Maharashtra Monsoon Session 2023 LIVE Updates: किरीट सोमय्या कथित व्हिडीओप्रकरणी सखोल चौकशी होणार, फडणवीसांची ग्वाही
Maharashtra Monsoon Session 2023 Live : आज विविध मुद्द्यांवरून विरोधक सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपा नेता किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. त्याचे परिणाम अधिवेशनातही दिसण्याची शक्यता आहे.
Maharashtra Monsoon Session 2023 Live : राज्य विधिमंडळाच्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरलं होतं. मात्र काही वेळातच अधिवेशनाचा पहिली दिवस आटोपता घेण्यात आला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज वादळी होण्याची शक्यता आहे. विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांना अपत्रातेची नोटीस ते किरीट सोमय्या यांचा कथित व्हायरल व्हिडीओ यामुळे दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.
Latest Updates
- कोर्टात जा आणि पुन्हा ताशेरे ओढवून घ्या - सुधीर मुनगंटीवर"उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केलेच नाही. त्यामुळे कारवाई होण्याचा विषयच नाही. तुम्हाला वाटतय की जर चुकीचं आहे तर कोर्टात जा आणि पुन्हा ताशेरे ओढवून घ्या. विरोधकांची अवस्था अशी आहे की धुल थी चेहरे पर और वे आएना साफ करते रहे," असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सचिन अहिरदेखील भाजपात येतील - सुधीर मुनगंटीवार
"माझी भविष्यवाणी आहे. एक दिवस असा येईल की सचिन अहिरदेखील भाजपात येतील. हे मी गांभीर्याने सांगतोय. अनिल परब यांची अवस्था महाभारतातील अश्वथामासारखी होईल," असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
पेनड्राईव्ह दिलाय पण तो पाहणे मोठे कठीण काम आहे - निलम गोऱ्हे
"सोमय्याप्रकरणी फडणवीसांनी चौकशी जाहीर केली आहे. याप्रकरणात एक अस्वस्थ करणारा मुद्दा आहे. व्हिडीओ ब्लर करून चॅनेल्सवरून घराघरात हे शॉर्ट्स दाखवले जातात. आपल्या घरात मुलं मुली पाहतात. मी विनंती करीन की तुम्ही व्हिडीओ ब्लर करत असला तरीही सगळं कृत्य परत परत दाखवता. व्हिडीओ दाखवत असताना थोडं बंधन ठेवा. पोलिसांच्या चौकशीत या वाहिन्यांनी गोपनिय स्वरुपात माहिती द्यावी. जेणेकरून पीडित महिलेपर्यंत पोहोचणं शक्य होईल. तुम्ही पेन ड्राईव्ह मला दिला आहे, तो बघणं म्हणजे फार कठीण परीक्षा आहे माझ्यासाठी. पण मी त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर या मान्यवराना ते बघायला सांगेन. त्या महिलेचे तक्रार आली पाहिजे, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.
किराट सोमय्या महाराष्ट्र द्रोही - अंबादास दानवे
"काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला आहे. माझ्याकडे आठ तासांचे व्हिडीओ आहेत. मी सभापतींना ते देणार आहे. किरीट सोमय्या मराठी माणसांवर अत्याचार करत आहेत. किरीट सोमय्या यांनी काय काय केले हे सर्वांना माहिती आहे. अशा किरीट सोमय्यांना सत्ताधारी पक्ष संरक्षण देणार का? किरीट सोमय्यांमुळे अनेकांना तुरुंगात जावं लागलं आहे. किराट सोमय्या महाराष्ट्र द्रोही आहे," असेही अंबादास दानवे म्हणाले.
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार - देवेंद्र फडणवीस
"हा विषय गंभीर आहे. राजकारणात असे अेक प्रसंग येतात ज्यामध्ये संपूर्ण आयुष्य पणाला लागते. मी यासंदर्भात तक्रारी असतील तर द्याव्यात त्याबद्दल चौकशी करु. काही ठोस असेल तर त्याची चौकशी करु. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून याचा तपास करतील," असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अंबादास दानवेंचा किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप
"राजकारणामध्ये काही लोक ईडी, सीबीआयची भीती दाखवतात आणि त्याच्या माध्यमातून ब्लॅकमेंलिंग करणे, खंडणी मागतात अशा प्रकारच्या बाबी समोर आल्या आहेत. हिच व्यक्ती त्यांच्याच पक्षातील काही महिलांना जबाबदारी देतो सांगून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करतात. नैतिकतेचा धडा देणाऱ्या पक्षाची एक व्यक्ती महिलांना महामंडळात नियुक्त्या देतो असे सांगतो. ही अपप्रवृत्ती समोर आली आहे. माझ्याकडे काही व्हिडीओ आले आहेत. अशा व्यक्तीला केंद्राची सुरक्षा आहे. या सुरक्षेचा वापर महिलांचा छळ करण्यासाठी केला जात आहे," असे अंबादास दानवे म्हणाले.
अमली पदार्थांच्या विक्रीबाबत शासनाने कारवाई करावी; रोहित पवार यांची लक्षवेधी
"अमली पदार्थांच्या विक्रीत वाढ होत असल्याने शहराच्या तरुणाईचे भविष्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी," अशी लक्षवेधी रोहित पवारांनी मांडली.
बार्टी प्रश्नावरुन आक्रमक होत विरोधकांचा सभात्याग
बार्टी संस्थेच्या माध्यमातून विधानसभेत मांडला होता. बार्टीद्वारे मागासवर्गीय मुलांसाठी प्रशिक्षण दिले जाते. मात्र मागासवर्गीय मुलां- मुलींवर प्रशिक्षण माध्यमातून अन्याय करण्यात येत आहे. त्यामुळे मागासवर्गीय मुलांच्या अडचणीत वाढ झाली आहे, असे नाना पटोले म्हणाले. 20 हजार मुलांचे प्रशिक्षण न्याय प्रविष्ट आहे. मंत्री तयार नव्हते त्यामुळे चुकेची उत्तर देत आहेत. सरकारमधील घटक पक्ष दुर्लक्ष करत नाहीत. देशात दलितांना, शोषितांना टार्गेट केले जात आहे. बार्टीतून मुलांवर अन्याय केला जात आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Monsoon Session 2023 LIVE Updates : बार्टी प्रश्नावरुन विरोधकांचा सभात्याग
बार्टी प्रश्नावरुन विरोधकांनी आक्रमक होत सभात्याग केला आहे.
अपने धंदे मे एक जाएगा तो सब जायेंगे हे लोकांनी लक्षात ठेवावं - नितेश राणे
"किरीट सोमय्या यांनी सकाळीच याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. पण सत्या चित्रपटातील एक संवाद आहे की, अपने धंदे मे एक जाएगा तो सब जायेंगे. त्यामुळे लोकांनी हे फक्त लक्षात ठेवावं. किरीट सोमय्या यांनी जी तपासाची मागणी केली आहे त्याबाबत माहिती आली की सत्यता बाहेर येईल मग बोलू," असे नितेश राणे म्हणाले.
भाजप सोम्मयांना क्लीन चीट देणार का?; भास्कर जाधव यांचा सवाल
"आज गोदी मिडिया असा उल्लेख मिडियाचा केला जातो. एका चॅनलने धाडस दाखवले त्याचे अभिनंदन करतो. सोम्मया हे भ्रष्टाचार मुक्त भारत आणि महाराष्ट्र करणार होते . लोकांची घर तोडायला जात होते. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी पत्र लिहलं आहे. ही चौकशी ईडी सीबीआय किंवा अन्य कोणाला देणार का? किरीट सोम्मया भाजपचा मापदंड आहे का? धनंजय मुंडेच्या बाबतीत करुणा शर्मा पूजा प्रकरणी संजय राठोड, ब्रिजभूषण, राहुल शेवाळे, सोलापूर विजय देशमुख, अशा अनेक महिलांना न्याय मिळाला नाही. भाजपकडून महिलांना न्याय मिळेल का? भाजप सोम्मयांना क्लीन चीट देणार का?," असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे.जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका - संजय राऊत
"आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, "जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका." नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे. जय महाराष्ट्र!" असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला उत्तर नाहीच
16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून 14 दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं होतं. मात्र, मुदत संपूनसुद्धा ठाकरे गटाकडून या नोटिशीला उत्तर देण्यात आलेलं नाही. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला उत्तर देण्यात आलं आहे.
विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यावंर आंदोलन
विरोधकांकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेस नेत्यांसह आता राष्ट्रवादीच्या आमदारांनाही सहभाग घेतला आहे. "लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो", "मंत्री तुपाशी, जनता उपाशी," यासंह अनेक घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहे.
निलम गोऱ्हेंना पत्र दिलं तरी त्या खुर्चीवर - अंबादास दानवे
शेतकऱ्यांचा मुद्दा महत्वाचा आहे. काल आम्हाला बोलु दिले नाही. उपसभापती यांना अपात्र करावे असे पत्र दिले तरी त्या खुर्चीवर बसल्या आहेत. त्यामुळे न्याय कसा मिळणार? असा सवाल विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.