Breaking News LIVE Updates: उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा आहे. अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. तर, आजपासून अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु होणार आहे. आजपासून विविध राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यातील दिवसभरातील महत्त्वाचा घडामोडींचा धावता आढावा.
Latest Updates
उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. 5 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथे जाहीर सभा होणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी मुंबईत सांगता सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात 16 नोव्हेंबर रोजी सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या 20 ते 25 जाहीर सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मविआच्या संयुक्त सभांचा देखील समावेश असणार आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या देखील सभा होणार आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: 'काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच सिंचन घोटाळ्याची फाईल उघडली'
काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच सिंचन घोटाळ्याची फाईल उघडली गेली आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मोठ्या नेत्यांची नावं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासह माजी मुख्यमंत्र्यांची स्टार प्रचारकांच्या यादीत नाव. महाराष्ट्रातून नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह मोठ्या नेत्यांची नावं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज मैदानात
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह बडे नेते उतरणार प्रचाराच्या रिंगणात. शतकी सभांच्या माध्यमातून विधानसभा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न. पंतप्रधान मोदींच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात एकूण ८ सभांचे नियोजन
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: निकालाआधीच मनसेला धक्का; अकोल्यातील उमेदवाराचा नामांकन अर्ज रद्द
अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघातून मनसे उमेदवार प्रशंसा आंबेरे यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला आहेय..विधानसभेच्या निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाने 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची अट दिली आहेय..अकोला पश्चिमच्या मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांच वय 25 पेक्षा कमी असल्याने यांचा नामांकन अर्ज छाननी दरम्यान बाद करण्यात आला आहेय..मनसे उमेदवार यांना 25 वर्ष पूर्ण करण्याकरिता 24 दिवसांचा अवधी बाकी असल्याचा कारणाने त्यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला आहेय..
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी मतदारसंघात महायुतीची मैत्रीपूर्ण लढत
महायुतीत विदर्भामध्ये एकमेव मैत्रीपूर्ण लढत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी तर्फे आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून उमेश यावलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याने महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आमदार देवेंद्र भुयार यांना अजित पवारांच्या पक्षाने शेवटच्या क्षणी दिली उमेदवारी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण स्थानकात एक्सप्रेसमध्ये बिघाड
छत्रपती शिवाजी महाराज हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म 4वर अचानक बिघाड झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: आमदार देवेंद्र भुयार आणि माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यातील वाद चव्हाट्यावर
2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांना निवडून आणण्यासाठी माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी मोठी भूमिका निभावली होती त्यामुळे हर्षवर्धन देशमुख आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यात मोठे सौख्य पाहायला मिळाले होते मात्र आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने भुयार आणि देशमुख यांच्यात अनेकदा खटके उडाले होते मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार देवेंद्र भुयार आणि माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: मुंबईत शिवसेना UBT जास्त जागा लढणारः संजय राऊत
विदर्भात काँग्रेस जास्त जागा लढवणार तर मुंबईत शिवसेना UBT जास्त जागा लढणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: तुळजापुरात काँग्रेसमध्ये बंडखोर, मधुकरराव चव्हाणांनी भरला अपक्ष अर्ज
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुळजापूर मध्ये काँग्रेसचा घोळ मिटला नाही. माजी मंत्री ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी बंडाचे निशाण फडकवत तुळजापूर विधानसभेसाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला. तुळजापूर मधून मी अपक्ष निवडणूक लढवणार .कोणत्याही परिस्थितीत अर्ज माघार घेणार नाही .तुळजापूर मध्ये काँग्रेसच सांगली पॅटर्न राबवणार असं मधुकरराव चव्हाण यांनी स्पष्ट केले. काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मधुकरराव चव्हाण यांनी अपक्ष लढवणार असल्याचे जाहीर केलं.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: सुहास कांदेंच्या विरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल
नांदगाव पोलिसात सुहास कांदे यांच्यावर शिवीगाळ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अर्ज भरताना आणि विरोधात बोलणाऱ्यांवर शिवीगाळ करून दिली होती धमकी. शिवीगाळ करण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदे आहेत शिंदे सेनेचे उमेदवार तर अपक्ष म्हणून समीर भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
राज्यातून एकूण 7 हजार 995 उमेदवारांचे अर्ज
महाराष्ट्रातील विधासभेच्या 288 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. राज्यातून एकूण 7 हजार 995 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. या जवळपास 8 हजार उमेदवारांनी एकूण 10 हजार 905 अर्ज केले आहे आहेत. यासंदर्भातील माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: दादा भुसेंच्या संपत्तीत पाच वर्षात तिप्पट वाढ
मालेगाव बाह्य मतदारसंघात सलग चार वेळा निवडून आलेल्या आणि मुख्यमंत्र्यांचे उजवे म्हणून ओळख असलेल्या दादा भुसे यांची संपत्ती पाच वर्षात जवळपास तिपटीने वाढली आहे. विशेष म्हणजे दादा भुसे यांच्या पत्नी अनिता या त्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत.पाच वर्षांपूर्वी भुसेंची संपूर्ण कुटूबाची एकूण मालमत्ता सहा कोटी ९९ लाख रुपये इतकी होती. मात्र भुसे दाम्पत्याची सध्याची एकूण संपत्ती १८ कोटी ४० लाखांच्या घरात आहे. यात स्वत: भुसे यांच्याकडे तीन कोटी ४१ लाख आणि पत्नीकडे तीन कोटी ४९ लाखांची जंगम मालमत्ता आहे. भुसे यांच्याकडे एक कोटी २२ लाखाची स्थावर मालमत्ता असून पत्नीच्या नावे १० कोटी २८ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. भुसे यांनी मुलांना ७४ लाखांचे कर्ज दिले आहे. पत्नीने प्रवीण बच्छाव यांच्याकडून १५ लाखाचे कर्ज घेतल्याचा उल्लेख आहे. कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या भुसे दाम्पत्यावर सुमारे ३० लाखाचे कर्ज आहे
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर 34 लाखांचं सोनं जप्त
सातारा - पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर 34 लाखांचा सोनं जप्त करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि भरारी पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे. हे सोनं नेमकं कुठून आणले कुठे नेण्यात येणार होते याचा जीएसटी भरला आहे का याची चौकशी वस्तू व सेवा कर विभाग आणि आयकर विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: अखेर 36 तासांनंतर श्रीनिवास वनगांचा कुटुंबीयांशी संपर्क
अखेर तब्बल 36 त्यानंतर पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा याचा कुटुंबीयांशी संपर्क झाल्याचे समजते. पहाटे श्री निवास वनगा हे घरी येऊन कुटुंबीयांना भेटून पुन्हा दोन दिवस बाहेर गेले असल्याचं त्याच्या पत्नी सुमन वनगा यांनी सांगितले. आपल्याला आरामाची गरज असल्याचं कारण सांगत, श्रीनिवास पुन्हा बाहेर गावी जात असल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कुटुंबीयांची चिंता मिटलेली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: अर्ज भरण्याचा काल होता शेवटचा दिवस
अखेरच्या दिवसापर्यंत मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात एकूण 618 उमेदवारांनी 778 अर्ज भरले आहेत. मुंबईत अणुशक्तीनगर मतदारसंघात सर्वाधिक 37 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दिंडोशी मतदारसंघात 32, मानखुर्द शिवाजीनगर 29, चांदिवली 27, जोगेश्वरी 25 आणि मुंबईतल्या उतार मतदारसंघात दाखल झालेल्या अर्जाची संख्या 20 च्या आसपास आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटाची तारीख 4 नोव्हेंबर आहे. अखेरच्या दिवसापर्यंत या आकड्यांमध्ये घट होणार का? हे पाहणं महत्त्वाचे असेल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: निवडणूक कालावधीत चार दिवस मद्य विक्री बंद
जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक कालावधीत म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यत. तसेच २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केले आहेत.या आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल, तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: सर्वाधिक बंडखोर उमेदवारांची संख्या ही महायुतीत
अकोला जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे ते म्हणजे नाराज इच्छुक उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याने.यामध्ये सर्वाधिक बंडखोर उमेदवारांची संख्या ही महायुतीत आहेत. सर्वाधिक आऊट गोईंग भाजपमध्ये असून सर्वाधिक इन कमिंग प्रहार पक्षात आहे. काल पर्यंत मोठी ताकद नसलेल्या तिसरी आघाडीला नाराज इच्छुकांमुळे आता बळ आला आहेय.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: ...तर उमेदवारी अर्ज मागे घेईल सुनील शेळकेंचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना खुले आव्हान
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण दिलेल्या माहितीतील एक शब्द जरी खोटा असेल, तर मी उमेदवारी अर्ज मागे घेईन, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळचे महायुती उमेदवार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात दोन दिवसांपूर्वी मावळमधील महायुती चा तेढ सोडवण्यासाठी चर्चा झाली. मात्र ती चर्चा निष्फळ ठरत दुसऱ्या दिवशीच बाळा भेगडे यांनी बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या व्यासपीठावर हजेरी लावली.