Breaking News LIVE Updates : धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर 2 या सिनेमाचं पोस्टर रिलीज

दक्षता ठसाळे-घोसाळकर Sun, 30 Jun 2024-11:14 pm,

Today Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Today Breaking News LIVE Updates: राज्यातील व देशातील राजकीय व इतर घडामोडींचा आढावा घेऊया या लाइव्ह अपडेटमधून. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुकाराम महाराज आणि माऊलींची पालखी आज पुण्यात दाखल होणार आहे. माऊलींच्या पालखीचा आज पुण्यात मुक्काम असणार आहे. लाखो वारकरी सोहळ्यात दाखल. 


साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा याची अनुभूती पुणेकर आज घेत आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होत आहे. तुकोबारायांची पालखी आकुर्डीचा मुक्काम उरकून तर ज्ञानोबांची पालखी आळंदीतला मुक्काम उरकून पुण्यनगरीत दाखल होत आहे. या निमित्ताने पुणेकरांनी संत जनांच्या स्वागताची जय्यत तयारी केलीये... राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.  संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम असतो.तुकाराम महाराजांच्या पादुका निवडुंग्या विठोबा मंदिरात तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखी विठोबा मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येतात. त्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांच्या रांगा लागतात. 

Latest Updates

  • धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर 2 या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं. हा सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ , ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे उपस्थित होते. 

  • यंदाही आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलनाचे सावट पहायला मिळत आहे. होलार समाजाचा अभ्यास करण्यासाठी आयोग स्थापनेसाठी होलार समाज आक्रमक.  आषाढी यात्रेत अभ्यास आयोग आणि आर्थिक विकास महामंडळासाठी होलार समाज मुख्यमंत्र्यांना रोखणार. आर्थिक विकास महामंडळ आणि अभ्यास आयोगासाठी ऐन आषाढी यात्रेत होलार समाज आंदोलन करणार आहे. पंढरपुरात होलार समाजाच्या बैठकीत हा निर्णय झाला. होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार  यांनी ही माहिती दिली. 

  • Breaking News LIVE Updates :पुणे पोलिसांची भिडे गुरूजीना नोटीस; कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या

  • महायुतीतल्या घटक पक्षांना एकत्र घेऊन विधानसभा निवडणूक लढा...कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप प्रभारींचे आदेश...तर टीम इंडियाप्रमाणे विधानसभेला महायुती मॅच जिंकेल...फडणवीसांचा दावा

  • अमरनाथ यात्रेसाठी जम्मूहून भाविकांचा आणखी एक जत्था रवाना...यात्रेचा आजचा दुसरा दिवस...

  • पंतप्रधान मोदींचा रोहित, विराट आणि राहुल द्रविडशी फोनवरून संवाद...टीम इंडियाचं केलं कौतुक

  • पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बातमध्ये पंढरपूरच्या वारीचा उल्लेख केला. त्याचबरोबर वारक-यांना शुभेच्छा दिल्या.

  • महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार...जुलैच्या शेवटपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जागावाटपाचा प्रश्न सोडवू..झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत नाना पटोलेंची माहिती...

  • नव्या सरकारच्या स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच मन की बात कार्यक्रम आज सादर केला. 
    भाजप नेते प्रसाद लाड यांनी त्यांच्या भाजप कार्यालयासमोर मोठं स्क्रीन लावत प्रसारण केलं. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते

  • पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राहुल भोसले, समीर मासुळकर, पंकज भालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...भेट घेणाऱ्यांमध्ये माझी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडेंचं ही नाव असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय...त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू आहे...

  • तिस-या कार्यकाळात आजपासून नव्याने सुरू होणार मन की बात...सकाळी ११ वाजता पंतप्रधान साधणार संवाद

  •  जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आज पिंपरी चिंचवड मधून पुण्याकडे प्रवास सुरू केला असताना पिंपरी-चिंचवडमध्ये ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांनी ही पुण्याकडे विठू नामाच्या गजरात पुण्याकडे प्रवास सुरू केला. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link