस्याप्रमाणेच करत राहीन आणि प्रचार समितीमध्ये सामील होणार नाही". 

  • उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं घेतलं दर्शन 

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पुण्यातील मानाच्या गणपतीसह अनेक प्रमुख मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेतले. मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती पासून त्यांची ही दर्शन यात्रा सुरू केली.  त्यानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरी वाडा गणपती, भोलेनाथ मित्र मंडळचा गणपती तसेच छत्रपती राजाराम मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अजित पवार जाणार आहेत.

  • 'मिळेल तिथे भूखंड खा आणि तृप्त व्हा..' विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची संजय राठोडांवर टीका 

    विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार संजय राठोड यांच्यावर टीका करून बेलापूरमध्ये दीड एकरचा भूखंड लाटल्याचा आरोप केला आहे. वडेट्टीवार यांनी म्हंटले की, गोर बंजारा समाजाला हा भूखंड दिला जाणार होता. परंतु मुख्यमंत्र्यानी सर्व कायदे बाजूला सारून या भूखंडाचे वाटप केले. कॅबिनेटचा निर्णय बदलुन मुख्यमंत्र्यानी नियमबाह्यपणे राठोड यांच्या कुटुंबियांच्या संस्थेला दिला आहे. यामुळे सरकारने बंजारा समाजाची घोर फसवणूक केली असून समाजाच्या नावाखाली संजय राठोड यांनी 500 कोटींचा भूखंड हडपला आहे. 

  • Breaking News : नाशिकच्या शिंदे गावातील फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग 

    नाशिकच्या शिंदे गावात फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. श्री स्वामी समर्थ नावाच्या फटाका गोडाऊनमध्ये ही आग लागली असून फटाक्यांच्या स्फोटाच्या आवाजाने शिंदे गाव हादरले. या भीषण अग्नितांडवामुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी मोठी अपडेट 

    मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी चेतन पाटील याला दिलासा मिळाला असून, त्याची न्यायालयीन कोठाडीत रवानगी करण्यात आली आहे. तर, मूर्तीकार जयदीप आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: मैत्रीपूर्ण लढती होऊ नयेत हे माझे वैयक्तिक मत- अजित पवार 

    अमित शहा आणि माझी भेट झाली असं सांगताना या भेटीत जागा वाटपाविषयी चर्चा झाली नाही असं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. राज्यात महायुतीच्या घटक पक्षात मैत्रीपूर्ण लढती होतील या बातमीत तथ्य नाही असंही ते म्हणाले. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत असेल तर शेजारचा म्हणेल माझ्याकडे का नाही? त्यामुळे मैत्रीपूर्ण लढते होऊ नयेत हे माझे वैयक्तिक मत आहे. मात्र अजून तरी तशी काहीच चर्चा झाली नाही. महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली की अंतिम निर्णय ते घेतील. माझं मत मी तुम्हाला सांगितलं, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

  • Maharashtra Breaking News LIVE: शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर

    शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर. आजची सुनावणी आठवडाभराने पुढे ढकलली असल्यामुळं आता पुढील बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. पहिल्या क्रमांकाच्या केसवरच दिवसभर सुनावणी होणार आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले

    जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, उपलब्ध माहितीनुसार सध्या इथं 18 दरवाजातून 10 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून, नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: जय आणि माझ्यात फरक काय? अजित पवारांनी मलाही आशीर्वाद द्यावेत- युगेंद्र पवार

    शरद चंद्र पवार गटाचे युवा नेते योगेंद्र पवार यांची आजपासून बारामती तालुक्यात स्वाभिमानी यात्रेला सुरुवात झालीय. श्रीक्षेत्र कनेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन त्यांनी या यात्रेची सुरुवात केली आहे. गावा गावात जाऊन गाव भेट दौरा करत नागरिकांच्या समस्या सोडून शरद पवार यांचे विचार देखील पोचवणार असल्याचे त्यांनी सांगितलेय. आमच्या गटाचे देखील अजून उमेदवारीचे फिक्स नसून जर माझे चुलत भाऊ जय पवार यांना त्यांनी उमेदवारी दिलीच तर माझी इच्छा आहे की मलाही काका म्हणून अजित पवारांनी आशीर्वाद द्यावेत माझ्यात आणि जय मध्ये फरक काय असेही ते म्हणालेत. विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांसह बारामतीकरांची भावना आहे मात्र हा सर्वस्वी निर्णय शरद पवार घेणार आहेत असेही ते म्हणाले. 

  • Maharashtra Breaking News LIVE: हसन मुश्रीफ यांची शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या समरजीत घाटगे यांच्यावर नाव न घेता टीका

    काही लोकांनी देवेंद्र फडणवीस यांचा गैरफायदा घेऊन त्यांचा विश्वासघात केला अशी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकताच शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या समरजीत घाटगे यांच्यावर नाव न घेता केलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील बाचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात ही टीका केलीय. मला सहा वेळा निवडून दिलं म्हणून आता हवा बदलली असेल असं काहींना वाटतं, अशी हवा बघत राहाल तर तुमचं वाटोळ होईल असं देखील हसण मुश्रीफ यांनी म्हटलंय. इतकंच न्हवे तर मी शरद पवार यांना सांगूनच बाहेर पडलो असा दावा देखील हसन मुश्रीफ यांनी केला. 

  • Maharashtra Breaking News LIVE: अपघात, बावनकुळे आणि... संजय राऊतांचा घणाघात 

    कारची नंबर प्लेट का काढली? संजय राऊतांचा बावनकुळेंना सवाल. बावनकुळे कुटुंबीयांचा अपघाताशी संबंध नाही तर लपवाछपवी का? फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत अपघाताची निष्पक्ष चौकशी होणार नाही. गाडीचा मालक बावनकुळेंचा मुलगा तर मग एफआरआरमध्ये नाव का नाही? संजय राऊतांचा थेट सवाल. 

  • Maharashtra Breaking News LIVE: लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा श्रेयवाद

    महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा श्रेयवाद रंगताना पाहायला मिळतोय. या योजनेच्या संदर्भात भाजपने लावलेल्या बॅनर मधून अजित पवारांचा फोटो गायब झालाय. वांद्रे परिसरात लावलेल्या पोस्टर्स वर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. मात्र या बॅनरवर अजित पवारांना स्थान देण्यात आलेलं नाही. नुकत्याच झालेल्या अमित शाह यांच्या दौऱ्यात देखील अजित पवारांची अनुपस्थिती राजकीय चर्चेचं कारण बनली होती. त्यातच भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नसल्याने आता भाजपलाही अजितदादा नकोसे झालेत का असा सवाल उपस्थित केला जातोय. 

  • Maharashtra Breaking News LIVE: एकिकडे जनसन्मान, दुसरीकडे स्वाभिमानी... पवार कुटुंब इथंही आमनेसामने

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू असतानाच त्यांचे पुतणे शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांची आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी यात्रेला सुरुवात होणार आहे. बारामतीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण हे तापू लागले आहे. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे मारुती मंदिरात दर्शन घेऊन युगेंद्र पवार आपल्या यात्रेची सुरुवात करणार आहे त्यानंतर ते माळावरची देवी दर्शन घेऊन पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत दुपारनंतर पुन्हा ते तालुक्यातील गावांमध्ये भेटीगाठी घेणार आहेत. ही स्वाभिमानी यात्रा 12 दिवस तालुक्यात असणार असून योगेंद्र पवार यावेळी पक्षाची विचार जनतेपर्यंत पोचवत मुक्त संवाद साधणार आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीवासीयांचे पुनर्वसन होणार 

    मुठा नदीला आलेल्या पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीवासीयांचे पुनर्वसन होणार आहे. निया रेषेच्या आत असलेल्या सदनिका तसेच दुकानांचे पुनर्वसन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आलं. एकता परिसरातील इमारतींमधील 1383 सदनिका तसेच 67 दुकानांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 698 कोटी रुपये खर्च करण्यात येऊन क्लस्टर स्वरूपात हे पुनर्वसन होणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत

    पंधरा ते वीस मिनिटांच्या दिरंगाईनंतर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत, हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून अप डाऊन मार्गावरील लोकल सुरू. नेरूळ स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही तासांच्या दिरंगाईनंतर लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. नेरूळ स्थानकादरम्यान विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र तांत्रिक बिघाड सोडवण्याचे प्रयत्न रेल्वे जलद गतीने केल्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: उदयनराजे यांनी साता-याच्या पोलीस अधीक्षकांना दम भरला

    गणेश विसर्जन मिरवणुकीची वेळ आणि डॉल्बी यावरुन भाजप खासदार उदयनराजे यांनी साता-याच्या पोलीस अधीक्षकांना दम भरला. सातारा शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंची भेट घेऊन, गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांबाबत तक्रारींचा पाढा वाचला. यावर उदयनराजेंनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तसंच प्रशासनानं सांगितलेल्या डेसिबल प्रमाणे डॉल्बी वाजवायला मंडळांना परवानगी द्या, तसंच विसर्जन मिरवणूक रात्री 12 पर्यंत नाही तर त्यानंतरही उशिरा पर्यंत सुरू ठेवण्याचा सूचना त्यांनी केल्या. मात्र त्याचवेळी मिरवणुकीत लेझर लाईट शोचा वापर करु नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी गणेश मंडळांना केलं. 

  • Maharashtra Breaking News LIVE: आजपासून कुटुंब भेट कार्यक्रम 

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत, कुटुंब भेट कार्यक्रम आजपासून राज्यभरात राबवण्यात येणारेय. यामध्ये शिवसेनेचे 1 लाख कार्यकर्ते प्रत्येकी 15 कुटुंबांना भेट देणार  आहेत. एका आठवड्यामध्ये 1 कोटी कुटुंबांना भेटण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री स्वतः या अभियानात सहभागी होणार असून, ते ठाण्यात 15 कुटुंबांना भेट देणारेत. या योजनेतील लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं हा यामागचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link