Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार

Wed, 24 Jul 2024-10:46 pm,

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स

Maharashtra Breaking News LIVE: केंद्र सरकारने मंगळवारी अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पानंतर राज्यातील विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर, मराठा आरक्षणाचा मुद्दादेखील तापला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. राज्यातील पावसाचे अपडेट ते विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर 

Latest Updates

  • Maharashtra Breaking News LIVE: कारगिल युद्धातील शहीद सैनिकांना मुख्यमंत्री देणार मानवंदना

    कारगिल युद्धातील शहीद सैनिकांना मुख्यमंत्री देणार मानवंदना. कारगिल युद्धातील सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणार. 26 जुलै रोजी शिवसेना सैनिक सेलच्या वतीने साजरा होणार कारगिल विजय दिवस. मुंबई महानगरपालिकेच्या समोरील शहीद स्मारकात कारगिल सैनिकांना मानवंदना दिली जाणार.

  • Maharashtra Breaking News LIVE: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मतदार यादीतील त्रुटींवर फडणवीसांनी बोट ठेवलं आहे. विधानसभा निवडणूक पूर्वी त्रुटी दूर करण्यासाची केली मागणी

  • Maharashtra Breaking News LIVE: रायगड जिल्‍हयात एस टी चालकाची स्‍टंटबाजी, चालकाचा प्रवाशांच्‍या जीवाशी खेळ

    पूलावरून पाणी वहात असताना एस टी चालकाने बस चालवली. ही आज सकाळची घटना आहे. पालीहून घोडगाव मार्गे पेणकडे बस निघाली होती. अंबा नदी पूलावर पाणी असताना प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालून प्रवास केला. भेरव गावाजवळच्या पुलावरून धोकादायक वाहतूक करण्यात आलीय. प्रवाशांच्‍या जीवाशी खेळणारा चालक निलंबित होणार असल्याची माहिती आहे. पेण आगाराचा चालक यू. एम. बनसोडे यांच्‍यावर निलंबनाची कारवाई करण्‍याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार

    विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी एकूण 11 विधानपरिषदेचे आमदार घेणार शपथविधी होणार आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवगिरीवर अजित पवार यांच्या भेटीला

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवगिरीवर अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेत असं कळतंय. अजित पवार काल रात्री दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर आता फडणवीस हे पवार यांची भेट घेणार आहेत

  • Maharashtra Breaking News LIVE: देशाची तिजोरी महाराष्ट्र भरी आणि महाराष्ट्राच्या मात्र हातावर तुरी, रोहित पवार यांची सत्ताधाऱ्यावर टीका

    काल मंत्रिमंडळ बैठकीत निधी नसल्याने मंत्र्यांमध्ये वादावादी होत असताना अर्थमंत्र्यांनी उद्विग्न होऊन जमिनी विकून निधी देऊ का, असं वक्तव्य केल्याचं समोर आलं. देशाला सर्वाधिक टॅक्स देणाऱ्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती का उद्भवली?

    केंद्राकडे सर्वाधिक टॅक्स महाराष्ट्र देतो, पण केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र काहीच येत नाही. त्यामुळंच आज महाराष्ट्राची अवस्था दयनीय झालीय. कालचं बजेट बघता ‘देशाची तिजोरी महाराष्ट्र भरी आणि महाराष्ट्राच्या मात्र हातावर तुरी’ असं म्हणायची आज वेळ आलीय.
    असो! सत्तेसाठी दिल्लीसमोर लाचारी करणं, हाच सत्ताधाऱ्यांचा राजधर्म असावा !

  • Maharashtra Breaking News LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबई दौ-यावर

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबई दौ-यावर येत आहेत. 29 जुलै रोजी राष्ट्रपती मुर्मू मुंबई दौ-यावर आहेत. विधानभवनात पुरस्कार वितरण कार्यक्रम, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE:सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर गंभीर आरोप

    Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगेंनी आंदोलन स्थगित केलं असलं तरी आरक्षणाचा मुद्दा थेट लोकसभेच्या सभागृहात उपस्थित करण्यात आला...सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर गंभीर आरोप केलेत...गेल्या अनेक वर्षांपासून सरकार खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला...महाराष्ट्रात सध्या मराठा आणि धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेत, तिथे जरांगे उपोषणाला बसलेत असंही त्यांनी सभागृहात सांगितलं...सभागृहात पहिल्यांदाच जरांगेंच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला...

  • Maharashtra Breaking News LIVE: कृष्णा नदीची पाणी पोहोचली 30 फुटांवर, तर वारणा नदीला पूरस्थिती

    लोणावळा आणि परिसरात तुफान पाऊस बरसतोय, ढगफुटी सदृश्य पावसाने सखल भागात पाणी साचलं आहे. याच पाण्यामुळं मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. पैकी 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे. उर्वरित पर्यटकांना ही काही वेळातच बाहेर काढण्यात येईल.

  • Maharashtra Breaking News LIVE: लोणावळ्यातील बंगल्यात अडकलेल्या 15 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात यश

    लोणावळा आणि परिसरात तुफान पाऊस बरसतोय, ढगफुटी सदृश्य पावसाने सखल भागात पाणी साचलं आहे. याच पाण्यामुळं मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. पैकी 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे. उर्वरित पर्यटकांना ही काही वेळातच बाहेर काढण्यात येईल.

  • Maharashtra Breaking News LIVE: भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार

    विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादात सुधारणा करण्याची मागणी भाजपचे शिष्टमंडळ करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत अनेक नावे गहाळ झाली होती व त्याचा भाजपला फटका बसला होता

  • Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाच्यावतीने लातूर - सोलापूर महामार्ग अडवला

    मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि मनोज जरंगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज भर पावसात एकवटला आहे. मराठा समाजाच्या वतीने लातूर - सोलापूर महामार्ग अडवण्यात आला आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: पुण्याच्या सिंहगडावरील दगडी भिंत कोसळली

    सिंहगडावरील देवटाक्याची भिंत पावसामुळं कोसळली आहे. मागील दोन दिवसांपासून डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. याचाच फटका सिंहगडाला बसला आहे. सिंहगड घाटात ही दरडी कोसळल्याने मलबा बाजूला केला जात आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE:  मुसळधार पावसानं कल्याणमधील रस्ते जलमय

    गेल्या अर्धा तासापासून कल्याण शहरांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे कल्याण मधील रस्ते जलमय झालेत. कल्याणच्या मलंगड भागात जाणाऱ्या चेतना परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: फडणवीसांच्या भेटीआधी अजितदादांनी घेतली शहांची भेट

    भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीपूर्वी राजधानी दिल्लीत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी घेतली अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: फडणवीसांच्या भेटीआधी अजितदादांनी घेतली शहांची भेट

     

  • Maharashtra Breaking News LIVE: वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार झालेल्या पावसामुळे काटेपूर्णा नदी वाहतेय दुथडी भरून

    वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरीप आहे.पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे.मालेगाव तालुक्यातील झालेल्या जोरदार पावसामुळे काटेपूर्णा धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढल्याने पाण्याची चिंता मिटली असून जून महिन्यात कोरडी ठक झालेली काटेपूर्णा नदी आज दुधडी भरून वाहत आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE:  नाळा तलावात बुडून 37 वर्षीय इसमाचा मृत्यू

    नालासोपारा पश्चिम नाळा गावातील तलावात एका तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.कौशीक प्रमोद राऊत (वय ३७) असे या तरुणाचे नाव आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार; 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देणार 

    हे सलाईन म्हणजे जेवण केल्यासारखे आहे. त्यापेक्षा नाही उपोषण केलं तरी चालत या मताचा मी आहे. हे सलाईन लावत राहणार आहे त्यापेक्षा मी मग दुपारी उपोषण स्थगित करून दौरे सुरू करीन महिलांच्या हाताने उपोषण स्थगित करीन असं उपोषण करून काहीही फायदा नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार; 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देणार 

  • Maharashtra Breaking News LIVE: वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम

    सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे कृष्णाने वारणा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.चांदोली धारणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक बंधारे व पूल पाण्याखाली गेले आहेत,त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा जवळचा संपर्क तुटला आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: रेड अलर्टनंतर सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस

    सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे.सातारा जिल्ह्याला आज देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे.जिल्ह्यातील धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस पडतो आहे.यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते आहे.जिल्ह्यातील सर्व धरणे 50 ते 60 टक्क्यांच्या वर भरली आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती; महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या संपर्क तुटला

    महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे बावनथडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र- मध्यप्रदेशला जोडणाऱ्या आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. बावनथडी नदीच्या बपेरा पुलावर 4 ते 5 फूट पुराचे पाणी वाहत आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत आज यलो अलर्ट; ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणार वारे

    मुंबईत आज हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणार वारे असून दुपारी 2: 11वा भरतीची वेळ 4.72 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: राज्यात महिनाभरात हिवतापाचे तीन हजार, तर डेंग्यूचे दोन हजार रुग्ण

    गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यात हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज्यामध्ये महिनाभरात हिवतापाचे दोन हजार ९२४ रुग्ण सापडले असून हिवतापाच्या रुग्णांची संख्या ७ हजार ४४७ वर पोहोचली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माटुंगा येथे तांत्रिक बिघाड

    मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. माटुंगा येथे जलद मार्गावर बांधकामाचे साहित्य कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सीएसएमटीकडे येणाऱ्या ट्रॅकवर सकाळी ही घटना घडली आहे. लवकरच लोकल सेवा पुरवत होईल रेल्वे प्रशासनाची माहिती.

  • Maharashtra Breaking News LIVE: लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद, 24 तासात 275 मिमी पाऊस

    लोणावळ्यात यावर्षीच्या सर्वाधिक पावसाचे नोंद आज झाली आहे. मागील 24 तासात लोणावळ्यात तब्बल 275 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यापासून लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली. या दीड महिन्यामधील मंगळवारी झालेला पाऊस हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. मागील आठवड्यापासून लोणावळा शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सलग आठ दिवस शहरात पावसाचा जोर कायम आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का

    शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का. 3.0 रिशटर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का.वारणावती सह परिसरात पहाटे 4  वाजून 47 मिनिटांवर जाणवला भूकंपाचा धक्का.वारणवती पासून 8 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू .

  • Maharashtra Breaking News LIVE: पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू, राधानगरी धरण 90 टक्के भरले

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच जिल्ह्यातील धरण देखील पूर्ण क्षमतेने भरू लागली आहेत. राधानगरी धरण सध्या 90 टक्के भरले असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो.

  • Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगेंच्या उपोषणचा आज पाचवा दिवस; प्रकृती खालावली

    मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.गेल्या 5 दिवसांत जरांगे यांनी डॉक्टरांना तपासणी करू दिली मात्र उपचार आणि पाणी घेतलेलं नाही.त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link