Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

नेहा चौधरी Fri, 13 Sep 2024-8:39 pm,

Maharashtra Live Updated News: राजकीय वर्तुळाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभराच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या एकाच ठिकाणी

Latest Updates

  • Maharashtra Breaking News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते शिवाजीनगर ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचे उद्धाटन करणार आहेत. त्यानंतर पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE : केंद्रीय मंत्री जेपी नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. लालबागच्या राजासह चिंचपोकळीचा चिंतामणी आणि वांद्र्यातील आशिष शेलार यांच्या गणरायाचे ते दर्शन घेणार आहेत. यावेळी ते काही भाजप नेत्यांशी संवाद देखील साधण्याची शक्यता आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE : राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असतील : प्रशांत पडोळे

    राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असतील असं विधान खासदार प्रशांत पडोळे यांनी गोंदियातल्या सभेत केलं आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE : 177 दिवसानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १० लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी 177 दिवसानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE : कर्जत विधानसभेच्या जागेवर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

    रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरती आता थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच दावा केलाय. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगली जुंपणार आहे. सुतारवाडी येथील गीताबाग या आपल्या निवासस्थानी सुनील तटकरे यांनी घेतलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना आपण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे कर्जतच्या जागेची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट करीत ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या गोटातून आनंद व्यक्त होत आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE : दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत, घटना सीसीटीव्हीत कैद

    दौंड तालुक्यातील गलांडवाडीमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून रात्रीच्या दरम्यान बिबट्याने अतुल शिंदे यांच्या घरच्या श्वानावर हल्ला केला असून जखमी श्वानाला बिबट्या घेऊन गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. या परिसरात बिबट्याचा सारखा वावर असल्याने अनेक दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE : खासदार विशाल पाटलांचा यू टर्न! आता म्हणाले रोहित पाटलांना आमदार करणार

    सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी आता रोहित आर आर पाटलांच्या आमदारकीसाठी शब्द दिलाय. वसंतदादा घराणे आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पाटलांना आमदार करण्यासाठी प्रयत्नशील असेल असं त्यांनी जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा तयारीत असणारे माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता खासदार विशाल पाटलांनी रोहित आर आर पाटील यांच्यावतीन आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पाटलांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचा पुढचा आमदार रोहित आर आर पाटील असणार असल्याचं स्पष्ट केलंय. काही दिवसात खासदार विशाल पाटलांनी घेतलेल्या यूटर्नमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

  • Maharashtra Breaking News LIVE : दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत, घटना सीसीटीव्हीत कैद

    दौंड तालुक्यातील गलांडवाडीमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून रात्रीच्या दरम्यान बिबट्याने अतुल शिंदे यांच्या घरच्या श्वानावर हल्ला केला असून जखमी श्वानाला बिबट्या घेऊन गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. या परिसरात बिबट्याचा सारखा वावर असल्याने अनेक दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE : आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर बाप्पाची आरती 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी विराजमान गणपतीची आरती करण्याचा मान आज शेतकऱ्यांच्या मुलांना मिळाला. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले त्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरती साठी निमंत्रण देण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यातून एकूण 25 मुले आणि 25 मुली वर्षावर दाखल झाले होते.  गेल्यावर्षी देखील या सर्वांना आरतीसाठी बोलावून मुख्यमंत्री यांनी या मुलांना मदत केली होती. 

  • Maharashtra Breaking News LIVE : लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे यांचा सरकारवर गंभीर आरोप

    तंत्रज्ञानाचा वापर करताना लाडकी बहीण योजनेत सारख्या चुका कश्या निघतात मग यांनी काय केलं आहे? डेटा कसा जमा केला? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. हे सरकार महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाही. हिट अँड रनच्या घटना रोज होत आहेत. ड्रग्जचे प्रमाण वाढले आहे. कोयता गँगची दहशत वाढली आहे. त्यामुळे सुरक्षितता राहिली का नाही? देशात अंधाधुंद कारभार चालला आहे. यांना फक्त घर आणि पक्ष, इनकम टॅक्स, इडी आणि सीबीआयसोडून यांना वेळ कुठे आहे. आयुष्यभर लढत राहू. संविधान बदलण्याचा प्रयत्न भाजपाने केल्यास शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

  •  Maharashtra Breaking News LIVE : हिंगोलीत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचा आरोप करत हिंगोली येथे भाजपाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध  व्यक्त केला आहे. यावेळी आंदोलकांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले होतेय. दरम्यान यावेळी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली.

  • Maharashtra Breaking News LIVE : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने आज शेतकरी यलगार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांची आजची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील शंभर ते दोनशे शेतकरी युवकांनी पुढाकार घेऊन कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हातात न घेता किंवा राजकीय पक्षाची किंवा व्यक्तीची मदत न घेता शेतकरी एल्गार मोर्चाचे आयोजन केलेय. या मोर्चामध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये भाव, कापसाला 12 हजार रुपये भाव, सरसकट कर्जमाफी जीएसटी मुक्त शेती उपयोगी साहित्य , शेतीला अनुदानावर तारकुंपण , शेतीला 24 तास वीज अशा सुमारे आठ प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आलेय. तर सरकार शेतकऱ्यांची शेती हे भांडवलदारांच्या घशात टाकत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलाय.

  • Maharashtra Breaking News LIVE : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन

    धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पंढरपूरमध्ये सहा जणांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मात्र राज्य सरकारकडून आंदोलनाची गंभीरपणे दखल घेतली जात नसल्याने धनगर समाजातील कार्यकर्ता विश्रांती भूसनर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. यावेळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्याची घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भंडारा उधळण्यात आला. काही वेळाने पोलिसांनी समजूत काढून आंदोलनकर्त्यांना खाली उतरवले.

  • Maharashtra Breaking News LIVE : गणेशोत्सवात मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी

    गणेशोत्सवात मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी... मुंबईच्या डबेवाल्यांन आता मुंबईतच घर मिळणार आहे.. पीएम आवास योजनेतून आता डबेवाल्यांना घरं दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डबेवाल्यांची संघटना यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली.. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची घोषणा केली.. डबेवाल्यांसाठी एकूण 12 हजार घरांची निर्मिती होणार आहे.. यात चर्मकार समाजातील बांधवांसाठी सुद्धा घरे असतील.. या प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी दिली जाणार आहे.. नमन बिल्डर यांच्या मार्फत ना नफा ना तोटा तत्वावर ही घरं बांधली जाणार आहेत.. 500 चौरस फुटांची अशी एकूण  12 हजार घरं या प्रकल्पात उभारण्यात येतील. 25 लाखात हे घर दिलं जाईल.. पुढील 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : नागपुरात काँग्रेसचं भाजपविरोधात आंदोलन

    एकीकडे भाजपचं राहुल गांधींच्या आरक्षणाच्या विधानाविरोधत भाजपचं राज्यभर आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे नागपूरमध्ये काँग्रेसनं भाजपविरोधात आंदोलन केलंय... राहुल गांधींना जीवे धमकी देणाऱ्या भाजप नेते रविंदरसिंग मारवा यांच्याविरोधात आंदोलन काँग्रेस नेत्यांनी केलंय.  शहराध्यक्ष विकास ठाकरे  यांच्या नेतृत्वात  महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं..यावेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर त्यांनी व्हेरायटी चौकात वाहतूक रोखून धरली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतल..

     

  • Maharashtra Breaking News LIVE : महायुतीत 70-75 टक्के जागांवर एकमत झालंय - बावनकुळे

    महायुतीत 70-75 टक्के जागांवर एकमत झालंय, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. ज्या जागा जिंकणार नाही, असं वाटत असेल तर त्या ठिकाणी महायुतीतील दुस-या पक्षाचा नवा मजबूत उमेदवार देऊ, असं बावनकुळेंनी म्हटलंय. त्यामुळे विद्यमान आमदारांचेही तिकिटं कापण्याचे संकेत बावनकुळेंनी दिलेत. त्यामुळे आता कोणता उमेदवार बदलणार, याकडं सर्वांच लक्ष लागून आहे.

     

  • Maharashtra Breaking News LIVE : शंभूराज देसाई आणि अंबादास दानवेंची गळाभेट 

    मंत्री शंभूराज देसाई, अंबादास दानवेंनी गळाभेट घेतलीय. दोन्ही नेते पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात एकत्र आले. यावेळी त्यांनी एकमेकांची गळाभेट गेतली. या दोघांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र, देवाच्या दारात राजकारण नको, अशी प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिलीय.

     

  • Maharashtra Breaking News LIVE : माढा लोकसभेनंतर आता विधानसभेच्या रिंगणात आणखी एका मोहिते पाटलांची एन्ट्री 

    माढा लोकसभेनंतर आता माढा विधानसभेच्या रिंगणात आणखी एका मोहिते पाटलांची एन्ट्री होणारेय. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतायेत. शिवतेजसिंह मोहिते पाटील समर्थकांनी सोशल मीडिया हँडलवरून माढा विधानसभेच्या सर्वांगिण विकासासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील, अशा पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार बबनराव शिंदेंना शिवतेजसिंहांचं आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

     

  • Maharashtra Breaking News LIVE : आरक्षणासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक 

    आरक्षणासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झालीये.. त्यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपनं राज्यभर आंदोलन सुरु केलंय.. काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओचा नारा देत भाजपनं हे आंदोलन पुकारलंय... अकोल्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे या आंदोलनात सहभागी झालेत.. तर मुंबईत आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु आहे. नाशिक आणि संभाजीनगरमध्येही आंदोलन सुरु आहे.. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : लाडक्या बहिणींच्या पैशांवर भावांचा डल्ला!

    संभाजीनगरमध्ये 12 जणांनी लाडकी बहीण योजनेत महिलांचे फोटो लावून पुरुषांनी अर्ज भरल्याचा प्रकार समोर आलाय. कन्नड तालुक्यात हा प्रकार घडलाय. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 ऑगस्टला पडताळणी केली असता हा प्रकार समोर आलाय. पोर्टलवर आधार कार्ड स्वतःच्या नावाचा अपलोड केला. तर हमीपत्रही स्वतःच्याच नावानं भरला. मात्र, फोटो इतर महिलांचे अपलोड केले. दरम्यान या प्रकरणीची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेत. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट

    बहुचर्चित ऑडी कार अपघात प्रकरणी वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे तसेच सोबत बसलेल्या रोनित चिंतमवार या दोघांचा मद्यपान केल्या संदर्भातला फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झालाय. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अर्जुन हावरे चे फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये शंभर मिलिलिटर रक्तात अल्कोहोलचे प्रमाण 28 मिलिग्रॅम एवढे आले आहे..

  • Maharashtra Breaking News LIVE : वैनगंगा नदीच्या पुरात एक 100 टन वजनाची क्रेन वाहून गेली

    भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेला आंभोरा केबल ब्रीज आणि गोसेखुर्द धरण थोडक्यात वाचलंय... वैनगंगा नदीच्या पुरात एक 100 टन वजनाची क्रेन वाहून गेली..  कोरंभी जवळ नविन पुलाच्या बांधकामासाठी ही क्रेन आणली होती.. मात्र आंभोरा ब्रीजपासून काही अंतरावरच ही क्रेन अडवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.. जर ही क्रेन ब्रीजला किंवा गोसेखुर्द धरणाला धडकली असती तर ब्रीजचंही नुकसान झालं असतं तसंच गोसेखुर्द धरणाचंही मोठं नुकसान झालं असतं..

     

  • Maharashtra Breaking News LIVE : अनंत चतुर्दशीला भाविकांसाठी रेल्वेचा खास निर्णय

    अनंत चतुर्दशीला मुंबई लोकल रात्रभर सुरू राहणार आहे. तर रात्री अधिकच्या लोकलच्या 8 फेऱ्या असणार आहे.. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर लोकल उपलब्ध असतील.

  • Maharashtra Breaking News LIVE : परतीच्या प्रवासासाठी कोकणातून विशेष रेल्वे गाड्या 

    कोकणातून परतणा-या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतलाय. 12 ते 16 सप्टेंबर दरम्यान 20 डब्यांच्या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. सीएसएमटी ते खेड आणि पनवेल ते खेड दरम्यान या विशेष गाड्या धावतील. 
    खेड ते सी एस एम टी(1 फेरी)
    16 सप्टेंबर सकाळी 6 वाजता सुटेल
    पनवेल - खेड (3 फेऱ्या) 13, 14 आणि 15 सप्टेंबर सकाळी 11 वाजता आणि रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी सुटेल

  • Maharashtra Breaking News LIVE : अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? 

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात होणारेय. मद्य धोरण भ्रष्टाचार प्रकरणात अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत. सीबीआयकडून त्यांना अटक करण्यात आलीय. यासंदर्भात आता सुप्रीम कोर्टात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावर आज कोर्ट निकाल देणारेय.

  • Maharashtra Breaking News LIVE : आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी पुन्हा लांबणीवर

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर गेलीय. 15 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणारेय. त्यामुळे एक महिन्यानंतर म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल पूर्ण होण्याची शक्यता मावळलीये. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढं ढकललीय. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात 21 ऑक्टोबरला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भात 12 नोव्हेंबरला सुनावणी होणारेय. त्यामुळे विधानसभा निवडणूकीपूर्वी पक्षाचं नाव आणि चिन्हाचा निकाल लागण्याची शक्यता मावळीय. 

  • Maharashtra Breaking News LIVE : राहुल गांधींच्या आरक्षणाबाबच्या विधानाचा भाजपकडून आज राज्यभर आंदोलन

    आरक्षणासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झालीये.. त्यांच्या या वक्तव्याविरोधात भाजप आज राज्यभर आंदोलन करणार आहे...काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओचा नारा देत भाजपनं हे आंदोलन पुकारलंय... भाजपचे मुख्य नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंडे मुंबईत आंदोलन करणार आहेत.. भाजपचे अन्य नेतेही जिल्हानिहाय आंदोलनात सहभागी होणार आहेत.. सकाळी 10 वाजता मुंबईत आशिष शेलार राहुल गांधींच्या आरक्षणाच्या विधानाचा आंदोलन करून निषेध कऱणार आहे..  

  • Maharashtra Breaking News LIVE : खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा 

    खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होत नाही... राज्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार असे दोनच साहेब आहेत, अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. खेड इथल्या सभेत बोलताना अजित पवारांनी आता कुणाला विचारावं लागत नाही आपणच साहेब असल्याचं विधान केलं होतं. त्याचा समाचार अमोल कोल्हेंनी घेतलाय.. 

  • Maharashtra Breaking News LIVE : 'मालवणमध्ये शिवराय पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार'

    मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या ठिकाणी, नव्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी ही माहिती दिली. यासाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे ठेवल्याचं केसरकरांनी सांगितलं. एकंदरीत राज्य सरकारच्या वतीनं शिवरायांचा पुतळाप्रकरणी, डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येतंय. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंक आजपासून खुला

    कोस्टल रोड आणि वांद्रे सी-लिंकला जोडणारा कोस्टल रोडवरील पूल आजपासून प्रवासासाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते काल कोस्टल रोडला जोडणाऱ्या पूलाचं उदघाटनं पार पडलं होतं.. त्यानंतर पूल मुंबईकरांसाठी खुला झालाय..  या मार्गामुळे आता मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्याला अवघ्या 12 मिनिटांत पोहोचता येणार आहे. वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटकाही होणार आहे.. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link