Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

दक्षता ठसाळे-घोसाळकर Sat, 07 Dec 2024-9:39 pm,

महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा फक्त एका क्लिक वर.

राज्य विधीमंडळाचं आजपासून मुंबईत विशेष अधिवेशन असणार आहे. आजपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन असणार आहे. 7, 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी असणार आहे. सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 9 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचं अभिभाषण असणार आहे. त्यानंतर 9 डिसेंबरलाच नागपूरमध्ये होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाईल. 

Latest Updates

  • उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

    पाण्यातून अथवा अन्नातून विष बाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय . मात्र यात सपना मिरकुटे या २ वर्षाच्या मुलीची दुर्दैवी मृत्यू झाला.तर घरातील ५ जणांना हाच त्रास झाल्याने त्यांना बदलापूर पालिकेच्या आशा सेविका आणि समाजसेवकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.ही माहिती पालिकेला मिळाल्यानंतर त्यांनी आदिवासी वाडीत मेडिकल कॅम्प घेत गावकऱ्यांची तपासणी केली.मीरकुटे कुटूंब त्रास होणाऱ्यांना करणी झाली असा संशय व्यक्त करीत असल्याने रुग्णालयात दाखल करत नव्हते, मात्र आशा सेविका आणि किशोर मेहेर यांनी त्यांना समजावल्याने ते रुग्णालयात दाखल करायला तयार झाले.

  • मुंबई विद्यापीठाकडून पेट परीक्षेचा निकाल जाहीर

    मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी एकूण 5040 एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यापैकी एकूण 3794 एवढे विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते. यापैकी या परीक्षेत एकूण  २००८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ( उत्तीर्णतेचे प्रमाण 53 % आहे )परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्याना त्यांच्या ईमेल लॉगिन मध्ये या परीक्षेचे प्रमाण पत्र लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. विद्यार्थ्याना मिळणारे प्रमाणपत्र हे विशेष फीचर क्यूआर कोडयुक्त असून ऑनलाइन पडताळणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. दिनांक 17 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी विविध केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

  • अबू आझमी महाविकास आघाडीला धक्का देणार?

    विशेष अधिवेशनात मविआमध्ये ताळमेळ नसल्याचं उघड झाले आहे. मविआच्या नेत्यांनी शपथविधीवर बहिष्कार घातला असताना विनोद निकोले, अबू आझमी, रईस शेख यांनी शपथ घेतली.मविआच्या कार्यपद्धतीवर अबू आझमींनी टीका केली.  समाजवादी पार्टी मविआतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

  • रायगडच्या कुंडलिका नदी पात्रात चारजण बुडाले

    रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील रवाळजे येथे मोठी दुर्घटना घडली आहे.कुंडलिका नदी पात्रात चार जण बुडाले आहेत. बचाव पथक, पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. दोघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकला यश आले आहे. बुडालेल्यांमध्ये तीन महिला एका लहान मुलाचा समावेश आहे. सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते.नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली.लहान मुलगा पाण्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन महिलाही बुडाल्या.

  • मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट 

    मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. 4 महिलांसह 11 जणांच्या सोन्याच्या चैनींवर चोरांनी डल्ला मारला आहे. तर कार्यकर्त्यांची हजारोंची रोकड घेऊन चोर पसार झालेत.तब्बल 12 लाख रुपयांचे ऐवज लंपास केला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमीचा मेसेज 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचा पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला हा मॅसेज आहे. मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज पाठवला आहे. बॉम्बस्फोट घडवून हत्या केली जाणार असल्याचंही मेसेजमध्ये म्हटलंय. तसेच दोन व्यक्तींची नाव लिहून ते दोघं ISI एजंट असल्याचं म्हटलंय. 

  • महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री होणार बैठक 

    महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री बैठक होणार आहे. मंत्रिमंडळ फॅार्म्युलावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.मंत्रिमंडळासोबतच विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधानपरिषद सभापती, उपसभापती या पदांबाबत चर्चा होणार. आज महायुतीचे तिन्ही प्रमुख नेत्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय होणार आहेत.

  • 'EVM विरोधात शरद पवार कायदेशीर लढा लढणार'

    ईव्हीएमबाबत जनतेत प्रचंड असंतोष आहे त्यामुळे बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. ईव्हीएमविरोधात शरद पवार कायदेशीर लढा लढणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकर पुन्हा भरणार अर्ज

    विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार आहेत. राहुल नार्वेकर उद्या अर्ज दाखल करणार आहेत. विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांकडे सलग दुसऱ्यांदा जबाबदारी देण्यात आली आहे.

  • शपथविधीवर बहिष्कार म्हणजे लोकांच्या मतदानाचा अवमान- राहुल नार्वेकर 

    शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचा इतिहासात प्रथमच घडत आहे. लोकांच्या मतदानाचा हा अवमान आहे. संसदीय लोकशाहीला अशोभनीय काम असल्याची प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

  • उद्या महाविकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित आमदार शपथ घेणार 

    महाविकास आघाडीच्या नवनिर्माची आमदारांनी आज शपथ न घेण्याचं जाहीर केले होते. त्यानंतर विधिमंडळातून आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भास्कर जाधव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा फोनवर बोलणं झालं आणि उद्या महाविकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल आहे.

  • बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा द्यायला तयार- सुनिल राऊत 

    बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे, असे आमदार सुनिल राऊत म्हणाले. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास मी 50 ते 60 हजार मतांनी मी निवडून येईन, असेही ते म्हणाले.

  • मधुकरराव पिचड यांच्या अंत्यविधीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता

    जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्यावर अकोले तालुक्यातील राजूर गावात अंत्यसंस्कार होणार असून तत्पूर्वी अकोले महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर उसळला आहे... एकीकडे आज नवनिर्वाचित आमदार शपथ घेत असताना अकोले येथील राष्ट्रवादीचे आमदार तथा पिचड यांचे राजकीय विरोधक किरण लहामटे मात्र अंत्यसंस्कारासाठी अकोलेतच थांबले आहेत.. राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आज ऐवजी उद्या शपथ घेणार आहेत.. राजूर गावात दोन हेलिपॅड बनवण्यात आल्याने चार वाजता पिचडांच्या अंतिम दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील काही महत्त्वाचे नेते उपस्थित रहातील अशी दाट शक्यता आहे.

  • आदित्य ठाकरेंचा महायुतीला सवाल?

    महायुतीला दिलेलं बहुमत कुणाचं आहे - आदित्य ठाकरे
    आमच्या मनातील शंका EVM वर आहे
    आज आमदारकीची शपथ घेणार नाही?
    विशेष अधिवेशनादरम्यान विरोधकांचा सभात्याग
    शपथ न घेताच विरोधी पक्षाचे आमदार सभागृहाबाहेर 

     

  • महायुतीतील आम्ही सर्वजण पहिल्या दिवसापासून अगदी मनापासून उत्तम पद्धतीनं काम करु - अजित पवार

    माध्यमांशी संवाद साधताना महायुतीतील आम्ही सर्वजण पहिल्या दिवसापासून अगदी मनापासून उत्तम पद्धतीनं काम करण्याचा निश्चय केला असल्याच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. तसेच पुढे त्यांनी सांगितले की, हे सर्व करताना सर्व जातीधर्मांना आम्हाला कसा न्याय देता येईल आणि शिव-शाहू-फुले- आंबेडकरांची विचारधारा जे सांगते ती विचारधारा पुढे नेत असताना केंद्राची, मोदी साहेबांची मोठ्या प्रमाणावर मदत महाराष्ट्राला मिळवण्याकरता प्रयत्नशील राहू. तसेच मोठे प्रकल्प मार्गी लावण्याकरता जे कार्यक्रम असतील ते वेळेत पूर्ण करण्याचा आमचा कटाक्षानं प्रयत्न असेल, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. 

  • राऊतांचा राज ठाकरेंना ठाकरे शैलीत टोला! म्हणाले, 'फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...'

    Devendra Fadnavis Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंसंदर्भातील सूचक विधान केल्याचा संदर्भ देत संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला. 'देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील' असा विश्वास विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच व्यक्त करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. 

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा. 

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आमदारकीची शपथ 

  • विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात 

    मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विधानभवनात दाखल
    9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड
    आज आणि उद्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी 

  • नवनिर्वाचित आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन कामकाजाला केली सुरुवात

  • फडणवीस ठाकरेंची विधानसभेच्या पायरीवरच भेट 

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची विधानसभेच्या पायरीवरच भेट झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे हंस्तादोलन करुन अभिनंदन केले. 

  • नवनिर्वाचित आमदारांच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वाहिली मानवंदना

    थोड्याच वेळात विशेष अधिवेशनाला सुरुवात

  • राज ठाकरे भाजपच्या हातचं खेळणं 

    माझ्यावरही भाजपनं दबाव टाकला असं संजय राऊत म्हणाले. भाजपमध्ये जा आणि आपल्यावरची कारवाई दूर करा, अशी ऑफर संजय राऊत यांना दिली होती. राज ठाकरे हे भाजपच्या हातचं खेळणं असल्याचं संजय राऊत म्हणाले. मुंबईत मराठी माणसांवर अन्याय होत आहे. 

  • भाजपला शरण न जाणाऱ्यांची संपत्ती जप्त - संजय राऊत 

    संजय राऊत यांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांचं अभिनंदन केलं आहे. भाजपला शरण न जाणाऱ्यांची संपत्ती जप्त केली मात्र अजित पवारांची संपत्ती मात्र मुक्त केली आहे. यापुढे संजय पवार म्हणाले की, ईडीनं इतकांची देखील संपूत्ती मुक्त करावी. 

  • खातं मागणं हे काही चूकीचं नाही - उदय सामंत

    - २ दिवसांत खातेवाटप पूर्ण होऊन मंत्रीमंडळाचा शपथविधीही पार पडेल 
    - खातं मागणं हे काही चूकीचं नाही, सकारात्मक निर्णय होईल 
    - मंत्रीमंडळ विस्ताराबाबत महायुतीचे ३ वरिष्ठ नेते निर्णय घेतील 
    - २४ तास एकनाथ शिंदेंनी काय हसतच रहावं का?त्यांचा चेहरा आहे तसाच आहे.. ते नाराज वगैरे काही नाही

  • शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अमोल धोंडिबा यांनी विधानसभेच्या पायरीच्या पाया पडून प्रवेश केला. 

  • विधानसभेच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतं राजेश मोरेंनी केला प्रवेश 

    मनसेचे एकमेव आमदार यांना पराभूत करुन राजेश मोरे कल्याण ग्रामीणचे आमदार झाले आहेत. कल्याण ग्रामीणचा विकास करणार असल्याचं राजेश मोरे यांनी सांगितलं. पहिल्यांदाच विधानसभेत येत असल्यामुळे पहिल्या पायरीचं दर्शन घेत प्रवेश केला. 

  • शरद पवार गटाला मोठा धक्का

    जळगावमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गुलाबरावांनी देवकरांनी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची भेट घेतलीय. या भेटीत पक्षप्रवेशनाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी जळगाव मध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर यांचा शिवसेना नेते गुलाबराव पाटलांकडून पराभव झाला होता.

  • कोणत्या मंत्र्यांच्या नावे कोणता बंगला?

    हिवाळी अधिवेशनासाठी बंगल्यांचं वाटप होणार आहे. कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे दुस-या क्रमांकावर आहे. शिंदेंना नागपुरातील देवगिरी बंगला देण्यात आलाय तर अजितदादांचा विजयगड बंगल्यावर मुक्काम असेल. 

  • जर तुम्ही मोबाईल खिशात ठेवून फिरत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या स्फोट होऊन एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील सिरेगाव टोला इथं ही घटना घडली आहे.  सुरेश संग्रामे असं मृत मुख्याध्यापकाचं नाव आहे. ते नत्थु गायकवाड यांच्यासोबत दुचाकीवरुन जात असताना अचानक त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या कपड्याला आग लागली असून ते यामध्ये भाजले गेले. दरम्यान त्याचा मृत्यू झाला.. तर त्यांचा मित्र नत्थु गायकवाड हा देखील गंभीर जखमी झाला आहे. 

  • अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराईचं संकट.. औषध खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी... महागड्या औषधांमुळे शेतकरी आर्थिक संकटात

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्सनं जप्त केलेली मालमत्ता मुक्त होणार आहे. अमोल मिटकरींकडून निर्णयाचं स्वागत करण्यात आली आहे. तर सुषमा अंधारेंची भाजपवर टीका केली आहे. 

  • माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालं असून नाशिकच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकरराव पिचड यांच्यांवर ब्रेन हॅमरेजमुळं रुग्णालयात उपचार सुरु होते. दीड महिन्यांपासून सुरु घेतलेल्या पिचडांचे शुक्रवारी निधन झाले. आज शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. 

  • दिल्ली ट्रिब्युनलच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी स्वागत केलं आहे. सत्याचा विजय होतो असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

  • दिल्ली ट्रिब्युनलच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी स्वागत केलं आहे. सत्याचा विजय होतो असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

  • महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक

    महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक असणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महायुतीच्या प्रमुख नेते राहणार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

     

  •  ठाणे, भिवंडीतील 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. पिसे इथल्या 'न्यूमॅटिक गेट सिस्टीम'मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link