Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाकरे गटाच्या स्थगित बैठका 7 जानेवारीपासून सुरु होणार

Mansi kshirsagar Wed, 01 Jan 2025-7:39 pm,

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE Updates: आज नवीन वर्षातील पहिला दिवस आहे. देशात अनेक नवीन बदल घडणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणातील आढावा, घेऊयात या ब्लॉगच्या माध्यमातून

Latest Updates

  • ठाकरे गटाच्या स्थगित बैठका 7 जानेवारीपासून सुरु होणार 

    ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका या 7 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. या बैठका 7, 8 आणि 9 जानेवारी रोजी पार पडणार आहेत. 

  • वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात गोंधळ, ओव्हर हेड पोर्टलवर चढला व्यक्ती

    वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात एका व्यक्तिचा गोंधळ. रेल्वेच्या ओव्हर हेड पोर्टलवर व्यक्ती चढला. यामुळे लोकल ट्रेन काही काळ थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वेची वाहतूक देखील खोळंबली होती. पोलिसांनी व्यक्तिला ताब्यात घेतलं जीआरपी पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई केली आहे. 

  • संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी गठीत

    संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आलीय. आयजी बसवराज तेली एसआयटी प्रमुख असणार आहेत. तर यामध्ये दहा पोलीस अधिकाऱ्यांचा  देखील समावेश असणार आहे. पंकजा मुंडेंसह इतर नेत्यांनी केली होती एसआयटी चौकशीची मागणी. 

  • महाराष्ट्रात नक्षलींची भरती पूर्णपणे संपुष्टात आलीय : देवेंद्र फडणवीस 

    आजचा दिवस जवानांसोबत घालवता आला याचा मला आनंद. गडचिरोलीत 75 वर्षानंतर पहिल्यांदा अहेरी ते गर्देवाडा बससेवा सुरु झाली.  सी-60 जवानांचा सत्कार करण्याचं भाग्य मिळालं. महाराष्ट्रात नक्षलींची भरती पूर्णपणे संपुष्टात आली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

  • संभाजीनगरमधील 21 कोटी क्रीडा विभागातील घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

    संभाजीनगरमधील क्रीडा विभाग 21 कोटी घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागरला अखेर अटक. आर्थिक गुन्हे शाखेकडून हर्षला दिल्लीतून अटक करण्यात आलीये. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

  • बीडमध्ये भागीदारीच्या पैशांतून दोन व्यावसायिकांमध्ये वाद

    बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीये. भागीदारीच्या पैशांतून दोन व्यावसायिकांमध्ये वाद झाला आहे. पायाला कुलूप लावून भागीदाराला डांबलं. बीडमध्ये भागीदाराचा अमानुषपणा समोर. पायाच्या कुलूपासोबत भागीदाराची पोलिसांत तक्रार. भागीदारीतील व्यवसाय वाढीसाठी मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या साथीदारालाच लुटण्यात आल्याचा प्रकार समोर. 

  • एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती  

    एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. कंत्राटदाराच्या फायद्यासाठी वाढीव दराने बसेस भाड्याने घेण्याचे काढले होते कंत्राट. यामुळं एसटी महामंडळाला सुमारे २ हजार कोटींचा तोटा होणार होता. भरत गोगावले एसटी महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर या निविदा प्रक्रियेला वेग आल्याची माहिती समोर आलीये. 

  • CID कडून वाल्मिक कराड यांची चौकशी

    CID पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडून वाल्मिक कराड यांची चौकशी. सकाळी देखील 4 जणांकडून झाली होती वाल्मिक करड यांची चौकशी. 

  •  उद्या दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक

    खातेवाटपानंतरची पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक उद्या मंत्रालयात पार पडणार आहे. या बैठकीत बीड आणि परभणी घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाकरे गटाला कोकणात धक्का, माजी आमदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

    कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार. माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत. निवडणुकीत आणि निवडणूकनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची मनात भावना शिवाय, कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची राजन साळवी यांना चिंता महिनाभरात राजन साळवी घेणार निर्णय. राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार याबाबतीत वेगवेगळ्या चर्चा कोकणात सुरू आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: बीडमधील जलसमाधी आंदोलन मागे

    बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि आंदोलक यांच्यात चर्चा सुरू असून गावकऱ्यांनी मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं आहे. आरोपींना फाशीची शिक्षा द्या,  अशी गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी मागितली आंदोलकांकडे दहा दिवसाची वेळ. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: वाल्मिक कराडच्या सीआयडीकडून चौकशीला सुरवात 

    वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशीला सुरवात. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडी पथकाकडून चौकशी. सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा पहिला दिवस. एक बंद खोलीत कराडची चौकशी सुरुय. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसंच, 25 जानेवारीला आमरण उपोषण करणार, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: अक्कलकोटमध्ये भाविकांवर काळाचा घाला; अपघातात 4 जणांचा मृत्यू

    अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जातं असताना मैंदर्गी जवळ भीषण अपघात घडला आहे. समोरासमोर झालेल्या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुष जागीच ठार झाले आहेत. तर 7 ते 8 जण गंभीर जखमी आहेत. सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमीना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात करण्यात आले दाखल.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates:  सुदर्शन घुलेच्या घरच्यांची कसून चौकशी 

    बीड हत्याकांड प्रकरणात सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी करण्यात येत आहे. फरार तिन्ही आरोपीच्या नातेवकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकश झाल्याची सूत्रांची माहिती. नातेवाईकांच्या संपर्कात हे तिन्ही आरोपी आहेत का याचा ही तपास सीआयडी कडून होत असल्याची माहिती. सीआयडीकडून तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: बीड हत्याकांडः आज मस्साजोग ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

    सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज मसाजोगचे ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन करणार आहेत. थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मस्साजोग गावाजवळील तलावात हे आंदोलन करण्यात येणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 23 दिवस उलटले तरी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनासाठी गावकरी जमायला सुरुवात झाली असून काही वेळातच आंदोलन आंदोलनास्थळी पोहोचणार आहेत. ज्या आंदोलनात गावातील महिला, वृद्ध व तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: बीड हत्याकांडः CIDचा फोकस आता सुदर्शन घुलेवर

    बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर आता सीआयडीचा फोकस असणार आहे. खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपीच्या CID मुसक्या आवळणार. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत. वाल्मिक कराडच्यानंतर तपास यंत्रणांचा फोकस तीन फरार आरोपीवर

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; राष्ट्रीय महामार्गांवर आजपासून हेल्मेटसक्ती

    नागरिकांची सुरक्षितता तसेच दुचाकी अपघातातील मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आज, १ जानेवारी २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. दुचाकीचालक आणि मागे बसलेला त्याचा सहप्रवासी अशा दोघांनीही हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. तसेच दुचाकीवर मागे बसलेल्या चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी वाहन चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सकाळी 10.30 वाजता लोककल्याण मार्गावर ही सभा होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक आहे. असे मानले जात आहे की आम आदमी पार्टी सरकारच्या सततच्या घोषणांमुळे केंद्र सरकार दिल्लीसाठी काही योजना जाहीर करू शकते.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुंबईत पार पडणार आढावा बैठक

    राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुंबईत पार पडणार आढावा बैठक. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आढावा. 8 आणि 9 जानेवारी रोजी मुंबईतील YB सेंटर येथे पक्षाची बैठक पार पडणार. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाची पुढील दिशा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या बैठकीत ठरवली जाणार. या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आजी-माजी आमदार, खासदार, विधानसभेचे पराभूत उमेदवार तसेच जिल्हाध्यक्ष ,तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी राहणार उपस्थित

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. हैद्राबाद येथील घरी पहाटे निधन. तीन वेळा किनवट मतदार संघाचे होते आमदार. विधानसभा निवडणुकीत झाला होता निसटता पराभव. वयाच्या 69 व्या वर्षी निधन

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सव पुर्वीच्या मंचकी निद्रेला राञी अभिषेक पुजेनंतर प्रारंभ झाला आहे. तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली दरम्यान त्यानंतर प्रक्षाळ पुजेचा विधी पलंगावर पार पडला तर पुढील आठ दिवस देवीची मंचकी निद्रा असणार आहे. तर 7 जानेवारी रोजी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: 'वडिलांचं स्वप्न, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करून पूर्ण करणार'

    राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक रात्री बारा वाजता साईबाबांचे दर्शन घेतलं. आपल्या वडिलांचं महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी साई बाबांकडे प्रार्थना केली असल्याचं वक्तव्य यावेळी दर्शनानंतर विखे पाटील यांनी व्यक्त केले.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: ... तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; खासदार तटकरेंचे आदेश

    रखडलेल्‍या मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून खासदार सुनील तटकरे चांगलेच संतापले आहेत. माणगाव इथं घेतलेल्या आढावा बैठकीत त्‍यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. काळ आणि गोद नदीवरील पुलांची कामे संथगतीने सुरू आहेत. रखडलेल्‍या कामाबाबत अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्‍तर मिळाले नाही. त्‍यामुळे तटकरेंचा संताप अनावर झाला. वेळेत काम न झाल्‍यास अधिकाऱ्यांवर गुन्‍हे दाखल करण्‍याचे आदेश त्‍यांनी दिले.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: साईनगरीत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

    नवीन वर्षाच्या निमित्ताने साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुलं. साई मंदिर परिसरात साईनामाचा जयघोष. नवीन वर्षाचे स्वागत साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी लाखोंच्या संख्येने साईभक्त शिर्डीत दाखल.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates: विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा येथे अनुयायी दाखल

    227 शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत. आतिश बाजी करत सामूहिक बुद्ध वंदनेने शौर्य दिनाला सुरुवात झाली असून मध्यरात्रीपासूनच अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. 2007 व्या शौर्य दिनाच्या निमित्ताने विजय स्तंभाला आकर्षक सजावट करण्यात आली असून यावेळेस विजय स्तंभावर संविधानाची प्रतिकृती सादर करण्यात आली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link